व्याख्या
शरीरामध्यें सूक्ष्म वा स्थूल स्वरुपाचे जंतू उत्पन्न होतात. त्यांनाच कृमी रोग असें म्हणतात.
स्वभाव
व्याधी चिरकारी असून, अत्यंत विविध प्रकारचीं लक्षणें उत्पन्न करणारा असतो.
मार्ग
बाह्य व अभ्यंतर.
प्रकार
क्रियमश्च द्विधा प्रोक्ता बाह्याभ्यन्तरभेदत: ।
बहिर्मलकफासृग्विड्जन्मभेदाच्चतुर्विधा: ॥
मा.नि. क्रिमी-१ पान १०८
इह खल्वग्निवेश । विंशतिविधा: क्रिमय: पूर्वमुद्दिष्टा नाना-
विधेन प्रविभागेनान्यत्र सहजेभ्य:, ते पुन: प्रकृतिभिर्भिद्य-
मानाश्चतुर्विधा भवन्ति तद्यथा-पुरीषज: श्लेष्मजा:, शोणितजा
मलजाश्चेति ।
पूर्वमुद्दिष्टा-इत्यष्टोदरीये संज्ञामात्रकथिता: । ``अन्यत्र
सहजेभ्य:'' इत्यनेन शरीरसहजास्त्ववैकारिका: क्रिमयो
विंशतेरप्यधिका भवन्तीति दर्शयति ।
प्रकृतिभिरिति=कारणै: । मलजा इति=बाह्यमलजा:ळ ।
सटिक चि. वि. ७-९ पान ५४१
कृमीचें सहज आणि वैकारिक असे स्वभावभेदानें दोन प्रकार आहेत. सहज कृमी हे कोणताहि विकार उत्पन्न करीत नाहींत. शरीरामध्यें ते असतात आणि ते प्रकृतीशी सहज असल्यामुळें शरीराच्या धारणेकरितां आवश्यक असणार्या कांहीं प्राकृत स्वरुपाच्या कर्माना साहाय्यभूत होतात हें न सांगताहि समजण्यासारखें आहे. वैकारिक कृमींचें बाह्य आणि अभ्यंतर असे मार्ग भेदानें दोन प्रकार आहेत. उत्पत्तिभेदानें कफज, शोणितज, पुरीषज आणि मलज असे चार प्रकार आहेत. त्यांच्या स्वरुपाकृतीच्या दृष्टीनें ते वीस प्रकारचे होतात. म्हणजे त्यांचीं नांवें वीस आहेत. त्यांतील कफज कृमींचा अन्नवहस्त्रोतसांशीं संबंध असल्यानें त्या प्रकारचे कृमी तेवढे कफज कृमींचा अन्नवहस्त्रोतसांशीं संबंध असल्यानें त्या प्रकारचे कृमी तेवढे या प्रकारांत वर्णिले आहेत. इतर रक्तवहस्त्रोतस् वा इतर प्रकरणामध्यें पहावें.
हेतू
अजीर्णाध्यशनासात्म्यविरुद्धमलिनाशनै: ।
अव्यायामदिवास्वप्नगुर्वतिस्निग्धशीतलै: ॥
माषपिष्टान्नविदलबिसशालूकसेरुकै: ।
पर्णशाकसुराशुक्तदधिक्षीरगुडेक्षुभि: ॥
पललानूपपिशितपिण्याकपृथुकादिभि: ।
स्वाद्वम्लद्रवपानैश्च श्लेष्मा पित्तं च कुप्यति ।
कृमीन् बहुविधाकारान् करोति विविधाश्रयान् ।
केषांचित् कृमीणां सामान्यं हेतुमाह-अजीर्णेत्यादि अजीर्णम्
आमविदग्धाभेदभिन्नं, अध्यशनम् अजीर्णभोजनं असात्म्यं
यत् सेवितं सुखार्थ न संपद्यते, विरुद्धं हिताहितीयोक्तं
मलिनं समलम् । पिष्टान्नं तण्डुलपिष्टादि, विदलं नकुष्ठादि;
बिसं बिसाण्डकं; शालू: पद्मकन्द: । पर्णशाकं, पत्रशाकं
सूक्तं संधानकविशेष: । पलल: तिलकल्क:, आनूपपिशितम्
आनूपमांसं, पिण्याकं यन्त्रपीडिततिलखली, `पीता' इति
लोके, पृथुक: चिपिटक:, आदिशब्दादेवंप्रकारा अन्येऽपि ।
बहुविधाकारान् विविधाकारान् । विविधाश्रयानिति नाना-
प्रकाराश्रयानित्यर्थ: । केचिदत्र अजीर्णाध्यशनादिकं हेतुगुणं
न पठन्ति, तेषां च हेत्ववगतिर्वक्ष्यमाणात् `क्षीराणि मांसानि'
इत्यादि प्रतिषेधविधानात्; मया तु सुखबोधार्थ हेतुगुण: पठित: ।
अपरे तु `अजीर्णभोजी मधुराम्लनित्यो द्रवप्रिय: पिष्टगुडोपभोक्ता ।
व्यायामजातानि च वर्ज्यमान: स्वप्नादि वान् वै लभते क्रिमीन्ना
इति पठन्ति ।
सटिक सु. उ. ५४-३ ते ५ पान ७७२-७३
अजीर्ण झालें असतां जेवणें, अध्यशन करणें, संवयीचे नसलेलें अन्न खाणें, परस्पर विरुद्ध गुणांचीं द्रव्यें एकत्र मिसळून खाणें, अन्नपान हें मलिन, घाणेरडें, दुष्ट, पूतिपर्युषित असणें, व्यायाम न करणें, दिवसा झोंपणें, गुरु, स्निग्ध, शीत असे पदार्थ सेवन करणें, उडिद, पीठापासून तयार केलेले पदार्थ,-कमलबीज, कमलकंद, शिंगाडा, पालेभाज्या, मद्य, आंबट कांजी, दहींदुधाचे पदार्थ, आंबट, गोड, पातळ असें पेय व माती खाणें यांच्या सेवनानें कफाचा व पित्ताचा प्रकोप होतो. कृमीहि उत्पन्न होतात. या कृमींची लक्षणें वा आश्रयस्थानें स्वभावभेदानें अनेक प्रकारचीं असतात.
संप्राप्ति
कृमींच्या साहचर्यानें प्रकुपितकफ पित्तांना आमाचें स्वरुप प्राप्त होतें आणि या दोष सदृश आमविषानें अनेक प्रकारचीं लक्षणें उत्पन्न होतात. माधवनिदानकारानें सर्व प्रकारच्या कृमींचीं सामान्य लक्षणें सांगितलीं आहेत.
ज्वरो विवर्णता शूलं हृद्रोग: सदनं भ्रम: ।
भक्तद्वेषोऽतिसारश्च संजातक्रिमिलक्षणम् ॥
आभ्यन्तरकृमिलक्षणमाह-ज्वर इत्यादि ।
विवर्णता शरीरे श्यामपीतता, शूलमामाशये पक्वाशये च,
हृद्रोगो हृदयविकारो हृल्लासादि:, भ्रमश्चक्रारुढस्येव भक्त-
द्वेषो भोजनविद्वेष: ।
आ. टीकेसह मा.नि. कृमि ६ पान ११०
ज्वर येणें, त्वचेचा वर्ण श्याव पीत होणें, पोटामध्यें दुखणें, हृल्लास हृदय वेदना उत्पन्न होणें, अंग गळून जाणें, चक्कर येणें, अन्नावर वासना नसणें, परसाकडे पातळ होणें, अशीं लक्षणें होतात.
श्लेष्मजा: क्षीरगुडतिलमत्स्यानूपमांसपिष्टान्नपरमान्नकुसु-
म्भस्नेहाजीर्णपूतिक्लिन्नसंकीर्णविरुद्धासात्म्यभोजनसमुत्थाना: ।
तेषामामाशय: स्थानम् । प्रवर्धमानास्तूर्ध्वमधो वा
विसर्पन्त्युभयतो वा । संस्थानवर्णविशेषास्तु श्वेता:
पृथुब्रध्नसंस्थाना: केचिद् वृत्तपरिणाहा गण्डूपदाकृतयश्च
श्वेता: ताम्रावभासा: केचिदणवो दीर्घास्तन्त्वाकृतय: श्वेता:
तेषां त्रिविधानां श्लेष्मनिमित्तानां क्रिमीणां नामानि-उदरादा
अन्त्रादा, हृदयचराश्चुरवो, दर्भपुष्पा:, सौगन्धिका महा-
गुदाश्चेति प्रभाव:-हृल्लास आस्यसंस्त्रवणमरोचकाविपाकौ
ज्वरो, मूर्च्छा, जृम्भा, क्षवथुरानाहोऽड्गमर्दश्छर्दि:
कार्श्य पारुष्यभिति ।
पिपीलिकां-लिक्षां केचिदाहु: । क्रिमीणां संज्ञा स्वशास्त्र-
व्यवहारसिद्धा देशान्तरप्रसिद्धा च बोद्धव्या ।
प्रभाव इति स्वशक्तिसंपाद्यमित्यर्थ: । हर्षकण्डूवादयो
व्रणदेश एवज्ञेया: ।
परमान्नं पायसम् । संकीर्णभोजनं घृणाविषयमला-
दिमिश्रितव्यञ्जनादिभोजनम् । ब्रध्नो मांसपेशी ।
सटिक च.वि. ७१२ पान ५४२
कफादामाशये ज्ञाता वृद्धा: सर्पन्ति सर्वत: ।
पृथुब्रध्ननिभा: केचित्केचिद्गण्डूपदोपमा: ॥
रुढधान्याड्कुराकारास्तनुदीर्घास्तथाऽणव: ।
श्वेतास्ताम्रावभासाश्च नामत: सप्तधा तु ते ॥
अन्त्रादा उदरावेष्टा हृदयादा महागुदा: ।
चुरवो दर्भकुसुमा: सुगन्धास्ते च कुर्वते ॥
हृल्लासमास्यस्त्रवणमविपाकमरोचकम् ।
मूर्च्छाच्छर्दिज्वरानाहकार्श्यक्षवथुपीनसान् ॥
कफजानाह-कफादित्यादि । कफनिमित्ता: क्रिमयो य
आमाशये जायन्ते, ते च वृद्धा: सन्त: सर्वत: ऊर्ध्वमधश्च
सर्पन्ति, एवं पुरीषजादिषु द्रष्टव्यम् । ब्रध्नश्चर्मलता,
ब्रध्नीति लोके, रुढं प्ररुढम् । तनव: परिणाहेन, दीर्घा
आयामेन, अणव: उभाभ्यामपि स्वल्पा: । ते इति कफजा: ।
सप्त नामानि विवृणोति अन्त्रादा इत्यादि एते च नाम-
विशेषा: केचित्सान्वया:, केचिन्निरन्वया: व्यवहारार्थं
पूर्वाचार्यै: प्रणीता:, एवं वक्ष्यमाणेषु बोध्यमिति ।
मा. नि. कृमि ७ ते १० म. टीकेसह पान ११७
दर्भपुष्पा महापुष्पा: प्रलूनाश्चिपिटास्तथा ।
पिपीलिका दारूणाश्च कफकोपसमुद्भवा: ॥
कफकृमिनामान्याह - दर्भपुष्पा इत्यादि ।
दर्भपुष्पादिका दारूणपर्यन्ता: कफकोपजा: षट् कृमय: ।
रोमशा रोममूर्धान: सपुच्छा: श्यावमण्डला: ।
रुढधान्याड्कुराकारा: शुक्लास्ते तनवस्तथा ॥
तेषामाकृतिमाह-रोमशा इत्यादि रोमशा: सर्वतो
रोमान्विता: । रोममूर्धान: सरोममस्तका: । श्यावमण्डला:
श्याममण्डलयुक्ता: । मज्जादा नेत्रलेढारस्तालुश्रोत्रभुजस्तथा ।
तेषामेव कर्मविशेषेण संज्ञान्तरमाह - मज्जादा इत्यादि ।
शिरोहृद्रोगवमथुप्रतिश्यायकराश्च ते ।
तेषां सर्वेषामेव कर्माण्याह-शिरोहृद्रोगेत्यादि । रोगशब्द:
शिरोहृद्भ्यां संबध्यते, तेन शिरोरोगो हृद्रोगश्च, वमथु: च्छर्दि: ।
चकारात् अन्यानपि कफजव्याधीन् कुर्वन्ति ।
ते कफजा: कृमय: ।
सटिक सु. उ. ५४-१२ ते १४ पान ७७३.
दूध, गूळ, तीळ, मासे, आनूप प्राण्यांचें मांस, पिठाचे पदार्थ, पायस (खिरी), करडईचें तेल, अजीर्ण असतां खाणें, नासलेलें, लाळ आलेलें, घाणेरडें मलमिश्रित, परस्पर विरुद्ध गुणांचे, न सोसणारे असें अन्न खाणें या कारणानें कफज कृमी उत्पन्न होतात. त्याचें स्वरुप निरनिराळे असतें. कांहीं पांढर्या रंगाचे मांस पेशीसारखे रुंद (चपटे) कांहीं गोल असून गांडूळासारखे दिसतात, कांहीं रंगानें तांबूस असतात. कांहीं अणुस्वरुप सूक्ष्म, (अदृश्य) सूतासारखे, लहान किंवा लांब असतात. कांहीं धान्यांच्या मोडाप्रमाणें लांबट व तोंडाशीं वांकडें असेहि असतात. त्यांची सात प्रकारचीं नांवें आहेत. आत्रांद, उदराद, (उदरावेष्ट), हृदयाद किंवा हृदयचर, दर्भपुष्प, सौगंधिक, महागुद अशीं त्यांचीं नांवें आहेत. सुश्रुतानें कफज कृमींचीं नांवें निराळीं सांगितलीं आहेत. चरकाप्रमाणें दर्भ पुष्प हें एकच नांव त्यानें सांगितलें असून त्याची महापुष्प, प्रलून, चिपिट, पिपीलिक, दारुण हीं इतर नांवें चरकापेक्षां वेगळीं आहेत. कफज कृमींचे सहा प्रकार त्यानें सांगितलें आहेत. त्यांच्या स्वरुपाचेंहि वर्णन चरकापेक्षां कांहीं बाबतींत वेगळें आहे. कांहीं कफज कृमींच्या अंगावर सगळीकडे केस असतात. कांहीच्या फक्त डोक्यावर (लव) केस असतात. कांहींना शेपूट असतें, कांहींच्या अंगावर काळ्या रंगांचीं वर्तुळें असतात. सुश्रुताचें हें वर्णन चरकाच्या वर्णनापेक्षां वेगळें आहे. सुश्रुतानें मज्जाद्, नेत्रलेही, तालुभुज श्रोत्रभुज अशी कर्मविशेषानेंच कफज कृमींचीं निराळीं नांवें दिलीं आहेत. या नाम-विशेषांना कांहीं वेळा विशेष अर्थ असतो तर कांहीं वेळां केवळ व्यवहारासाठीं कांहीं तरी नांव पाहिजे म्हणून कृमींचीं नांवें ठेवलेलीं आहेत. हे कृमी आमाशयामध्यें असतात आणि संख्येनें वाढले म्हणजे वर मुखाकडे व खालीं गुदाकडे क्वचित् दोन्हीहि दिशांनीं संचार करतात.
या कृमीमुळें हृल्लास, तोंडाला पाणी सुटणें, अरोचक, अविपाक् ज्वर, कंडू मूर्च्छा, छर्दी, जृंभा (जांभया येणें), शिंका येणें, आनाह (पोट फुगणें), अंगमर्द, कृशता आणि त्वचा या शरीरवयव रुक्ष होणें अशी लक्षणें होतात. कृमी होणें, कोणत्याही वयांत स्वाभाविक असलें तरी लहान मुलांच्यामध्यें हा व्याधी विशेषेंकरुन अधिक प्रमाणांत आढळतो. माती खाणें, जमीनी वरील अस्वच्छ घाणेरडे पदार्थ तोंडांत घालणें या कारणानें मुलांच्यामध्यें कृमी उत्पन्न होण्याची शक्यता असते. दंतोद्भवाप्रमाणेंच कृमीमुळेंहि अनेक प्रकारची पीडाकर लक्षणें उत्पन्न होतात. विशेषत: पोट मोठें दिसणें, द्रव मल प्रवृत्ती होणें, उलटी होणें, मंदज्वर असणें, अन्न मुळींच नकोसें वाटणें वा खा खा सुटणें, अंग खाजणें अशीं लक्षणें असतात. हारीतानें सूचीमुख कृमी या नांवानें एक प्रकार वर्णिला आहे.
सूची कृमि
सूचिवत् तूद्यतेऽन्त्राणि रक्तं चैवाति सार्यते ।
यकृत्वा भक्षयन्ति अन्ये रक्तं वा वमने भृशं ॥
क्लेदो मुखे रुचिर्जाडयं मंदाग्नित्वं च वेपथु: ।
क्षुत् तृष्णा च ज्वरो ज्ञेया सूचीमुखकृमीरुज: ।
हारित संहिता तृ. ५-१४, १५
सूचीमुख कृमीमुळें आंत्रामध्यें टोंचल्यासारख्या वेदना होतात. सरक्तमलप्रवृत्ती होते. या कृमीमुळें रक्ताची उलटी होते. तसेंच यकृत कुरतडलें जातें. तोंड चिकट होणें, अरुचि, अंग जड वाटणें, अग्निमांद्य, कंप, क्षुधा, तृष्णा, ज्वर हीं लक्षणें होतात.
धान्यांकुर कृमि
ये च धान्यांकुरांस्तेषां वक्ष्याम्यथ च लक्षणं ।
मलाशयस्था कृमयो मलं जग्धंति ते भृशम् ।
तैस्तु संजायते देहे विद्रधिर्भेदनं तथा ।
पारुष्यं कार्श्यमंगानां रुजत्वं हृत्क्लमोद्भव: ।
हारित तृ. ५-१६, १७. पान २३८
धान्यांकुराकार कृमीमुळें शरीरामध्यें निरनिराळ्या प्रकारचे विद्रधि उत्पन्न होतात, ते फुटतात, शरीर कृश, रुक्ष होतें. निरनिराळ्या प्रकारच्या वेदना होतात. हृदय दुर्बल होतें. मलप्रवृत्ति शिथिल फुटीर होते. हें वर्णन फार चांगलें आहे. मात्र हारिताच्या उपलब्ध संहितेच्या अधिकृतपणाविषयीं कांही लोक शंका प्रगटा करितात.
चिकित्सा संदर्भानें लक्षणें
अग्निमांद्य, शोथ, गुल्म, उदर, व्रण, उदर व्रण, कामला, पांडु, अर्श, भगंदर, नेत्ररोग (वंगसेन पान १९४४)
उपद्रव
उपद्रव म्हणून ज्वर, अतिसार, शूल, पांडु, विद्रधि शोथ, उदर यकृत्वृद्धि असे व्याधी उत्पन्न होतात.
साध्यासाध्य विवेक
चिरकारी व तीन स्वरुपाचा शूल उत्पन्न करणारे, धान्याच्या मोडाप्रमाणें मुखाशीं वांकडे असलेले सूक्ष्म आंत्राद कृमी बहुधा असाध्य असतात. हृद्रोग उत्पन्न करणारे कृमीहि असाध्य असतात. बाकीचे कृमी कष्टसाध्य असून, गंडूपद कृमी त्या मानानें साध्य आहेत.
चिकित्सा सूत्रें
चिकित्सितं तु खल्वेषां समासेनोपदिश्य पश्चाद्विस्तरेणो-
पदेक्ष्याम: । तत्र सर्वक्रिमीणामपकर्षणमेवादित: कार्यम् ।
तत: प्रकृतिविधात: । अनन्तरं निदानोक्तानां भावनामनुप-
सेवनमिति ।
तत्रापकर्षणं-हस्तेनाभिगृह्यविमृश्योपकरणवताऽपनयनमनुप-
करणेन वा, स्थानगतानां तु क्रिमीणां भेषजेनापकर्षणम्
न्यायत: । तच्चतुर्विधम्, तद्यथा-शिरोविरेचनं, वमनं
विरेचनं वा, स्थानगतानां तु क्रिमीणां भेषजेनापकर्षणम्
न्यायत: । तच्चतुर्विधम्, तद्यथा-शिरोविरेचनं, वमनं
विरेचनं आस्थापनं च । इत्यपकर्षणविधि: ।
प्रकृतिविघातस्तेषां कटुतिक्तकषायक्षारोष्णानां द्रव्याणा-
मुपयोगो यच्चान्यदपि किंचित् श्लेष्मपुरीषप्रत्यनीकभूतम्
तत् स्यादिति प्रकृतिविघात: ।
अनन्तरं निदानोक्तानां भावानामनुपसेवनमिति-यदुक्तं
निदानविधौ तस्य विवर्जनं, तथाप्रायाणांचपरेषां द्रव्याणाम्
अपकर्षणं-हस्तादि, संशोधनानि च ।
प्रकृते: कारणस्य श्लेष्मरुपस्य विघात: प्रकृतिविघात: इत्यर्थ: ।
उपकरणवतेति सन्दंशाद्युपकरणयुक्तेन । तत् स्यादिति
विघात: स्यादिति योजना । निदानोक्तानां भावानामनुप-
सेवनमितिविवरणानुवा: । अस्य विवरणम् `यदुक्तम्'
इत्यादि । तथाप्रामाणमिति श्लेष्मजपुरीषजक्रिमिनिदान-
सदृशानामित्यर्थ: लक्षणत इति संक्षेपत: । संक्षेपो हि
विस्तरस्य ग्राहकं लक्षणं भवति ।
सटिक च.वि. ७-१४ ते १७ पान ५४३
कृमी रोगासाठीं प्रथम अपकर्षण मग प्रकृतिविघात आणि त्या नंतर कृमी उत्पन्न करणार्या कारणांचा परिहार या पद्धतीनें उपचार करावे. अभ्यंतर कृमी शोधनोपचारानें काढून टाकावे. त्यासाठीं लेखन वमन, नस्य विरेचन व बस्ती हे उपचार करावे. कटु, तिक्त, कषाय, क्षार, उष्ण या द्रव्यांच्या उपयोगानें कृमींचा प्रकृति विघात होतो (कृमी निर्जीव होतात अथवा मरुन पडतात.) कृमीच्या उत्पत्तीस सहाय्यभूत होणार्या कफ दोषाचा नाश करणें हेंहि कृमीचा प्रकृति विघात करणारे ठरते. त्यानंतर विशेष पथ्यानें राहून निदानोक्त कारणें वर्ज्य करावीत.
कल्प
सर्पगंधा वावडिंग, किरमाणी ओवा, निशोत्तर कपिकच्छु शूक, पोपईचें बीज-कुचला पळसपापडी इंद्रयव कुटकी, काडेचिराईत बाळाबोळ, एरंडस्नेह खुरासनी ओवा. कृमी कुठार, कृमी मुद्गर, आरोग्यवर्धिनी, विडंगासव कुमारी आसव.
पथ्यापथ्य
दूध, मांस, तूप, दही, पालेभाज्या, मलीन अम्ल, मधुर व शीत असे पदार्थ वर्ज्य करावें.