रसवहस्त्रोतस् - सिरागत वात
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
शरीरं मंदरुक् शोफं शुष्यति स्पंदते तथा ।
सुप्तास्तन्व्यो महत्यो वा सिरा वाते सिरा गते ।
च. चि. २८-३६
रसरक्त वाहिन्यावर वायूचा परिणाम होऊन शरीरामध्यें विविध प्रकारच्या मंद वेदना होणें निरनिराळ्या ठिकाणीं सिराच्यामध्यें स्पंद जाणवणे शरीर कृश होत जाणें, सिरा बारीक होणे, वा शिथील झाल्यामुळे आकारानें मोठया होणे अशी लक्षणे होतात. धमनीप्रतिचय आणि सिरागवात हे विकार अवयवदृष्टया एकाच ठिकाणीं घडतात. विकृतीच्या कारणामध्यें मात्र एकेठिकाणी कफ व दुसरीकडे वात असतो त्यामुळें स्थानाच्या एकरुपतेनें लक्षणें कांहीं वेळा एकसारखी असण्याची शक्यता असते. सिरांना आलेली घनतां व सिरांना आलेले शौथिल्य यांच्या परीक्षणानेंच अशा वेळी व्याधिविनिश्चय करावा. धमनीप्रतीच्या हा व्याधी शोधन साध्य असून सिरागत वात हा व्याधी शमन बृंहण साध्य आहे.
उपद्रव-मूर्च्छा, भ्रम, हृद्रोग, क्लम दौर्बल्य
दोन्ही विकार याप्य आहेत.
चिकित्सा
बृहद्वातचिंतामणी, हेमगर्भ, त्रैलोक्यचिंतामणी, अश्वगंधा, विदारी, लक्ष्मीविलास, द्राक्षासव.
आहार - लघु जांवनीय
विहार - विश्रांति
N/A
References : N/A
Last Updated : July 24, 2020
TOP