रसवहस्त्रोतस् - विधिभेदानें ज्वरभेद

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


शारीर व मानस

शारीरो जायते पूर्वे देहे मनसि मानस: ।
`पृथग्भिन्नस्य चाकृतिम्' इति प्रश्नस्य क्रमागतमुत्तरं
शारीर इत्यादि । पूर्वमिति वचनादुत्तरकालं शारीरज्वरो
मनस्यपि भवति, एवं मानसो मनस्युत्पादानन्तरं देहेऽपि
भवतीति ज्ञेयम् । एवं च यद्यपि सर्वज्वराणां देह-
मनोधिष्ठानत्वं, तथाऽपि यो देहाश्रयी प्रथमं शरीरदोषेण
बलवता प्रारब्ध: स्यात् स तद्दोषचिकित्सयैव चिकित्स्य
एवं मानसोऽपि मानसदोषचिकित्सयैव चिकित्स्य: इति
दर्शयितुं शारीरमानसभेदोपदर्शनं साधु । ननु शारीरस्य
ज्वरस्य संतापलक्षणं व्यक्तं, मानसस्य तु ज्वरस्य कथं
संताप:, यत्तस्य लक्षणं भवतीत्याह वैचित्त्यादयो मानस-
संतापशब्देनोच्यन्ते, तापशब्दस्य पीडावचनत्वादित्यर्थ: ।
मनस्तापप्रस्तावेन, `देहोन्द्रियमनस्तापी' इत्यत्र य इंद्रियतापा
ज्वरस्योक्ता:, स व्याचक्ष्यत इंद्रियानां चेत्यादि ।
वैकृत्यमिति स्वभावान्यथात्वं, तज्चार्थाग्रहणाद्यनुमेयम् ।
सटिक च. चि. ३-३९ पान ८८०

मनस्यभिहते पूर्व कामाद्यैर्न तथा बलम् ।
ज्वर: प्राप्नोति वाताद्यैर्देहो यावन्न दुष्यति ॥
देहे चाभिह (द्रु) ते पूर्व वाताद्यैर्न तथा बलम् ।
ज्वर: प्राप्नोति वाताद्यैर्देहो यावन्न दुष्यति ॥
देहे चाभिह (द्रु) ते पूर्व वाताद्यर्न तथा बलम् ।
ज्वर: प्राप्नोति कामाद्यैर्मनो यावन्न द्ष्यति ॥
च. चि. ३-१२६, १२७ ९११

शारीरज्वर हा प्रथम मिथ्याहारविहारादि कारणांनीं दोषप्रकोप होऊन नंतर उत्पन्न होतो. तर मानसज्वर हा कामक्रोधादि कारणांनीं प्रथम मनाला विकृति येऊन उत्पन्न होतो. वस्तुत: ज्वर हा देहेन्द्रियमनस्तापी असल्याचें सांगितलें आहे. कारण कोणतेहि असलें तरी शेवटी देह व मन यांची विकृती उत्पन्न होतेच. सर्वांग ग्रहण व संताप हीं शारीर लक्षणें व वैचित्य, अरति, ग्लानी हीं मानसलक्षणें दोन्ही ज्वरांत उत्पन्न होतातच चरकानें उभयविध तापामुळेंच ज्वराला खरें बल प्राप्त होते असें सांगितलें आहे. चरक म्हणतो कीं कामादि विकारांनीं मनावर आघात झाला तरी जोवर मानसिक विकृतीचा परिणाम म्हणून वातपित्तकफांना विकृती येऊन शरीर दुष्ट होत नाहीं तोंवर मानसज्वरालाहि बल प्राप्त होत नाहीं. तसेंच वातपित्त कफांच्या प्रकोपानें शरीरदुष्टी होऊन ज्वर उत्पन्न झाला तरी, कामादि कारणांनीं होते त्याप्रमाणें मानसदुष्टी झाली नाहीं तरे शारीरज ज्वरालाहि यावें तसें बल येत नाहीं. शारीरिक ज्वरामध्यें प्रथम शरीरासंबंधीचीं लक्षणें दिसतात व नंतर शरीरासंबधींचीं लक्षणें प्रकट होतात. शारीर व मानस हा भेद ज्वराचा आरंभ कोणत्या कारणानें झाला आहे त्यावरच आधारलेला आहे. चिकित्सेमध्यें साहाय्यक उपचार म्हणून या कारणांच्या विचाराला निश्चित स्वरुपाचें महत्व असल्याकारणानें ज्वर व्याधी शारीरिक आहे कां मानसिक आहे. हा भेद समजून घेणें आवश्यक होते.

सौम्य आणि आग्नेय

योगवाह: परं वायु: संयोगादुभयार्थकृत्
दाहकृत्तेजसा युक्त: शीतकृत् सोमसंश्रयात् ।
च. चि. ३-३७ पृष्ठ ३३८

वातपित्तात्मक: शीतं उष्णं वातकफात्मक:
इच्छत्युभयमेतत्तु ज्वरो व्यामिश्रलक्षण: ।
च. चि ३-३७ पृष्ठ ८८२

वातकफामुळें उत्पन्न होणारे एक दोषज वा द्वंद्वज ज्वर हे सौम्य स्वभावाचे ज्वर होत. कारण कफ हा शीत गुणाचा आहे व वायूहि मूलत: तसाच आहे. पित्तज्वर, वातपित्तज्वर हा आग्नेय स्वभावाचा ज्वर आहे. वायू हा गुणानें योगवाही असल्यानें तो ज्याच्याशीं मिसळेल त्याच्या गुणाच्या उत्कटतेला कारणीभूत होतो. त्यामुळें स्वतंत्र असा वातज्वर सौम्य असलातरी वातपित्तज्वर मात्र आग्नेय स्वरुपाचाच आहे. पित्ताच्या आग्नेय गुणाच्या साहचर्यात वायूहि आग्नेय गुणाचाच होतो. कफपित्तज्वर मात्र सौम्याग्नेय अशा मिश्र स्वरुपाचा आहे. हा मिश्र प्रकार तिसरा न मानतां आग्नेयाचाच पोटभेद मानावा असें हेमाद्रीनें सांगितलें आहे. (वा.नि. २-४८). मिश्र म्हणून सौम्याचा उपप्रकार मानूं नये याचें हेमाद्रीनें सांगितलेलें कारण मार्मिक आहे. तो म्हणतो ``दाहस्य दु:सहत्वात् न सौम्यभेद: ।'' सौम्य हा सुसह आणि आग्नेय हा दाहकत्वामुळें दु:सह असा असतो. मिश्र लक्षण ज्वरामध्यें थोडाबहुत तरी दाह असल्यानेंच त्यालाहि दु:सहत्व येतें. म्हणून मिश्रलक्षणांचा समावेश आग्नेयांतच करणें इष्ट. त्याचा समावेश कोठेहि केला नाहीं तर ज्वराचे तीन उपप्रकार होतात आणि विधिभेदानें तर दोनच उप्रप्रकार सांगितले आहेत. म्हणून हा आग्नेयच मानावा.

आंतर्वेगी, बहिर्वेगी

आन्तर्दाहोऽधिकस्तृष्णा प्रलाप: श्वसनं भ्रम: ।
सन्ध्यस्थिशूलमस्वेदो दोषवर्चोविनिग्रह: ॥
अन्तर्वेगस्य लिड्गानि ज्वरस्यैतानि लक्षयेत् ।
संतापोऽभ्यधिको बाह्यस्तृष्णादीनां च मार्दवम् ॥
बर्हिवेगस्य लिड्गानि सुखसाध्यत्वमेव च ।
च. चि. ३-३९ ते ४१ पान ८८२

उक्तज्वराणां मध्ये संप्राप्तिवशात्कश्चिदन्तर्वेगो भवति कश्चि-
द्‍बहिर्वेगस्तयोर्लक्षणमाह अन्तर्दाह इत्यादि ।
श्वसनं श्वास: सदनमिति पाठान्तरं, तन्न युक्तमिति जेज्जट:,
यतोऽन्तर्वेगएव सुश्रुते गम्भीराख्य: पठित:, तत्र च श्वास
एव पठित इति । विनिग्रहोऽप्रवृत्ति: ।
तृष्णादीनामित्यादिशब्देनोक्तप्रलापादीनां ग्रहणम् ।
मार्दवं स्वल्पत्वम् ।
अस्य सुखसाध्यत्वाभिधानेर्वेगस्य कृच्छ्रसाध्यतां सूचयति
असाध्यतां वा ।
`गम्भीरतीक्ष्णवेगार्त' ज्वरितं परिवर्जयेत् इति (सु. उ. तं ३९)
सुश्रुतवचनादिति ।
मा. नि. ज्वर ६० म. टीका पान ६३

अंतर्वेगी ज्वरामध्यें विशेष स्वरुपाचा अंतर्दाह, तृष्णा, प्रलाप, श्वास, भ्रम, संधिशूल, अस्थिशूल, घाम न येणें, दोषांचा अवरोध, मलावष्टंभ अशीं लक्षणें असतात. (ज्वराच्या अंतर्वेगामुळें अस्वस्थता हें लक्षण अधिक प्रमाणांत असतें.) बहिर्वेगी ज्वरामध्यें दाह हें लक्षण त्वचेमध्यें संतापरुपानें जाणवतें आणि अंतर्ज्वरामध्यें उल्लेखिलेलीं तृष्णादि लक्षणें सौम्य स्वरुपांत असतात. ज्वर अंतर्वेगी होतो. याचा अर्थ असा कीं दोषांचें बळ अधिक असल्यामुळें वा सामता अधिक असल्यानें विमार्गग झालेली पित्ताची उष्णता आंतल्या आंत कोंडली जाऊन रोग्याचीं उलघाल अधिक होते. सुश्रुतानें गंभीरज्वर म्हणून अंतर्वेगीज्वरांचाच उल्लेख केला आहे. दोषांचा व पुरुषिचा विनिग्रह हें सांगितलेलें लक्षण या प्रकारांतील स्त्रोतोरोधाचें उत्कटत्व अधिक स्पष्ट करणारें आहे. असा स्त्रोतोरोध ज्या वेळीं नसतो त्यावेळीं विमार्गग झालेल्या पित्ताची उष्णता सर्व शरीरभर सारखी पसरते आणि मग त्वचेमध्यें स्पर्शाला उष्णता लागणें येवढेच लक्षणांचे स्वरुप उरतें. हा भेद स्पष्ट करण्यासाठींच अंतर्वेगी ज्वरांत अंतर्दाह असें म्हटलें आहे. बहिर्वेगी ज्वरांत ``बाह्य: संताप:'' असे शब्द वापरलेले आहेत.

प्राकृत व वैकृत

प्राकृत: सुखसाध्यस्तु वसन्तशरदुद्‍भव: ।
उष्णमुष्णेन संवृद्धं पित्तं शरदि कुप्यति ॥
चित: शीते कफश्चैवं वसन्ते समुदीर्यते ।
वर्षास्वम्लविपाकाभिरद्‍भिरोषधिभिस्तथा ॥
संचितं पित्तमुद्रिक्तं शरद्यादित्यतेजसा ।
ज्वरं संजनयत्याशु तस्य चानुबल: कफ: ॥
प्रकृत्यैव विसर्गस्य तत्र नानशाद्‍भयम् ।
अद‍भिरोषधिभिश्चैव मधुराभिश्चित: कफ: ॥
हेमन्ते, सूर्यसंतप्त: स वसन्ते प्रकुप्यति ।
वसन्ते श्लेष्मणा तस्माऽज्वर: समुपजायते ॥
आदानमध्ये तस्यापि वातपित्तं भवेदनु ।

प्राकृत इत्यादिना प्रकरणेन प्राकृतवैकृतविवरणम् । तत्रेह
कालस्वभावप्रकुपितो दोष: प्रकृतिरुच्यते, तज्जातीयाच्च
दोषादुद्‍भूतो ज्वर: प्राकृत उच्यते । यद्वक्ष्यति कालप्रकृति-
मुद्दिश्य निर्दिष्ट: प्राकृतो ज्वर: इति । एवमपि वर्षाकालप्र-
कृतिभूतेन वातेन कृतो ज्वर: प्राकृत: स्यादिति, तन्निषे-
धायाह 'सुखसाध्यस्तु वसन्तशरदुद्‍भव: इति। तुशब्दोऽव
धारणे। तेन, य एव सुखसाध्यो वसन्तशरदुद्भव:
प्राकृत: स एवेह प्राकृतशब्देनोच्यत इत्यर्थ:। वर्षा-
कालभववातिकस्तु न सुखसाध्य इति, तेन नासौ प्राकृत
उच्यते। प्राकृतवैकृसंज्ञाव्यवहारो हि यथाक्रमं सुख-
साध्यकृच्छ्र्साध्यबोधप्रयोजनक: तद्ददि कृच्छ्रेऽपि वातजे
प्राकृतत्वं स्यात्तदा किं प्राकृतव्यवहारेण। यतश्च, वसन्त-
शरदुद्‍भवावेव प्राकृतौ तेन तयोरेव 'उष्णं' इत्यादिना
ग्रन्थेन विवरणं प्रपञ्चेन करिष्यति न वातिकस्येति।
अत्रार्थे जतूकर्णे "सौम्याग्नेयावुष्णशीतकामौ, जीर्णस्त्र-
योदशे दिने, वसन्तशरदो: प्राकृतोऽन्यत्र वैकृत:" इति।

यद्दपि वसन्तज: पूर्वमुक्तस्तथाऽपि प्रतिलोमव्याख्यया
उष्णमित्यादिना शरदुद्‍भवं निर्दिशति। उष्णं पित्तं चित्तं
वर्षासु शरद्दुदीर्णेनातपेन कुप्यतीति विज्ञेयम् । शीत इति
हेमन्ते। उष्णमित्यादिना निर्दिष्टस्य वर्षास्वित्यादि भाष्यम्
ननु यदि वर्षास्वम्लविपाकित्वं सर्वासामोषधीनां तदा प्रति-
द्रव्याभिहितविपाकस्याव्यवस्था स्यात्, तस्य कालवशे-
नाम्लत्वदर्शनात् । मैवं, यथा निष्ठापाकेन यन्मधुरं द्रव्यं,
तद्यथाऽवस्थिकेन पाकेनाम्लं भवति यदुक्तं ``परं तु
पच्यमानस्य विदग्धस्याम्लभावत: (चि. अ. १५)''
इत्यादिना, तथेहापि कालमहिम्नाऽम्लविपाकित्वमपि
भविष्यति; एवं हेमन्ते यन्मधुरपाकित्वमोषधीनां तत्रापि
व्याख्येयम् । अन्ये तु वर्षासु वह्निमान्द्याद्विदाहनिमित्तमोष-
धीनामम्लविपाकित्वमिति ब्रुवते । यदुक्तं ``वर्षासु विद-
हत्यन्न (?) । तदा हि सर्वमेवान्नं प्रायो ह्यस्य विदह्यते''
इति । एवमपि तैर्हेमन्ते मधुरपाकित्वं नोक्तमेव; तस्मात्
कालमहिम्नैव पाकान्तरमोषधीनां साघु । आश्विति पित्तस्या-
शुकारित्वाच्छीघ्रं जनयति । अनुबलं इति अनुबन्धरुप:
कफो भवति । एवं ज्वरस्य लंघनीयतामाह प्रकृत्यैवेत्यादि ।
विसर्गस्य प्रकृत्येति विसर्गरुपकालजया प्रकृत्या सौम्यादि-
रुपयाऽनशनाद्‍भयं न भवति । विसर्गो हि सौम्य: स्निग्ध:,
तत्र बलवन्त: पुरुषाश्च, तेन तत्रोत्पन्नो ज्वर आमाशयस-
मुत्पन्नत्वेन लंघानार्हो लड्घनीय एव । किंवा `प्रकृत्यैव
विसर्गाच्च' इति पाठ: । तदा प्रकृत्येति ज्वरकारणेन
कफपित्तरुपेण लंघनहेतुना, तथा विसर्गाच्च कालाल्लंघने
भयं नास्ति । उक्तं हि ``कफपित्ते द्रवे धातू सहेते लंघनं
महत्'' इति । हेमन्ते चित: कफो वसन्ते कुप्यतीति
युक्तमेव, यतो दोषचयादिक्रमे शिशिरो नास्त्येव । ``आदा-
नमध्ये तस्यापि वातपित्तं भवेदन्विति'' तस्यापि वसन्तज-
कफज्वरस्य वातपित्तम्, अन्विति अनुबन्धरुपं भवति ।
तदा वसन्तादौ दुर्बलं वातपित्तं, मध्ये तु मध्यं, अन्ते तु
प्रबलं भवति, एवं शरद्यपि कफो भवति ।
च. चि. ३-४२ ते ४६ पान ८८२ च. पा. टीकेसह

प्राकृत आणि वैकृत या शब्दांचाच विचार केला असतां ज्या ऋतुमध्यें ज्या दोषाचा प्रकोप निसर्गक्रमामध्यें स्वाभाविकपणें होत असतो त्या ऋतुमध्ये त्याच दोषानें ज्वर येणें यास प्राकृत ज्वर असें म्हणतात व त्या त्या ऋतूमध्यें भिन्न दोषाच्या प्राबल्यानें ज्वर येणें यास वैकृत ज्वर असें म्हणतात. या नियमाप्रमाणें शरद्‍ऋतूमध्यें पित्तज्वर, वसंतऋतूमध्यें कफज्वर व वर्षाऋतूमध्यें वातज्वर हे प्राकृतज्वर आहेत व या दोषांपेक्षां वेगळ्या दोषांनीं शरद्‍, वसंत, वर्षा ऋतूंत ज्वर आल्यास त्यास वैकृतज्वर म्हणावें.

चरकाच्या टीकाकारानें प्राकृत वैकृतज्वराचा सरळपणें होणारा अर्थ न घेतां परिणामावर अवलंबून ज्वराचें सुखसाध्यत्व. दु:साध्यत्व लक्षांत घेऊन केवळ शरद्‍वसंतामध्यें होणार्‍या पित्तज्वरास व कफज्वरास तेवढें प्राकृत म्हणावें असें स्वत:चें मत सांगितलें आहे. वर्षाऋतूमध्यें उत्पन्न होणार्‍या वातज्वरास अनुकूल ऋतुकालाच्या दृष्टीनें तो प्राकृत असूनहि त्याचे ठिकाणीं दु:साध्यत्व असल्यानें या ज्वरास वैकृतज्वर म्हणावें असें चक्रदत्तानें सुचविलें आहे. चरकाच्या रचनेचा ओघ आपणास अनुकूल असल्याचें त्यानें म्हटलें आहे. परंतु साध्यासाध्याचें वर्गीकरण निराळें असल्यानें त्याचा प्राकृत वैकृताशीं मेळ घालून शब्दांचे मूळचे अर्थ उपेक्षावेत हें आम्हास योग्य वाटत नाहीं.

वर्षाशरद्वसन्तेषु वाताद्यै: प्राकृत: क्रमात् ।
वैकृतोऽन्य: स दु:साध्य:ळ प्रायश्च प्राकृतोऽनिलात् ॥
वर्षादिषु त्रिषु ऋतुषु यथाक्रमं वाताद्यैस्त्रिभिर्दोषैर्यो ज्वरो
जायते स प्राकृत: । वर्षासु वातज्वर: प्राकृत:, शरदि पित्त-
ज्वरो, वसन्ते कफज्वर: इति परिभाष्यते । अत एव वात-
प्रकृतेर्वातेन यो ज्वर:, पित्तप्रकृते: पित्तेन, श्लेष्मप्रकृते:
श्लेष्मणेति, स प्रकृतिभवत्वेन प्राकृत इत्युच्यते ।
वैकृतोऽन्य इति । यो ज्वरो वर्षादिभ्य ऋतुभ्योऽन्यत्र
काले जातो वर्षादिष्वपि वा न यथाक्रमं वाताद्यैर्जनित:
स यथोक्तप्राकृत लक्षणादन्य: स वैकृत उच्यते ।
स च दु:साध्य: कृच्छ्र साध्य: ।
प्राकृतस्तु सुसाध्य इत्यर्थाद्‍गम्यते । प्राय इत्यादि ।
प्रायोबाहुल्येन, प्राकृतोऽपि यो ज्वरोऽनिलाज्जायते सोऽपि
दु:साध्य: । प्रायोग्रहणेनैतद्‍ द्योतयति । कदाचिद्दैवानुकूल-
त्वात्सुसाध्य एव भवति । ननु वर्षास्व (शरद्य) पि
प्राकृतोऽपि ज्वरो यथा विकृतिविज्ञानीये कथितस्तथाऽ
साध्य एव । ``ज्वरो निहन्ति बलवान्'' (हृ. शा.अ.
५/७१) इत्यादि । तदेतत्पूर्वापरव्याहतमिव दृश्यते ।
नैवम् अनयोर्वचसो: सामान्यविशेषरुपत्वात् । तथाचेह
सामान्येनोक्तम् विकृतिविज्ञानीये तु विशेषेणेति ।
एतदेव च स्फुटीकर्तु वक्ष्यति (श्लो. ५३) ``विकृति
ज्ञाने प्रागसाध्यं उदाहृत: ।'' इति ।
वा. नि. २-५० स. टीकेसह पान ४५६

वाग्भटानें वर्षाऋतूंतील वातज्वरासहि प्राकृत असेंच स्पष्टपणें म्हटलें आहे. माधवनिदानकारानें वाग्भटाचेंच वचन उद्‍धृत केलें आहे. वाग्भटानें कालानुकूलतेसवेंच प्रकृतीच्या अनुकूलतेप्रमाणें ज्वरास प्राकृतत्व किंवा वैकृतत्व येतें असें जें सांगितलें आहे तेंहि महत्वाचें आहे. ज्या दोषांची प्रकृती असेल त्याच दोषानें ज्वर उत्पन्न होणें हा प्राकृत ज्वर व प्रकृतीपेक्षां भिन्न दोषांच्या प्राबल्यानें ज्वर उत्पन्न होणें हा वैकृतज्वर होय. त्या त्या ऋतूमध्यं दोषप्रकोप कां व कसा होतो यांचेहि वर्णन ग्रंथकारांनीं या संदर्भात केलें आहे त्याचें व्याख्यान करण्याची या ठिकाणीं आवश्यकता नाहीं (साध्य व असाध्य या भेदानें पडणारे ज्वराचे प्रकार पुढें वर्णन केले आहेत.) कश्यपानें सम आणि विषम या नांवानें ज्वराचे दोन भेद उल्लेखिलेले आहेत. ते असे.

समविषम

अल्पहेतुर्बर्हिर्मार्गो वैकृतो निरुपद्रव: ।
एकाश्रय: सुखोपायो लघुपाक: समो ज्वर: ।
विषमस्तद्विपर्यस्तस्तीक्ष्णत्वात् संततो मत: ।
तद्वत प्रेत ग्रहौत्था ये चत्वारो विषमागमात् ॥
दुर्जयत्वा (द्‍दुर्ग्रहत्बा) दुग्रर्ग्रहपरिग्रहात् ॥
वैषम्यं संततादीनां दारुणत्वादुदाहृतम् ॥
तथा सततकादीनां चतुर्ना कालकारितम् ॥
विषमत्वं प्रवक्ष्यामि ज्वराणां जायते यथा ॥
समस्ता द्वन्द्वशो वाऽपि धमनी रसवाहिनी: ।
दोषा: प्रपन्ना: कुर्वन्ति विषमा विषमज्वरम् ॥
ज्वरितो मुच्यमानो वा मुक्तमात्रश्च यो नर: ।
व्यायामगुर्वसात्म्यान्नमतिमात्रमथो जलम् ॥
पायसं कृशरं पिष्ठं पललं दधि मन्दकम् :
पिण्याकमाषविकृतीर्ग्राम्यानूपं तथाऽऽमिषम् ॥
एवंविधानि चान्यानि विरुद्धानि गुरुणिच ॥
सेवते च दिवास्वप्नमजीर्णाध्यशनानि च ॥
ज्वरोऽभिबर्धते तस्य विषमो वाऽऽशु जायते ॥
दोषेष्वपरिपक्वेषु कषायं यश्च सेवते ॥
लौल्याद्वा स्नेहपानानि क्षीरसंतर्पणानिवा ॥
दैवतानामभिध्यानाद्‍ ग्रहसंस्पर्शनादपि ॥
सद्यो वान्तो विरिक्तो वा स्नेहपीतोऽनुवासित: ।
शीतोपचारं गुर्वन्नं व्यवायं यश्च सेवते ॥
तस्यापि सहसा वायुरस्थिमज्जान्तरं गत: ।
कुपित: कोपयत्याशु श्लेष्माणं पित्तमेव च ।
ततोऽस्य धातुवैषम्याद्विषमो जायते ज्वर: ।
सततोऽन्येद्युको वाऽपि तृतीय: सचतुर्थक: ।
का. सं. पान २२७

कश्यपानें थोडया कारणांनीं उत्पन्न झालेला बर्हिमार्गी उपद्रव रहित एकाद्याच धातूच्या आश्रयानें असलेला. दोषांचें पचन लवकर होतें असा ज्वर समज्वर म्हणून मानला आहे. याच्या उलट जो दारुण दुश्चिकित्स्य, तीक्ष्ण ग्रहादि आगंन्तु कारणोप्तन्न असा असतो त्यास विषम म्हटलें आहे. हे द्वंद्वज वा सान्निपातिक दोष इतर ज्वराप्रमाणेंच रसवाहिनी सिरांच्या द्वारां स्थान संश्रय करुन ज्वर उत्पन्न करतात.

विषमज्वराच्या कारणामध्यें कश्यपानें अपथ्याचा उल्लेख पुढील प्रमाणें केला आहे. ज्वर उतरल्यानंतर लगेच व्यायाम, गुरु असात्म्य असें अन्न अधिक प्रमाणांत घेणें, फार पाणी पिणें, निरनिराळीं पक्वान्नें मिष्टान्नें सेवन करणें, ग्राम्य आनूप मांस, अदमुरे दही, दिवसां झोपणें, अजीर्ण, अध्यशन या कारणांनीं विषमज्वर होतो. तसेंच दोषांचें स्वरुप परिपक्व होण्यापूर्वीच कषाय सेवन करणें. हावरेपणानें स्नेहपान दूध संतर्पण करणारे पदार्थ यांचें सेवन करणें. दैवतपीडा ग्रहपीडा यांनीं बाधित होणें, वमन विरेचन स्नेहपान अनुवासन यानंतर शीत उपचार जडान्न व मैथुन सेवन करणें. या कारणांनीं वायू प्रकुपित होऊन अस्थि व मज्जा यांचा आश्रय करतो. वायूमुळें कफपित्तांचाहि प्रकोप होतो. धातूंना वैषम्य म्हणजे दुर्बलता येते व विषमज्वर उत्पन्न होतो. विषमज्वराचें हें वर्णन विषमज्वर या सर्वमान्य प्रकाराशीं कांहींसें जुळतें आहे. कश्यपाचा समज्वर म्हणजे सुखसाध्य ज्वर असावा असें दिसतें.

दोषकालबलाबलभेदानें होणारे प्रकार

ज्वर: पञ्चविध: प्रोक्तो मलकालबलाबलात् ।
प्रायश: सन्निपातेन भूयसा तूपदिश्यते ॥
सन्तत: सततोऽन्येद्युस्तृतीयकचतुर्थकौ ।
वा. नि. २-५६, ५७ पान ४५८

पुन: पञ्चविध: दृष्ट इत्यत्र न पञ्चविधेन भेदेन सर्वज्वर-
व्याप्ति:, यत: `प्रायश: सन्निपातेन दृष्ट: पञ्चविधो ज्वर:'
इति वक्ष्यति । ततश्च केवलवातादिज्वराणां न संततादि-
भेदेन ग्रहणं तथा संततादिज्वराणां कालनियमो वक्तव्य:,
ततश्च ये कालनियतास्ते संततादिभिन्ना एव, तस्माद्दोष-
कालबलाबलाद्ये ज्वरा भवन्ति, ते पश्चविधा एवेति वाक्यार्थ:
दोषकालबलाबलादिति दोषकृतात् कालबलाबलात् । काल-
बलाबले ज्वरकालप्रकर्षाप्रकषौ । तत्र संतते ज्वरे बलवता
दोषेण सप्ताहादि: प्रकृष्टत्वाद्वलवान्, कालो नियम्यते,
सततके तु संततकालापेक्षया हीनबलेन दोषेणाबलो ज्वर-
काल: स ह्यहोरात्रे द्विकालेनात्र व्यापको भवति, तथाऽ
यमेव सततकज्वरकालो हीनबकालान्येद्दुष्कापेक्षया बलवान्
भवति, एवमन्येद्दुष्कादि ज्वरकालोऽपि व्याख्येय:। किवा
दोषकालो दुष्टिकालो ज्वरकाल इत्यर्थ:, तस्य बलाबलात्
प्रकर्षाप्रकर्षादित्यर्थ:। कालप्रकर्षाप्रकर्षनियमाश्च व्याख्याता
एव अन्ये तु, दोषश्च कालश्च दोषकालौ, तयोर्बलाबलदिति
वदन्ति। तत्र तत्र दोषबलात् कालबलाच्च सन्ततो भवन्ति
यदुक्तं-`कालदूष्यप्रकृतिभिर्दोषस्तुल्यो हि संततम्, इत्यादिना ।
दोषकालबलत्वमबलत्वं च विवरणग्रन्थेनोक्तम्,
तथा दोषस्याबलत्वं सप्रत्यनीकतया सततकादिषु भवति,
तथा ज्वरवेगविगमे च सततकादौ कालस्याबलत्वं भवति ।
अत्र पक्षे दोषकालबलाभ्यां सर्वज्वरा व्यापन्ते, ततश्च
संततादिपञ्चज्वरनियमो दुर्घट: स्यात् । अन्ये तु
व्युत्क्रमाभिधानेन `दोषबलाबलकालात्' इति कृत्वा
व्याख्यानयन्ति । एतच्चाशब्दं व्याख्यानम् । तृतीयकचतुर्थक-
रोरागन्त्वनुबन्धत्वादिसाधारणधर्मयोगितां दर्शयति ।
टीका च. चि. ३-३५ पान ८७-८७९

प्रायश इत्यादि । बाहुल्येनायं सन्ततादिज्वर: सन्निपाता-
द्‍भवति । [ननु] अत्र सन्निपातेनेत्यसाधु । न ह्यन्य:
कश्चित्सन्ततादिव्यतिरिक्तो ज्वरोऽस्ति यमेकदोषजं द्विदोषजं
वा परिकल्पयेदिति, तस्मादसदेतत् । उच्यते । समर्यादया
दोषगत्या ये सन्ततादयो ज्वरा उत्पद्यन्ते, त एकदोषजादय
उपपद्यन्ते । ये पुनर्विषमसम्प्राप्तिसमुत्पन्ना: सन्ततादयस्ते
सन्निपातेन । इति प्रायश: सन्निपातेनेति न्याय्यमेतत् ।
ननु, एवं सति वातिकोऽयं पैत्तिकोऽयं श्लैष्मिकोऽयमयं द्वान्द्विक
इति कथं व्यपदेश: ? इत्याह - भूयसेति । सन्निपातोद्‍भवेऽ-
प्यस्मिन् सन्ततादौ भूयान् अधिको दोष:, तद्दोषोपलक्षितां
संज्ञामासादयतीत्यर्थ:, वातज्वरोऽयमित्यादि । तुरवधारणे,
भूयसैव दोषेण व्यपदेशो नान्येनापि । ततश्चैवं सन्निपातोत्थ:
सन्ततादिज्वर इति स्थितम् । अत एव तन्त्रान्तर एवं
जगाद ``सन्ततो मारुतात्प्राय: पित्तात् प्रायस्तृतीयक: ।
अन्येद्युश्च कफात्प्राय: सन्निपाताच्चतुर्थक: । सन्निपातकृत-
त्वात्तु दुश्चिकित्स्यश्चतुर्थक:'' इति ।
टीका वा. नि. २-५७ पान ४५८, ४५९

दोषांचे बलाबल व कालाचें बलाबल यामुळें संतत, सतत, अन्येद्यु;, तृतीयक आणि चतुर्थक असें ज्वराचे पांच प्रकार होतात. दोषकालबलाबल या शब्दाचे अर्थ निरनिराळ्या प्रकारांनीं केलेले आहेत. दोष आणि काल एकमेकाला अनुकूल असतील त्यावेळीं ज्वर उत्पन्न होतो व प्रतिकूल असतांना ज्वर उत्पन्न होत नाहीं असा एक अर्थ. दोषांच्यामुळें कालाचें बलाबल ठरते असा दुसरा अर्थ. दोष बलवान असल्यामुळें संततज्वर कालालाहि बल देतो व त्यामुळें सात, दहा, बारा, असा ज्वरकाल ठरतो. सततादि ज्वरांमध्येम दोषांचें बल संततापेक्षां कमी असतें त्यामुळें ज्वरकालालाहि अबलत्व येतें आणि मग ज्वरकाल खंडित होतो.

या पंचविधज्वराविषयीं अनेक प्रकारांनीं वर्णन ग्रंथांतरीं आलेलें आहे. संततादिप्रकार ही दोषजज्वरापेक्षां ज्वराची एक स्वतंत्र जाति आहे असें एकूण वर्णनाचा विचार करतां वाटतें. त्यांतहि संतत आणि सततादि इतर चार यांच्या मध्यें कांहीं साम्य, भेद आहेत. संतताचें स्वरुप दोषज्वरांप्रमाणेंच आहे असें म्हणतां येण्यासारखें आहे परंतु ``प्रायश: सन्निपातेन दृष्ट: पंचविधो ज्वर:'' या वचनामुळें सर्वसामान्य दोषज्वरापेक्षां या पंचविधज्वराचें स्वरुप वेगळें असलें पाहिजे असें म्हणणें आवश्यक होतें. केवळ वेगदृष्ट्या विचार करतां संततज्वर व संततवेगी ज्वर अशी परिभाषा वापरुन दोषज ज्वर हे संततवेगी ज्वर असतात असें म्हटलें असतां कल्पनेंतील घोटाळा कमी होण्यास मदत होईल.

अरुणदत्तानें दोषांच्या गतीनें संततादि ज्वर उत्पन्न होतात व ते एकदोषजच असतात असें स्पष्टपणें म्हटलें आहे. `प्रायश:' शब्दांतून त्यानें काढलेला हा अर्थ विचार करण्यासारखा आहे.

संतत ज्वर

स्त्रोतोभिर्विसृता दोषा गुरवओ रसवाहिभि: ।
सर्वदेहानुगा: स्तब्धा ज्वरं कुर्वन्ति सन्ततम् ॥
दशाहं द्वाद्वशाहं वा सप्ताहं वा सुख:सह: ।
स शीघ्रं शीघ्रकारित्वात् प्रशमं याति हन्ति वा ॥
कालदूष्यप्रकृतिभिर्दोषस्तुल्यो हि सन्ततम् ।
निष्प्रत्यनीक: कुरुते तस्माज्ज्ञेय: सुदु:सह: ॥
यथा धातूंस्तथा मूत्रं पुरीषं चानिलादय: ।
युगपच्चानुपद्यन्ते नियमात् सन्तते ज्वरे ॥
स शुद्ध्या वाऽप्यशुद्ध्या वा रसादीनामशेषत: ।
सप्ताहादिषु कालेषु प्रशमं याति हन्ति वा ॥
यदा तु नातिशुध्यन्ति न वा शुध्यन्ति सर्वश: ।
द्वादशैते समुद्दिष्टा: सन्ततस्याश्रयास्तदा ॥
विसर्ग द्वादशे कृत्वा दिवसेऽव्यक्तलक्षणम् ।
दुर्लभोपशम: कालं दीर्घमप्युनुवर्तते ॥
इति बुद्ध्वा ज्वरें वैद्य उपक्रामेत्तु सन्ततम् ।
क्रियाक्रमविधौ युक्त: प्राय: प्रागपतर्पणै: ॥

स्त्रोतोभिरित्यादिना संततादिभेदमाह । गुरव इति वृद्धा: ।
दशाहमित्यादि दशाहादीन् व्याप्य । सुदु:सहो `भवति'
इति शेष: । शीघ्रमिति दशाहादय एव प्रभूततरकालान्त-
रापेक्षया शीघ्रशद्ववाच्या: । दशाहादिविकल्पश्च यथाक्रमं
पित्तकफानिलोत्तरसन्निपातारब्धत्वात् सन्ततज्वरस्य ज्ञेय: ।
यदुक्तमन्यत्रापि-`पित्तकफानिलवृद्ध्या दशदिवसद्वादशा-
हसप्ताहात् । हन्ति विमुञ्चति वाऽऽशु त्रिदोषजो धातुमल-
पाकात् । तथा `दशद्वादशसप्ताहै: पित्तश्लेष्मानिलाधिक: ।
दग्ध्वोष्मणाधातुमलान् हन्ति मुञ्चति वा ज्वर:' इति ।
हननमोचनविकल्पस्तु रसादीनामप्यशुद्ध्या च वक्तव्य: ।
कस्मादेवमयं दु:सह शीघ्रकारी च सन्ततो भवतीत्याह
कालेत्यादि कालो वर्षादि:, दूष्यो रसादि:, प्रकृतिर्देहप्रकृति:
कास्मोदेवमयं दु:सह: शीघ्रकारी च सन्ततो भवतीत्याह
कालेत्यादि काल वर्षादि:, दूष्यो रसादि:, प्रकृतिर्देहप्रकृति:
श्लेष्मप्रकृत्यादिका । ननु कालादितुल्यता दोषस्य कदाचिदेव
संभवति, यथा वसन्ते, श्लेष्मप्रकृतौ, मेदसि दूष्ये, कफो
दोष:, एवं शरदि पित्तमपि ज्ञेयम्, इतरेषां तु त्रिदोषादीनां
कालादितुल्यत्वं दुष्प्रापम्, अतस्तत्कृतसंतत: कथं भवतु,
संततश्च द्वादशाश्रयत्वेन त्रिदोषज एव वक्तव्य: । उच्यते
तुल्य इत्यबिधायपि यत् `निष्प्रत्यनीक:' इति करोति, तेन
कालाद्यनुगुणतामेव कालादितुल्यतां स्फोटयति । कालादीनां
चासमानानामपि बलवता दोषेण परिगृहीतानां प्रपीपार्थ-
करणासामर्थ्येनानुगुणतैव भवति, यथा बलवतो राज्ञ एव
हृदयेन प्रतिकूला अपि क्षुद्रराजानोऽनिउगुणा एव भवन्ति ।
किञ्च, त्रिदोषारब्ध एवास्मन्मते संतत:, तस्य चान्यतरं
दोषं प्रति कालादीनां तुल्यत्वं संभवत्येव । अत्रैके `तस्मा-
ज्ज्ञेय: सुदु:सह:' इत्यतोऽनन्तरं `यथाधातून्' इत्यादि
पठन्ति, तदनु `यथा धातून्' इत्यादिग्रन्थं, तत: पुनरा-
चार्यान्तरमतेनान्येद्युष्कादिज्वरत्रयलक्षणं पठन्ति । तत्र
प्रथमपाठक्रमे `यथा धातून्' इत्यादिना सन्ततस्योत्पादा-
दिक्रमं ब्रुवते । धातूनिति रसादिधातुसप्तकम् । रसदुष्टिर्ज्ञेया ।
यथेति येन प्रकारेण गुरुत्वस्तब्धत्वादिना । युगपदित्ये-
ककालम् । नियमादिति सर्वानेव धात्वादीन् सर्व एव दोषा-
श्चानुपद्यन्ते । स शुद्ध्या वेत्यादि स संतत: यदा सर्वे
रसादय: सर्वथा विशुद्धा भवन्ति तदा प्रशाम्यांते सप्ताहा-
दिषु, यदा रसादय: सर्वे सर्वथा वाऽविशुद्धा भवन्ति तदा
हन्तीत्यर्थ: । अथ यदा स्तोका शुद्धिस्तदा का विधेत्याह
यदा त्वित्यादि । नातिशुध्यन्तीति सर्व एव नातिविशुद्धा
भवन्ति सावशेषदोषा भवन्तीत्यर्थ: । न वा शुध्यन्ति सर्वश
इति रसादिषु मध्ये कतिचिच्चाविशुद्धा वर्तन्त इत्यर्थ: ।
द्वाद्वशेति सप्त धातवस्त्रयो दोषा मूत्रं पुरीषं च । दोषाणां
चेह शुद्धि: प्रकृतिगमनेन ज्ञेया । द्वादशाश्रयत्वेन संतत-
स्यैकदोषारब्धत्वं यदुच्यते, तन्निरस्तमेव ज्ञेयम् । विसर्गमिति
परित्यागम् । विसर्गस्वरुपमाह अव्यक्तलक्षणमिति, अव्यक्तं
लक्षणं यस्य तमव्यक्तलक्षणं विसर्गत एतेन, तदाऽपि ज्वरो
लीनोऽस्त्येव, परं लक्षणानि तस्य व्यक्तानि न भव-
न्तीति दर्शयति । तदनु त्रयोदशदिनादारभ्य दीर्घकालमनु
वर्तते, ततो दुर्लभोपशमो भवतीति युक्तमुक्तम् । एभिश्च
धात्वादिद्वादशाश्रयित्वदशाहादिव्यापकत्वादिर्भिर्धर्मै: सततो
भिन्न एव वातादिज्वरेभ्य: कालनियमेन द्वित्र्यादिदिनेषु
व्यवच्छेदेनानुषक्तेभ्य: । यस्तु तन्त्रान्तरे `तथा संतत
एवान्य: स्वल्पदुर्बलकारण: । एकदोषो द्विदोषो वा स्वल्पो-
पद्रवलक्षण: । `अतुल्यदूष्यप्रकृतिं: इत्यादिना ग्रन्थेनोच्यते
सोऽस्मादन्य एवेति, तन्त्रान्तरेऽप्यन्यशब्दप्रयोगात् प्रतिपा-
दितानामिति न विरोध: ।
च. चि. ३-५३ ते ६० च. पा. टीकेसह पान ८९०-९१

बलिनो गुरव: स्तब्धा विशेषेण रसाश्रिता: ।
सन्ततं निष्प्रतिद्वन्द्वा ज्वरं कुर्यु: सुदु:सहम् ॥
वा. नि. २-५९ पान ४५९

बलवान, सामत्वामुळें गुरु असल्यामुळें व स्त्रोतसामध्यें शिरुन स्तब्ध झालेले असे दोष विशेषत: रसवहस्त्रोतसाच्या आश्रयानें व्याधी उत्पन्न करतात. ज्वराच्या सामान्यसंप्राप्तींतील ग्रहणीदुष्टी दोषांच्या बलि, गुरु स्तब्ध या वैशिष्टयामुळें इतर कोणत्याहि व्याधीपेक्षां संततामध्यें अधिक असतें. म्हणूनच कश्यपानें ज्वरचिकित्सेच्या प्रकरणामध्यें ग्रहणीला बल प्राप्त होणें ही एक व्याधिमुक्तीसाठीं आवश्यक अशी अवस्था मानून त्या अनुषंगांत कांहीं उपचार सुचविले आहेत.

संजाते ग्रहणीबले । काश्यप पृ. ३१५ तसेंच सन्निपातज्वरामध्यें आंत्राभिसंजनम् । काश्यप पृ. ३०९ आंत्रक्षोभ होतो असें सांगितलें आहे. संततज्वरामध्यें दोषामुळें दुष्ट भाव सर्व शरीराला व्यापून असतात. शरीरांतील दोष, धातू व मल सर्वच्या सर्व दुष्ट होतात. त्यामुळें व्याधीला द्वादशाश्रयित्व येतें. वात, पित्त व कफ हे तीन दोष, रसादि सप्त धातू आणि मूत्र, पुरीष हे मल या सर्वांचीच विकृति संततज्वरामध्यें असल्यानें तो निष्प्रत्यनीक होतो -व्याधीला कोणीही प्रतिस्पर्धी रहात नाहीं.
[हे द्वादशाश्रयित्व मानतांना स्वेद हा मल अधिक मानावा आणि ज्या दोषाच्या प्राधान्यानें ज्वर उत्पन्न होतो तो बारा आश्रयाच्या यादींतून वगळावा असें आम्हांस वाटतें (कारण दोष ही जशी स्वतंत्र वस्तू आहे तशी वस्तू व्याधि नाहीं संयोगविशेषानें व्याधित्व येतें.) ]

सामान्यत: व्याधीमध्यें अशी स्थिति असते कीं एका दोषाची एखाद्या धातूच्या अथवा मलाच्या आश्रयानें विकृती असली म्हणजे इतर दोषांचे वा धातूंचे गुण व्याधिग्रस्त दोषधातूंच्या गुणांपेक्षां वेगळे असल्यानें व्याधीला वा व्याधींच्या प्रसाराला एक प्रकारची मर्यादा पडून व्याधीची संप्राप्ति नियंत्रित रहाते. संततामध्यें सर्वच विकृत झाल्यामुळें कोणत्याहि भावाचे प्रकृतस्थितींतील नियंत्रण या व्याधीवर रहात नाहीं.

प्रत्येक भाव एक दुसर्‍यापेक्षां भिन्न गुणधर्माच असतांना विकृतीमुळें ज्याच्या दुष्टीमुळें विकृति प्राप्त झाली त्याला अनुकूल अशीच अवस्था त्या त्या शरीरभावनाहि प्राप्त होतें. टीकाकारानें या वस्तुस्थितीच्या स्पष्टीकरणासाठीं एक चांगली उपमा वापरली आहे. विषय समजावून घेण्यासाठीं तिचा उपयोग होणार आहे. बलवान पराक्रमी राजानें जिंकलेले मांडलिक राजे मनांतून प्रतिकूल असूनहि वाह्यव्यवहारामध्यें सम्राटाच्या इच्छेप्रमाणें वागून सर्व गोष्टी करीत रहातात. तसेंच शरीरांतील दोषधातुमलांचे होतें असे तो म्हणतो.

मलं ज्वरोष्मा धातून्वा स शीघ्रं क्षपयेत्तत: ।
सर्वाकारं रसादीनां शुद्ध्याऽशुद्ध्याऽपि वा क्रमात् ॥
वातपित्तकफै: सप्त दश द्वादश वासरान् ।
प्रायोऽनुयाति मर्यादा मोक्षाय च वधाय च ॥
इत्यग्निवेशस्य मतं, हारीतस्य पुन: स्मृति: ।
द्विगुणा सप्तमी यावन्नवम्येकादशी तथा ॥
एषा त्रिदोषमर्यादा मोक्षाय च वधाय च ।
शुद्ध्यशुद्धौ ज्वर: कालं दीर्घमप्यनुवर्तते ॥
ज्वरस्योष्मा-अनलधर्म: सकलवस्तुक्षपणस्वभाव: स कदा-
चित्तथाभूताददृष्टवशादस्मिन् ज्वरे धातुमलयोरेकलोली-
भूतयोर्मलं-वातविडादिकं, क्षपयेत् । तथाभूतादृष्टासामर्थ्या-
द्धान्तूवा रसादीन्, क्षपयेत् । शीघ्रं-आश्वेव, न तु चिरेण
कालेन । अत्र च मलक्षपणोद्यतोऽयं ज्वरोष्मा न धातु-
क्षपणोद्यत इति निरामलक्षणेन विज्ञायते । तत्र चैतन्नि-
रामलक्षणम् - `असंरोधस्त्रोतस्त्वं सप्राणत्वमड्गलाघवं
वातानुलोमनत्वं वाग्देहमनश्चेष्टास्वनालस्यमग्निदीप्तत्वं
विशदास्यत्वं मूत्रपुरीषदिमलप्रवर्तनत्वं क्षुदुपगमो निर्ग्ला-
निता' इत्येवं किञ्चिदुत्पद्यमानमुपलभ्य निश्चीयते ज्वरोष्मणो
मलक्षपणोद्यतत्वम् । एतल्लक्षणविपर्ययेण दोषोपक्रमणीयोक्तेन
(हृ. सू. अ. १३/२३) - ``स्त्रोतोरोध'' इत्यादिना साम-
लक्षणमवगम्यनिश्चीयेत, यथाऽयं ज्वरोष्मा धातुक्षपणोद्यत इति ।
स इत्यनुवर्तते । तत:-तस्मान्मलधातुक्षपणात् कारणात्,
रसादीनां-धातुमूत्रशक्रुद्दोषाणां द्वादशानामप्येकलोली-
भूतानां, सर्वाकारं निशेषं कृत्वा, शुद्द्या-ज्वरोष्मणा निष्पा-
दितया निर्मलतया, वातपित्तकफैर्भूयिष्ठैरेकैकश उत्पन्न: स
सन्ततो ज्वर: प्रायो मोक्षाय ज्वरमुक्तये, मर्यादां अवधिं,
सप्त दश द्वादश वासराननुयाति-अनुवर्तते । वासरानिति
``अत्यन्तसंयोगे'' द्वितीया । सर्व अकारो यस्मिन् शोधने
तत्सर्वाकारं-नि:शेषकफम् । ``क्रियाविशेषणानां नपुसकत्वं
द्वितीया च'' इति द्वितीया । क्रमात्-यथाक्रमम्, तेन वात-
भूयिष्ट: सन्ततो ज्वर: सप्त वासरान् पित्तभूयिष्टो दश
वासरान् कफभूयिष्टो द्वादश वासरान्, इत्यवतिष्ठते । तथा
रसादीनां, एकलोलीभूतानां केवलं ज्वरोष्मक्षपणमात्रमनु-
भवतां, अशुद्द्या समलतया, एषामेव ज्वरोष्मा वातपित्त-
कफैरेकैकश उत्पन्न: प्रायो वधाय मर्यादां सप्त दश द्वादशा-
वासरानुनुयाति । प्रायो बाहुल्येन एषा मर्यादा । कदाचिच्च
वातज्वरादिरुक्तेभ्य: सप्तादि वासरेभ्योऽधिकानि दिनान्य-
नुवृत्य मोक्षाय वधाय वा भवति, कदाचित् न्यूनान्यपीति ।
तन्त्रान्तरे चोक्तम् - ``पित्तकफानिलवृध्या दशदिवस-
द्वादशाहसप्ताहात् । हन्ति विमुञ्चति वाऽऽशु ज्वरो-
ष्मणा धातुमलपाकात् ॥ इति । द्दत्याग्निवेशस्य मतं - ज्ञानम् ।
हारीतस्य पुनरेव स्मृति:-स्मरणम्, नित्यत्वादायुर्वेदस्य ॥
द्विगुणा सप्तमी-चतुर्दशदिनानि यावद्वातज्वर: सन्तत:,
पित्तज्वरो द्विगुणा नवमी-अष्टादशदिनानि, कफज्वरो द्वि-
गुणैकादशी-द्वाविंशतिर्दिवसा: । ``एषा त्रिदोषमर्यादा
मोक्षाय च वधाय च ।'' इति " सर्वाकारं रसादीनां
शुद्ध्याऽशुद्ध्याऽपि वा क्रमात् ।" इत्यत्राप्यनुवर्तनीयम् ।
त्रयश्च ते दोषाश्च त्रिदोषा: तेषां मर्यादा-अवधि:, त्रिदो मर्यादा: ।
द्वयमपि चैतत् तन्त्रकृद्वच: प्रमाणम् । तथादृष्टत्वात् ।
इदानीं यथापरिभाषितात् द्विविधादपि मर्यादाप्रकारादधिक-
तरं कालं यथाऽस्य ज्वरस्यानुवृत्तिभर्वति तथा दर्शतितुमाह-
शुध्द्यशुद्धाविति । शुद्धिसहिता अशुद्धि: शुद्ध्यशुद्धि: ।
शाकपार्थिवादित्वात्समास: । तस्यां सत्यां ज्वर: सन्तताख्यो
दीर्घमपि कालमनुवर्तते - अनुबध्नाति । कदाचिद्रसाख्यो
धातुर्मलरहितो ज्वरोष्मणा क्षपितमलो भवति, कदाचिद्र-
क्तान्यतम:, कदाचिद्रक्तादय: सर्वे न रस:, कदाचिद्रक्तादय:
सर्वे किञ्चिन्मलरहिता न रसस्थथाभूत: कदाचित्किञ्चि-
न्मलरहितो रक्ताद्यन्यतम:, एवंप्रकारा शुद्धिसहिता अशुद्धि-
रुच्यते । सत्यां सन्तताख्यो ज्वरो दीर्घकालमनुवर्तते ।
टीकेसह वा. नि. १-६० ते ६३ पान ४५९-६०

दोषधातुमलांना प्राप्त झालेली ही दुष्टी शरीरांतील स्वाभाविक प्रक्रियेनें वा औषधोपचारानें कमी होत जाईल त्याप्रमाणें सात दहा किंवा बारा दिवसांमध्यें ज्वर उतरतो. हाच काळ हारीताच्या मताप्रमाणें १४, १८ वा २२ दिवसाचाहि असूं शकतो इतकेंच नव्हें तर दोषधातुमलांची शुद्धी नीट झाली नाहीं, व्याधीचें बळ मुळांतच जास्त असलें तर हा काळ ७, १०, १२ या मुदतीच्या पटीमध्यें पुढेंहि दीर्घकाळपर्यंत वाढूं शकतो. या वाढण्याचें व्याधिस्वभावामुळें एक वैशिष्टय असतें. मुदतीच्या काळाचें एक मंडळ पूर्ण झालें म्हणजे ज्वर कांहीं काळ मुक्त झाल्यासारखा दिसतो. ज्वरोष्मा प्रकृत देहोष्म्याइतका उणावतो. आणि पुन्हां वाढूं लागून कालमर्यादेचें दुसरें मंडल सुरुं होतें.

दोषांच्या दुष्टीच्या प्राबल्यानें जर धातूंना येणारी विकृती अधिक अधिक वाढत गेली तर याच नियतकाळाच्या मर्यादेंत रुग्णाचा मृत्यूहि घडतो. सात, दहा, बारा दिवसांची ही मुदत अनुक्रमें वात, पित्त आणि कफ या दोषांच्या उत्कटतेप्रमाणें असतें. वात सर्वात चल गुणाचा म्हणून त्याचा काळ सापेक्षत: अल्प, कफ सर्वात स्थिर गुणाचा म्हणून त्याचा कालावधी अधिक दीर्घ स्वरुपाचा असतो. दोषांचे बलाबल असेल त्याप्रमाणें वर उल्लेखिलेल्या कालमर्यादेपेक्षां ज्वर मुक्ती वा मृत्यु हे परिणाम लवकरहि घडूं शकतात. संततज्वरामध्यें त्याच्या प्रकृतिवैशिष्टयामुळें दोषदुष्टी कमी आणि धातुदुष्टी अधिक अशी स्थिती असल्यानें लक्षणांची विविधता या आधिक्य बहुधा असत नाहीं. कित्येक वेळां तर थोडेंसें अध्मान व ज्वर या लक्षणांव्यतिरिक्त दुसरें कोणतेंहि लक्षण असत नाहीं. दोषज ज्वराच्या मानानें दोषांचें बळ कमी असल्यामुळेंच असें घडतें.

सन्तत्या अविच्छेदेन सप्ताहादीन् व्याप्य अविसर्गी अपरि
त्यागी, अत्यन्तसंयोगे द्वितीया । ननु, यद्येवं कथमस्य
विषमज्वरप्रकरणे पाठ: ? मुक्तानुबन्धित्वं विषमत्वं तच्चात्र
नास्ति । नैव, अस्यापि तथाभावात् । तथा च तल्लक्षणे
चरक:-``विसर्ग द्वादशे कृत्वा दिवसेऽव्यक्तलक्षण: ।
दुर्लभोपशम: कालं दीर्घमप्यनुवर्तते'' इति (च. चि. अ.स्था. ३)
यदुक्तं खरनादेन - ``ज्वरा: पूर्व मयोक्ता ये पञ्च सन्ततकादय: ।
चत्वार: सन्ततं हित्वा ज्ञेयास्ते विषमज्वरा:''- इति;
तत्सन्तते मुक्तानुबन्धित्वस्येकदा भावित्वेनाल्पत्वान्न
तद्‍व्यपदेश: एकतण्डुलाभ्यव्यवहारेऽनशनशब्दस्य व्यपदेशवत्
नहि तृतीयकादिवदावृत्त्या मुक्तानुबन्धित्वमस्येत्यभिप्रायेण
द्रष्टव्यम् । अथवा या विषमज्वरोल्लेखनोक्ता चिकित्सा सा
सन्ततवर्ज सततादिशु कार्येति प्रतिपादनार्थकम् । हरिचन्द्रे-
णापि ``कर्म साधारणं जह्यात्तृतीयकचतुर्थकौ'' इति
(च. चि. स्था. अ. ३) चरकवचनाद्विषमज्वरोक्तचिकित्सा
तृतीयकचतुर्थकयोरेव अन्येषु दोषप्रत्यनीकचिकित्सा कार्येति
व्याख्यातम् । अस्यां हरिचन्द्रव्याख्यायां कर्म साधारणं
सर्वत्रैव विषमज्वरे कार्य विशेषेण तृतीयकचतुर्थकयोरिति
द्रष्टव्यं अन्यथा उक्ततन्त्रान्तविरोध: ।
टीका - मा.नि. ज्वर ३५ पान ४९, ५०

संततज्वराच्या विषयीं त्याला विषमाच्या प्रकरणांत घालावं कीं नाहीं यासंबंधीं कांहीं वाद आहेत. विषमज्वर हे विसर्गी असतात तर संततज्वर हा अविसर्गी ( न उतरणारा) असतो (संतत्या योऽविसर्गी स्यात् संतत: स निगद्यते । (मा.नि. ज्वर ३४) तेव्हां विषमज्वर कां मानावें अशा प्रश्नास प्राचीन ग्रंथकारांनीं उत्तर दिलें आहे तें असें - मुक्तानुबंधित्व, उतरणें व पुन्हां चढणें हें जें विषमज्वराचें वैशिष्टय तें इतर सततादि चार ज्वरांप्रमाणें संततज्वरांतहि असतें. संतताच्या पुनरावृती या बाहेरुन अपथ्य न घडलें तरी मूलभूत दोष विकृतीच्या बलामुळें घडून येतात म्हणजे थोडया दीर्घकालानें असलें तरी संततालाहि मुक्तानुबंधित्व असतें. संततज्वराच्या अनुबंधाचा काळ सात, दहा, बारा असा दीर्घ असल्यामुळें नैसर्गिक कालक्रमानें किंवा उपचारानें दोषांचें पचन झाल्यामुळें पुन: अनुबंध न होण्याची शक्यता असली तरी व्याधिस्वभावामुळें पुन: अनुबंध प्रकृती आहे हें वैशिष्टय बाधित होत नाहींच. खरदानानें केवल चिकित्सावैशिष्टयापुरतेंच खरें मानलें पाहिजे. त्यांतहि तृतीयक चतुर्थकांनाच चिकित्सेसंबंधीचे नियम इतर ज्वरांच्यापेक्षां वेगळें असे उपयोजावे लागतात.

सुश्रुतानें सन्निपातालाच संतत असें म्हटलें असावें असें वाटतें. डल्हणानें आपल्या टीकेंत तसा उल्लेख केला आहे. (सु.उ.३९-५२ टीका) सुश्रुतानें सन्निपाताची कालमर्यादा सांगत असतांना चरकादींनीं संतत प्रकरणीं सांगितल्याप्रमाणें वर्णन केलें आहे. संततज्वर व इतर चार ज्वर यांच्यामध्यें एकरुपतेच्या दृष्टीनें पुढील गोष्टी निरपवादपणें सारख्या आहेत.
(१) संततादि सर्व ज्वर सान्निपातिक आहेत.
(२) रसरक्तादि भिन्नभिन्न धातूंच्या आश्रयांनी ते असतात. धातुदुष्टी हे सर्वाचें समान असें वैशिष्टय आहे.
(३) दोषांचें बल कमी असतें त्यामुळें स्वतंत्र लक्षणसमुच्चय कोणाचाच सांगितलेला नाहीं.
(४) सर्वाच्यामध्यें मुक्तानुबंधित्व असतें.

(१) सततादि इतर विषम व संतत यांमध्ये भेदाचीहि कांहीं विशेष स्वरुपें आहेत. इतर विषम हे शरीरांतील विशिष्ट भावांच्या आश्रयानें असल्यामुळें इतर भाव त्यांना अनुकूल असें नसतात त्यामुळें ते ज्वर अप्रत्यनीक किंवा सप्रतिद्वंद्व असे आहेत. संतत मात्र द्वादशाश्रयी असल्यामुळे निष्प्रत्यनीक आहे.
(२) सततादिविषमज्वरांतील दोष संततापेक्षां अल्प बलाचें व चल असतात. त्यामुळें या विषमांतील मुक्तानुबंधित्व स्पष्ट असतें. संततज्वर बलि, गुरु व स्तब्ध दोषांमुळें होत असल्यामुळें त्याचें मुक्तानुबंधित्व दीर्घकालानें व्यक्त होतें.

संततज्वर जरी सान्निपातिक असला तरी त्याच्या सामान्यसंप्राप्तींत वाताचें प्राधान्य विशेष असतें. त्यामुळें आध्मान हें लक्षण संततज्वरांत बहुधा आढळून येतें.
संतताचाच एकदोषप्राधान्यानें होणारा एक सौम्य प्रकारहि ग्रंथांतरी वर्णिलेला असल्याचें चरकाच्या टीकेवरुन दिसतें. हाहि संतताप्रमाणेंच बली, गुरु व स्तब्ध दोषांनीं युक्त व सर्व धातुमलांच्या आश्रयांनीं राहून ज्वर उत्पन्न करणारा असतो. इतर दोषांचा अनुबंध वा दुष्टी जोडीनें नसल्यामुळें त्याची निष्प्रत्यनीकता त्या प्रमाणांत दुर्बल असतें. ज्वराचें स्वरुपहि सौम्य असतें. ज्वर वेग फार तीक्ष्ण असत नाहीं

मंथरक ज्वर

ज्वरो दाहो भ्रमो मोहो ह्यतीसारो वमिस्तृषा ।
अनिद्रा च मुखं रक्तं तालु जिह्वा च शुष्यति ।
ग्रीवायां परिदृश्यते स्फोटका: सर्षपोपमा: ।
एभिस्तु लक्षणैर्विद्यान्मन्थराख्यं ज्वरं नृणाम् ॥
योग रत्नाकर-पान २१४

योगरत्नाकरानें उल्लेखिलेला मंथरक ज्वर हा संततज्वराचा एक प्रकार आहे असें आमचें मत आहे. संतताच्या सामान्यसंप्राप्तींत वात दोष असला तरी विशेषसंप्राप्तीमध्यें पित्त प्राधान्य आल्यास स्वराचें स्वरुप जें व्यक्त होतें तोच मंथर ज्वर होय. लौकिकामध्यें मघुरा निघणें, वेडा मधुरा निघणें असें या विषमज्वरास उद्देशून म्हटलें जातें. या प्रकारामध्यें ज्वर, दाह, भ्रम, मोह, द्रवमल प्रवृत्ती, छर्दी, निद्रानाश, तोंड लाल होणें, जीभ व टाळू कोरडी पडणें अंगावर विशेषत: गळ्यावर वा गळ्याजवळील शरीरभागावर मोहोरीसारखे, लाल बारीक असे एक प्रकारचे पुरळ येतें. दोषप्राबल्याप्रमाणें तें विरळ व दाट असतें. या अवस्थेंतील भ्रम, मोह हीं लक्षणें उत्कट झाल्यास कांहीं काळ उन्मादाचें स्वरुपहि प्राप्त होतें, आणि या अवस्थेला अनुसरुनच वेडा मधुरा असें म्हटलें जातें. संततादि विषमज्वरांच्या संप्राप्तिप्रकरणांत समाविष्ट होतील अशीं कांहीं सूत्रें चरकादि ग्रंथांतून आलीं आहेत.

कृशांना ज्वरमुक्तानां मिथ्याहारविहारिणाम् ।
दोष: स्वल्पोऽपि संवृद्धो देहिनामनिलेरित: ॥
सततान्येद्युष्कत्र्याख्यचातुर्थान् सप्रलेपान् ।
कफस्थानविभागेन यथासंख्यं करोति हि ॥
सन्ततज्वरमधिधायेदानीं विषमज्वरान् सततादीनाह-
कृशानामित्यादि । कृशानां मिथ्याहारविहारिणां ज्वरमुक्तानां
च मिथ्याहारविहारिणां दोष: स्वल्पोऽपि `अपथ्यै: कृत'
इति शेष:, पुनर्मिथ्याहारविहाराभ्यामभिसंवृद्धो वातप्रेरित:
सन् सततादीन् यथासंख्यं कफस्थानविभागेन करोतीति
सम्बन्ध: । कफस्थानानि आमाशयोर: कण्ठशीर: सन्धयो
यथासंख्यं कथ्यन्ते । तत्र आमाशयस्थ: सततं करोति, स
च प्रतिदिनं कालद्वयानुवर्तनात् किञ्चिन्न्यून:, उर:स्थो
अन्येद्युष्कं, कण्ठस्थ: तृतीयकं; शिरस्थ: चतुर्थकं, सन्धिस्थ:
प्रलेपकं, सर्वेषु कफस्थानेषु व्यवस्थितो दोष: सन्ततं
करोतीति ज्ञातव्यम् । दोषशब्दोऽत्र पृथग्द्वन्द्वसमस्तरुपो
वातादिर्ग्राह्य: । अनिलेरितत्वं च वातस्यापि । स्थितस्य
बाह्यहेतुप्रचुरीभूतेनापरेण वातेन संभवति ।
सटीक सु. उ. १९-५१, ५२ पान ६७५

अहोरात्रादहोरात्रात् स्थानात् स्थानं प्रपद्यते ।
ततश्चामाशयं प्राप्य दोष: कुर्याज्ज्वरं नृणाम् ॥
यथा उरआस्थितो दोषोऽन्येद्युष्कादीन् करोति तथाऽऽह-
अहोरात्रादित्यादि । अहोरात्रादुर:स्थो दोष आमाशयं
प्राप्य अन्येद्युष्कं करोति अन्यस्मिन् दिवसे, कण्ठस्थितो
द्वाभ्यामहोरात्राभ्यां तृतीयकं तृतीयदिवसे शिर: स्थित:
स्थानत्रयमतिक्रम्य चतुर्थकं चतुर्थदिवसे, सन्धिषु ।
स्थितो नित्यमेव प्रलेपकं करोति, स च राजयक्ष्मिणामेव ।
सटीक सु. उ. ३९-५३ पान ६७५

कृशानां व्याधिमुक्तानां मिथ्याहारादिसेविनाम् ।
अल्पोऽपि दोषो दूष्यादेर्लब्ध्वाऽन्यतमतो बलम् ॥
सविपक्षो ज्वरं कुर्याद्विषमं क्षयवृद्धिभाक् ॥
ईदृशानां पुंसामल्पोऽपि-हीनबलोऽपि, अपिशब्दान्महाबलोऽ
पि दोषो-वाताद्यन्यतमो, ज्वरं विषमसंज्ञं कुर्यात् । किं
कृत्वा ? दूष्यादेरन्यतमो, बलं लब्ध्वा । आदिशब्दो देशर्त्वो-
र्ग्रहणाय । अन्यतमग्रहणं चोपलक्षणार्थम् । तेन कदाचिद्‍-
दूष्यादेरेकस्माद्रसादे: कदाचिद्‍दूष्यदेशर्तुभ्यो बलं लब्ध्वेति
योज्यम् । किम्भूतो दोष: ? सविपक्ष:-सह विपक्षेण प्रत्यनी-
केन वर्तते सविपक्ष: । तथा च किम्भूत: ? क्षयश्च वृद्धिश्च
ते भजते-सेवते, क्षयवृद्धिभाक् । सन्ततो हि ज्वरो नि-
ष्पत्यनीक इति सन्ततादस्य भेद: । मिथ्याहारादिसेविना-
मित्यत्रादिशब्देन विहारौषधादिपरिग्रह: ।
वा. नि. २-६४ स. टीकेसह पान ४६०

सन्ततं रसरक्तस्थ:, सोऽन्येद्यु: पिशिताश्रित: ।
मेदोगतस्तृतीयेऽह्नि, त्वस्थिमज्जगत: पुन: ॥
कुर्याच्चतुर्थकं घोरमन्तकं रोगसंकरम् ॥
संततादिज्वराणां प्रतिनियतदूष्यान् धातूनाह रसरक्तस्थो
दोष: संततं कुर्यादित्यध्याहारार्थमाहेति संबन्ध: । यो दोषो
रसरक्ताश्रय: स संततं ज्वरं करोति सन्ततशब्द: सततस्यो-
पलक्षण: । तेनैतदुक्तं भवति-रसस्थ: संततं, रक्तस्थ:
सततकमिति यदुक्तं चरके-``रक्तधात्वाश्रय: प्रायो दोष:
सततकं ज्वरम्'' इति । रसग्रहणं चात्र विशेषपरं सर्व-
ज्वरेषु रसस्यावश्यं दुष्टत्वात् । अन्ये तु सततं सातत्या-
र्थकं मन्यमाना: ``संततौ रसरक्तस्थौ'' इति पठन्ति ।
तत्र युक्तम् । अत्र हेतु: संततसततशब्दौ चात्र संज्ञापरौ
न तु सातत्यवचनौ, तेन संततशब्देन सततकस्यानभि-
धानात्कथमेकशेष: । भिन्नरुपयो: समानार्थयोरेव एकशेष-
विधानात् । तथा च वार्तिकं-विरुपाणामपि समानार्थानाम्-''
इति । केचितु ``सततं रसरक्तस्थ:'' इति पाठं पठित्वा
रसरक्तस्थ: दोष: सततकं ज्वरं करोतीति । अन्ये त्वत्र
सततमिति लुप्तं वर्णयित्वा संततं रसस्थ: सततं रक्तस्थ:
कुर्यादित्याचक्षते । सोऽन्येद्युरिति स इति दोष ।
पिशिताश्रितो मांसश्रित:, अन्येद्युरिति अन्येद्युष्कम् ।
दोषोऽस्थिमज्जगतश्चतुर्थेह्नि चातुर्थकं ? घोरं सुदु:सहम् ।
अन्तकं यममिव मारकत्वात् । रोगसंकरमनेकरोगसंकुलं,
यतो गम्भीरस्थानत्वाच्चिरक्लेशनत्वाच्च रोगानन्या-
नप्यावहति ।
मा.नि. ज्वर ३२, ३६ आ. टीकेसह पान ४८

चरक, वाग्भट, माधवनिदान या ग्रंथकारांनीं धातुविभागांनी संततादि ज्वरांचीं आश्रयस्थानें सांगितलीं आहेत तर सुश्रुतांनीं कफस्थान विभागानें या ज्वरप्रकारांतील दोषाचें आश्रयस्थान वर्णिलें आहे. सुश्रुताचें वर्णन असें -
आमाशय, उर, कंठ, शिर व संधी अशीं कफाचीं स्थानें आहेत. सतताचे दोष आमाशयांत, अन्येद्युष्काचे उरांत, तृतीयकाचे कंठांत व चतुर्थकाचे शिरामध्यें राहतात. वाताच्या प्रेरणेनें हे दोष एका दिवसांत एक स्थान व्यापीत आमाशयामध्यें येऊन ज्वर उत्पन्न करतात. (आमाशयाचे ऊर्ध्व व अध: असे दोन भेद करुन, ऊर्ध्वामाशयाच्या आश्रयानें सतत व अधरामाशयाच्या आश्रयानें संतत असें मानलें असतां सर्व विषमज्वरांची सुश्रुतोक्त कल्पना पूर्ण केल्यासारखें होईल) आमाशयांतील दोष सतत (संतत) ज्वर उत्पन्न करतात. उरांतील दोष एक दिवसांनीं आमाशयांत येतात. त्यामुळें अन्येद्युष्क ज्वर उत्पन्न होत. उरामध्यें निवास करुन मग आमाशयांत उतरत असल्यामुळें तृतीयकज्वर उत्पन्न होतो. शिरांतील दोषांची आमाशयांत येत असतांना मार्गातील कंठ व उर या स्थानी दोन दिवस विश्रांति होते व चवथ्या दिवशीं ते आमाशयांत पोंचत असल्यानें चातुर्थिक ज्वर उत्पन्न करतात. दोषदुष्टीचें प्रमाण अल्प असल्यामुळें दोष त्या त्या कफस्थानीं संचित होऊन आमाशयोन्मुख होण्यास मध्यंतरी कांहीं काळ जातो व त्यामुळें हे ज्वर निसर्गी बनतात. (सर्व कफस्थानांतील दोष संतत ज्वर आणितात.) सुश्रुताचे हे वर्णन कफस्थानाप्रमाणेंच कां विभागलें हें समजत नाहीं. सर्व प्रकारचे ज्वर हे वातप्रधान असल्याचें वर्णन बहुधा सर्वांनीं केलेलें आहे त्यामुळें सुश्रुताच्या वर्णनाची उपपत्ति लागत नाहीं. सुश्रुतानें वर्णन केलेल्या स्थानांमध्यें त्या त्या प्रकारच्या ज्वरांत कांहीं विशेष लक्षणें आढळतात असेंहि म्हणतां येत नाहीं. ज्वरांना चिरकारिता असते त्यामुळें सुश्रुतानें कफाची संबंध या ज्वराशीं लावला असल्यास न कळे. चरकादींनी विषमज्वरांचे धातूंच्या आश्रयांनीं असलेंले विविध स्वरुप वर्णिलेलें आहे. रसाच्या आश्रयानें संतत, रक्ताच्या आश्रयानें सतत, मांसाच्या आश्रयानें अन्येद्यु:, मेदाच्या आश्रयानें तृतीयक आणि अस्थिमज्जेच्या आश्रयानें चातुर्थिक ज्वर होतो असें वर्णन केलेलें आहे. या ज्वरांच्या धातूंचें वर्णन मात्र कांहीं ठिकाणीं थोडें वेगळे आहे. चरकानें अन्येद्युष्क ज्वराचे आश्रयस्थान मेद व रक्त सांगितलें आहे. तृतीयकाचें आश्रयस्थान मांस व अस्थि सांगितलें आहे.

माधवनिदानाचें वर्गीकरण लक्षणें व चिकित्सेचा विचार करतां अधिक योग्य वाटतें. हें दोषांचे धातूंच्या आश्रयानें असणें, प्रायिक असून व्यपदेशस्तु भूयसा या नियमानें त्यांचे उल्लेख केले आहेत असें समजावें.

सतत ज्वर

दोषो रक्ताश्रय: प्राय: करोति ज्वरम् । अहोरात्रस्य
स द्वि: स्यात्
प्रायो-बाहुल्येन. रक्ताश्रयो दोष: सततं ज्वरं विदधाति ।
प्रायोग्रहणात् रसाद्याश्रयत्वमस्य सूचयति । तस्मात्सर्वो
ज्वर: सर्वधातुव्यापी । भूयांस्तु धातुर्व्यपदिश्यते । अत
एव सन्तते पपाठ (श्लो. ५९) ``विशेषेण रसाश्रिता:'' इति ।
तस्माद्विशेषेण रक्ताश्रय: सतत इत्यवेहि ।
स: सतत:, अहोरात्रस्य मध्ये द्वि: स्यात्-द्वौ कालानुवर्तते ।
अहर्युक्ता रात्रिरहोरात्र: । ``अह:सर्वैकदेश'' इत्यादिना
अच्‍ समासान्त: । ``रात्राह्नाह: पुंसि'' इति पुंस्त्वम् ।
द्वौ वारौ द्वि: । ``द्वित्रिचतुर्थ्य: सुच्‍'' इति सुच्‍ ।
अत्र च नायं नियम;, यदह्नेकवारं रात्रावेकवारमिति, किं
तर्हि ? कदाचिदह्नयेव वारद्वयं कदाचिद्रात्रामेव वारद्वयं,
कदाचिद्‍द्वयोरपि वारद्वयमिति प्रतीहि ।
वा.नि. २-६९ स. टीकेसह पान ४६२

रक्तधात्वाश्रय: प्रायो दोष: सततकं ज्वरम् ।
सप्रत्यनीक: कुरुते कालवृद्धिक्षयात्मकम् ॥
अहोरात्रे सततको द्वौ कालावनुवर्तते ।
च.चि. ३-६१, ६२ पान ८९४

विशेषत: रक्तधातूच्या आश्रयांनीं राहून दोष सततज्वर उत्पन्न करतात. हा ज्वर दिवसांतून दोनदां, रात्रींतून दोनदां वा दिवसरात्र मिळून दोनदां या प्रमाणें येतो. रक्तधातूची दुष्टी व दोषांचें बलाबल असेल त्या प्रमाणें ज्वराची २४ तासांतील आवर्तनें याहीपेक्षां जास्त वेळां होऊं शकतात. कित्येक वेळीं दोनतीन तासांच्या अंतरानेंसुद्धां आवर्तन पुरें होतें. थंडी वाजतें, ताप भरतो. वरचेंवर येणारी ही ज्वराची आवर्तनें धातू व दोष यांच्या दुष्टीची दारुणता सूचवितात.

अन्येद्यु: ज्वर

सकृदन्येद्युराश्रित: ।
तस्मिन्मांसवहा नाडी:
सकृदन्येद्यु: `अहोरात्रस्य' इत्यनुवर्तते । अहोरात्रस्य
मध्येऽयमन्येद्युर्नाम विषमज्वर सकृत् एकवारं भवेत् ।
कदाचिदहन्येकवारमुत्पद्यते, कदाचिद्रात्राविति । तस्मिन्
अन्येद्युर्ज्वरे, सर्वधात्वाश्रयोऽपि दोषो विशेषेण मांसवहा
नाडीराश्रित: । आ. र. अन्येद्युर्लक्षणमाह-सकृदिति ।
सकृत एकवारम् । आश्रितो दोष: । अस्मिन् अन्येद्यु: ।
सटीक वा. नि. २-७० पान ४६२

कालप्रकृतिदूष्याणां प्राप्यैवान्यतमाद्वलम् ।
अन्येद्युष्कं ज्वरं दोषो रुद्‍ध्वा मेदोवहा: सिरा: ॥
च. चि. ३-६३

अन्येद्युष्कं ज्वरं कुर्यादपि संश्रित्य शोणितम् ।
च. चि. ३-६५ पान ८९५

अन्येद्युष्कज्वर विशेषत: मांसधातूच्या आश्रयानें राहिलेल्या दोषांमुळें उत्पन्न होतो. रक्त व मेदाच्या आश्रयानेंहि हा ज्वर येत असल्याचें चरकानें सांगितलें आहे. या ज्वरामध्यें रोज ताप येतो (मध्यें उतरुन)

तृतीयक ज्वर

मेदोनाडीस्तृतीयके ।
ग्राही पित्तानिलान्मूर्ध्नस्त्रिकस्य कफपित्तत: ॥
सपृष्ठस्यानिलकफात्स चैकाहान्तर: स्मृत: ।
तृतीयके मेदोवहा नाडीर्विशेषेण दोष आश्रित इति योज्यम् ।
मेदोवहा नाडीराश्रित्य दोषस्तृतीयक: कुरुत इत्यर्थ: । स च
त्रिविध:-पित्तवातादधिकात् कफपित्तात् वातकफाच्च ।
तत्र ग्राही मूर्ध्न: शिरस:, पित्तानिलात्तृतीयको भवति,
मूर्ध्नि वेदनास्तास्ता जनयतीत्यर्थ: । यश्च कफपित्तादुत्प-
द्यते स त्रिकस्य ग्राही-त्रिके पीडामुत्पादयति । यश्चानिल-
कफाज्जायते स पृष्ठसहितस्य त्रिकस्य ग्राही-पृष्ठे त्रिके च
पीडा जनयति । एवमयं त्रिप्रकारस्वभाव: । स च तृतीयक
एकहान्तरं इति स्मृतो `मुनिभि:' इति शेष: । एकेनाह्नाऽ
न्तरं व्यवधानं, यस्य स एवम् । एकस्मिन्नहनि तिरोभूय
पुनरुदेतीत्यर्थ: ।
वा. नि. २-७०, ६१ स. टीकेसह पान ६६२

स प्रत्यनीको जनयत्येककालमहर्निशि ।
दोषोऽस्थिमज्जरा: कुर्यात्तृतीयंकचतुर्थकौ ॥
च. चि. ३-६४

मांसस्त्रोतांस्यनुगतो जनयेत्तु तृतीयकम् ।
च. चि. ३-६६ पान ८६५

कफापित्तात्रिकग्राही पृष्ठाद्वातकफात्मक: ।
वातपित्ताच्छिरोग्राही त्रिविध: स्यात्तृतीयक: ॥
मा. नि. ज्वर ३७ पान ५१

उल्बणदोषमेदेन तृतीयचतुर्थकयोर्लक्षणान्तरमाह-कफ-
पित्तादित्यादि । त्रिकग्राही वेदनया त्रिकव्यापी, त्रिकस्य
वातस्थानत्वे तद्‍गतौ पित्तकफावन्यस्थानगतत्वेन दुर्बलौ
तृतीयादिने वेगं कुरुत:, यदि तु स्वस्थानस्थितौ स्यातां तदा
सन्ततज्वरमेव कुर्यातामिति जेज्जट: । एवं शिरसि कफ-
स्थाने, पृष्ठे च पित्तस्थाने बोद्धव्यम् । पृष्ठादिति ल्यब्लोपे
कर्मणि पञ्चमी, पृष्ठं वेदनया व्याप्येत्यर्थ: । न च वाच्यं
यदि त्रिकं वातस्थानं तत्कथं तत्र पित्तकफाविति; प्रकृति-
स्थानां दोषाणां स्थाननियमो न तु प्रकुपितानां हि, दोषाणां
शरीरे परिधावताम् । यत्र सड्ग: ख (स्व) वैगुण्या,
व्द्याधिस्तत्रोपजायते इति (सु. सू. आ. अ २४) ।
एव मन्यस्थानगतत्वेन दोषदौर्बल्यादि चतुर्थकेऽपि वाच्यम् ।
मा. नि. ज्वर-३८ म. टीका पान ५१,५३

तृतीयज्वर विशेषत: मेदधातूच्या आश्रयानें असणार्‍या दोषामुळें उत्पन्न होतो. चरकानें अस्थि व मांस हे धातू या व्याधीचे आश्रय म्हणून सांगितले आहेत. प्लीहावृद्धि हें लक्षण दीर्घकालीन तृतीयकाचा परिणाम म्हणून दिसते. त्यामुळें मेदोधातूशी तृतीयकाचा संबंध अधिक असावा असें वाटतें. तृतीयकाचे दोषदृष्टया तीन उपप्रकार होतात व प्रकारभेदानें त्याच्या उत्पत्तिकालीन लक्षणांमध्येही भेद उत्पन्न होतो.

कफपित्तप्रधान तृतीयकामध्यें त्रिक या अवयवांत वेदना असतात. वातकफात्मकतृतीयकामध्यें पृष्ठामध्ये पीडा होते. वातपित्तात्मकतृतीयकामध्ये शिर:स्थूल हें लक्षण असतें. त्रिक वाताचे, पृष्ठ पित्ताचे, शिर हे कफाचे स्थान आहे, त्या स्थानांत येणारे इतर दोष दुसर्‍याचे स्थानांत आल्यानें दुर्बल असतात म्हणून स्थानीन दोषाच्या दृष्टीनें त्या त्या स्थानीं वेदना होतात. हे मधुकोषाचेच मत चिंतनीय आहे. तृतीयकज्वर एक दिवसाआड येतो.

चातुर्थिक ज्वर
चतुर्थको मले मेदोमज्जास्थ्यन्यतमस्थिते।
मज्जस्थ एवेत्यपरे प्रभावं स तु दर्शयेत॥
द्विधा कफ़ेन जंघाभ्यां स पूर्व शिरसोऽनिलात।
मेदश्च मज्जा चास्थि च मेदोमज्जास्थीनि, तेषामन्यस्मिन्
स्थिते दोषे कदाचिन्मेदसि स्थिते दोषे कदाचिन्मज्जनि
कदाचिदस्थनि स्थिते दोषे चतुर्थको ज्वरो जायते। एकं
दिनं ज्वरयित्वा व्द्दहं विमुच्य पुनर्ज्वरयति स चतुर्थको
वेद्द:। मज्जस्थ एवेत्यपरे-अन्ये पुनराचार्या एवं स्मरन्ति,
चतुर्थको ज्वरो मज्जस्थ एव दोषे जायते। स पुनश्चतुर्थक:
प्रभावं द्विधा द्विप्रकारं, दर्शयेत। कफ़ेनाधिकेन यो जायते
स पूर्व प्रथमं, जड्घाभ्यां ततोऽन्येभ्योऽड्गेभ्य:। अनिलाद्यो
भवति स पूर्व शिरसो जायतेऽनन्तरमड्गान्तरेभ्य: ।
वा. नि. २-७२ स. टीकेसह पान ४६२

संश्रितो मेदसो मार्ग दोषश्चापि चतुर्थकम् ।
च. चि. ३-६६ पान ८९५.

प्रभावं रुजारुपशक्तिम् । दैविध्यं विवृणोति जड्वाभ्यामित्यादि
जड्घाभ्यां शिरस्त इत्येतच्च पञ्चमीद्वयं पूर्ववत् । पूर्वमिति
प्रथमं, तत्र भूत्वा । निखिलं देहं व्याप्नोति । श्लैष्मिक
इति श्लेष्मोल्बण:, सन्ततसततकान्येद्युष्कतृतीयकचतुर्थकानां-
पञ्चानां सन्निपातजत्वात् (यदुक्तं चरके ``प्रायश: सन्निपातेन
दृष्ट: पञ्चविधो ज्वर: । सन्निपाते तु यो भूयान् स
दोष: परिकीर्तित:'' (च.चि.स्था.अ.३) । अथवा
प्रायोग्रहनादेकदोषजा द्विदोषजो अपि भवन्ति । अन्ये त्वाहु:
विकृतिविषमसमवायारब्धा, सन्तदादय: सन्निपातजा तेषा-
मेवोभ्तूतदोषेण व्यपदेश:, प्रकृतिसमसमवायारब्धास्त एक-
दोषजद्विदोषजा अपि भवन्तीति जेज्जट: । प्रकृतिसमसम-
वायारब्धश्चतुर्थकस्तु पित्तेन न क्रियत एव, व्याधिस्वभावात्
पित्तजगलगण्डवत् । ननु अस्ति पैत्तिकोऽपि चतुर्थक:,
तथाच हारीताचार्यो व्याहरति - `चतुर्थको नाम गदो
दारुणो विषमज्वर: । शोषण: सर्वधातूनां बलवर्णाग्निनाशन: ।
त्रिदोषजो विकार: स्यादस्थिमज्जगतोऽनिल: । कुपितं
पित्तमेवं तु कफश्चैवं स्वभावत: । शीतदाहकरस्तीव्रस्त्रिकालं
चानुवर्तते । स सन्निपातसंभूतो विषमो विषमज्वर: ।
ऊर्ध्व कायस्य गृह्वाति य: पूर्व सोऽनिलात्मक: ।'' पूर्व
गृह्णात्यध:कायं श्लेष्मवृद्धश्चतुर्थक: इति'' । अत्राहु:-
अनुबन्धरुपमत्र पित्तं, नत्वारम्भकं, कथमेषा प्रतीतिरिति
चेत्, स्थानविशेषानभिधानात्'; अत एव हारीतेनापि स्थानं
नोदाहृतमेव जड्घादिवदिति चरकटीकाकृतो व्याचक्षते ।
किंत्वेषां व्याख्या तदा संगच्छते यदि पित्तर्लिंड्गं नोद्‍भूतं
दृश्यते, दृश्यते च; तथाहि कथ्यते-भेडेऽपि पैत्तिक: पठयते,
``आमाशयस्थ: पवनो ह्यस्थिमज्जगतोऽपि वा । कुपित:
कोपयत्याशु श्लेष्माणं पित्तमेव च'' इति । किंच नागभर्तृ-
तन्त्रे स्थानमप्युक्तमेव ऊर्ध्वकायं तु य: पूर्व गृह्णाति सोऽ-
निलात्मक: । मध्यकायं तु गृह्णाति पूर्व यस्तु स पित्तज: ।
पूर्व गृह्नात्यध:कायं श्लेष्मवृद्धश्चतुर्थक:'' इति । तस्मात्प्रा-
येण कफवाताभ्यां भवतीति पैत्तिकश्चतुर्थकश्चरकादिभिर्नो-
दाहृत: नत्वसंभवादिति मन्तव्यम् ।
मा. नि. ज्वर ३८ म. टीका पान ५२

चतुर्थकज्वरामध्यें भेद, अस्थि व मज्जा या धातूंच्या आश्रयानी राहिलेलें दोष ज्वर उत्पन्न करतात. याचे दोन प्रकार होतात. कफप्रधान चतुर्थकामध्यें पोटर्‍या दुखून ज्वर येतो व वातप्रधान चतुर्थकामध्यें ज्वरलक्षणाला शिर:शूला पासून आरंभ होतो. माधव निदानाच्या टीकेमध्यें या चातुर्थिकज्वराची तिसरी एक पित्तप्रधान अवस्थाही मानलेली आहे, या प्रकारामध्ये मध्यशरीरामध्ये दाहादिक लक्षणें दिसून नंतर ज्वर येतो असें वर्णन केलेलें आहे. चातुर्थिकज्वर हा दोन दिवसांआड येतो. गंभीर धातूंच्या आश्रयानें असल्यामुळें व्याधीचें स्वरुप परिणामत: दारुण ठरतें. व्याधी चिरकारी होतो. या ज्वरामध्यें सर्व धातूंचे शोषण होते. बल, वर्ण व अग्नि यांचा नाश होतो.

विपर्यय

विषमज्वर एवान्यश्चतुर्थकविपर्यय: ।
त्रिविधो धातुरेकैको द्विधातुस्थ: करोति यम् ॥
संग्रति मध्ये अहनी ज्वरयत्यादावन्ते च यो मुञ्चति, स
चतुर्थकविपर्ययत्वेन चतुर्थकग्रहणगृहीत एवेति दर्शयनाह-
विषम इत्यादि त्रिविधो धातुरिति वातादि । द्विधातुस्थ
इति अस्थिमज्जगत: । अयं च विषमज्वर एवेति सामान्ये-
नोक्तं, तथाऽपि चतुर्थकस्य प्रकाररुपविषमज्वर एवेति
मन्तव्यम् । अत्र तन्त्रान्तरम्-`अस्थिमज्जोभयराते चतुर्थक-
विपर्यय: । त्र्यहाद्‍ह्नहं ज्वरयति ह्यादावन्ते च मुञ्चति इति ।
च. चि. ३-७३ च. पा. टीका पान ८९९

विषमज्वर एवान्यश्चतुर्थकविपर्यय: ।
स मध्ये ज्वरयत्यह्नि आदावन्ते च मुञ्चति ॥
चतुर्थकविपर्ययमाह-विषमेत्यादि । अत्र तन्त्रान्तरं
``अस्थि मज्जोभयगते चतुर्थकविपर्यय: । स मध्ये
ज्वरयत्यह्नि ह्यादावन्ते च मुञ्चति'' इति ।
असावेकदिनं मुक्त्वा, मध्ये दिनद्वयं भूत्वा अन्ते
एकदिनं न भवतीति व्याचक्षते जेज्जटादय: ।
`अस्थिमज्जोभयगते चतुर्थकविपर्यय: ।
त्र्यहाव्हयं ज्वरयतादावन्ते च मुञ्चति-'' इति पराशर
वचनास्यापि स एवार्थ:, त्र्यहादिति त्र्यहस्यादिदिने विमु-
ञ्चति, दिनद्वयं ज्वरयति, त्र्यहस्यान्ते चतुर्थदिनं मुञ्चतीति
तात्पर्यार्थ व्याचक्षते । हरिचन्द्रस्त्वाह-द्वे अहनी निरन्तरं
ज्वरयित्वा उपरम्यैकमह: पुनर्ज्वरयतीत्येषश्चतुर्थकविपर्यय इति ।
आदिदिनाभावश्चोत्तरोत्तरपातिदिवसेष्ववधार्य: ।
चतुर्थकविपर्ययस्योपलक्षणत्वेन तृतीयकादिविपर्ययोऽप्यूह्य
इत्याहु: । तद्यथा-मध्ये एकदिनं ज्वरयति, आद्यन्तयोर्मुञ्च-
तीति तृतीयकविपर्यय: एककालं विमुच्य सर्वमहोरात्रं
व्याप्नोतीन्यन्येद्युष्कविपर्यय:, कालद्वये मुञ्जति, सर्व-
महोरात्रं ज्वरयतीति सततविपर्यय: अत्र दोषाविकृतिरेव
मानाविधा हेतुरिति । ``कफस्थानेषु वा तिष्ठन् दोषो
द्वित्रिचतुर्षु च । विपर्ययखयान्कुरुते विषमान्कृच्छसाधनान्
[सु. उ. तं. आ. ३९] । इति वृद्धसुश्रुतवाक्यं व्याचक्षाणो
जेज्जत: अन्येद्युप्कतृतीयकचतुर्थकमात्रस्यविपर्ययमुदाहारति
तद्यथा-आमाशयहृदयकण्ठस्थितेन तृतीयकविपर्यय:
तत्रैकस्मिन् दिने हृदयस्थो दोष आमाशयमागत्य तत्स्थेन
सह ज्वरयति, तद्दिने कण्ठस्थितश्च हृदयमायाति, अपरदिने
सोऽप्यामाशयमागत्य ज्वरयति एवं दिनद्वयं भूत्वा पश्चा-
देकदिनं न भवतीति तृतीयकविपर्यय: क्रियते, तत्र यस्मिन्
दिने हृदयस्थो दोष आमाशयामागत्य ज्वरयति तस्मिन्नेव
कण्ठस्थो हृदयं शिरसश्च कण्ठमायाति अपरदिने हृदिस्थ
एवामाशयमागत्य ज्वरयति, एवं दिनत्रये भूत्वा पश्चादेक-
दिनं न भवतीति चतुर्थकविपर्यय इति । एते च सर्व एव
ज्वरा न विरुद्धा: सर्वेषामेव मुनिप्रणीतत्वात् । यथोक्तं
स्मृतिशास्त्रे-स्मृतिद्वैधं तु यत्र स्यात्तत्र धर्मावुभौ मतौ'' इति ।
दृश्यन्ते च नानाविधा एव विषमज्वरा: एष एव
न्यायश्चरकसुश्रुतयो; कुष्ठवैषम्ये वाप्यचन्द्रेण दर्शित:, न वा
चिकित्साभेदोऽप्येषामुक्त:, यैव तृतीयकादौ चिकित्सा सैव
तद्विपर्ययेऽपीति ।
मा. नि. ज्वर-३९ म. टीकेसह पान ५३, ५४

अस्थिमज्जोभयगते चतुर्थकविपर्यय: ।
त्रिधा, व्द्यहं ज्वरयति दिनमेकं तु मुञ्चति ॥
वा. नि. २-७३ पान ४७३

चातुर्थिकविपर्यय हा विषमज्वराचाच एक प्रकार असून त्यामध्यें ओळीनें दोन दिवस ताप येणें अशी स्थिति असतें. चातुर्थिक-विपर्यय-ज्वर उत्पन्न करणारे दोष अस्थि आणि मज्जा या दोनहि धातूना व्यापून असतात. चातुर्थिकविपर्यय हा चातुर्थिकाचा पोटभेद आहे. चातुर्थिकामध्यें दोन दिवस ज्वर नाहीं अशी स्थिती असून एक दिवस ज्वर असतो अशी स्थिती असते. चातुर्थिकाच्या विपर्ययामध्यें ही परिस्थिती उलट होते. म्हणजे दोन दिवस ज्वर नसण्याच्या ऐवजीं दोन दिवस ज्वर असतो व एक दिवस ज्वर नसतो. या विपर्यामध्यें दोषांचें बल व स्थानव्याप्ति अधिक असल्यामुळें ज्वर आहे असा काळ अधिक व ज्वर नाहीं असा काळ अल्प अशी घटना घडते. चातुर्थिकविपर्ययाच्या उपलक्षणेनें सर्वच विषमज्वराच्या बाबतींत (विसर्गी) विपर्यय घडतात. असें माधवनिदानाच्या टीकाकारानें सांगितलें आहे. सुश्रुताच्या कफस्थानानुरुप असणार्‍या दोषसंश्रयानें विपर्यय कसे उत्पन्न होतात त्याचें वर्णन टीकाकारानें केलें आहे. एकापेक्षां अधिक दोन, तीन, चार अशा स्थानांना व्यापून असणारे दोष विपर्यय उत्पन्न करतात असें तेथें सांगितले आहे. विपर्ययामध्यें स्थानदुष्टी व्यापक असते व दोषांचें बल अधिक असते हा नियम त्यावरुनहि सिद्ध होतो असें म्हणतां येईल. ज्वराचा काळ अधिक असणें व ज्वरमुक्तीचा काल अल्प असणें हें विपर्ययाचे स्वरुप लक्षांत घेतलें तरच तृतीयक व अन्येद्युष्क व सतत यांचे विपर्यय होतात हे ध्यानांत येईल नाहींतर तृतीयक व तृतीयकविपर्यय दिवसाच्या मोजणीनें फरक पडणें शक्य नाहीं. पुढे दिलेल्या ज्वराच्या आलेखावरुन विपर्ययाची कल्पना स्पष्ट होईल.

विषमाचे अन्य प्रकार

उक्तं च तन्त्रान्तरे-``समौ वातकफौ यस्य क्षीणपित्तस्य
देहिन: । रायो प्रात्रौ ज्वरस्तस्य दिवा हीनकफस्य तु'' इति ।
सर्वेषु च विषमज्वरेष्ववश्यंभावी वायु: । यदाह वृद्ध-
सुश्रुत:-`नर्तेऽनिलाद्वै विषमज्वर: समुपजायते । कफ
पित्ते हि निश्चेष्टे चेष्टयत्यनिलेरिता'' इति (सु. उ. तं.अ. ३९)
तथा विदेहेऽपि-``पवनो गतिवैषम्याद्विषमज्वरकारणम् इति ।
मा. नि. ज्वर पान ५७

कफवातौ समौ यस्य हीनपित्तस्य देहिन: ।
तीक्ष्णो वा यदि वा मन्दो जायते रात्रिको ज्वर: ॥
दिवाकरापीतबले व्यायामाच्च विशोषिते ।
शरीरे नियतं वाताज्जर: स्यात् पूर्वरात्रिक: ॥
अ. सं. नि. पान, २२, २३.

वातकफ समप्रमाणांत वाढले असून पित्त कमी झाले असेल तर दोषांच्या बलाबलाप्रमाणें तीक्ष्ण वा मंद स्वरुपाचा ज्वर रात्रीच्या वेळीं येतो त्यास रात्रिक ज्वर असें म्हणतात. वाताचें बल अधिक असल्यास व्यायामानें व सूर्याच्या उष्णतेनें शरीर शुष्क झालें असल्यास ज्वर रात्रीच्या पूर्वीच येतो. [पूर्वरात्रिक या शब्दाचा अर्थ पहिल्या रात्री प्रदोषकाळीं असा आहे. मधुकोशटीकेच्या संदर्भानें आम्ही रात्रीच्या पूर्वीच म्हणजे दिवसा असा अर्थ केला आहे. ``पीतबले'' व ``विशोषिते'' या संग्रहाच्या शब्दाने मधुकोशकारानें उल्लेखिलेली कफहीनताच सूचित होते. कफहीनतेमुळें ज्वर दिवसा येतो असे मधुकोशकारानेंच म्हटलें आहे. रात्रीं येणारा, पूर्वरात्रीं प्रदोषसमयीं येणारा व दिवसा येणारा असे तीन प्रकारही करतां येतील. अन्येद्युष्काचेच हे उपप्रकार मानावेत. साध्या अन्येद्युष्कापेक्षा दोषदुष्टीतील वैषम्य, या उपप्रकारामध्यें अधिक असल्यानें हे उपभेद अधिक पीडाकर आहेत ] सर्वच विषमज्वरांत वायूचे प्राधान्य असलें तरी विषमांतील हे उपप्रकार वातदुष्टीचीच उग्रता व्यक्त करणारे असतात.

ज्वराचा अन्यथा भाव

बालाबलेन दोषाणामन्नचेष्टादिजन्मना ।
ज्वर: स्यान्मनसस्तद्वत्कर्मणश्च तदा तदा ॥
दोषदूष्यर्त्वहोरात्रप्रभृतीनां बलाज्ज्वर; ।
मनसो विषयाणां च कालं तं तं प्रपद्यते ॥
वा. नि. २-७४, ७५ पान ४६३

बलं चाबलं च बलाबलं, सामर्थ्यासामर्थ्यम्, आसन्नव्याधि-
कारणानां दोषाणां-वातदीनां तदा तदा बलाबलेन ज्वर:
स्यात् किम्भूतेन ? अन्नचेष्टादिजन्मना । आद्यात् इत्यन्नं
रक्तशाल्यादि । अन्नग्रहणमुपलणार्थम्, मांसरसाद्यपि
हि पानं गृह्यते । चेष्टयत् इति चेष्टा चान्नचेष्टे, ते आदी येषां
कालदूष्यादीनां त एकम्, तेभ्यो जन्म यस्य बलाबलस्य,
तेनान्नचेष्टाद्युत्पन्नेन सततकादिर्ज्वरो भवेत् । मनस्तद्वत् ।
तद्वदित्यनेन दोषाणां बलाबलमतिदिश्यते । यथा दोषाणां
शारीराणां बलाबलेन ज्वर: स्यात् । चशब्दात् कर्मणोऽपि
पूर्वोक्तस्य बलाबलेन सततकादिज्वर: स्यादिति । कस्य
सम्बन्धिन: कर्मणो व्यापरस्य चित्तस्यार्थस्य बलाबलेन
तद्वशाज्ज्वरोऽसौ भवेत् । अन्ये त्वाचक्षते, कर्मण:
पुराकृतस्य बलाबलेन, पुराकृतकर्मवशादिति । यत्तदोर्नि-
त्याभिसम्बन्धाद्यदत्रानुक्तमपि लभ्यते । तेनायं सम्बन्ध:
यदा, यदाऽन्न्चेष्टादिजन्म दोषाणां बलाबलं स्यात्, तथा
मनसो दोषाणां बलाबलं स्यात्, तथा कर्मण: पूर्वकृतस्य
बलाबलं, स्यात्, तदा तदा सततकादिर्ज्वर: स्यादिति ।
अपि च दोषाणां वातादीनां बलेन, तथा दूष्याणां रसादीनां
तथा ऋतूनां शिशिरादीनां तथाऽहोरात्रस्य तथा प्रकृतीनां
बलेन, मनसो बलेन, तथा विषयाणां शब्दस्पर्शरुपरस-
गन्धानां बलेन, ज्वरस्तं तं-विशिष्टं कालं प्रपद्यते । तेन
कदाचित् सततकोऽन्येद्युस्तृतीयकश्चतुर्थको वा भवति ।
तथा कदाचित् चतुर्थको भूत्वा तृतीयकोऽन्येद्यु; सततको
वा भवेत् ।
टीका वा. नि. २-७५ पान ४६३

एषां च ज्वराणामृत्वादिहेत्वन्तरलाभादन्यथाभावोऽपि
दृश्यते । तद्यथा सन्तत: स्वरुपं त्यक्त्वा सततादीनाम-
न्यतमत्वं प्रतिपद्यते, तथा चतुर्थकस्तृतीयकादिरुपत्वम् ।
यदाह चरक:, ``ऋत्वहोरात्रदोषाणां मनसश्च बलाबलात् ।
कालमर्थवशाच्चैव ज्वरस्तं तं प्रपद्यते-इति (च. अ. स्था.
(चि. ३) । अस्यार्थ: बलाबलादिति ऋत्वादिमनोन्तेन
संबध्यते, बलं चाबलं च, बलाबलं अर्थशब्दोऽत्र प्राक्तन-
कर्मवाची, तं तं कालं सततकाद्युक्त: ज्वर: प्रतिपद्यते
इति योजना । उदाहरणं च ऋत्वहोरात्रबलाबलाद्यथा-यदा
निदाघोत्पन्नो वातप्रधानश्चतुर्थको वर्षासमयप्राप्नोति तदा
तेनर्तुनाऽऽप्यायितबलस्तृतीयकान्तानां सततकादीनामन्यत-
मत्वं प्राप्नोत्युत्कर्षात् । एवं वर्षासमुत्पन्न; सन्तत: शरदं
प्राप्याकृष्टबल: सततादीनामन्यमत्वमेत्यपर्षात् । एवं पित्तं-
कफयोरप्युत्कर्षापकर्षावृतुकृतौ व्याख्येयौ । अहोरात्रशब्देन
कतिपयान्यहोरात्राणि गृह्यन्ते, नह्येकस्मिन्नहोरात्रे सतता-
दीनामुत्कर्षापकर्षाभ्यामन्यथाभाव उपपद्यते; किंतु कतिपयै-
रेव । यदा वर्षाशरद्वसन्तप्रारम्भे वातादयो ज्वरं चतुर्थक-
मारम्भते तदा मध्यानि कतिपयदिनान्यवाप्य स एव तृतीयक-
पूर्वत्वेन विपरिणमते उत्कर्षात्; अपकर्षात्तु यदाऽन्त्यानि
दिनान्याप्नोति तदा सन्ततो वातारब्ध: प्रावृष:, पित्तारब्ध:
शरदो, वसन्तस्य च श्लेष्मारब्ध:, प्रतनुकत्वाद्दोषस्य सतता-
दीनामन्यतमत्वेन विपरिणमत इति । दोषबलाबलाद्यथा-यदा
सततादीनामन्यतमकारी दोष: श्लेष्मा मधुरस्निग्धादीन्
दिवास्वप्नादीश्च हेतूनाप्नोति तदा सन्ततकादीन् करोति ।
एवं वातपित्तयोरप्यूह्यम् । मनोबलाबलद्यथा-यदा सन्ततज्वरी
सत्वगुणोद्रेकात्प्रहर्षावष्टम्भबहुलो भवति तदा सततादीना-
मन्यतमत्वं प्राप्नोति; यदा चतुर्थकज्वरी तमोगुणभूयिष्टत्वा-
द्विषादादिभिरभिभूयते तदा तृतीयकादीनामन्यतमो भवति
``विषादो रोगवर्धनानाम्'' (च. सू. स्था. अ. २५)
इत्यागमात् । अन्ये तु मन:शब्देन बुद्धिं व्याख्यानयन्ति,
कारणे कार्योपचारात् । तस्याश्च बलाबलं यथा यदा,
चतुर्थकज्वरी प्रज्ञापराधाद्देवादीनभिभूयाहितान्याचरति तदा
तृतीयकपूर्वेषामन्यतमत्वमाप्नोति; यदा तु शुद्धसत्त्वोत्कर्षा-
द्विवेकिन्या बुध्द्या युक्त: स्यात्तदा शुभानि देवताराधनेष्टि-
बल्य्पहारीदीन्याचरति तदा सन्ततज्वरी सततादीनामन्यत-
मत्वं प्राप्नोति । अर्थवशाद्यथा सन्ततज्वरीणोऽपि यदि
चतुर्थकवेदनीयं कर्म स्यात्तदा सन्ततोऽपि चतुर्थकत्वेन
विपरिणमते; अथ चतुर्थकज्वरीविष्टस्य यदि तत्काल-
परिपाकि कर्म, बलीयो भवति तदा सन्ततत्वेन परिणमते ।
एतच्च कर्मवशत्वं ऋत्वहोरात्रदोषबलाबलेष्वपि बोद्धव्यं,
तदनन्तरं तन्निर्देशादिति !
मा. नि. ज्वर ४७ म. टीका पान ५७.

ज्या ज्या वेळीं मिथ्याहारविहार यांनी प्रकुपित झालेल्याला दोषांचे बल वाढेल त्या त्या वेळीं ज्वर येईल. मानसिक दोषांच्या दुष्टीचे बलाबल आणि पूर्वजन्मकृत कर्माचे भोगकाल हे प्रकुपित दोषांच्या स्थानसंश्रयास अनुकूल होतील त्या त्या प्रमाणांत संततादि ज्वर उत्पन्न होतील. या दोषदुष्टीमुळें उत्पन्न होणार्‍या ज्वरांना दोष, दूष्य, ऋतु, दिवस, रात्र, मनोविकृति, शब्दस्पर्शादींचे मिथ्यायोग यांची अनुकूलता प्रतिकूलता असेल त्याप्रमाणें चातुर्विकाची तृतीयांतून पुढें प्रतिलोमगतीनें वा संतताची सततादींतून पुढें अनुलोमगतीनें अवस्थांतरेम होत जातात.

ऋतु व अहोरात्र यांच्या बलाबलामुळें उत्पन्न होणारे अन्यथात्व- ग्रीष्मऋतूमध्यें वातप्रकोपानें उत्पन्न झालेला वातप्रधान असा चातुर्थिक ज्वर, वर्षाऋतूपर्यंत टिकून राहिला तर वर्षाऋतूच्या दोषप्रकोपक स्वभावाच्या अनुकूलतेमुळें वाताचें बल आणखीनच वाढतें व बलाच्या वाढीच्या प्रमाणांत चातुर्थिकज्वराला तृतीयकत्व, अन्येद्युष्कत्व वा सततत्व संततत्वही येतें. दोषाच्या उत्कर्षानें ज्वराची गती अशीच प्रतिलोम होते. वर्षाऋतूमध्यें उत्पन्न झालेला वातप्रधान संततज्वर, शरद ऋतूपर्यंत टिकून राहिला असतां, शरद ऋतूच्या दोषप्रकोपक स्वभावाच्या प्रतिकूलतेमुळेम या संततास कारणीभूत असलेल्या वातदोषाचे बळ कमी होत जाते. आणि या बलाच्या अपकर्षामुळें बलाच्या हीनतेच्या प्रमाणांत संतताला सतत, अन्येद्यु:, तृतीयक या चातुर्थिकाचें स्वरुप येत जातें.

पित्त व कफ या दोषांनीं उत्पन्न होणार्‍या ज्वरांचेहि उत्कर्ष, अपकर्ष याप्रमाणेंच होतात. दिवस व रात्र यांचे बलाबल प्राप्त होण्यासाठीं मात्र दिवस व रात्र यांची संख्या आठवडयांनी मोजण्यासारखी अधिक असली पाहिजे. एकाच दिवसरात्रीमुळें संततादि ज्वराच्या बळाचा उत्कर्ष अपकर्ष होऊन त्यांना अन्यथाभाव येण्याची शक्यता नाहीं. ते ते ज्वर अधिक दिवस टिकून राहतील त्याचवेळीं त्यांतील दोष उत्कर्षाच्या वा अपकर्षाच्या स्थितीस प्राप्त होतील. चातुर्थिकज्वर बरेच दिवस टिकून राहिला असतां शरीराला दुबळेपणा येऊन दोषाचें बल वाढतें व या उत्कर्षामुळें कांहीं दिवसांनीं दोषांचाच पाक होऊन त्यांचें बळ कमी होऊं लागते व या अपकर्षामुळें संततादि ज्वर सततादींचे अल्पदोषोत्पन्नस्वरुप धारण करुं लागतात. मिथ्याहारविहारानें दोष उत्कर्ष पावून ज्वराला अन्यथात्व येते वा पथ्यकर आहारविहारानें दोष दुर्बल होऊनही ज्वराला अनुलोम पद्धतीनें अन्यथात्व येतें. संतज्वरी सत्वगुणी, सोशीक, आनंदी अशा स्वभावाचा असेल तरे मनाच्या सामर्थ्यानें दोषांचें बल कमी होऊन संतताला सततत्व येते किंवा चातुर्थिकज्वरी तमोगुणी, हाळवा, त्रासिक असा असेल तर मनोविकृतीनें दोषांचे बल वाढून चातुर्थकाचा तृतीयक वा अन्येदुष्क होतो.

सारांश निरनिराळ्या भावांच्या अनुकूलतेनें दोषदुष्टी वाढत गेल्यास ज्वर शरीरांत असण्याचा काल वाढत जातो व त्यामुळें चातुर्थिक, चातुर्थिक विपर्यय तृतीयक, तृतीयकविपर्यय, अन्येधुष्क, अन्येद्युष्कविपर्यय, सतत, सततविपर्यय, संतत वा तीक्ष्णवेगी संतत अशा चढत्या क्रमानें ज्वराची परिणती. अवस्थांतरें वा अन्यथाभाव होत जातात. प्रतिकूल भावांच्यामुळें दोषदुष्टीचा अपकर्ष झाल्यास उग्र स्वरुपाच्या संततापासूनही चातुर्थिकाकडे ज्वराची अवनती होत जाते. विषमज्वरामध्यें ज्वराला मुक्तानुबंधिता कां येतें यासंबंधी प्राचीन ग्रंथकारांनी कांही कल्पना विस्तारपूर्वक मांडलेल्या आहेत.

मुक्तानुबंधित्वाचें कारण

दोष: प्रवर्तते तेषां स्वे काले ज्वरयन् बली ।
निवर्तते पुनश्चैव प्रत्यनीकबलाबल: ॥
तेषां-कृशादीनां दोषो-वाताद्यन्यतमव: स्वे काले-यो यस्या-
त्मीय: कालो वृद्धिहेतुर्वयोहोरात्रिभुक्तलक्षणस्तस्मिन् स्वे
काले, दोष: प्रवर्तते-स्वीयं कर्म दर्शयतीत्यर्थ: । किं कुर्वन्
ज्वरयन् - सन्तापमुत्पादयन् । कीदृशो दोष: ? बली बलवान्
सन् प्रवर्तते । पुनश्चैव: विषमज्वराम्भको दोष: सततकादेरु
त्पादको निवर्तते-स्वव्यापाराद्विरमति । किम्भूत: ? प्रत्यनी-
कस्य बलं प्रत्यनीकबलं, तेनाबल: । एतदुक्तं भवति-यद्यसौ
दोषो दूष्यादीनां सपक्षानामन्यतमस्माद्वलं लभते तदाऽस्त्रौ
स्वव्यापारे प्रर्वर्तते । यदा तु तस्य विपक्षा भवन्ति तदा-
तेषां विपक्षाणामन्यतमस्य बलेनास्य दोषस्य बलं हीयते
तदानीं च प्रत्यनीकबलाबलत्वादसौ दोषो निवर्तते, वटा-
दिबीजवत् ! यथा-वटादिबीजं जलादिसामग्रीतो बल-
मासाद्य विशिष्टे काले रोहति-अड्कुरादिकमुद्भावयति ततो
जलादिविरहाद्‍भूमावेवावतिष्ठते, न तु स्वकार्यमुद्भावयति
तथैवैषोऽपि विषमज्वरस्य कर्ता दोष:स्वपक्षतो दूष्यादेर्बलं
लब्ध्वा स्वव्यापारं कुरुते । यदा तु विपक्षबलेनासौ प्रति-
हतशक्तिस्तदा स्वव्यापारं न कुरुते, देह एव निलीय तिष्ठति
सटिक वा. नि. २-६५ पान ४६०

वातादिदोष मिथ्याहारादि कारणांनीं कृश वा व्याधिमुक्त व्यक्तींच्या ठिकाणीं आपापल्या कालहेतूंप्रमाणें प्रकुपित होऊन कालानुकूलतेप्रमाणें बल प्राप्त झाल्यामुळें ज्वर उत्पन्न करतात. दोषाचें शरीरांतील प्रत्यनीक (प्रतिस्पर्धी अनुकूल नसलेले) असे जे भाव त्यांच्यां बलामुळें प्रतिकूल काळीं दोषाचें बल कमी होतें व ज्वर उतरतो. ज्याप्रमाणें एखाद्या वृक्षाचें बीज अनुकूल काळ, जलादि सामग्री यांची वाट पहात जमिनींत पडून रहातें, सर्व दृष्टीनी अनुकूल अशीं परिस्थिती प्राप्त होतांच अंकुरित होतें, एरवीं तसेंच लीन होऊन राहिलेले असते त्याप्रमाणें प्रतिकूल काळीं दोषही शरीरांत लीन होऊन रहातात.

क्षीणे दोषे ज्वर: सूक्ष्मो रसादिष्वेव लीयते ।
लीनत्वात्कार्श्यवैवर्ण्यजाडयादीनादधाति स: ॥
दोषे-विषमज्वरकारिणी, क्षीणे सति सततकादिज्वर:
सूक्ष्मो भूत्वा रसादिष्वेव धातुषु लीयते-लयं याति ।
कथं पुनरेतदवगम्यते ? यदसौ लीनो न पुनर्विनष्ट
एव इत्यत्र हेतुमाह-लीनत्वादित्यादि । स तु लीनो
ज्वरो लीनत्वात् कार्श्यादीन् करोति । अत एवासौ
न विनष्ट एवेत्युच्यते । अत: कार्श्याद्युद्गम उपलभ्यते ।
निरन्वयविनष्टाद्धि तद्धेतुकार्श्याद्यनुपलब्धिरेव ।
तस्माल्लीनो दोषो विषमज्वरेषु भवतीति स्थितम् ।
स. टीकेसह वा. नि. २-६६ पान ३६१

स चापि विषमो देहं न कदाचिद्विमुञ्चति ।
ग्लानिगौरवकार्श्येभ्य: स यस्मान्न प्रमुच्यते ॥
वेगे तु समतिक्रान्ते गतोऽयमिति लक्ष्यते ।
विषमज्वराणामुपशान्तवेगानामपि देहावस्थानं दर्शयति स
चापीत्यादि । विषमो विषमज्वर: । समाहारत्वेन कार्श्या-
दिति सिद्धे यत् कार्श्येभ्य इति बहुवचनं तेन लक्षणान्तर-
मपि गृह्यते । तथा च-``शिरस्थै: गौरवं ग्लानिर्नातिश्रद्धा
च भोजने । माधुर्यमथ वैरस्यं तिक्तत्वमथवा पुन: ।
वक्त्रस्य जायते यस्मात् प्रवेगेऽपि गते सति । तस्मात्तु
नियतो लीन: शरीरे विषमज्वर: इति ।
सटिक सु. ३-३९-६३, ६४ पान ६७६

वेगं कृत्वा विषं यद्वदाशये लीयतेऽबलम् कुप्यत्याप्तबलं भूय:
काले दोषविषं तथा एवं ज्वरा: प्रवर्तन्ते विषमा: सततादय:
असंनि २ पान २०

ज्वर: प्रवेगोपरमे देही मुक्त इवेक्ष्यते ।
तथाऽप्यस्यामवस्थायामेभिर्लिड्गैर्न मुच्यते ॥
मुखवैरस्य काटुक्यप्राधुर्यादिभिरल्पश: ।
नात्यन्नलिप्साग्लानिभ्यां शिरसो गौरवेण च ॥
का. सं.

विषमज्वराचे दोष शरीरामध्यें रसादिधातूंच्या आश्रयानें सूक्ष्म रुपानें लीन होऊन असतात. संपूर्णपणें नष्ट असे होत नाहींत. त्यामुळें ज्वर नसतो अशा काळांतसुद्धां कृशता, गौरव, ग्लानि, विवर्णता, मुखवैरस्य, अश्रद्धा, शिर:शूल हीं लक्षणें असतातच. लीन दोष सुप्त विषाप्रमाणें अनुकूलता उत्पन्न होताच पुन; प्रकट होतात. लीन दोषांचा पुन: प्रकट होण्याचा हा काल विषमाच्या प्रकारभेदानें वेगवेगळा असतो. विषमज्वरामध्यें ज्वरवेग गेल्यानंतर जरी ताप गेला असे वाटत असले तरी तोंडाला चव नसणें, तोंड कडू गोड वा चिकट असणे, अन्नावर वासना नसणें अंग गळून गेल्यासारखे वाटणें, डोकें जड असणें, अशी लक्षणें यामधील कालांतही असतातच असें काश्यपनें म्हटलें आहे -

पुन: पुनर्यथा चैष जायते तन्निबोध मे ।
निरुद्धमार्गो दोषेण विषमज्वरहेतुना ॥२५॥
वायुस्तद्दोषकोपान्ते लब्धमार्गो यथाक्रमम् ।
दोषशेषं तमादाय यथास्नानं प्रपद्यते ॥२६॥
स दोषशेष: स्वे स्थाने लीन: कालबलाश्रयात्
रसस्थानमुपागम्य भूयो जनयति ज्वरम् ॥
का. सं. २५-२८

कालक्रमानें मार्गावरोध करणार्‍या दोषांना बल प्राप्त होते व वायू त्यांना त्या त्या स्त्रोतसांतून रसस्थानांत घेऊन येतो व पुन्हां ज्वर उत्पन्न होतो. स्त्रोतसांचें वैगुण्य नाहीसें होईपर्यंत व दोषांचे नि:शेष पचन होईपर्यंत हा क्रम विषमज्वराचें हे चक्र सारखे फिरत रहातें.

यथोत्तरं मन्दगतिर्मन्दशक्तिर्यथा यथा ।
कालेनाप्नोति सदृशान् स रसादींस्तथा तथा ॥
दोषो ज्वरयति क्रुद्धश्चिराच्चिरतरेण च ।
अ. सं. नि. २ पान २०

असन्नविवृतास्यत्वात्स्त्रोतसां रसवाहिनाम् ।
आशु सर्वस्य वपुषो व्याप्तिर्दोषे जायते ॥

सन्तत: सततस्तेन, विपरीतो विपर्ययात् ।
विषमो विषमारस्मक्रियाकालोऽनुषड्गवान् ॥
आसन्नं विवृतं चास्यं-मुखं, येषां रसवाहिनां स्त्रोतसां
तान्येवम् । तेषां भाव आसन्नविवृतास्यत्वम् ।
तस्माद्धेतोस्तत्र प्रविष्टेन दोषेण शीघ्रं सर्वस्य वपुष:
शरीरस्य, व्याप्ति-जीर्यते ।
तेन कारणेन दोषेणाशु सर्वशरीरव्याप्तिलक्षणेन,
सन्तताख्यो ज्वर: सततो-निरन्तरो भवति ।
विपरीत: भवति न निरन्तरं ज्वययति ।
कस्माद्विपरीत: ? विपर्ययात् ।
एतदुक्तं भवति-स्थूलान्यासन्नानि विवृतास्यानि
च रसवाहीनि स्त्रोतांसि । दूरतराणि संवृतास्यानि
सूक्ष्मतराणि च रक्तवाहीनि । तैर्दोषश्चिरेण तथा
असाकल्येन कायं व्याप्नुवन् विच्छिन्नकालं ज्वरं करोति ।
अत एवाह [श्लोक ७०] `अहोरात्रस्य स द्वि: स्यात्' इत्यादि ।
ततो दूरतराणि संवृततराणि च मांसवाहीनि स्त्रोतांसि:
साकल्येन युगपद्देहमनुव्याप्नोति ।
अतोऽनेन कारणेनासावन्यस्मिन् दिने ज्वरं निर्वर्तयत्यन्येद्युसंज्ञम् ।
तेनासौ संततादपि विप्रकृष्टो भवति ।
ततोऽपि सूक्ष्मतराणि संवृततरमुखानि च मेदोवहानि तानि
चिरतरेण दोष: प्राप्नोति न च तैरशेषदेहं व्याप्नोति ।
अतोऽसावनेन कारणेन यथाक्लममन्यादीनामेकं हित्वा
तृतीयेऽह्नि तृतीयको भवति । ततोऽप्यनेनैव विप्रकृ-
ष्टतमेन क्रमेण दिनद्वयं हित्वा चतुर्थको भवति ।
एवं चतुर्थकविपर्यश्च । संग्रहेऽख्यत् (नि.अ.२) ``सूक्ष्मसूक्ष्म-
तरास्येषु दूरदूरतरेषु च । दोषोरक्तादिमार्गेषु शनैरल्पश्चि-
रेण यत् । याति देहं च नाशेषं भूयिष्टं भेषजेऽपि च ।
क्रमोऽयं तेन विच्छिन्नसन्तापो लक्ष्यते ज्वर: ॥ इति ॥
अधुना विषमज्वरस्य स्वरुपं प्रतिपादयन्नाह विषम इति ।
विषमो-विषमसंज्ञो ज्वरो, विषमारम्भक्रियाकालो भवति ।
आरम्भश्च क्रिया च कालश्च आरम्भक्रियाकाला ।
विषमा आरम्भक्रियाकाला यस्य स एवम् । तत्र विषम
आरम्भो यथा-कश्चित्पूर्व मूर्धानमारभ्यागच्छति, कश्चित्पृष्टम्,
कश्चिजड्घाभ्यामिति । विषमक्रियो यथा कश्चिच्छीतकृत्,
कश्चिद्दाहकृदिति ।
विषमकालश्च यथाकश्चित् पराह्णे, कश्चिदपराहे,
कश्चिन्निशीथे, इति । तथा अनुषड्गवान्-दीर्घकालानुबन्धी ।
स. टीकेसह वा. नि.२-६७, ६८ पान ४६१

रात्र्यह्नो: षट्‍सु कालेषु कीर्तितेषु यथा पुरा ।
प्रसह्य विषमोऽभ्येति मानवं बहुधा ज्वर: ॥
इदानीं सततादीनां स्वकालेषूद्वमं दर्शयति-रात्र्यह्नोरित्यादि ।
षट्‍सु कालेषु पूर्वाह्‍णमध्याह्नापराह्‍णप्रदोषार्धरात्रप्रत्यूषेषु,
कीर्तितेषु कथितेषु यथा पुरा येन प्रकारेण पूर्व व्रणप्रश्नाध्याये ।
तत्र पूर्वाहणप्रदोषयो: कफस्य, मध्याह्नार्धरात्रयो: पित्तस्य,
अपराद्द‍णप्रत्यूषयोर्वातस्य प्रकोप इति, एवं पूर्वोक्तकथितेषु
स्वस्वदोषप्रकोपकालेषु प्रसह्य हठाद्विषमो ज्वरोऽभ्येति
अभि समन्ततो व्याप्य मानवमागच्छति । बहुधेति
अहोरात्रे कालद्वयं एककालं, एकदिनान्तरं, द्विदिनान्तरं,
अन्ये तु व्याख्यानयन्ति बहुधा कदाचिच्छीत:, कदाचिदुष्ण:
कदाचिद्धस्तपादयो:, कदाचिदंसाद्यवयवेषु नियतकालं,
चिरकालमल्पकालं चेति । एतेन विषमज्वराणामानन्त्य
मुक्तम् ।
सटीक सु. उ. ३९-६२ पान ६७६

संततज्वर हा आमाशयाला अगदीं जवळ असलेल्या आणि स्थूलसुख अशा रसवहस्त्रोतसास व्यापून असल्यामुळें सर्व शरीर त्वरित व्यापूं शकतो. आणि त्यामुळें संततांतील ज्वराला सातत्य (अविसर्गिता) असतें. सततादि इतर ज्वर मात्र अखंड स्वरुपाचा ज्वरवेग उत्पन्न करुं शकत नाहींत कारण त्यांना आश्रयभूत होणारी रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा या धातूंची स्त्रोतसें क्रमानें अधिकाधिक सूक्ष्म व रसवहस्त्रोतसाच्या मानानें अधिकाधिक दूर असल्यामुळें त्यांच्या आश्रयानें राहिलेले दोष आमाशयामध्यें येऊन ज्वर उत्पन्न करण्यास विलंब लागतो. स्त्रोतस जों जों सूक्ष्म व अधिक दूरचें तों तों हा काळ वाढत जातो. यामुळें विषमज्वरामध्यें विछिन्नसंताप हें लक्षण उत्पन्न होतें. ज्वराच्या या प्रकारांना विषमज्वर असें नांव पडण्यास ज्वरकाल विच्छिन्न असणें हेंही एक कारण आहे. या ज्वरांचा आरंभही मागें वर्णन केल्याप्रमाणें विषम असतो. कधीं डोकें दुखण्यापासून तर कधी पाठ दुखण्यापासून तर कधीं पोटर्‍या दुखून ज्वराची काळही (ज्वर येण्याचा) सकाळ, संध्याकाळ, दुपार वा रात्र असा अनियमित असतो आणि ज्वरांतील दोष उपचार केले तरी बरेंच दिवसपर्यंत शरीरात तसेच टिकून असतात.

वायुर्व्यवायी विशद: शीतो रुक्षश्चल: खर: ।
पित्तमाग्नेयमुष्णं च तीक्ष्णमल्पं लघु द्रवम् ॥
सौम्य: शीतो गुरु: स्निग्धो बलवान् कफको बहु:
कफो मन्दव्यवायी च चिरोत्थाननिवर्तन: ॥
वायुश्च शीतसामान्या त् कफस्थानुबलो बली ।
बलवान् हि गुण: सौम्य आग्नेयो दुर्बल: स्मृत: ॥
हेतुनाऽनेन महता श्लेष्मा हि बलवत्तर: ।
तस्मात् पूर्व ज्वरे शीतं पश्चाद्दाह: प्रवर्तते ॥
का. सं. ५३-५६ पान २३१

कश्यपानें विषमज्वरांत ज्वरवेग येण्यापूर्वी वाजणार्‍या थंडीचें कारण सांगितलें आहे तें असें. स्थिर आणि बलवान कफाशीं व्यवायी गुणाचा वायु संमिश्र होऊन पित्ताच्या आग्नेय गुणांवर मात करतो व त्यामुळें ज्वरांत प्रथम थंडी वाजते. कश्यपानें सांगितलेली ही कारणमीमांसा चिंत्य आहे. दार्हपूर्वज्वराच्या स्पष्टीकरणांत कश्यपानें याच स्वरुपाचें कारण सांगितलें आहे तेथें कफाऐवजीं वायूची संमूर्च्छना पित्ताशीं होते.
का. सं. पान २६२

``दोषैरावृतमार्गत्वादूर्ध्वगत्वाच्च तेजस: ॥६६॥
बाहुल्यादिन्द्रियाणां च शिर: संतप्यतेऽधिकम् ॥
तेजसाऽतिप्रवृद्धेन सोमधातु: प्रपीडित: ॥६७॥
अध: प्रपद्यते तेन शैत्यं भवति पादयो: ॥
६६-६७ पान २३२ काश्यप सं

ज्वरामध्यें बहुतेक वेळी डोके अधिक गरम व पाय अधिक गार असतात. त्याचें कारण सांगत असतां कश्यप म्हणतो -
तेज हे स्वभावत:च ऊर्ध्वगती असते दोषांनीं (कफप्रधान) शिरांतील स्त्रोतसाचें मार्ग आवृत होतात. शिरामध्यें सर्व इंद्रियें असतात. त्यामुळें शिर अधिक गरम होते. (अग्नीच्या ऊर्ध्वगतित्वानें). तेजाच्या वृद्धीमुळें सोमगुणप्रधान भाव हे खाली ढकलले जातात. त्यामुळें पाय अधिक गार असतात. ( या साठींच ज्वर चिकित्सेत डोके गार आणि पाय गरम ठेवावे लागतात.

परो हेतु: स्वभावो वा विषमे कैश्चिदीरित: ।
आगन्तुश्चानुबन्धो हि प्रायशो विषमज्वरे ॥
...... विषमज्वरे भूतादिर्हेतुरुक्तस्तस्य समर्थनमाह-
आगन्तुरित्यादि । प्रायशो बाहुल्येन आगन्तु:
भूतादि: अनुअनुबन्ध: हीति यस्मादर्थे ........
सटीक सु. उ, ३९-५६ पान ६७५.

केचिद्‍भूताभिषड्गोत्थं ब्रुवते विषमज्वरम् ।
सु. उ. ३९-६८ पान ६७७

विषमज्वरामध्यें दोष अल्प असून त्याचे प्रकोपाचे कारणही बहुधा आगंतु स्वरुपाचे असते. आगंतूच्या कारणामध्यें भूतोपसर्ग हे एक कारण आहे. भूतशब्दानें ग्रहपिशाचाप्रमाणेंच इतरही जीवजंतूंचा मशकादि कृमिकीटकांचा बोध होतो.

दुर्जलजात ज्वर

योगरत्नाकर व भावप्रकाश या ग्रंथकारांनीं दुष्टजलापासून उत्पन्न होणार्‍या ज्वराचा एक प्रकार सांगितला आहे. मात्र त्याची लक्षणें वगैरे कांहीं दिलेली नाहींत. या ज्वराची भीती बहुधा प्रवाशाला असते. त्यांत जी चिकित्सा सांगितलेली आहे त्यावरुन लक्षणांची कल्पना करता येते ती अशी - अरुचि, अगिमांद्य प्रतिश्याय, श्वास, कास, आध्मान, शूल, विष्टंभ, उदकदोष (अतिसार प्रवाहिका आदि लक्षणें) हीं लक्षणें दुर्जलजनितज्वरांत असतात. निरनिराळ्या ठिकाणचें पाणी बाधूं नये म्हणून सुंठ आणि तूप जेवणाच्या पूर्वी घेण्यास योगरत्नाकरानें सांगितलें आहे. दुर्जलजेतारस हा एक स्वतंत्र कल्प या व्याधीसाठीं सांगितलेला आहे.
(यो. र. पृ. २१५)

धातुगत ज्वर

गुरुता हृदयोत्क्लेश: सदनं छर्द्यरोचकौ ।
रसस्थे तु ज्वरे लिड्गं दैन्यं चास्योपजायते ॥
रक्तनिष्ठीवनं दाहो मोहश्छर्दनविभ्रमौ ।
प्रलाप: पिडका तृष्णा रक्तप्राप्ते ज्वरे नृणाम् ॥
पिण्डिकोद्वेष्टनं तृष्णा सृष्टमूत्रपुरीषता ।
ऊष्माऽन्तर्दाहविक्षेपौ ग्लानि: स्यान्मांसगे ज्वरे ।
भृशं स्वेदस्तृषा मूर्च्छाप प्रलापच्छर्दिरेव च ।
दौर्गन्ध्यारोचकौ ग्लानिर्मेद:स्थे चासहिष्णुता ॥
भेदोऽस्थनां कूजनं श्वासो विरेकश्छर्दिरेव च ।
विक्षेपनं च गात्राणामेतदस्थिगते ज्वरे ॥
तम: प्रवेशनं हिक्का कास: शैत्यं वमिस्तथा ।
अन्तर्दाहो महाश्वासो मर्मच्छेदश्च मज्जगे ॥
मरणं प्राप्नुयात्तत्र शुक्रस्थानगते ज्वरे ।
शेफस: स्तब्धता मोक्ष: शुक्रस्य तु विशेषत: ॥

........ रसस्थ इत्यनेन विशेषेणात्र रसो दूष्य:, सर्वेषामेव
ज्वराणां रसानुगत्वात् ....... ......... ऊष्मा बहि: एतश्च
विशेषपरं, प्राय: सर्वज्वरेषु तथाभावात् ।
``ऊष्मान्तर्मोहविक्षेपौ'' इति पाठान्तरे, ऊष्मान्त: अन्तर्दाह इत्यर्थ: .....
....भृशं स्वेद इति धर्मस्य मेदोमलत्वात्; तद्विकृत्येव दौर्गन्ध्यं गात्रे ।
असहिष्णुता वेदनाया असहत्वं, क्रोधनत्वा दिति कार्तिक: ।
भेदोऽस्थ्नामिति भेद इव भेद: भड्गवत्पीडेत्यर्थ: परपदार्थेषु
प्रयुज्यमाना: शब्दावृत्ति .......
मा. नि. ज्वर ४८ ते ५४ पान ५८, ५९

रसगत ज्वर

गौरव, उत्क्लेश, अंगसाद, छर्दि, अरोचक, दैन्य अशीं लक्षणें असतात. अष्टांगसंग्रहामध्यें जृंभा व अंगभंग अशीं दोन लक्षणें अधिक सांगितलीं आहेत.

रक्तगत ज्वर

रक्तनिष्ठीवन, दाह, मोह, छर्दि, भ्रम, प्रलाप, तृष्णा, पिडका, अशी लक्षणें असतात, अष्टांगसंग्रहानें मद, पिटकांचा रक्तवर्ण असून त्या उष्णस्पर्श असतात. अंगावर लाली येते अशीं विशेषलक्षणें सांगितलीं आहेत,

मांसगत ज्वर

ग्लानि, पिंडकोद्वेष्टन, तृष्णा, मलमूत्रांची प्रवृत्ति, ऊष्मा, अंतर्दाह, विक्षेप अशीं लक्षणें असून संग्रहानें भ्रम, तम, दौर्गध्य हीं लक्षणें अधिक सांगितलेलीं आहेत.

मेदोगत ज्वर

घाम फार येणें, तृष्णा, मूर्च्छा, प्रलाप, छर्दि, दुर्गंधि, अरोचक, ग्लानि आणि अत्यंत त्रासिकपणा अशीं लक्षणें असतात.

अस्थिगत ज्वर

हाडें फुटल्यासारख्या वेदना होणें, कूजन, श्वास, अतिसार, छर्दि, गात्रविक्षेप अशीं लक्षणें असतात.

मज्जागत ज्वर

अंधारी येणें, हिक्का, कास, छर्दि, महाश्वास, हृदयामध्यें अत्यंत पीडा होणें (मर्मच्छेद) (मर्मच्छेद शब्दानें विशेषत: हृदयांतील वेदना, अभिप्रेत असल्या तरी तीव्रस्वरुपाचा शिर:शूल व बस्तिशूल देखील या ठिकाणीं अभिप्रेत असावा), बाहेरुन थंडी वाजणें व आंतून दाह होणें अशी लक्षणें असतात.

शुक्रगत ज्वर

शिस्न ताठ होतें, शुक्राचा स्त्राव होतो आणि त्वरित मृत्यू येतो (स्त्रियांमध्ये अति रज:स्त्राव हें लक्षण सभवतें.

चरकानें धातुगतज्वर विधिभेदानें होणार्‍या प्रकारांत वर्णिले असले तरी वस्तुत: धातुगतता ही दोषप्राबल्यानें ज्वराला येणारी एक गंभीर अवस्था आहे. सर्व शरीराला व्यापून असणार्‍या दोषप्रकोपानीं विगुण धातूंमध्यें विशेष स्वरुपाची दुष्टी होऊन ज्वराला किंवा इतर कोणत्याहि रोगाला धातुगतावस्था प्राप्त होते. व्याधीमध्यें अवस्थाविशेषानें ज्या धातूची दुष्टी होईल त्या धातूमध्यें संभवनीय अशीं लक्षणें उत्पन्न होतात. दोष रसानुग होऊन ज्वर उत्पन्न होतो असें सामान्य संप्राप्तींतील वर्णन असतांना रसधातुगतज्वराचें वैशिष्ट्य काय अशी शंका येणें स्वाभाविक आहे. ज्वराच्या सामान्यसंप्राप्तींत रसाची विगुणता अभिप्रेत आहे तर धातुगतावस्थेमध्यें रसाची विशेष स्वरुपाची दुष्टी अभिप्रेत आहे. धातूच्या आश्रयाने असलेले सततादिज्वर आणि धातुगत ज्वर यांच्यामध्येंहि हाच विगुणता व दुष्टीचा भेद आहे. धातुगत अवस्था ही स्थिती ज्वराची गंभीरता दाखविणारी असून बहुधा अनुक्रमानें घडते अर्थात् अनुक्रमापेक्षां धातूंच्या वैगुण्यावरच धातुदुष्टी विशेषस्वरुपानें अवलंबून असणें स्वाभाविक आहे. वातादि कारणांनी होणारे ज्वराचे अष्टविध भेद, संख्यासंप्राप्तीच्या रुपानें पूर्वीच सांगितले आहेत.

ज्वराच्या आमादि अवस्था

आम

अरुचिश्चाविपाकश्च गुरुत्वमुदरस्य च ।
हृदयस्याविशुद्धिश्च तन्द्रा चालस्यमेव च
ज्वरोऽविसर्गी बलवान् दोषाणामप्रवर्तनम् ।
लालाप्रसेको हृल्लास: क्षुन्नाशो विरसं मुखम् ॥
स्तब्धसुप्तगुरुत्वं च गात्राणां बहुमूत्रता ।
न विड्‍ जीर्णा न च ग्लानिर्ज्वरस्यामस्य लक्षणम् ॥
च. चि. ३-१३३ ते १३५ पान ९१३

ज्वराच्या आमावस्थेंत अरुचि, अविपाक, उदरगुरुता, हृल्लास, तंद्रा, आलस्य, ज्वर न उतरता चढत जाणें (बलवान), कफ न सुटणें, मलप्रवृत्ती न होणें, शरीर जखडल्यासारखें जड व बधिर होणें, मूत्रप्रवृत्ति पुष्कळ होणें, पुरीष साम असणें, ग्लानि अशीं लक्षणें असतात.

द्विविधा हि सामता-एका रसस्य, अपरा दोषस्य; रस-
सामता तु मुखवैरस्यादिलक्षणा, दोषसामता तरुणत्वरुपा
साष्टाहेनैवापैति । अत्र च हरिचंद्रेण हेतुरुक्त:-``सप्ताहेनैव
पच्यन्ते सप्तधातुगतामला । निरामश्चात्यत: प्रोक्तो ज्वर:
प्रायोऽष्टमेऽहनि'' इति । सप्तानां धातूनां धात्वग्निना सप्ताहे-
नामपाकादष्टाहेनैव निरामत्वमिति । रससामतता त्वष्टाहात्
परतोऽप्यनुवर्तते । एनमर्थ जेज्जटोऽपीच्छति यदेवं लिखति
चरकसुश्रुतटीकायां ``तरुणा सामताऽष्टाहादपैति रससाम-
ता तु परतोऽप्यनुवर्तते इति । एतत् प्रयोजनं च तरुणसाम-
तायामौषधं नोपयुज्य ते रससामतायां त पाचनं दीयते ।
मानिज्वर ६५ मटीका पृ. ६४

ज्वरांतील सामता दोन प्रकारची असते. एक दोषसामता व दुसरी रससामता. दोषसामतेवरुन आमावस्था, पच्यमानावस्था व पक्वावस्था या अवस्था कल्पिल्या आहेत. रससामता ही रसाशी असलेल्या दोषांच्या संबंधामुळें उत्पन्न होत असल्यानें तीं ज्वर असेतोंवर टिकून असते. दोषसामता ही अपक्व अन्नाच्या आमामुळें उत्पन्न होते. त्यामुळें लंघनादि कारणांनीं ज्वरमुक्तीच्या पूर्वीही ती नाहीशीं होऊं शकते.

पच्यमान

ज्वरवेगोऽधिकस्तृष्णा प्रलाप: श्वसनं भ्रम: ।
मलप्रवृत्तिरुत्क्लेश: पच्यमानस्य लक्षणम् ॥
च. चि. ३-१३६ पान ९१३

पच्यमानावस्थेंत ज्वरवेग वाढतो, तहान अधिक लागते, मलप्रवृत्ति होते, घशाशीं आल्यासारखे वाटते, प्रलाप, श्वास, भ्रम हीं लक्षणें असतात.

निराम पक्व

क्षुत्क्षामता लघुत्वं च गात्राणां ज्वरमार्दवम् ।
दोषप्रवृत्तिरष्टाहो निरामज्वरलक्षणम् ॥
..... न च नि:सप्ततैवैका निरामज्वरलक्षणम् । चिरादपि
हि पच्यन्ते सन्निपातज्वरे मला: । सप्तरात्रातिवृत्तिं च
क्षामतादि च (स्व) लक्षणम् । तस्मादेतद्‍द्वयं दृष्ट्वा
निरामं ज्वरमादिशेत्'' इति । अष्टाहादर्वाग्दोषपाकजनित-
क्षुदादिदर्शनान्निरामता सुश्रुतेनाष्टाहादर्वाग्मेषजदानं दर्शयता
प्रतिपादिता । यदुक्तम्-`` अर्वागपि च देयं स्याद्भेषजं .....
समस्तं च लक्षणं यथोक्तन्यायाज्ज्ञेयम् । .....
च. चि. ३-१३७ पान ९१४

भूक लागणें, कृशता, ज्वराचें मार्दव (ज्वरवेग कमी होणें), अंग हलकें वाटणें, दोषांची प्रवृत्ति होणें (गुदानें वाताचें अनुलोमन होणें असा अर्थ माधवाच्या आतंकदर्पण टीकाकारानें दिला आहे. आंत्रक्षोभ व आध्मान कमी झाल्याचें हें लक्षण आहे.) हीं लक्षणें पक्वावस्थेचीं किंवा निरामतेची आहेत ही निरामता सामान्यत: सात दिवसांनंतर उत्पन्न होतें. सन्निपातज्वरामध्यें निरामता प्राप्त होण्यास अधिक काळहि लागतो. दोषांचे बळ कमी असल्यास पक्वावस्था लवकरही येऊं शकते. त्यामुळें कालापेक्षां लक्षणें प्रादुर्भूत होतील त्यावरुन अवस्था ठरव्यात. जीर्णतामविपर्यासात् या वाग्भटाच्या वचनाप्रमाणें ज्वराच्या आमावस्थेंत जीं लक्षणें सांगितलीं आहेत तीं लक्षणें नष्ट होणें वा त्या लक्षणांच्या विपरीत लक्षणें दिसूं लागणें हेही निरामवस्थेंतील स्वरुप मानावें. त्यावरुन रुचि उत्पन्न होणें, तंद्रा, ग्लानि, आळस नसणें, तोंड स्वच्छ वाटणें, अवयवांच्या हालचाली सहजतेनें होणें ज्वर उणावणें हीं लक्षणें निरामावस्थेत असतात असें म्हणतां येईल.

जीर्णज्वर

``त्रिसप्ताहे व्यतीते तु ज्वरो यस्तनुतां गत: ।
प्लीहाग्निसादं कुरुते स जीर्णज्वर उच्यते''
मा. नि. ज्वर ६५ म. टीका पान ६५

जीर्णज्वर ही ज्वरांतील दोष अगदी अल्पबल झाल्यानंतर बराच काळ टिकून रहाणारी एक अवस्था आहे. ज्वरवेग अगदी अल्प असतो व त्याचे स्वरुप बहुधा फार सौम्य अशा अन्येद्युष्कासारखें असतें. अग्नि अतिशय मंद होतो व प्लीहा वाढतें. हातापायाची डोळ्याची जळजळ होते. प्लीहावृद्धि हें लक्षण तृतीयकानंतर आलेल्या जीर्णज्वरांत विशेषेकरुन आढळतें. ज्वरोष्म्यामुळें व लंघनामुळें रक्त, मेद या धातूंना विकृती प्राप्त होऊन प्लीहावृद्धि हें लक्षण उत्पन्न होते. जीर्णज्वर ही अवस्था दोषांचें उत्तम प्रकारें शोधन न झाल्यामुळें ज्वरानंतर येऊं शकतें. दीपनपाचनानंतरही राहिलेला दोष शेष या स्थितीस कारणीभूत असतो. तीन आठवड्यानंतर हीं अवस्था येते असे म्हटले असले तरी ही कालमर्यादा मागें पुढें होऊं शकते.

दोषपाक, धातूपाक (ज्वरांतील)

धातुपाकाद्धन्ति, मलपाकाद्विमुञ्चतीति व्यवस्थितविकल्प:,
धातुमलपाकविकल्पे च दैवमेव हेतु: । उत्तरोत्तररोगवृद्धि-
बलहानिभ्यां शुक्रादिधातुसहितमूत्रादिना च धातुपाको
ज्ञेय:, यदुक्तं-``निद्रानाशो हृदि स्तम्भो विष्टम्भो गौरवारुची ।
अरतिर्बलहानिश्च धातूनां पाकलक्षणम्'' इति; अन्यथा च
मलपाक: ``दोषप्रकृतिवैकृत्यं लघुता ज्वरदेहयो: ।
इन्द्रियाणां च वैमल्यं दोषाणां पाकलक्षणम् इति ।
मा. नि. ज्वर ७३ म. टीका पान ६८

नाभेरुर्ध्व हृदोअऽधस्तात्पीडिते चेद्‍ व्यथा भवेत् ।
धातो: पाकं विजानीयादन्यथा तु मलस्य च ॥
यो. र. ज्वर पान १६३

शश्वद्धीन्द्रियपंचकस्य पटुता वह्नेश्च यत्र क्रमात् ।
तृष्णादिप्रशमो ज्वरस्य मृदुता तं दोषपाकं वदेत् ॥
हृन्नाभ्योरतिवेदनातिसरणं तीव्रो ज्वरस्तृट्‍ क्लम: ।
श्वासाधिक्यमरोचकोऽरतिरिति स्याद्‍धातुपाकाकृति: ॥
यो. र. ज्वर. पान १६३

ज्वराच्या उष्णतेनें दोषपाक होणें वा धातुपाक होणें या दोन अवस्था संभवतात. रोगाचे बल वरचेवर वाढत गेले, रुग्णाची शक्ती दिवसेंदिवस कमी होत गेली तर धातुपाक ही अवस्था उत्पन्न होते. या अवस्थेमध्यें शरीराच्या रक्षणास आवश्यक असणारे धातु दुर्बळ झाल्यामुळें दोषदुष्टीनें विकृत होतात आणि वेळींच सावरले गेले नाहीं तर या धातुपाकाची परिणती मृत्युमध्यें होते. ज्वराला प्राप्त झालेल्या गंभीरतेचे हे निरनिराळ्या संदर्भात केलेलें वर्णन आहे असें समजण्यास अडचण नाहीं. धातुपाकाच्या अवस्थेंत निद्रानाश, हृदयामध्यें जखडल्यासारखें वाटणें; मलमूत्रांचा अवष्टंभ, अंग जड होणें, तोंडाला चव नसणें, अत्यंत अस्वस्थता येणें, शक्ति पार नाहींशी होणें अशीं लक्षणें होतात.

योगरत्नाकरानें हृदय व नाभि यांच्या ठिकाणीं अत्यंत वेदना होणें, नाभी व हृदय यांच्यामध्यें उदरभागीं दाबलें असतां तीव्र स्वरुपाच्या वेदना [स्पर्शासहत्व] असणें, अतिसार होणें, श्वास लागणें क्लम, तीव्र ज्वरवेग अशीं धातुपाकाची लक्षणें सांगितलीं आहेत व हीं अत्यंत महत्वाचीं आहेत. संततज्वरामध्यें विशेषत: धातुपाकामुळें उत्पन्न होणार्‍या अतिसार, शूल, स्पर्शासहत्व या लक्षणांना रिष्टलक्षणेंच मानलें पाहिजे.

वातिक: सप्तरात्रेण दशरात्रेण पैत्तिक: ।
श्लैष्मिकोइ द्वादशाहेन ज्वर: पाकं नियच्छति ॥
वंगसेन ज्वर - २०२ पान २२

दोषपाक होण्यासाठीं वातज्वरांत ७ दिवसांचा, पित्तज्वरांत १० दिवसांचा आणि कफज्वरांत १२ दिवसांचा काळ लागतो. ज्यावेळीं व्याधी उत्पन्न करणार्‍या दोषांचेच पचन होतें त्यावेळीं दोषपाक ही स्थिती उत्पन्न होते. ही घटना इष्ट अशीच असते. पथ्यामुळें, योग्य त्या औषधोपचारामुळें दोषांचे बळ मुळांत कमी असून ते अधिक न वाढल्यामुळें, रुग्णाच्या शरीरामध्यें व्याधिक्षमता चांगली असल्यामुळें, दोषदूष्याच्या संघर्षात कालक्रमानें दोषांचे पाचन होतें. याच स्थितींत दोषप्रकोपाची लक्षणें नष्ट होतात, शरीर हलकें मोकळें वाटतें, ज्वरवेग उणावतो, सर्व इंद्रियें निर्मल व कार्यक्षम होतात. या अवस्थेला दोषपाक असें म्हटलें जातें. निरामावस्था वा पक्वावस्था आणि हा दोषपाक एकच आहे असें म्हणतां येईल.

चिकित्सा संदर्भानें लक्षणें -
छर्दि, रक्तपित्त, कामला (वा. चि. १-५८).
प्रतिश्याय, वैरस्य, शिरोरोग, कंठरोग (वा.चि.१२७).
कास, रक्तपित्त, विसर्प, श्वास (वंगसेन ज्वर पृ. २७).
छर्दि, कास, हृद्रोग, शूल (वंगसेन ज्वर पृ. ३).
मन्यास्तंभ, उरोघात, हनुस्तंभ, शिरोरोग (वंगसेन ज्वर पृ. ४७).
वर्ध्म (वृषणशोथ), हिक्का, श्वास, पांडु, प्रमेह, अर्श, प्लीहावृद्धि, यक्ष्मा, अपस्मार, उदावर्त, कृमी, कुष्ठ (वंगसेन ज्वर पृ. ७३).
हृद्रोग, प्लीहा, ग्रहणी, गुल्म (वंगसेन ज्वर पृ. ७४)
शोथ, शूल, उदर, आध्मान (यो. र. ज्वर पृ. १९७).
पांडु, हलीमक, कामला, पार्श्वशूल, पृष्ठशूल, आनुशूल वातरोग, शिरोरोग
रजोदुष्टी (यो. र. ज्वर पृ. १९९).
दंतरोग (यो. र. पृष्ठ. २७४).
कंडु, विस्फोट, असृग्दर, नेत्ररोग (यो. र, पृ. २०५)

ज्वर-मंदज्वर-मंदतमज्वर-कामला-हलीमक-पांडु-यक्ष्मा-शोफ-उदर-गुल्म-श्वास-शूल-मंदाग्नित्व-स्वरभेद -
मंदज्वर-अतिसार-ज्वर-हिक्का-शोष-मोह-भ्रम-अरुचि-हारीतानें ही लक्षणें व्याधिसंकरासारखी वर्णन केली आहे.

वृद्धिस्थान क्षय

अरति, ज्वरवेग, मोह, तंद्रा, प्रलाप हीं लक्षणें वाढणें हें ज्वरवृद्धीचें द्योतक आहे. ज्वरवेग स्तिमित (फारसा न चढणारा व उतरणारा) असणें हें ज्वराच्या स्थानस्थितींतील स्थिरतेचें द्योतक आहे. रुचि उत्पन्न होणें, लाघव येणें, मलमूत्रांची प्रवृत्ती ठीक होणें, घाम येऊं लागणें. ज्वरवेग मंदावणें हीं लक्षणें ज्वराच्या क्षयाची द्योतक आहेत.

ज्वरमोक्ष

ज्वरप्रमोक्षे पुरुष: कूजन् वमति चेष्टते ।
श्वसन्विवर्ण: स्विन्नाड्गो वेपते लीयते मुहु: ॥
प्रलपत्युष्णसर्वाड्ग: शीताड्गश्च भवत्यपि ।
विसंज्ञो ज्वरवेगार्त: सक्रोध इव वीक्ष्यते ॥
सदोषशब्दं च शकृद्‍द्रवं स्त्रवति वेगवत् ।
लिड्गान्येतानि जानीयाद्‍ज्वरमोक्षे विचक्षण: ॥
बहुदोषस्य बलवान् प्रायेणाभिनवो ज्वर: ।
सत्क्रियादोषपक्त्या चेद्विमुञ्चति सुदारुणम् ॥
कृत्वा दोषवशाद्वेगं क्रमादुपरमन्ति ये ।
तेषामदारुणो मोक्षो ज्वराणां चिरकारिणाम् ॥
धातून् प्रक्षोभयन् दोषो मोक्षकाले विलीयते ।
तेन व्याकुलचित्तस्तु क्षीयमाण इवेहते ॥
सु. उ. ३९-३२१ पान ६९५

दाह: स्वेदो भ्रमस्तृष्णा कम्पविड‍भिदसंज्ञिता ।
कूजनं चास्यवैगन्ध्यमाकृतिर्ज्वरमोक्षणे ॥
``ज्वरप्रमोक्षे पुरुष: कूजेद्वमति चेष्टते'' इति ।
वाग्भटोऽप्याह-धातून् प्रक्षोभयन् दोषो मोक्षकाले
विलीयते ।
ततो नर: श्वसन् स्विद्यन् कूजन्वमति चेष्टते''
(वा.नि.स्था. अ.२) इति । वैगन्ध्यं दुर्गन्धता गात्रे ।
ज्वरमोक्षणे आकृतिर्लक्षणं `भवति' इति शेष: ।
ननु, दोषक्षयं विना न व्याधिनिवृत्ति:, क्षीणश्च दोष:
कथमेवंविधं लक्षणं कुर्यात् ? उच्यते कश्चिद्भाव:
क्षीणोऽपि विनाशकाले स्वशक्तिं दर्शयति, यथा-
निर्वाणावस्थो दीपो विशेषात्प्रज्वलति, अथवा
दोषाभिभूतानां धातूनां दोषापगमेन क्षोभाद्दाहादय:,
तरलतरवानरपरिहीयमानतरूणतरुवल्लरीशिखर-
कम्पवदिति ।
मा. नि. ज्वर ७८ - म. टीकेसह पान ७०

ज्वरमोक्षाचे दारूणमोक्ष व अदारुणमोक्ष असे दोन प्रकार आहेत. दोष, बहुल (वातकफ) व बलवान ज्वर अल्पकालीन असेल तर बहुधा दारुणमोक्षप्रकारानें उतरतो या प्रकारामध्ये ज्वरमुक्तीच्या कालीं ज्वरलक्षणें थोडी वाढल्यासारखी दिसतात. रोगी कण्हतो, कांपतो, विवर्ण होतो, त्याच्या सगळ्या अंगास दरदरुन घाम येतो. श्वास वाढतो, शरीराचा वर्ण फिक्का पडतो, रोगी बडबडतो, मूर्च्छित होतो. रागावल्यासारखा दिसतो, त्याचें अंग फार उष्ण वा गार लागतें, साम सशब्द द्रव अशी मलप्रवृत्तीं वेगानें होते, क्वचित् रोग्यास छर्दिही होते आणि ज्वर एकदम उतरतो. दोष धातूंना दुष्ट करतांना ज्याप्रमाणें धातूंचा क्षोभ होतो त्याप्रमाणेंच दोषपाक होऊन ते धातूंना सोडून वेगळे होऊं लागले म्हणजेही धातूंचा क्षोभ होतो. या धातुक्षोभामुळेंच हीं लक्षणें दिसतात. दिवा जातांना मोठा होतो वा वानरें झाडावरुन उडया मारीत निघून चालली म्हणजे सर्व वृक्ष गदगदून हालतो त्याप्रमाणें दोष नाहींसे होतांना ही धातुक्षोभाची स्थिती उत्पन्न होते अशा दोन मार्मिक उपमा टीकाकारानें दारुण मोक्षांस दिल्या आहेत. अदारुणमोक्षामध्यें ज्वर बहुधा चिरकारी असतो, दोष लक्षणें व ज्वरवेग क्रमाक्रमानें कमी होत हा ज्वर उतरतो.

विगतक्लमसंतापमव्यथं विमलेन्द्रियम् ।
युक्तं प्रकृतिसत्वेन विद्यात् पुरुषमज्वरम् ॥
च. चि. ३-३२९ पान ९९१

देहो लघुर्व्यपगतक्लममोहताप: ।
पाको मुखे करणसौष्ठवमव्यथत्वम् ॥
स्वेद: क्षव: प्रकृतियोगि मनोऽन्नलिप्सा ।
कण्डूश्च मूर्ध्नि विगतज्वरलक्षणानि ॥
वा.नि. २-७९ पान ४६५

स्वेदो लघुत्वं शिरस: कण्डू: पाको मुखस्य च ।
क्षवथुश्चान्नलिप्सा च ज्वरमुक्तस्य लक्षणम् ॥
मा. नि. ज्वर - ७५ पान ७०

क्लम, मोह, संताप हीं लक्षणें नाहींशी होतात इंद्रियांना कार्यक्षमता येते. वेदना नाहींशा होतात, मन स्वस्थ होतें, शरीर हलकें वाटतें, अन्न खाण्याची इच्छा होते, शिंका येतात, डोकें खाजतें, चेहरा किंचित् फिक्का दिसतो, मुखपाक होतो, घाम येतो या लक्षणांनीं ज्वर पूर्णपणें नाहीसा झाला आहे असें समजावें.

उपद्रव

श्वासो मूर्च्छा रुचिश्छर्दिस्तृष्णातीसारविड्ग्रहा: ।
हिक्काकासाड्गभेदाश्च ज्वरस्योपद्रवा दश ॥
वंगसेन ज्वर - ८४० पान ८१

श्वास, मूर्च्छा, अरुचि, छर्दि, तृष्णा, अतिसार, मलावष्टंभ, हिक्का, कास, अंगमर्द, हे ज्वराचे उपद्रव होत. धातुपाकावस्थेचा उपद्रव म्हणून उदर, रक्तपित्त, मर्मच्छेदाचा परिणाम म्हणून हृद्रोग, पक्षवध, मूत्राघात असे विकार होतात.

शीतकालेषु भूयिष्टं बालानां कुक्षिशायिनां
स्वमूत्रोपहतांगानां स्नानोद्वर्तनवर्जिनां ।
कृमिमत्कुणयूकानां संभवात् तैश्च भक्षणात्
गात्रं दद्रुलतां याति कटिदेशे विशेषत: ।
म्रक्षणोद्वर्तनं स्नानं गंधं धूपनिषेवनं ।
बालानां शस्यते तत्र शय्यायाश्च विकल्पनं
का. सं. पृ. १२९

शय्या व्रण

बालांना आगंतू कारणानें उत्पन्न होणार्‍या व्रणाचें वर्णन वरील श्लोकांत काश्यपानें केले आहे. ही परिस्थिती इतरत्र ज्या ज्या ठिकाणी उत्पन्न होईल त्यां त्या ठिकाणी सर्वांनाच अशा तर्‍हेचें व्रण उत्पन्न होण्याची सहज शक्यता आहे परस्वाधीन असल्यामुळें बालकांच्या बाबतींत जसें या स्वरुपाचें व्रण संभवतात तसेच रुग्णही परस्वाधीन असतो त्यावेळी या तर्‍हेचे व्रण संभवतील. संतत ज्वर पक्षवध, कटिपृष्ठांतील अस्थिभंग, अतिक्षीण अतिदुर्बल अतिवृद्ध अशा रुग्णांच्या बाबतींत या स्वरुपाच्या व्रणांची शक्यता अधिक असते. हा व्रण म्हणजे ज्वराचा उपद्रवच मानावा.

काश्यपानी या रोगासाठी सांगितलेले उपचारहि उत्कृष्ट आहेत. अवयव हलक्या हातानें चोळणें (म्रक्षण) निरनिराळ्या प्रकारचीं श्लक्ष्ण चूर्णे उद्वर्तनासाठीं वापरणें, सुगंधी द्रव्ये व धूपन यांचा उपयोग करणे, व अंथरुणावरील चादरी वगैरे कपडे वरचेंवर बदलणे, स्वच्छ निर्मळ वस्त्रे वापरणें हे उपचार दक्षतेनें करीत राहिले असतां रुग्णास व्रण उत्पन्न होणार नाहीत व झाल्यास नाहिसे होतील.

उदर्क

अथवाऽपि परीपाकं धातुष्वेव क्रमान्मला: ।
यान्ति ज्वरमकुर्वन्तस्ते यथाऽप्यपकुर्वते ॥
दीनतां श्वयथुं ग्लानिं पाण्डुतां नान्नकामताम् ।
कण्डूरुत्कोठपिडका: कुर्वन्त्यग्निं च ते मृदुम् ॥
चं. चि. २-६३६, ३३७ पान ९९२

दोष गंभीर होऊन धातुपाक, दौर्बल्य उत्पन्न करतात व त्याचा परिणाम म्हणून दैन्य, शोथ,ग्लानि,कंडू, उत्कोठ, पीडका, अग्निमांद्य अशी लक्षणें दिसतात. प्लीहावृद्धि, ग्रहणी, पांडु, कृशता (कृशतेला कारण असलेल्या धातुक्षयाचा परिणाम म्हणून क्लैब्य, रज:क्षीणता, वंध्यत्व, त्रासिकपणा हीं लक्षणें होतात). धात्वग्निमाद्यांचा परिणाम म्हणून क्वचित् स्थूलताही येते.

साध्यासाध्यत्व

हेतुभिर्बहुभिर्जातो बलिभिर्बहुलक्षण:
ज्वर: प्राणान्तकृद्द्यश्च शीघ्रमिन्द्रियनाशन:॥
ज्वर: क्षीणस्य शूनस्य गम्भीरो दैर्घरात्रिक:।
असाध्यो बलवान्  यश्च केशसीमन्तकृत‍ज्वर:॥
गम्भीरस्तु ज्वरो  यो ह्यन्तर्दाहेन तृष्णया।
आन्नद्धत्वेन चात्यर्थश्वासकासोद्गमेन च॥
आरम्भाद्विषमो यस्तु यश्च वा दैर्घरात्रिका।
क्षीणस्य चातिरुक्षस्य ग्म्भीरो यस्य हन्ति तम् ॥
विसंज्ञस्ताम्यते यस्तु शेते निपतितोऽपि वा ।
शीतार्दितोऽन्तरुष्णश्च ज्वरेण म्रियते नर: ॥
यो हृष्टरोमा रक्ताक्षो हृदि संघातशूलवान् ।
वक्रेण चैवोच्छ्‍वसिति तं ज्वरो हन्ति मानवम् ॥
हिक्काश्वाससमायुक्तं मूढं विभ्रान्तलोचनम् ।
सन्ततोच्छ्‍वासिनं क्षीणं नरं क्षपयति ज्वर: ॥
हतप्रभेन्द्रियं क्षीणमरोचकनिपीडितम् ।
गम्भीरतीक्ष्णवेगार्त ज्वरितं परिवर्जयेत् ॥
मा. नि. ज्वर ६६ ७३ पान ६५-६६

......... गोसर्गे वदनाद्यस्य स्वेद: प्रच्यवते-भूशम् ।
लेपज्वरोपसृष्टस्य दुर्लभं तस्य जीवितम् ।
मृत्युश्च तस्मिन् बहु पिच्छिलत्वाच्छीतस्य जन्तो:
परित: सरत्वात् । स्वेदो ललाटे हिमवन्नास्य
शीतार्दितस्यैति सुपिच्छिलश्च । कण्ठे स्थितो यस्य
न याति वक्षो नूनं यमस्यैति गृहं स मर्त्य: ।
स्त्रुतस्वेदो ललाटाद्य: श्लथसन्धानबन्धन: । मुह्येदुत्थाप्य-
मानस्तु स स्थूलोऽपि न जीवति । यस्य स्वेदोऽतिबहुल:
पिच्छिलो याति सर्वत: । रोगिण: शीतगात्रस्य तदा मरण-
मादिशेत्'' इति । ``आधानजन्मनिधने प्रत्ययाख्ये विप-
त्करे । नक्षत्रे व्याधिरुत्पन्न: क्लेशाय मरणाय वा ।
ज्वरस्तु जात: षड्रात्राश्विनीषु निवर्तते'' - इत्यादिना ग्रन्थेन
नक्षत्रभेदेन ज्वरस्य साध्यत्वासाध्यत्वं यदभिहितं, तद्धारीत-
वृद्धवाग्भटयोर्द्रष्टव्यं इह तु विस्तरभयान्न लिखितम् ।
मा. नि. ज्वर ७३ - म. टीका पान ६६, ६७, ६८.

पुष्कळ कारणांनी जो ज्वर उत्पन्न झाला असेल, ज्यातील दोषांचे बल अधिक असेल, उत्पन्न होणार्‍या लक्षणांची संख्या मोठी असेल, योग्य तर्‍हेनें उपचार चालूं असूनही ज्या ज्वरामध्यें ज्ञानेंद्रियांना वा कर्मेंद्रियांना फार त्वरेनें वैकल्य येतें तो ज्वर प्राणघातक ठरतो. ज्वरामुळें शरीर क्षीण होणें, अंगावर सूज येणें, ज्वर धातुगत होणें, दीर्घकाल टिकून रहाणें, केस विरळ होऊन भांग पडणें अशा लक्षणांनी युक्त ज्वर बलवान असतो म्हणून असाध्य ठरतो. अंतर्दाह, तृष्णा, तीव्र स्वरुपाचा मलावष्टंभ, अधिक प्रमाणांतील श्वास कास या लक्षणांनी ज्वर गंभीर झाला आहे असें जाणावे. हा ज्वर कष्टसाध्य वा असाध्य असतो. विषमज्वर ज्यावेळीं दीर्घकाळ टिकून राहतो, अग्निक्षीणता व अतिरुक्षता उत्पन्न होते. आणि ज्वर अंतर्वेगी होतो अशा स्थितींत रोगी जगत नाहीं. रोगी मोह, मूर्च्छा या लक्षणांनी युक्त असतो, निजलेल्या स्थितींतून उठूं शकत नाहीं, बाहेरुन थंडी वाजत असते, आंतून दाह होतो हीं लक्षणें असतांना ज्वर मारक ठरतो. अंगावर सतत रोमांच उभे रहाणें, डोळे रक्ताळणें, छातीमध्यें दगडानें आघात केल्याप्रमाणें वेदना होणें, श्वासोच्छास तोंडानें करावा लागणें अशा लक्षणांनी युक्त ज्वर प्राणघातक ठरतो. हिक्का, श्वास, तृष्णा, मूढता, डोळे तारवटणें, सारखी धाप लागणें, क्षीणता येणें हीं लक्षणें झालीं असतां ज्वर असाध्य होतो.

कांती नष्ट होणें, इंद्रियें विकल होणें, क्षीणता येणें, अत्यंत अरुचि असणें ज्वर अंतर्वेगी होणें, ज्वराचा वेग टिकून रहाणें या लक्षणांनी युक्त अशा रोग्यावर उपचार केले असता कांहीं उपयोग होत नाहीं. ज्याला भूतपिशाच्चासवें आपण मद्यपान करतो आहो वा कुत्रीं आपणास ओढीत आहेत अशी स्वप्नें पडतात तो रोगी लवकर मरतो. सकाळच्या वेळीं ज्याचा ज्वर अतिशय चढतो, कोरडी ढांस अधिक प्रमाणांत असते, मांसक्षीणता व बलक्षीणता येते असा रोगी जगत नाहीं. संध्याकाळच्या वेळीं ज्वरवेग तीक्ष्ण होणें व खोकल्यांतून पुष्कळ कफ पडणें, दुर्बलता बलक्षीणता व कृशता येणें हीं लक्षणें मारक ठरतात. तीव्र ज्वर संताप तृष्णा, मूर्च्छा, बलक्षय सांधे ढिले होणें हीं लक्षणें मरण ओढवून आणतात. रोग्याचे ग्रह वाईट असल्यास तो जगत नाहीं. ज्याच्या अंगाला चिकट गार घाम पुष्कळ प्रमाणांत येतो, अंग गार पडतें, घाम गळ्याला येतो पण छातीवर येत नाहीं, संधिबंध ढिले होतात, उठून बसविलें असतां मूर्च्छित होतो असा ज्वरी रुग्ण फारसा कृश झाला नसला तरी जगत नाहीं,

बलवस्त्वल्पदोषेषु ज्वर: प्राकृत: साध्योऽनुपद्रव: ।
मा. नि. ज्वर ६६ पान ६५

वर्षाशरद्वसन्तेषु वाताद्यै: प्राकृत: क्रमात् ।
वैकृतोऽन्य: स दु:साध्य: प्राकृतश्चानिलोद्भव: ।
मा. नि. ज्वर ५५ पान ६०

रोगी बलवान असेल, दोषांचें बल अल्प असेल, उपद्रव उत्पन्न झालेले नसतील लक्षणें थोडी असतील तर ज्वररोग साध्य असतो. वसंत व शरद ऋतूत उत्पन्न होणारे अनुक्रमें कफाचे वा पित्ताचे ज्वर साध्य असतात. वातज्वर प्राकृत असला तरी कष्टसाध्यच असतो. ज्वराच्या धातुगत प्रकारांपैकीं रसरक्ताश्रित ज्वर साध्य, मांसमेदोगत ज्वरही साध्य, अस्थिमज्जागत कष्टसाध्य व शुक्रस्थ ज्वर असाध्य समजावा. धातुगतज्वर मुळांतच कष्टसाध्य वा असाध्य आहे. वरील धातुगतज्वरानें तील साध्यासाध्य विचार हा त्या धातुगत अवस्थेच्या परस्परांतील सापेक्षसंबंधा समजावा.

सप्ताहाद्वा दशाहाद्वा द्वादशाहात्तथैव च ।
सप्रलापभ्रमश्वासस्तीक्ष्णो हन्याज्ज्वरो नरम् ॥

प्रलापयुक्त वातज्वर सात दिवसांमध्यें मारक होतो, भ्रमयुक्त पित्तज्वर दहा दिवसांत मारक होतो. कांहीं श्वासयुक्त कफज्वर बारा दिवसांत मारक होतो. कांहीं लोकांच्या मतें प्रलाप, भ्रम, श्वास व तीक्ष्ण वेग या लक्षणांनीं युक्त असा ज्वर वातपित्तकफांचे प्राबल्य असेल त्याप्रमाणें सात, दहा, बारा दिवसांत मारक होतो. असा सान्निपातिक ज्वर असाध्य असतो.

रिष्टलक्षणें

ज्वरो निहन्ति बलवान् गम्भीरो दैर्घरात्रिक: ।
सप्रलापभ्रमश्वास: क्षीणं शूनं हतानलम् ॥
अक्षामं सक्तवचनं रक्ताक्षं हृदि शूलिनम् ।
सशुष्ककास: पूर्वाह्णे योऽपराःह्नेऽपि वा भवेत् ॥
बलमांसविहीनस्य श्लेष्मकाससमन्वित: ।
वा. शा. ५-७१ ते ७३ पान ४२५

ज्वर बलवान असून गंभीर, दीर्घकालानुबंधी, प्रलाप, भ्रम, श्वास यांनीं युक्त; क्षीणता, शोथ, अग्निनाश हीं लक्षणें उत्पन्न करणारा असेल वा शूल नसून बोलणें आंत ओढल्यासारखें असणें, डोळे लाल होणें, हृदयामध्यें कृश असणें, ज्वर सकाळीं वा संध्याकाळीं तीक्ष्ण वेगी होऊन शुष्क कास असणें, बल मांस विहीनता व कफकास असणें अशी लक्षणें असतील तरे तीं मरणसूचक ठरतात.

चिकित्सा सूत्रें

लड्घनं स्वेदनं कालो यवाग्वस्तिक्तको रस: ।
मलानां पाचनानि स्युर्यथावस्थं क्रमेण वा ॥
वा. चि. १-२१ रु. टीकेसह पान ५४६

आमाशयस्थो हत्वाऽग्निं सामो मार्गान् पिधाय यत् ।
विदधाति ज्वरं दोषस्तस्मात्कुर्वीत् लड्घनम् ॥
प्राग्रूपेण ज्वरादौ वा बलं यत्नेन पालयन् ।
बलाधिष्ठानमारोग्यमारोग्यार्थं: क्रियाक्रम: ॥
वा. चि. १-२ सं टीकेसह पान ५४३

ज्वरे लड्घनमेवादावुपदिष्टमृते ज्वरात् ।
क्षयानिलभयक्रोधकामशोकश्रमोद्भवात् ॥
च. चि. ३-१३९ पान ९१५

लड्घनै: क्षपिते दोषे दीप्तेऽग्नौ लाघवे सति ।
स्वास्थ्यं क्षुतृड्‍रुचि: पक्तिर्बलमोजश्च जायते ॥
वा. चि. १--३ पान ५४३--५४४

आमाशयांत प्रकुपित झालेले दोष अग्निमांद्य उत्पन्न करुन आमयुक्त होतात आणि स्त्रोतसांचा अवरोध करुन ज्वर उत्पन्न करतात यासाठीं ज्वराच्या पूर्वरुपांत किंवा ज्वराच्या आरंभीच्या आमावस्थेंत उपवासरुप लंघन घ्यावें. मात्र लंघनाचा प्रयोग करीत असतांना रोग्याचे बल टिकून राहील असें पाहिले पाहिजे थकवा, ग्लानि, अशक्तपणा जाणवूं लागण्यापूर्वीच लंघन थांबविलें पाहिजे. लंघन चांगल्याप्रकारे झाले म्हणजे इंद्रियें निर्मल होतात, कार्यक्षम होतात. मलप्रवृत्ति व्यवस्थित होऊं शकते, शरीराला हलकेपणा येतो; रुचि उत्पन्न होते, तहान आणि भूक या दोन्ही संवेदना एकमेकींसह उत्पन्न होतात. मुख, कंठ, उर या ठिकाणीं स्वच्छता वाटतें मोकळेपणा वाटतो, ढेकर स्वच्छ येते, व्याधीचें बल उणावतें, उत्साह वाटतो, तंद्रा नाहींशी होते (वा. सू. १४,१७) अशा रीतीनें लंघनानें दोष नाहीसें झाले, अग्निदीपन झाले म्हणजे रोग्याला पेयादि आहारद्रव्ये (द्रवरुप) दीपनपाचन औषधांनीं सिद्ध करुन द्यावींत.

तत्रोत्कृष्टे समुत्किष्टे कफप्राये चले मले ।
सहृल्लासप्रसेकान्नद्वेषकासविषूचिके ॥
सद्योभुक्तस्य सञ्जाते ज्वरे सामे विशेषत: ।
वमनं वमनार्हस्य शस्तं ॥
वा. चि. १-४

कुर्यात्तदन्यथा ।
श्वासातीसारसम्मोहहृद्रोगविषमज्वरान् ॥
वा. चि. १-५ पान ५४४

दोष उत्क्लिष्ट नसतांना द्यावे परंतु कफ, पित्त या दोषांचे प्रमाण अधिक असेल, ते चल झाले असतील. त्यामुळें हृल्लास, प्रसेक, अन्नद्वेष, कास, छर्दि, द्रवमलप्रवृत्ति अशी लक्षणें दिसत असतील किंवा जेवण घेतल्यानंतर लगेंच ज्वर चढला असेल तर रोगी वमन देण्यास योग्य आहे कां नाहीं तें पाहून ज्वराच्या आमावस्थेंत वमन द्यावें. ज्वरांत योग्य वेळीं योग्य प्रकारें वमन दिलें नाहीं तर श्वास, अतिसार, मोह, मूर्च्छा, हृद्रोग, विषमज्वर असे उपद्रव होतात. वमन देणें योग्य असेल त्यावेळीं प्रथम वमनोपचार करुन मग लंघन द्यावें. प्रारंभी शोधन झालेल्या दोषांचें पचन व शमन त्यामुळें योग्य प्रकारें होतें (शोधन हाही एक लंघनाचाच प्रकार आहे). आमज्वरांत लंघन देणें अत्यंत आवश्यक असलें तरी केवळ वातप्रकोपानें उत्पन्न झालेला ज्वर; भय, क्रोध, काम, शोक, श्रम, यांनीं उत्पन्न झालेला ज्वर आणि राजयक्ष्मांतील ज्वर यांमध्यें मात्र उपवासरुप असें संपूर्ण लंघन कधींही देऊं नये. त्यानें वातवृद्धी होऊन ज्वराचें स्वरुप अधिकच उग्र होईल. वमनलंघनाप्रमाणेंच दोषांच्या पाचनासाठीं स्वेदनाचीही आवश्यकता असते. स्वेदन हें बाह्य आणि अभ्यंतर अशा दोन्हीही प्रकारांनी करतां येतें. ज्वरांतील बाह्यस्वेदनासाठीं उपनाह, लेप, तापस्वेद वा गुरुप्रावरण यांचा उपयोग करावा. परिषेक वा अवगाहस्वेद ज्वरामध्यें वापरुं नयेत. ज्वरांमध्यें शीतोपचार न करतां उष्णोपचारच कां करावा यांचें कारण सांगत असतां काश्यप म्हणतो.

``ज्वरोष्मणाऽभिसंतप्ते प्रागुष्णादिक्रियाविधि: ॥
क्रियते नेतर: कस्माच्छीत उष्णस्य बाधक: ।
यथाऽग्न्यगारे संतप्ते कपाटपुटसंवृते ॥६६॥
भवत्यधिकस्तूष्मा सर्वत: परितापन: ।
स एवोद्धाटितद्वारे मन्दीभवति तत्क्षणात् ॥
एवमावृतमार्गेषु दोषै: स्त्रोत: सु देहिनाम् ।
ज्वरोष्मा वर्धते देहे यथा हेतुबलाश्रयम् ॥
उद्धाटनार्थ तत्तेषामुष्णोपक्रम इष्यते ।
स्तभ्मनो हि गुण: शीत उष्णो विलयन: स्मृत:

आमाने आवृत झालेल्या स्त्रोतसामुळें दारे बंद केलेल्या भट्टीची उष्णता वाढावी त्या प्रमाणें शरीराची उष्णता वाढत असते. भट्टीची दारे उघडली म्हणजे जशी भट्टी निवूं लागते त्या प्रमाणें आमावृत स्त्रोतसे विवृत झाली, मोकळी झाली म्हणजे ज्वरोष्माहि कमी होऊं लागतो. उष्ण गुण हा विलयन असून, शीत गुण स्तंभन आहे म्हणून ज्वराच्या उपचारांत उष्म्याचेच प्राधान्य असले पाहिजे. अभ्यंतर स्वेदनासाठीं उकळलेलें, औषधांनीं सिद्ध केलेले असें उष्ण जल वापरावें. वाग्भटानें या उष्णजलाचें उत्तम वर्णन केलें आहे.

तृष्णगल्पाल्पमुष्णाम्बु पिबेद्वातकफज्वरे ।
तत्कफं विलयं नीत्वा तृष्णामाशु निवर्तयेत् ॥
उदीर्य चाग्निं स्त्रोतांसि मृदुकृत्य विशोधयेत् ।
लीनपित्तानिलस्वेदश कृन्मूत्रानुलोमनम् ॥
निद्राजाड्यारुचिहरं प्राणानामवलम्बनम् ।
विपरीतमत: शीतं दोषसड्घातवर्द्धनम् ॥
वा. चि. १-११ ते १३

उष्णमेवंगुणत्वेऽपि युञ्ज्यान्नैकान्तपित्तले ।
उद्रिक्तपिते दवथुदाह मोहातिसारिणि ॥
विषमद्योत्थिते ग्रीष्मे क्षतक्षीणेऽस्त्रापित्तिनि ।
वा. चि. १-१४

घनचंदनशुष्ठयम्बुपर्पटोशीरसाधितम् ।
शीतं तेभ्यो हितं तोयं पाचनं तृड्‍ज्वरापहम् ॥
वा. चि. १-१५

ऊष्मां पित्तादृते नास्ति ज्वरो नास्त्यूष्मणा विना ।
तस्मात्पित्तविरुद्धानि त्यजेत् पित्ताधिकेऽधिकम् ॥
वा. १-१६ पान ५४५

ज्वरिताला तहान लागली तर कफवातज्वरामध्यें थोडथोडे उष्ण जल प्यावयास द्यावे. तहान मुळींच नसली व पाणी नकोसें वाटलें तर पाणी पाजण्याचा आग्रह धरुं नये (न क्वचित् वारि वार्यते असा सिद्धांत असला तरी आग्रह योग्य नाहीं). उष्ण जलामुळें कफाचें विलयन होतें. कफ शिथील पातळ होऊन सुटा होतो. वातामुळें झालेला शोष नाहींसा होतो. अग्नीचे उदीरण होतें. स्त्रोतसांना मार्दव येऊन तीं शुद्ध होण्यास सहाय्य होतें. स्त्रोतसामध्यें लीन होऊन राहिलेल्या पित्त, वात, स्वेद, पुरीष, मूत्र यांचें अनुलोमन होतें. निद्राधिक्य, जडपणा, अरुचि यांचा नाश होतो. प्राणांचें अवलंबून होतें. (बल टिकून राहतें) उष्ण जलाचे असे गुण असले तरी एकांतोपत्तज्वरांत त्याचा उपयोग करुं नये. तसेंच दाह, संताप, भ्रम, मूर्च्छा, अतिसार हीं लक्षणें असतांनाही उष्णजल वापरुं नये. उर:क्षती, रक्तपित्त असलेला रोगी, विषोत्पन्न वा मद्योत्पन्न ज्वर आणि ग्रीष्म ऋतु (उन्हाळा) यांचे बाबतींतही उष्णजलाचा उपयोग करुं नये. नागरमोथे, चंदन, सुंठ, वाळा, काळा वाळा व पित्तपापडा यांनी जल सिद्ध करुन तें (औषधी घालून उकळलेलें पाणी) गार झाल्यानंतर रोग्यास प्यावयास द्यावें. यालाच षडंगोदक म्हणतात. उष्णता हा गुण पित्ताचा आहे. ज्वरामध्ये उष्णता वाढलेली असते त्यामुळें तेथें पित्ताचा प्रकोप प्रकोप सामान्यपणें असतोच यासाठीं कोणताही स्वेदनोपचार करतांना (बाह्य वा आभ्यंतर) पित्तप्रकोप होणार नाहीं याची काळजी वातज्वर, कफज्वरांतही घेतली पाहिजे. पितज्वरांत तर उष्ण गुणाचा उपयोग करतांना फारच सावधपणा बाळगला पाहिजे.

उत्तानस्य प्रसुप्तस्य कांस्ये वा ताम्रभाजने ।
नाभौ निधाय धारां तु शीतं दाहनिवारणे ॥
हारित तृतीय १ ७४ पान १८४

ज्वर संताप व दाह जास्त असेल तर पित्तज्वरांत रोग्यास उताणे निजवून त्याच्या नाभीवर गारपाणी घातलेले काशाचें वा ताब्याचें पात्र ठेवावे किंवा गार पाण्याची धार धरावी. सामान्यत: सहा दिवसपर्यंत शोधन, लंघन, स्वेदन उपचार झाले म्हणजे ज्वराची आमावस्था बहुधा नाहींशी झालेली असते. त्यानंतर रुग्णाला बलरक्षण करणार्‍या दीपन पाचन गुणांनीं युक्त व ज्वरघ्न अशा पेया द्याव्या आणि तिक्तरसानें युक्त अशी औषधें द्यावींत तीं विशेषत: क्वाथरुपानें द्यावींत. ज्वराला निरामावस्था कधीं प्राप्त होते याविषयीं प्राचीन ग्रंथांत व टीकेमध्ये अनेक प्रकारचे मतभेद उल्लेखलेले आहेत.

अत एवाह चरक:, - ``ज्वरितं षडहेऽतीते लघ्वन्नप्रतिभो-
जितम् [पाचनं शमनीयं वा कषायं पाययेत्तु तम्'' इति-इति ।
(च.चि.स्था.अ.) तथा-``मृदौ ज्वरे लघौ देहे प्रचलेषु'' मलेषु च ।
पक्वं दोषं विजानीयाज्ज्वरे देयं तदौषधम्''
(सु. उ. तं अ. ३९) इत्यभिधायापि यत्सुश्रुतेन पठितम् -
``सप्तरात्रात्परं केचिन्मन्यन्ते देयमौषधम् ? दशरात्रात्परं
केचिद्दातव्यमिति निश्चिता:'' (सु. उ. स्था. अ.) इति
चरक-वचनस्य-'' सप्तरात्रात्परं'' (सु. उ. तं. अ३७)
इत्यादिना सुश्रुतवचनेन विरोध:, यत: षडहेऽतीते सप्तम-
दिनं भवति, तत्र कषायं विधत्त इति । उच्यते, षडहेऽतीते
सप्तमे लघ्वन्नप्रतिभोजितमष्टमे कषायं पाययेदित्यष्टमपद-
लोपाद्योज्यं रसौदनवदिति चक्र:, ``भेषजं ह्यामदोषस्य
भूयो ज्वलयति ज्वरम् (च. चि. स्था. अ. ३) इति दोष-
श्रुतेरुक्तसुश्रुतविरोधाच्च । प्रकारान्तरेणैनमर्थ कार्तिक-
कुण्डोऽप्याह तद्यथा-षडहेऽतीते इति ज्वरोत्पाददिनं परि-
त्यज्य गणना, बस्तिदानदिनपरिहारेण परिहारकालगणना-
वत् एवं ``पाययेदातुरं साममौषधं सप्तमे दिने । शमने-
नाथवा दृष्ट‍वा निरामं तमुपाचरेत्'' इत्येतदपि वचनं
व्याख्येयम् ।
वा. चि. स्था. अ. १

...... अयमर्थोऽभियुक्तैश्च कैश्चिदुक्तश्चिकित्सकै: । सप्ताहा-
त्परतोऽस्तब्धे सामे स्यात्पाचनं ज्वरे । निरामे शमनं स्तब्धे
सामे नौषधमाचरेत् ``इति संक्षेप: । विस्तरस्तु कषाय-
निर्णयप्रकरणे द्रष्टव्य: । पक्वज्वरलक्षणेन जीर्णज्वरलक्ष-
णमपि चिकित्सोचितं बोद्धव्यम् । यदुक्तं तन्त्रान्तरे
``आसप्तरात्रं'' इत्यादि । जतुकर्णेनाऽप्युक्तं ``जीर्णस्त्रयो-
दशदिवस:'' इति ।
मा. नि. ज्वर ६५ म. टीका पान ६४-६५

ही वर्णनें व टीका पाहिली म्हणजे या वादविवादाची कल्पना येईल. केवळ शब्दप्रामाण्य निरपवादपणें मानण्याच्या काळांत या स्वरुपाचा वादविवाद होणें स्वाभाविकहि होते; आज त्यांतील सार पाहून त्याप्रमाणें वागणें हेंच योग्य आहे. सहा, सात या दिवसांचा प्रत्यक्ष उल्लेख जरी आमपाचनाच्या कालमर्यादा सांगताना केला असला तरी या ठिकाणीं दिवसगणना ही अपरिहार्य नसून आमाचें पाचन होणें हें महत्त्वाचें आहे हें लक्षांत ठेवलें पाहिजे. दोषांच्या प्रकोपाचें बलाबल, रुग्णाची व्याधिक्षमता व कालाची अनुकूलता जशी असेल त्याप्रमाणावर आमाचें पाचन होणें वा न होणें हें अवलंबून असतें. आमपचनासाठीं दोन तीन दिवसांइतका अल्प वा पंधरा वीस दिवसांइतका दीर्घ काळही लागणें सहज शक्य असतें. त्यामुळें आमावस्थेची जीं लक्षणें सांगितली आहेत ती नाहीशीं झाली वा लंघन चांगलें झाल्याची, ज्वराला पक्वावस्था आल्याची जी लक्षणें सांगितलीं आहेत तीं प्रकट झालीं म्हणजेच ज्वराची आमावस्था संपली असें मानावें. कालाच्या मर्यादेचा उल्लेख हा सामान्यपणे मार्गदर्शनासाठीं म्हणून केलेला आहे.

वमितं लड्घितं काले यवागूभिरुपाचरेत् ।
यथास्वौषधसिद्धाभिर्मण्डपूर्वाभिरादित: ॥
यावज्वरमृदूभावात् षडहं वा विचक्षण: ।
तस्याग्निर्दीप्यते ताभि: समिद्भिरिव पावक: ॥
ताश्च भेषजसंयोगाल्लघुत्वाच्चाग्निदीपना: ।
वातमूत्रपुरीषाणां दोषाणां चानुलोमना: ॥
स्वेदनाय द्रवोष्णत्वाद्‍द्रवत्वातृट्‍प्रशान्तये ।
आहारभावात् प्राणाय सरत्वाल्लाघवाय च ॥
ज्वरघ्न्यो ज्वरसात्म्यत्वात् तस्मात्पेयाभिरादित: ।
ज्वरानुपचरेद्धीमानृते मद्यसमुत्थिथात् ॥
मदात्यये मद्यनित्ये ग्रीष्मे पित्तकफाधिके ।
ऊर्ध्वगे रक्तपित्ते च यवागूर्न हिता ज्वरे ॥
च. चि. ३-१४५ ते १५४ च. पा. टीकेसह पान ९२३ ते ९२४

तत्र तर्पणमेवाग्रे प्रयोज्यं लाजसक्तुभि: ।
ज्वरापहै: फलरसैर्युक्तं समधुशर्करम् ॥
च. चि. ३-१५५ पान ९२७

वमनलंघनादि प्रयोगांनी ज्वरांतील दोषांना अल्पता व निरामता आल्यानंतर योग्य त्या औषधांनी सिद्ध केलेल्या यवागूचा उपयोग करावा. सामान्यत: सात दिवसांनंतर यवागू द्यावयास लागावें. यवागूमुळें शोधनलंघनानें अल्पबल झालेल्या अग्नीचें संधुक्षण होतें. औषधि द्रव्यांनी सिद्ध केलेली असल्यामुळें, अग्निसंस्कारामुळें आणि धान्यांचे प्रमाण अतिशय अल्प वापरलेलें असल्यामुळें यवागू लघु आणि अग्निदीपन अशा होतात. यवागूंच्या उपयोगामुळें दोषांचे व मलांचे अनुलोमन होतें. यवागू या द्रव असल्यामुळें आणि त्या कढत कढतच प्यावयाच्या असल्यामुळें त्यानें स्वेदन होण्यास साहाय्य होतें. व तहानही भागतें. यवागू हे आहारद्रव्य असल्यानें प्राणाचें रक्षण होतें. बल टिकून राहतें. त्यांच्या सरगुणामुळें आम न वाढता शरीराचें लाघव टिकून रहातें आणि या सर्व गुणविशेषांमुळें यवागू ह्या ज्वरामध्यें देण्यास योग्य आणि ज्वरघ्न अशाच होतात. म्हणून ज्वरामध्यें प्रथम मंड, मग पेया आणि पूर्व ज्वरमुक्तीनंतर विलेपी अशा क्रमानें यवागू द्याव्यात. यवागू अशारीतीनें ज्वरामध्यें आरंभीं द्यावयाचें आहारद्रव्य म्हणून योग्य असल्या तरी मद्यामुळें आलेला ज्वर, नेहमी मद्य पिणारा रोगी, ग्रीष्म ऋतू. पित्तकफज्वर, ऊर्ध्वगरक्तपित्त अशा स्थितीमध्यें देऊं नये. द्रव, उष्ण, सर हे यवागूचे गुण वरील सर्व अवस्थांमध्यें विपरीत परिणाम करतात. या ठिकाणीं विशिष्टपद्धतीनें तयार केलेली अशी इतर आहार द्रव्यें वापरावींत. साळीच्या लाह्या, मूळांत लघु असलेल्या अशा भाजलेल्या धान्याचे पीठ, द्राक्षा, दाडिम, खजूर, चारोळी, फालसा यांनी सिद्ध केलेलीं अशीं द्रव स्वरुपाचीं आहारद्रव्यें द्यावींत. या पद्धतीच्या आहारद्रव्यांना तर्पण असा परिभाषिक शब्द वापरलेला आहे. (च. चि. ३. १५५ जेज्जट)

तिक्त रस

पाचनं शमनीयं वा कषायं पाययेद्भिषक ।
ज्वरितं षडहेऽतीते लघ्वन्नप्रतिभोजितम् ॥
च. चि. ३-६० पान ९२८

यवागू द्यावयास लागल्यानंतर दोषांच्या पाचन, शमनासाठीं तिक्तरसप्रधान द्रव्यांचे काढे रोग्यास द्यावयास लागावे. तिक्तरस प्रधान द्रव्यांचे काढे रोग्यास द्यावयास लागावे. तिक्तरस हा वायू आणि आकाश या महाभूतांच्या आधिक्यानें उत्पन्न होत असल्यामुळें तद्‍गुण युक्त द्रव्यें लघु, स्वच्छ करणारी, स्त्रोतसांना मोकळें करणारी, शीतवीर्य आणि पाचन अशी असतात. पर्यायानें तीं अग्निदीपनही होतात; त्यामुळें अग्निमांद्य, आम आणि पित्तानुबंध यांनी युक्त अशा ज्वराच्या सामान्यसंप्राप्तीचा भंग करण्यासाठीं तिक्त रसाची द्रव्यें कार्यकारी होतात. क्वचित् इतरहि रस वापरावे. कषायरस मात्र ज्वरामध्यें वापरुं नये कारण तो स्तंभन गुणाचा असल्यामुळें स्त्रोतोरोध अधिकच वाढवितो. तिक्तरसांच्या उपयोगानंतर सिद्धघृतपान, विरेचन, निरुह अनुवासन बस्ति, नस्य, अभ्यंग, प्रदेह, परिषेक, धूप यांचा यथायोग्य रीतीनें उपयोग करावा.
(च. चि. ३.१६४ ते १७६)

संसृष्टान् सन्निपतितान् बुद्ध्वा तरतमै: समै:
ज्वरान् दोषक्रमोपेतान् यथोक्तैरौषधैर्जयेत् ॥
वर्धनेनैकदोषस्य क्षपणेनोच्छ्रितस्य वा ।
कफस्थानानुपूर्व्या वा सन्निपातज्वरं जयेत् ॥
सटिक च. चि. ३-२८५, २८६
पान ९७५ ते ९७७

द्विदोषज व सन्निपातज ज्वरामध्यें दोषांच्या दृष्टीनें औषधीद्रव्यांचा उपयोग करावा. सन्निपातज्वराची चिकित्सा करतांना-त्यामध्यें तीनही दोषांचा प्रकोप, दोषांचे परस्परविरुद्ध गुणधर्म, यांचेमुळें-चिकित्सेचे स्वरुप अत्यंत संकुल होतें. त्यामुळें त्यांतून मार्ग काढण्यासाठीं आदर्श चिकित्सेचें जें सांगितलेलें दृश्य स्वरुप त्यास थोडा बाध येत असला तरी निरुपायानें परिणामाकडे दृष्टी ठेवून आचार करावें लागतात. तीनही दोषांची शामक द्रव्यें जरी उल्लेखिलेली असली तरी ती फार थोडी आहेत आणि त्यांच्यामध्यें प्रमाथि गुण नाहीं. त्रिदोषघ्न द्रव्याचे कार्यकारित्व बहुधा सौम्य स्वरुपाचें असतें आणि सन्निपाताच्या आशुकारी अवस्थेंत त्यांचा उपयोग विशेष लाभदायक ठरत नाहीं. यासाठीं चिकित्सेला एकमार्गी निश्चित असें स्वरुप द्यावें लागते. सन्निपातामध्यें दोषप्रकोपाचे तीन गट पडतात-पाडता येतात. खरें म्हणजे एकोल्बण आणि एकहीन हेंच त्याचें अंतिम स्वरुप राहते. हीनमध्याधिक हा जो तिसरा प्रकार तो एकोल्बण आणि एकहीन या दोन्ही गटांमध्यें समाविष्ट होणारा आहे. सन्निपाताचें स्वरुप असें द्विविध असल्यामुळें चिकित्सा सुलभ होण्यासाठीं सोयीचें असेल त्याप्रमाणें जो एक दोष इतर दोन दोषांपेक्षां वाढलेला असेल त्यास कमी करण्याचा प्रयत्न करावा वा तीन दोषांपैकी जो एक दोष इतर दोषांपेक्षा कमी असेल त्यास वाढविण्याचा प्रयत्न करावा. हीनमध्याधिक प्रकारामध्यें यांतील जें सोयीचें असेल तें करावें. यामध्यें वाढलेला दोष कमी करणें हें चिकित्सेच्या सामान्य स्वरुपाशीं अनुकूल आहे असें वाटतें; कमी असलेला दोष वाढविणें हें चिकित्सेच्या ध्येयाशीं विसंगत दिसतें म्हणून या उपचाराचें थोडें स्पष्टीकरण होणें अवश्य आहे.

सन्निपातामध्यें दोषाना स्स्त्यानत्व आलेलें असतें. दोष शमन होण्यासाठीं त्यांना चल करणें अत्यंत आवश्यक आहे म्हणून कांहीं वेळां दोषांना चल करुन शिथिल बनविण्यासाठीं वृद्धी करणें या विचित्र दिसणार्‍या उपयाचाही अवलंब करावा लागतो. दोष कोष्ठांत आणणें हें अत्यंत आवश्यक असतें म्हणून स्त्रोतोमुखविशोधन, दोषांचें पाचन, या अनुकूल उपचारांसवें वृद्धीचा वा अभिष्यंदनाचा वर वर विपरीत दिसणारा उपायही योजावा लागतो. वाढलेल्या कफाच्या शोधनासाठीं वमन देण्यापूर्वी आधीं कफकर [कफवृद्धिकर] दहीभात रुग्णास खावयास देण्याची जी पद्धती आहे तिच्यामध्ये याच तत्त्वाचा अवलंब केलेला आहे. सन्निपाताच्या चिकित्सेमध्ये हेंच तत्त्व स्वीकारिलें आहे. एक दोष वाढविण्याच्या प्रयत्नांत जें द्रव्य वापरलें जातें त्याचे गुणधर्म इतर दोन दोषांना कमी करण्यास साहाय्यभूत होतात आणि एक दोष कमी करण्याच्या प्रयत्नांत वापरल्या जाणार्‍या द्रव्यांचे गुणधर्म इतर दोन दोषांच्या वृद्धीस साहाय्यभूत होऊन स्त्यान दोषांना चलत्व आणतात.

ज्यावेळीं हे वृद्धिक्षयात्मक उपचार करता येणार नाहींत किंवा दोषांचा प्रकोप समप्रमाणांत असेल त्यावेळीं कफस्थानाच्या अनुक्रमानें दोषांचे शमन शोधन करावें. प्रथम कफ व आमाशय, नंतर पित्त व पच्यमानाशय व शेवटी वात आणि पक्वाशय यांचे शमन व शुद्धी होईल अशी चिकित्सा करावी. ज्वराच्या सामान्यसंप्राप्तींत पित्त हा दोष महत्त्वाचा असल्यानें ज्वरचिकित्सेच्या संदर्भात प्रथम पित्तावर उपचार करावेंत असें जरी सुश्रुतादि ग्रंथकारांनीं सांगितले असले तरी त्यांचे तें विधान सामान्यस्वरुपाचे समजावे. तुल्यप्रमाणानें प्रकुपित झालेल्या सन्निपाताच्या विशिष्ट अवस्थेंत कफस्थानानुपूर्वीनें चिकित्सा करणें हेंच श्रेयस्कर आहे. अग्निमांद्य, आमोत्पत्ति व स्त्रोतोरोध या ज्वरसंप्राप्तींवरील चिकित्सा आणि कफावरची चिकित्सा साधारणपणें एकाच स्वरुपाची असल्यानें संनिपातज्वरांत कफाच्या सामान्यचिकित्सेनें संप्राप्तिभंग होण्यास साहाय्य होतें. कफ हा स्थिर, गुरु, मंद, पिच्छील अशा गुणधर्मांचा असल्यानें त्याचे ठिकाणीं उपचारसहत्वहि असतें आणि म्हणून अधिक निर्भयपणें कफावरचे उपचार करता येतात. कारण उपचार करतांना क्वचित् चूक झाली तरी तिचे परिणाम फारसे घातक होत नाहींत. तीक्ष्ण स्वभावी चलगुणाच्या पित्त, वात दोषांच्या प्रकरणीं मात्र चिकित्सेंत झालेली चूक कफचिकित्सेइतकी बिनधोक ठरत नाहीं. या वस्तुस्थितीमुळेंहि सन्निपाताच्या चिकित्सेमध्यें कफस्थानुपूर्वीनें उपचारक्रम सांगितला असावा. तज्ज्ञ व अनुभवी वैद्य यांचे उपचारस्वातंत्र्य शेवटीं अबाधितच असते.

दिशा‍ऽनया शेषमपि स्वयमूहेत बुद्धिमान ।
न शास्त्रमात्रशरणो न चानालोचितागम: ॥२६३॥
अ. सं. सू. ७ पृ. ६१

केवळ सन्निपातज्वरापुरतेच नव्हे तर सर्वच रोगांत वा त्यांच्या प्रकारांत निदानचिकित्सेचे जे धोरण सांगितले असेल ते पाहून त्यावरुन तारतम्याने जाणत्यानें आपल्या व्यवहाराचे धोरण निश्चित करावें. आयुर्वेदीय ग्रंथकारानें आम्ही केवळ मार्गदर्शनपर तेवढेंच सांगतो अशा अर्थाची वचनें अनेक ठिकाणीं सांगितलीं आहेत.

कल्प

नागरमोथे, पित्तपापडा, धमासा, गुळवेल, कडू पडवळ, इंद्रयव, कुडा, कुटकी, निंब, चंदन, अनंतमूळ, पिंपळी, सुंठ, मिरें, हरितकी, आमलकी, द्राक्षा, त्रिवृत, रिंगणी, डोरली, देवदारु, पुष्करमूळ, कचोरा, पारिजातक, वत्सनाभ, केशर, कस्तुरी. त्रिभुवनकीर्ति, सूतशेखर, चतुर्भुज, वातविध्वंस, समीरपन्नग, चंद्रकला, महामृत्युंजय, महाज्वरांकुश, लक्ष्मीनारायण, संजीवनी, त्रैलोक्यचिंतामणि, पारिजातकगुटी, आरोग्यवर्धिनी, सुवर्णमालिनीवसंत, लक्ष्मीविलास द्राक्षादिचूर्ण, सुदर्शनचूर्ण. अमृतारिष्ट, द्राक्षारिष्ट, दशमूलारिष्ट, कुटजारिष्ट, कुमारीआसव, तिक्तपंचकक्वाथ, सारिवाद्यासव, उशीरासव.

अन्न

मंड, पेया, विलेपी, सिद्ध दूध, मांसरस, फलरस, षडंगोदक.

विहार

ज्वरे प्रमोहो भवति स्वल्पैरप्यवचेष्टितै: ।
निषष्णं भोजयेत्तस्मान्मूत्रोच्चारौ च कारयेत् ॥
सु. उ. ३९-१६३ पान ६८४

ज्वरामध्यें विशेष हालचाल करुं नये. शक्यतों शय्येवरच स्वस्थ पडून रहावें. मलमूत्रप्रवृत्तींसाठीहि शय्येवरच योग्य ती व्यवस्था करावी. ज्वरामध्यें हालचालीचे श्रम झाले असतां मोह, मूर्च्छा, भ्रम अशी लक्षणें उत्पन्न होतात. ज्वर वाढतो.

पथ्यापथ

सज्वरो ज्वरमुक्तश्च विदाहीनि गुरुणि च ।
असात्म्यान्यन्नपानानि विरुद्धानि च वर्जयेत् ॥
व्यवायमतिचेष्टाश्च स्नानमत्यशनानि च ।
तथा ज्वर: शमं याति प्रशान्तो जायते न च ॥
व्यायामं च व्यवायं च स्नानं चंक्रमणानि च ।
ज्वरमुक्तो न सेवेत यावन्न बलवान् भवेत् ॥
च. चि. ३-३३० ते ३३२ पान ९९२

ज्वर असतांना व ज्वर उतरल्यानंतरहि बळ प्राप्त होईपर्यंत पुढील गोष्ट, वर्ज्य मानाव्या. विदाही, गुरु, विरुद्ध, असात्म्य असें अन्नपान, मैथुन, व्यायाम श्रम, अत्यशन, स्नान, अनावश्यक हालचाली [चंक्रमण]

असंजातबलो यन्तु ज्वरमुक्तो निषेवते ।
वर्ज्यमेतन्नरस्तस्य पुनरावर्तते ज्वर: ॥
दुर्हृतेषु च दोषेषु यस्य वा विनिवर्तते ।
स्वल्पेनाप्यपचारेण तस्य व्यावर्तते पुन: ॥
चिरकालपरिक्लिष्टं दुर्बलं हीनतेजसम्
अचिरेणैव कालेन स हन्ति पुनरागत: ॥
च. चि. ३-३३३ ते ३३५ पान ९९७

ज्वर उतरल्यानंतर बल प्राप्त होण्यापूर्वीच जर अपथ्य म्हणून सांगितलेल्या वरील गोष्टी घडल्या तर ज्वर पुन: उलटतो. तसेंच दोषांचे पूर्ण शोधन झालें नसेल तर थोडयाशा उपचारानेंसुद्धां ते शेषदोष प्रकुपित होऊन ज्वर उत्पन्न करतात. ज्वराचा परिणाम म्हणून रोग्याचें शरीर स्वभावत:च निस्तेज, दुर्बल, क्लांत [शिणलेलें] असें झालेलें असतें त्यामुळें वरवर दिसावयास घडलेलें अपथ्य सौम्य स्वरुपाचें व अल्प स्वरुपाचें भासलें तरी त्यानें उत्पन्न होणारा दोषप्रकोप व्याधि दुर्बल शरीरांत पुन: उग्र स्वरुपाचा व्याधी उत्पन्न करुं शकतो व रोगाचे हें पुनरागमन घातक ठरतें.

निवृत्तेऽपि ज्वरे तस्माद्यथावस्थं यथाबलम् ।
यथाप्राणं हरेद्‍दोषं प्रयोगैर्वा शमं नयेत् ॥
मृदुभि: शोधनै: शुद्धिर्यापना बस्तयो हिता: ।
हिताश्च लघवो यूषा जाड्गलामिषजा रसा: ॥
अभ्यड्गोद्वर्तनस्नानधूपनान्यञ्जनानि च ।
हितानि पुनरावृत्ते ज्वरे तिक्तघृतानि च ।
गुर्वभिष्यन्द्यसात्म्यानां भोजनात् पुनरागते ॥
लड्वनोष्णोपचारदिक्रम: कार्यश्च पूर्ववत् ।
किराततिक्तकं तिक्ता मुस्तं पर्पटकोऽमृता ॥
घ्नन्ति पीतानि चाभ्यासात्पुनरावर्तकं ज्वरम् ।
च. चि. ३-३३९ ते ३४३ पान ९९३

यासाठीं ज्वरमुक्तीनंतरहि रोग्याचें बल ज्या क्रमानें वाढत जाईल त्या त्या अवस्थांना अनुरुप असें उपचार करावेत. रोग्याचे बल पाहून शोधन वा शमन यांचे प्रयोग करावेत. शोधन द्यावयाचें झालें तरी तें मृदु असेंच असावें. यापनबस्ति वापरावा. हितकर लघु असें यूष, जांगल मांसरस, अभ्यंग, उद्वर्तन, स्नान, धूपन, अंजन या गोष्टी कराव्या. इतकें करुनही क्वचित् ज्वर पुन: आल्यास तिक्तद्रव्यांनीं सिद्ध केलेली घृतें वापरावीत. गुरु, अभिष्यंदीं, असात्म्म अशा भोजनानें ज्वर उलटला असल्यास पुन: पूर्वीप्रमाणेंच लंघन, स्वेदन आदि क्रम काळजीपूर्वक उपयोजावा. काडेचिराईत, कुटकी, गुळवेल, नागरमोथे, पित्तपापडा हीं द्रव्यें उलटलेला ज्वर नाहींसा करण्यासाठीं विशेष उपयोगी पडतात. या द्रव्यांचा उपयोग बर्‍याच प्रमाणांत (दीर्घ काल) करावा.

N/A

References : N/A
Last Updated : July 24, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP