पौष शुद्ध २

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


श्री नृसिंहसरस्वतींचा जन्म

चौदाव्या शतकांत पौष शु. २ या दिवशी दत्त सांप्रदायांतील प्रसिद्ध पुरुष श्री नृसिंहसरस्वती यांचा जन्म झाला.
शिव आणि विष्णु यांची उपासना   एकरुपाने करणा-या  दत्तसांप्रदायाने  महाराष्ट्रांत संस्कृती प्रसाराचें कार्य चांगलेच केले आहे. श्रीपाद श्री वल्लभांच्यांनंतर श्री नृसिंहसरस्वतींचा अवतार झाला.  श्रीपाद श्री वल्लभांनी कुरवपुरास अंबिका नावाच्या स्त्रीस आशीवाद  दिला होता  की, पुढील जन्मी तुला अलौकीक पुत्र होईल. ही अंबिकादेवी मरणोत्तर  व-हाडांत  कारंजगावी जन्मास आली. ' जन्म झाला पुढे तियेंसी। करंजनगर उत्तरदेशीं । वाजसनेय  शाखेसी। विप्र कुळी जन्मली ।या जन्मी तिचं नांव अंबाभवानी असे होते. माधव नावाच्या  धर्मनिष्ठ  ब्राम्हणाशी तिचा विवाह झाला आणि यांच्या पोटी नृसिंहसरस्वतींचा जन्म झाला. यांचे चरित्र पहिल्यापासुनच अलौकिक अशा चमत्कारांअनी भरुन राहिले आहे. असे सांगतात की, " जन्मताच तो बालक । ॐकार शब्द म्हणतसे ऐक. ज्योतिषानी याचे भविष्य असे वर्तविले की, न होती तयांसी गृहिणीसुत । पूज्य होईल त्रिभुवनात.' ॐ या अक्षराखेरीज दुसरा कोणताहि उच्चार हे बालक  करीत नसल्यामुळे  सर्वांना चिन्ता लागून राहिली.परंतु मुंज झाल्यानंतर आईने पहिली भिक्षा घातली तेव्हा यांनी ' अग्निमुळे पुरोहित," 'इषेत्वा' 'अग्नि आयाहि ' इत्यादि वेदांतील चार मंत्र म्हणून दाखविले.  त्यानंतर यांनी आईच्या आग्रहासाठी  घरच्या घरींच वेद्पठ्ण  केले. दूसरी भावंडे झाल्यावर हे तिर्थ यात्रेस निघाले.
 काशी येथे नृसिंहसरस्वतींनी खडतर असें तपोनुष्ठान केले.  त्याच ठिकाणी कृष्णसरस्वती नावांचे एक तपोनिष्ठ व अति वृद्ध  संन्यासी होते. त्याच्यांपासून यांनी संन्यासाची दिक्षा घेतली. श्री नृसिंहसरस्वतींचे संपूर्ण चरित्र  गुरुचरित्रांत  वर्णिले आहे.  हे साक्षांत्‍ दत्तांचा अवतार असल्यामुळे यांच्या जीवितात   अनेक अद्भूत आणि चमत्कारिक  गोष्टींचा  संग्रह झाला आहे.  हे नृसिंहसरस्वती शके १३८० मध्यें  समाधिस्थ झाले.

शिशिर ऋतू  माघ मासीं । आसित पक्ष प्रतिपदेसि ।  
शुक्रवारी पुण्य दिवशी। श्री गुरु बसले निजानंदी ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 02, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP