रसवहस्त्रोतस् - ज्वर अभिघातज
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
शस्त्रलोष्ठकशाकाष्ठमुष्टयरत्नितलद्विजै: ।
तद्विधैश्च हते गात्रे ज्वर: स्यादभिघातज: ॥
तत्राभिघातजे वायु: प्रायो रक्तं प्रदूषयन् ।
सव्यथाशोफवैवर्ण्य करोति सरुजं ज्वरम् ॥
(च.पा.) आगन्तुं चतुर्विधं विभजन्नाह आगन्तुरित्यादि ।
कशा `सार' इति ख्याता, मुष्टि: `कील' इति ख्यात: ।
हते अभिहते । प्रायो रक्तमिति अत्यर्थं रक्तं दूषयन्
मांसादि चाल्पं दूषयतीत्यर्थ: । यद्यपि निदानेऽपि ``तत्राभि-
घातजेन वायुना दुष्टशोणिताधिष्ठानेन (नि. अ. १)
इत्युक्तं, तथाऽपीह रक्तस्य साक्षाद्दुष्टि:, तथा मांसादीनां
मनाग्दुष्टि: सूच्यत इति विशेष: ।
(ज) आगन्तोश्चतुर्विधस्यावसर: प्रस्तूयते । ``तत्राभि-
घातजो वायु: प्रायो रक्तं प्रदूषयन्'' । इति । प्रायोग्रह-
णादेतज्ज्ञापयति । विशेषेण रक्तमन्येऽपिधातवो दूष्यन्ते ।
ननु निदानेऽभिघातजो वायुरस्त्राधिष्टान उक्त: । तत्राभि-
घातजो वायुना दुष्टशोषितोधिष्ठानेन'' (इत्यादिना तत्कि-
मत्राह विशेष) यन्निति । उच्यते । दूष्याधिष्ठानयोर्नाना-
त्वाभावात् । तदेव हि दूषयित्वा वायुस्तच्चाधिष्ठाय निदाने-
रितेनास्य भेद: ।
सटिक च. चि. ३-११२, १३ पान ९०९
निरनिराळ्या कारणांनीं, निरनिराळ्या स्वरुपाचे मार लागतात. कधीं त्वचेवर व्रण उत्पन्न होतात तर कधीं नुसताच मुका मार लागतो. त्याचे परिणाम कधीं कधीं अस्थिभंगापर्यंतहि होतात. शस्त्र, काष्ट, लोष्ट (दगड) या सारख्या साधनांनीं आघात होणें, मारामारींत दुखापत होणें, पडणें, अपघातांत सांपडणें भाजणें ही अभिघातज आगंतू ज्वराचीं कारणें आहेत. या अभिघातामुळें वायु प्रकुपित होऊन विशेषेंकरुन रक्तास व इतर धातूंसहि दुष्ट करुन ज्वर उत्पन्न करतो. या ज्वरामध्यें ज्वर या लक्षणासह ज्या ठिकाणीं प्रामुख्यानें मार लागला असेल त्या ठिकाणीं वेदना, वैवर्ण्य, शोथ अशीं लक्षणें असतात. अस्वस्थताहि जास्त असते.
N/A
References : N/A
Last Updated : July 24, 2020
TOP