अन्नवहस्त्रोतस् - उत्क्लेश
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
उत्क्लिश्यान्नं न निर्गच्छेत् प्रसेकष्ठीवनेरितं ।
हृदयं पीड्यते चास्य तमुत्क्लेशं विनिर्दिशेत ।
सु. शा. ४-५३ पान ३६०
अन्न कोष्ठांतील वायूच्या क्षोभामुळें उत्क्लेश पावते, डुचमळते, विमार्गग होऊं पाहतें वा प्रतिलोम होतें. त्यामुळें लाळ सुटणें, थुंकी येणें; अशीं लक्षणें होतात. छातीमध्यें भरुन आल्यासारख्या अडकल्या सारख्या वेदना होतात. उलटीच्या रुपानें अन्न बाहेर पडत नाहीं. उमासे मात्र येत रहातात. या स्थितीस उत्क्लेश असें म्हणतात. हा विकार बहुंशी लक्षण म्हणून अजीर्ण, छर्दी उदावर्त या रोगांत असतो.
चिकित्सा
लंघन, शोधन, अनुलोमन, दीपन, पाचन, शमन औषधें शंखवटी, लिंबूपानक, प्रवाल पंचामृत (अग्निपुटी)
N/A
References : N/A
Last Updated : July 23, 2020

TOP