रसवहस्त्रोतस् - धमनीप्ररिचय
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
धमनीप्रतिचय हा शब्द चरकामध्यें कफाचे नानात्मज विकार सांगत असतांना आणि कांहीं विरुद्ध अन्नानें उत्पन्न होणारे परिणाम सांगत असतांना आलेला आहे. टीकाकारानें त्याचा अर्थ कफाच्या नानात्मज विकार प्रकरणीं धमन्युपलेप (च.सू.२१-२१ टीका) असा केला आहे. दोन्ही ठिकाणीं आमच्यामतें धमनीं हा शब्द रसवाहिनीचा द्योतक आहे. आणि रसवाहिन्यांचा उपलेप होऊन त्या घन गुरु जड होतात हा अर्थ दोन्ही ठिकाणीं अभिप्रेत आहे. आज रक्ताचा दाब वाढला या शब्दानें ज्या विकाराचे वर्णन केले जाते तो विकार बहुतांशी धमनी प्रतीचय हा असावा. ज्यावेळीं प्रत्यक्ष सिरामध्यें विकृति नसेल त्यावेळीं रस, रक्तगतवात वा व्यान वायूची विकृति यांचा परिणाम असण्याची शक्यता आहे. अभिष्यंदी कफकर असा आहार यामुळें प्रौढ व उत्तर आयुष्यामध्यें बहुतकरुन धमनीप्रतिचय हा व्याधी आढळतो. पुढें पुढें वाढत जाणार्या अग्निमांद्याचा तो परिणाम असतो. व्याधीचे प्रारंभीचे स्वरुप स्थानवैगुण्याचे द्योतक असते. दोषानुबंधामुळें भ्रम, क्लम, हृदस्पंद, निद्रानाश अशी लक्षणें प्रगट होऊन मूळचा नानात्मज असलेला व्याधि सामान्यज होतो.
उपद्रव - हृद्रोग, मूर्च्छा, वातव्याधि.
चिकित्सा
सौम्य विरेचन- आमलकी बाहावा. द्राक्षा हारीतकी, सोनामुखी.
द्रव्य- सर्पगंधा, अश्वगंधा, खुरासनी ओवा, सारिवा जटामांसीसूतशेखर, सर्पगंधावटी, शिलाजित.
आहार - अनभिष्यंदी लघु.
विहार - विश्रांति मानसिक प्रसन्नता
N/A
References : N/A
Last Updated : July 24, 2020
TOP