उद्गार निरोधज उदावर्त
धारणात्पुन: ।
उद्गारस्यारुचि: कम्पो विबन्धो हृदयोरसो: ॥
आध्मानकासहिध्माश्च ।
वा.सु. ४-७,८ पान ५४
उद्गारवेगेऽभिहते भवन्ति घोरा विकारा: पवनप्रसूता: ।
सु.उ. ५५-१४ पान ७७७
भोजनादिनंतर ढेकरा येणें पुष्कळदां स्वाभाविक असतें. येणारी ढेकर येऊं दिली नाही तर त्यामुळें वात प्रकोप होऊन, अरुचि, अंग कापणें, हृदय व उर याठिकाणीं जखडल्या सारखी, बांधल्यासारखी वेदना होणें, आध्मान, कास व हिक्का हीं लक्षणें होतात.
चिकित्सा
हिध्मावत् तत्र भेषजं ।
उचकीप्रमाणें चिकित्सा करावी. वायूचें अनुलोमन होईल असें उपचार केले पाहिजेत.
क्षुधा निग्रहज उदावर्त
तन्द्राड्गमर्दारुचिविभ्रमा: स्यु:
क्षुधोऽभिघातात् कृशता च दृष्टे: ।
क्षुज्जोदावर्तलक्षणमाह - तन्द्रेत्यादि । तन्द्रा वैकारिकी
निद्रा, अड्गमर्द: अड्गोद्वेष्टनमिव वेदना, स्फुटकेत्यन्ये,
विभ्रम: अत्यर्थ चक्रारुढस्येव भ्रमणम् । कृशता च दृष्टे:
दृड्वान्द्यम्, चकारात् दौर्बल्यादयस्तन्त्रान्तरोक्ता ग्राह्या: ।
सटिक सु. उ. ५५-१६ पान ७७७
अड्गभड्गारुचिग्लानिकार्श्यशूलभ्रमा: क्षुध: ।
तत्र योग्यं लघु स्निग्धमुष्णमल्प च भोजनम् ॥
वा.सु. ४-११ पान ५५
तंद्रा, अंगमर्द, अरुचि, भ्रम, ग्लानी, शूल, कृशता दौर्बल्य दृष्टि मंदावणें हीं लक्षणें भूक मारल्यामुळें उत्पन्न होतात. त्यावर स्निग्ध, लघु, उष्ण असें भोजन अल्प मात्रेमध्यें घ्यावें.
छर्दी निग्रहज उदावर्त
कण्डूकोठारुचिव्यड्गशोथपाण्ड्वामयज्वरा: ।
कुष्ठवीसर्पहृल्लासश्छर्दिनिग्रहजा गदा: ॥
मा. नि. उदावर्त ९ पान २२७
विसर्पकोठकुष्ठाक्षिकण्डूपाण्ड्वामयज्वराः ।
सकासश्वासहृल्लासव्यड्गश्वयथवोवमे: ॥
वा.सू. ४-१७ पान ५५
गण्डूषधूमानाहारा रुक्षं भुक्त्वा तदुद्वम: ।
व्यायाम: स्त्रुतिरस्त्रस्य शस्तं चात्र विरेचनम् ॥
सक्षारलवणं तैलमभ्यड्गार्थ च शस्यते ।
वा. सू . ४-१८ पान ५६
छर्दींचा वेग धारण केल्यामुळें अंगावर गांधी उमटणें, कंडु, कुष्ठ, नेत्रकंडू, पांडु विसर्प, श्वास, हृल्लास, व्यंग अरुचि शोथ - हीं लक्षणें उत्पन्न होतात. यावर उपचार म्हणून - धूम, लंघन, रुक्ष असा आहार करुन वमन, व्यायाम, रक्तमोक्ष विरेचन, क्षार लवणयुक्त तेलाचा अभ्यंग असे उपचार करावे.
मिथ्याहार विहारज उदावर्त
वायु: कोष्ठानुगो रुक्षै: कषायकटुतिक्तकै: ।
भोजनै: कुपित: सद्य: उदावर्त करोति हि ॥
वातमूत्रपुरीषासृक्कफमेदोवहानि वै ।
स्त्रोतांस्युदावर्तयति पुरीषं चातिवर्तयेत् ॥
ततो हृद्वस्तिशूलार्तो हृल्लासारतिपीडित: ।
वातमूत्रपुरीषाणि कृच्छ्रेण लभते नर: ॥
श्वासकासप्रतिश्यायदाहमोहतृषाज्वरान् ।
वमिहिक्काशिरोरोगमन:श्रवणविभ्रमान् ॥
बहूनन्यांश्च लभते विकारान् वातकोपजान् ।
त्रयोदशवेगावरोधजानुदावर्तानभिधायेदानीं रुक्षादिभोजन-
जनित वातजमाहवायुरित्यादि । कोष्ठानुग: कोष्ठशब्देन
समस्तमुदरमध्यमुच्यते, रुक्षादिभिश्चणकराजमाषादिभि:,
तथा कषायादिभि: रसै: कुपित: । तस्य संप्राप्तिमाह वातेत्यादि ।
तत: स्वै; कारणै: कुपितो वायु: वातमूत्रादीनां स्त्रोतांस्युदावर्तयति
ऊर्ध्वमावृणोति पुरीषं चातिवर्तयेत् ।
हृद्वस्तिशुलै: तथा हृल्लासादिभि: पीडित: कृच्छ्रेण कष्टेन
वातमूत्रपुरीषाणि लभते, वैद्यप्रयत्नात्प्राप्नोतीत्यर्थ: ।
श्वासादीनन्यांश्च वातप्रकोपजान् गदान् लभते ।
मनोविभ्रम: स्थाणौ पुरुषज्ञानमित्यादि, श्रवणविभ्रमो विपरीत
श्रवणम् ।
अत्र केचित् सुश्रुतोक्तमसाध्यलक्षणं पठन्ति - ``तृष्णार्दितं
परिक्लिष्टम्'' इत्यादि ।
मा. नि. उदावर्त १३ ते १६ पान २२९ आ. टीकेसह
कटु, तिक्त, कषाय, रुक्ष (हरभरा रानमूग) अशा द्रव्यांच्या आहारामुळें वायु प्रकुपित होतो आणि कोष्ठाच्या ठिकाणीं स्थानसंश्रय करुन उदावर्त उत्पन्न करतो. या वातप्रकोपामुळें वात, कफ, रक्त, मेद, मूत्र व पुरीष यांचीं स्त्रोतसें विकृत होऊन त्यांचीं दुष्टी होते. या रोग्याला हृद्शूल, बस्तिशूल, हृल्लास, अरति, श्वास कास, प्रतिश्याय, दाह, मोह, तृष्णा, ज्वर, छर्दी, हिक्का, शिरोरोग कानामध्यें विकृति (कर्ण नाद, अशब्दश्रवणादि) मनोविकृती ही लक्षणें दिसतात. इतरहि वात प्रकोपाचीं लक्षणें होतात. वातमूत्र पुरीष यांची प्रवृत्ती उपचारानंतर कष्टानें होते. पुरीषाचे खडे बनतात. वायूचें अनुलोमन करावें. स्नेहन, अभ्यंग व स्वेद करावा. अम्ल लवण रस औषधाकरितां वापरावें. एरंड स्नेह, अनुवासन बस्ती हे यथायोग्य रीतीनें वापरावे. दोष-लक्षण-भेदानें शूल, ग्रहणी, अजीर्ण या रोगावरील औषधें वापरावीं.
आमानाह
आमं शकृद्धा निचितं क्रमेण भूय़ो विबद्धं विगुणानिलेन ।
प्रवर्तमानं न यथास्वमेन विकारमानाहमुदाहरन्ति ॥
मा. नि. उदावर्त, १७-१८ पान २२९
अग्निमांद्यामुळें आम तयार होतो. व प्रकुपित झालेल्या वायूमुळें त्याचें अनुलोमन न होतां तो कोष्ठामध्यें क्रमाक्रमानें थोडा थोडा सांचत जातो. या आम संचितीमुळें कोष्ठस्थान दुर्बल होऊन, वायूची संचिती होते व आनाह व्याधी उत्पन्न होतो. या व्याधीमध्यें आमाशय भागीं शूल व गुरुत्व जाणवते. हृदयामध्यें जखडल्यासारखें वाटतें. ढेकर येत नाही. तहान लागते. सारखे पडसें असतें. डोक्यामध्यें आग होतें.