वक्ष्यते वाच्यमतिकार्श्येऽप्यत: परम् ॥१०॥
सेवा रुक्षान्नपानानां लड्घनं प्रमिताशनम् ।
क्रियातियोग: शोकश्च वेगनिद्राविनिग्रह: ॥११॥
रुक्षस्योद्वर्तनं स्नानस्याभ्यास: प्रकृतिर्जरा ।
विकारानुशय: क्रोध: कुर्वन्त्यतिवृशं नरम् ॥१२॥
व्यायाममतिसौहित्यं क्षुत्पिपासाऽऽमयौषधम् ।
कृशो न सहते तद्वदतिशीतोष्णमैथुनम् ॥१३॥
प्लीहा कास: क्षय: श्वासो गुल्मोऽर्शास्यदुराणि च ।
कृशं प्रायोऽभिधावन्ति रोगाश्च ग्रहणीगता: ॥१४॥
शुष्कविस्फगुदरग्रीवो धमनीजालसन्तत: ।
त्वगस्थिशेषोऽतिकृश: स्थूलपर्वा नरो मत: ॥१५॥
सटीक. च. सू. २१-१० ते १५
टीका - वाच्यम् अभिधेयं; किंवा वाच्यमति निन्दि-
तमवद्यमिति यावत् । प्रमितस्य स्तोकस्याशनं प्रमिताशनम्
क्रियातियोग: वमनाद्यतियोग: । प्रकृति: देहजनकं बीजम् ।
अनुशय: अनुबन्ध: । कृशस्य लक्षणं - शुष्केत्यादि ।
त्वगास्थिशेष इति `दृश्यत' इति शेष: । स्थूलपर्वा-
कृशानां बृंहणार्थं च लघु संतर्पणं च यत् ॥२०॥
च. सू. २१-२० पा० २४६
सतत रुक्ष गुणांनीं युक्त असें अन्नपान करणें, उपवास करणें, अगदीं मोजके अन्न खाणें, पंचकर्मादींचा अतियोग होणें, शोक होणें, वेग विधारण करणें, जागरण करणें रुक्ष शरीराच्या माणसानें उद्वर्तन. स्नान यांचा सातत्यानें अवलंब करणें, अनुवंशामध्येंअ कृशता असणें, म्हातारपण येणें, दीर्घकालीन व्याधी असणें, स्वभाव संतापी असणें, कुढा असणें, मत्सरी असणें या कारणांनीं मनुष्याला कृशता येते. (कृशता येणे हे मांस धातूच्या क्षयाचेच परिणामरुप लक्षण वा स्वरुप लक्षण आहे) वरील कारणानीं वायु प्रकुपित होतो आणि तो मेदाचेंच नव्हे तर मांसाचेंही उपशोषण करतो. आहाररस वायूनें व्याप्त झालेला असल्यानें त्या आहार-रसानें मांसमेदाचे पोषण व्हावें तसें होत नाहीं व त्याचा परिणाम म्हणून शरीराला कृशता येते. कृश माणसाला व्यायाम, फार जेवणें, तहान, भूक, वीर्यवान् औषधें, हवामानांतील शीतोष्णादींचे फेरफार मुळींच सोसत नाहीत. त्यांचे नितंब, पोट, मान हे अवयव अगदीं सुरकुतलेले असतात. सर्व शरीरभर सिरांचे जाळें उठून दिसतें. हाडें आणि कातडें तेवढें अवशिष्ट राहिलें आहे असें दिसतें. सांधे व पेरी मोठी जाड दिसतात. कृश मनुष्याला प्लीहावृद्धी, कास, क्षय, श्वास, गुल्म, अर्श, उदर हे व्याधी होण्याची शक्यता असते. ``सततं व्याधितावेतौ अतिस्थुल कृशौ नरौ (च. सू. २१-२६) अतिकृश माणसें (अतिस्थूलही) नेहमींच दुखणेकरी असतात. कोणत्या ना कोणत्या स्वरुपाची पीडा त्यांना सतत होत असते.
चिकित्सा
कृशानां तु लघुतर्पणं च देयं; तद्धि लाघवादग्नि-
वृद्धिकरं संतर्पणत्वाश्च पुष्टिकृत् । एतच्च द्वितयमप्य-
भीष्टतमत्वेनोक्तं; तेन, मेदस्विनो यल्लघु संतर्पणं
प्रशातिकाप्रियड्ग्वादि तच्च कर्तव्यं; तथा कृशस्यापि
नवान्नादि गुर्वपि संतर्पणं कर्तव्यं; परं लाघवं गौरव च
तत्र संस्कारादिना प्रतिकर्तव्यम् ॥२०॥
च. सू. २१/२ टीका. पा० २४६
स्वप्नो हर्ष: सुखा शय्या मनसो निर्वृति: शम: ।
चिन्ताव्यवायव्यामविराम: प्रियदर्शनम् ॥२९॥
च. सू. २१/२९
अचिन्तनाच्च कार्याणां ध्रुवं संतर्पणेन च ।
स्वप्नप्रसड्गाश्च नरो वराह इव पुष्यति ॥३४॥
च. सू. २१-३४ पा० २४७
लघु गुणांनी युक्त, संतर्पण करणारीं द्रव्यें बृंहणासाठीं द्यावीं, झोप, आनंद, सुखकारक शय्यासनें, मनाला चिंता नसणें, संयमी असणें, व्यायाम, मैथुन, काळजी, या गोष्टी नसणें, प्रिय व्यक्तींची संगती असणें यामुळें शरीराची पुष्टी होते. निष्काळजीपणा पुष्टिवर्धक आहार, आणि झोंप यांच्या सतताभ्यासामुळें मनुष्य उत्तम प्रकारे पुष्ट होतो.
कल्प
अश्वगंधा, शतावरी, भुई कोहोळा, वाराहिं कंद, मिश्री, बदाम, आक्रोंड, द्राक्षे, आम्र, दूध, तूप, मांस, अंडी. हेमगर्भ, सुवर्णमालिनिवसंत, मधुमालिनीवसंत, वसंतकुसुमाकर, च्यवनप्राश, द्राक्षासव, अश्वगंधारिष्ट.