अध्याय १४ वा - श्लोक ३

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


ज्ञाने प्रयासमुदपास्य नमंत एव जीवंति सन्मुखरितां भवदीयवार्ताम् ।
स्थाने स्थिताः श्रुतिगतां तनुवाड्मनोभिर्ये प्रायशोऽजित जितोप्यसि तैस्त्रिलोक्याम् ॥३॥

ज्ञानसाधनाचे श्रम । जिहीं जाणोनि अतिदुर्गम । सोडिला तत्प्राप्तीचा उद्यम । यत्न अणुसम न करितां ॥९३॥
स्वस्थ सद्भावें आपुले सदनीं । राहिले होत्साते अनुदिनीं । तुझिया गुणवर्ता सज्जनीं । कथितां श्रवणीं ज्या पडली ॥९४॥
सज्जनवेषें असज्जन । तव्गुणमिषें पाषंडकथन । हें उमजावया भाविकजन । सावधान परिसोत ॥९५॥
द्रव्यलोभें गुणपाठक । केवळ कळिकाळींचे ते ठक । सोंग दावूनि ठकविती लोक । अतिदांभिक शठ दुष्ट ॥९६॥
जेवीं वार्द्धूष वराटिका - । लोभें वस्तु ओपिती लोकां । तेंवी सधना सकामुकां । नाना कौतुक शंसिती ॥९७॥
हरिकथा हें नाममात्र । एरव्हीं ढोढाख्याचरित्र । श्रोते वक्ते निरयपात्र । श्रोत्रवक्र वाढवितां ॥९८॥
सोडूनि अन्य व्यवसाव । अवगुणींचे महानुभाव । पोटीं द्रव्याचा उपाव । वरी महत्त्व संतांचें ॥९९॥
वर्णाश्रमाचारधर्म । नवांमाजीं कोण्ही प्रेम । नाहीं सन्मार्गीं नित्य नेम । बाह्यसंभ्रम पोटार्थ ॥१००॥
तें अशास्त्र अनाधार । पुराणोक्त ना शिष्टोद्गार । पाखंडगाथा स्वैराचार । प्रशंसापर दुर्वक्ते ॥१॥
ऐशियां असज्जनांपासून । असत्कथांचें करिती श्रवण । तेही फुकट देऊनि धन । नरकसाधन प्रयत्नें ॥२॥
सुलभ सांडूनि पीयूष । मोल वेंचूनि घेती विष । प्राणहानीचा मानिती तोष । जेवीं सदोष सव्रीड ॥३॥
ऐसे नव्हते ते सज्जन । जे कां सन्मार्गपरायण । नित्यनेमें भगवद्गुण । करिती कीर्तन सप्रेमें ॥४॥
ज्यांचेनि मुखें जे मुदितां । तव गुणाची रसाळ वार्ता । त्यांचेनि सन्निधिमात्रें चित्ता । आनंदभरिता परिसती ॥१०५॥
ऐशी तुझिया गुणाची कथा । श्रवणें नाशिजे भवव्यथा । बैसवी मोक्षाचिये माथां । जे परमार्था मूळभूमी ॥६॥
असतां आपुले स्वेच्छासदनीं । सज्जनीं स्वभावें गातां वदनीं । सहज स्थितीनें पडतां कानीं । आनंद मनीं उद्बोधी ॥७॥
आलिया पाषाण निजांगणीं । तो जरी सकळ चिंतामणि । झालिया तयाचे रक्षणीं । आळस कोणी न करी कीं ॥८॥
तैशी अनायासें तुझी कथा । श्रवणा आली न प्रार्थितां । तिणें हरितां दुस्तर व्यथा । मग सर्वथा न त्यजिती ॥९॥
कायावाचामनेंकरून । अनन्यभावें होती शरण । अभिवंदिती प्रशंसून । करिती कीर्तन सप्रेमेम ॥११०॥
ऐसे श्रवण कीर्तनपर । ज्याचें जीवित निरंतर । त्याविण साधनप्रकार । जे अणुमात्र न करिती ॥११॥
परी जे तव गुणांहूनी । पढियें मानूनि घेती श्रवणीं । अभिवंदिती सत्कारूनि । गाती वदनीं सप्रेमें ॥१२॥
ज्यापासूनि श्रवणा रुचि । झाली उपरति मानसाची । गोडी रुचली स्वानंदाची । हे कृपा त्यांची कळली कीं ॥१३॥
लोहा पालटि स्पर्शमणि । कीं चिंता पुरवी चिंतामणि । अमूल्य रत्नीं कां पाषाणीं । यांची करणी केवीं घडे ॥१४॥
मलयागरें वेधती काष्ठें । कीं भस्म होती हव्यवाटें । तेवीं मिडगणें लखलखाटें । वाळुवंटें न जळती ॥११५॥
तेथ उसिना रविप्रकाश । तैसा बाह्य विद्याभ्यास । नेदी स्वानुभवाचा लेश । प्रेमा ओस हृदयीं तो ॥१६॥
म्हणोनि जिहीं हरिगुण । गाऊनी वेधिलें अंतःकरण । तेचि कृपाळु सज्जन । स्वानंदघना ओळखिले ॥१७॥
तेथ कायावाचामनेंधनें । अवंचकता अनन्यपणें । सोडूनि येरें ज्ञानसाधनें । तव गुणश्रवणें रंगलें ॥१८॥
जळावेगळा न वसे मीन । तैसें कथामृताचें श्रवण । यावज्जीवन हें जीवन । करूनि धन्य हे झाले ॥१९॥
जो तूं अजिंक्य लोकत्रयीं । कोण्ही जिंकिला न वचसी कांहीं । त्या तुज आजि जिंकिलें तिहीं । बैसले ठायीं गुणश्रवणें ॥१२०॥
ब्रह्मादिकां दुर्लभब भेटी । सनकादि सांडूनी वैकुंठीं । तूं प्रकटसी कोरडे काष्ठीं । वचनासाठीं तयांच्या ॥२१॥
शत क्रतूंचे राबणें । देखोनी शक्रत्वास भीकणें । त्या तुज जिंकूनी आंगवणें । द्वाररक्षणें ठेविलें ॥२२॥
शिवादि पादोदक मुकुटीं । धरूनी ध्याती श्मशानमठीं । त्यांतें उमरडूनी वळी थाटी । धरूनि काठी वत्सांच्या ॥२३॥
स्वाधीन कैसी प्रेमचाडें । मागें अनेक देखिले गाढे । अझून होतील पुढें पुढें । कृपाउजेडें ते दिसती ॥२४॥
पुंडरिक द्वारीं उभे । करील प्रेमाच्या वालभें । तेथील कीर्तनाचिया लाभें । कलि न शोभे लाजोनी ॥१२५॥
प्रेमें जिंकोनी धर्म बळी । काढवी जो पत्रावळी । शब्द नुलंघवील पांचाळी । आज्ञे तळीं ठेवील ॥२६॥
अर्जुनें धोवविलीं घोडीं । भीष्म युद्धाचे कडाडीं । ....................... । हारी रोकडी ओपील ॥२७॥
एका गह्रीं वाहसील पाणी । एका मागें फिरसी रानीं । बैसोनि एकाचे कीर्तनीं । करिसी दाटूनी परिचर्या ॥२८॥
शंख चक्र गदा पद्म । वाहतां न चले तव विक्रम । तिहीं जिंकिलासि निष्काम । काम ज्यांचें प्रेम तवगुणीं ॥२९॥
त्यांसी ज्ञानाचे सायास । करणें नलगे योगाभ्यास । भक्ति सार ज्ञान भूस । तो विशेष विधि बोले ॥१३०॥

N/A

References : N/A
Last Updated : April 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP