अध्याय १४ वा - श्लोक २

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


अस्यापि देव वपुषो मदनुग्रहस्य स्वेच्छामयस्य न तु भूतमयस्य कोऽपि ।
नेशेमहि त्वतसितुं मनसांऽतरेण साक्षात्तवैव किमुताऽऽत्मसुखानुभूतेः ॥२॥

सगुण सुलभ नेत्रांपुढें । प्रेम रसाचें रूपडें । सर्वेंद्रियां फावे कोडें । तैसें निवाडें अवतरलें ॥६७॥
तरी याही तुझिया स्वरूपाचा । ब्रह्मादिक महिमा साचा । जाणो न शकती तेथ कैंचा । आणिकांचा प्रवेश ॥६८॥
देव म्हणोनी संबोधन । स्वप्रकाशें द्योतमान । ज्याचे द्योतनें करून । आब्रह्मभुवन द्युतिमंत ॥६९॥
हेंही देवा तुझें वपु । मदनुग्रहार्थ जें सकृपु । स्वजनइच्छेसारिखें रूप । सुरपादप पडिपाडें ॥७०॥
देवकीवसुदेवांतें कळे । तैसें दावूनि बंदिशाळे । त्यांचे स्वेच्छेनें मोकळें । बाळलीले हें धरिलें ॥७१॥
इतुका कळला असतां बोध । म्हणसी कैसेनि हें अगाध । तरी जेणें गुंतती विबुधबुध । झालों मुग्ध मी एथें ॥७२॥
तें तूं ऐकें यादवराया । अयोनिसंभव तुझी हे काया । नोहे इतरां भूतमयां । तुल्य म्हणोनिया अगाध ॥७३॥
अतर्क्य ऐश्वर्य हें तुझें । आपुलेनि प्रज्ञाबळें बुझें । ऐसा नसेची जेथें माझें । ज्ञान लाजे फल्गुत्वें ॥७४॥
हेंचि अतर्क्य अधोक्षजा । द्विभाग जाहली कलिंदजा । पूतना पावविली सायुज्या । शोषूनि स्तनजा गरातें ॥७५॥
शकट मृदुपदें भंजन । तृणावर्त प्रपातन । मेरूहूनी गरिष्ठपण । मिषें जृंभण जग दावी ॥७६॥
मुखीं देखोनि ब्रह्मांडगोळ । माता व्यामोहें व्याकुळ । तिचे स्वेच्छेसारिखें केवळ । धरिलें कोमल हें वपु ॥७७॥
यमलार्जुनां उन्मूळणें । नारदोक्तीपरिमार्गणें । गुह्यकाचे प्रबोधनें । हें कें करणें भूतमय ॥७८॥
वत्सासुर बकासुर । मारूं आले कपटधर । त्यांचें कळलें अभ्यंतर । तें शरीर भूतमय ॥७९॥
वत्सें वत्सप गिळिले अघें । स्वयेंचि त्याचे वदनीं रिघे । अक्षत स्वकीय काढूनि अवघे । मग सवेगें तो वधिला ॥८०॥
त्याची विशुद्ध आत्मज्योति । पहातां अस्मदादि समस्तीं । तुझी लक्षूनि हेचि मूर्ति । समरस पावती जाहली ॥८१॥
तें देखोनि पदाभिमानें । बद्ध झालों रजोगुणें । वत्सवत्सप म्यां दुर्जनें । मायिकपणें लपविले ॥८२॥
तो त्वां निरसूनी दुस्तर मोहो । कृपेनें केला अनुग्रहो । जेणेंकरूनी तोचि हा देहो । नयनीं पाहो प्रत्यक्ष ॥८३॥
केला अनुग्रहो मजवरी । त्या देहाची पाहतां थोरी । जन्म घेऊनि कोटीवरी । गुण निर्धारीं असमर्थ ॥८४॥
अथवा विराट भूतमय । तुझें वपु म्हणों जरी ज्ञेय । तरी तेंही स्वामी अप्रमेय । विदित होय को ण्हींसी ॥८५॥
आपुले आंगीं भां किति । गणनानियमें न गणिजती । मीं विराट पुरुषा तव गुण्यंति । अनियमगति अगाध ॥८६॥
स्वेच्छामय किंवा विराट । याचे महिमेचा शेवट । नलगे तेथ नित्य निघोट । शुद्ध चोखट केवीं कळे ॥८७॥
इयें शुद्ध सत्त्वात्मकें । मादृशस्वजनानुग्राहकें । मां ब्रह्म असिकें । केवीं कळे ॥८८॥
करूनि शमादि साधन काढि । विशुद्ध मानस योगी हट्टी । त्यां हें सगुणचि न कळे कष्टीं । मां कैची गोष्टी अगुणाची ॥८९॥
जें कां स्वानुभवैकगम्य । तुझें केवळ परम धाम । ब्रह्मादिकांस अति दुर्मळ । म्हणो तें रहस्य किमुत हें ॥९०॥
एथ म्हणसी जनार्दना । जरी मी अप्राप्य साधना । तरी प्राकृतां अज्ञानां जनां । भवनिस्तरणा अनुपाय ॥९१॥
यदर्थीं ऐकें पुरुषोत्तमा । सांडूनि जाणिवे इया श्रमा । जे अनुसरले भक्तिप्रेमा । त्यांचा महिमा परियेसीं ॥९२॥

N/A

References : N/A
Last Updated : April 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP