अस्थिवहस्त्रोतस् - संधिगतवात
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
वातपूर्णद्रुतिस्पर्श: शोथ: सन्धिगतेऽनिले ।
प्रसारणाकुञ्चनयो: प्रवृत्तिश्च सवेदना ॥६७॥
च. चि. २८/३७ पा. १४४९.
हन्ति सन्धिगत: सन्धीन् शूलाटोपौ करोति च ॥२१॥
मा. नि. वातव्याधी १९८.
संधिगत वातामध्यें सांध्याच्या वर सूज येते. सांध्यांची हालचाल होत नाहीं, वेदना होतात आणि सुजलेंल्या सांध्यांचा स्पर्श वारा भरलेल्या पखालीसारखा वाटतो. सांध्याच्या हालचालीमध्यें आवाज उत्पन्न होतो (आटोप)
चिकित्सा
अस्थ्याश्रयाणां व्याधीनां पञ्चकर्माणि भेषजम् ।
बस्तय: क्षीर संपाषिं तिक्तकोपहितानि च ॥२७॥
चं. सू. २८/२७ पा. ३८०.
अस्थीच्या आश्रयानीं असलेल्या व्याधीमध्यें पंचकर्मोपचार करावे, बस्ती द्यावे तिक्तद्रव्यांनीं सिद्ध केलेलीं घृतें वापरावीं. (बस्तीसाठीं व प्राशनासाठीं). दूधही तिक्तरस सिद्ध वापरावे. गुडूची, आभाळगुग्गुळ, प्रवाळपंचामृत, अजास्थिभस्म, कुकुटांडत्वक्भस्म, अभ्रक, लोह, सुवर्ण, चंदनबलालाक्षदिलैत. विश्रांति, बलवर्धन पौष्टिक आहार.
N/A
References : N/A
Last Updated : August 07, 2020
TOP