मेदोवहस्त्रोतस - प्रमेह

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


व्याख्या

प्रकर्षेण मेहति इति प्रमेह: ।
च. नि. ४-३

वारंवार व पुष्कळ प्रमाणांत मूत्रप्रवृत्ति होते म्हणून या व्याधीस प्रमेह असें म्हणतात.

स्वभाव --

चिरकारी, याप्य.

मार्ग --

मध्यममार्ग

प्रकार--

(१) विंशतिरेव मेहा: । च. चि. ६-८
(२) त्रिदोषकोपनिमित्ता: विंशति: प्रमेहा: भवन्ति ।
त्रिदोषप्रकोपनिमित्ता इति सर्व मेहेष्वेव त्रिदोषा: कारणम् ,
अधिकत्वाच्च श्लैष्मिकादिव्यपदेश इति दर्शयति ।
सुश्रुतेऽप्युक्तं ``सर्व एव मेहा: सर्वदोषजा: '' इति -
च. नि. ४-३ टीका पान ४५०

कफज दहा, पित्तज सहा, वातज चार असें मिळून वीस प्रकारचें प्रमेह होतात. ह्या वीस प्रकारांचें प्राधान्य विचारांत घेऊन कफज, पित्तज, वातज असे तीन मुख्य गट बनत असले तरी सर्व प्रकारचे प्रमेह त्रिदोषज आहेत. त्यामुळें त्यांचे प्रकार तीन न म्हणतां वीस असें म्हटलें आहे.

निदान

आस्यासुखं स्वप्नसुखं दधीनि ।
गाम्यौदकानूपरसा: पयांसि ।
नवान्नपानं गुडवैकृतं च
प्रमेहहेतु: कफकृच्च सर्वम् ॥४॥
च. चि. ६-४ पान १०३६

नेहमीं सुखानें बसून रहाणें, फार झोंप घेणें, ग्राम्य, औदक व अनूप प्राण्यांचें मांस खाणें, दूध, दहीं यांचा उपयोग भरपूर प्रमाणांत करणें; नवीन धान्य व नवीन मद्य ह्यांचें सेवन करणें, गूळ, साखर ह्यापासून तयार केलेलीं गोड पक्वान्नें पुष्कळ प्रमाणांत खाणे, व्यायाम न करणें, असे कफ प्रकोप करणारे भाव प्रमेहाच्या उत्पत्तीस कारणीभूत होतात.

संप्राप्ति

कफ: सपित्त: पवनश्व दोषा
मेदोऽस्त्र शुक्राम्बुवसालसीका:
मज्जा रसौज:पिशितं च दुष्या:
प्रमेहिणां, विंशतिरेव मेहा: ॥८॥
कफ इत्यादिना सर्व मेहानां दोषदूष्यसंग्रहमाह ।
रसश्च ओजश्वेति रसौज:, ओजसोऽपि मधुमेहे दूष्यत्वात् ।
यद्यपि मेद: प्रभूतयो दूष्या इह उच्यन्ते तथाऽपि मेदो-
मांसशरीर क्लेदानामवश्यम्भावितया परिग्रहमज्जा
दयश्च सर्वमेहेनपुनरवश्यं दूष्यन्ते, स्तोकं वा दुष्टा
भवन्ति; किंवा सर्वमेहानामेव त्रिदोषत्वं तथा सकल
दूष्यत्वं च `कफ: सपित्त' इत्यादिना ग्रन्थेनोच्यते;
मेदोमांसादीनि त्वत्यर्थदूष्योपदर्शनार्थ पृथगुक्तानि;
यत: कियन्त: शिरसीये - सकल मेहवाचकं मधुमेहं
कथयता दोषत्रयप्रकोपोऽप्युक्त: । तथाहि - `समारुतस्य
पित्तस्य कफस्य च मुहुर्मुहु: ।
दर्शयत्याकृतिं गत्वा क्षयमाप्यायते पुन:'' (सू. अ. १७)
इत्युक्तं; तथा सुश्रुतोऽप्याह ``वातपित्तमेदोभिरन्वित: श्लेष्मा
मेहाञ्जनयति'' (सू. नि. अ. ६) इति ।
कफादीनां द्वत्युल्बणादिसंसर्गस्यानन्त्येनाधिक प्रमेह संख्या
प्रसक्ति निरामार्थमाह - विंशतिरेव मेहा इति ॥८॥
पान १०४०

मेदश्च मांस च शरीरजं च । क्लेदं कफो बस्तिगतं प्रदूष्य ।
करोति मेहान् समुदोर्णमुष्णेस्तोनव पित्तं परिदृष्य चापि ॥५॥
क्षीणेषु दोषेष्ववकृष्य बस्तो धातून प्रमेहाननिल: करोति ।
दोषो हि बस्तिं समुपेत्यं मूत्रं । संदूष्य मेहाञ्जनयेद्यथा स्वम् ॥६॥
च. चि. ६ ५/६ पान १०३९

प्रमेहाच्या संप्राप्तींत कफ, पित्त वात हे तीनही दोष मेद, रक्त, शुक्र, उदक, वसा, लसिका, मज्जा, रस, ओज आणि मांस ही दूष्ये विकृत होतात. यामध्यें कफ हा दोष, व मेद, मांस, क्लेद हीं दूष्यें प्रमेहास विशेषरीत्या कारणीभूत असून बाकीची सामान्य स्वरुपांत विकृत असतात. किंवा प्रकारभेदाने त्यांचे ठिकाणीं विशेष स्वरुपाची दुष्टी आढळते. प्रकुपित झालेलें दोष मेदादिदूष्यांना दुष्ट करुन मूत्रासह बस्तीमध्यें येऊन प्रमेह हा व्याधी उत्पन्न करतात.

पूर्वरुपें :-

त्रयस्तु खलु दोषा: प्रकुपिता: प्रमेहानभिनिर्वर्तयिष्यन्त
इमानि पूर्वरुपाणि दर्शयन्ति; तद्यथा जटिलीभावं केशेषु,
माधुर्यमास्यस्य, करपादयो: सुप्ततादाहौ, मुखतालुकण्ठ
शोषं, पिपासाम्, आलस्यं मलं काये, कायच्छिद्रेषूपदेहं,
परिदाहं सुप्ततां चाड्गेषु, पट्‍पदपिपीलिकाभिश्च शरीर
मूत्राभिसरणं, मूत्रे च मूत्रदोषान्; विस्त्रं शरीरगंधनिद्रा
तन्द्रां च सर्व कालमिति ।
च. नि. ४-४६ पान ४५७-५८

यथर्थु खलु सर्व कालमिति ।
च. नि. ४-४६ पान ४५७-५८

स्निग्ध, पिच्छिल, गुरुता, गात्राणां साद:, श्वास:,
तालुगलजिल्हादंतेषु मल्लोप्तत्ति: वृद्धिश्च नखानां ।
सु. नि. ६-५

हृन्नेत्रश्रवणोपदेह, शीतप्रियत्वं, केष्यवृद्धि: शिथिल-
त्वमंगे स्वेद: शय्यासनस्वप्नासुख तर्भषंग:
वा. नि. १०-३८

प्रमेहाचीं पूर्वरुपें म्हणून पुढील लक्षणें होतात. केसांच्या जटा बनतात, तोंड गोड होतें, हात व पाय यांना बधिरता येते, आग होते, मुख, तालु, कंठ यांना कोरड पडते, तहान लागते, आळस येतो, शरीर मळकत होतें. शरीरामध्यें सर्व ठिकाणीं चिकटपणा वाढतो. आग झाल्यासारखी वाटते. अंग बधिर होतें, मुंग्या येतात (झिणझिण्या येतात), मूत्राला मुंग्या लागतात, मूत्रामध्यें निरनिराळ्या स्वरुपाचें दोष दिसतात. शरीरास दुर्गंध येतो. शरीर जड व स्निग्ध वाटतें. अंग गळून जातें. दम लागतो, ताल, गल, जिव्हा, दंत या ठिकाणीं मलसंचय होतो. नखांची वाढ अधिक प्रमाणांत होते. केंसही अधिक वाढतात. घाम पुष्कळ येतो. अंग शिथील होतें. पडून रहावेंसें वाटतें. डोळे व कान यांतील मळ वाढतो उरामध्यें भरल्यासारखें, चिकट वाटतें, गार पदार्थ आवडतात.

रुपें

प्रमेहपूर्वरुपाणामाकृतिर्यत्र दृश्यते ॥
किंचिच्चाप्याधिकं मूत्रं ते प्रमेहिणामादिशेत् ॥२२॥
सु. नि. ६-२२ पान २९३

प्रमेहामध्यें वरचेवर अधिक प्रमाणांत मूत्रप्रवृत्ती होणें आणि मूत्राचा वर्ण आविल, गढूळ असणें, असें सामान्य लक्षण असतें. चरकाच्या मताप्रमाणें चार ओंजळी [म्हणजे १ प्रस्थ-६४ तो.] इतकें मूत्राचें प्राकृत प्रमाण सांगितलें आहे. भारतीय ऋतुमानाचा विचार करतां तें योग्य आहे. आपल्याकडे घाम येण्याची प्रवृत्ती अधिक असल्यामुळें मूत्राचें प्रमाण उणावणें स्वाभाविक आहे. पाणी पिणें नैसर्गिक आवश्यकतेनुसार होत असल्यास मूत्राचें प्रमाण ६४ तोळ्याचें आसपासच रहातें. मूत्राचा प्रकृत वर्ण किंचित् पीत असून तें स्वच्छ दिसतें. प्रमेहाच्या रुग्णाला बहुधा रात्रींतून एक वेळापेक्षा अधिक वेळा मूत्रोत्सर्गासाठीं जावें लागतें. या मूत्राशीं संबद्ध असलेल्या लक्षणाव्यतिरिक्त शरीराला चिकटपणा वाटणें, तहान लागणें, हातापायांची जळजळ होणें, अंग जड वाटणें, आळस येणें, अशीं रुपामध्यें सांगितलेलीं लक्षणेंही असतात. सुश्रुतानें मधुरसूत्रता हें लक्षण प्रमेहाच्या पूर्व रुपामध्येंही सांगितलेलें आहे ते अर्थातच रुपामध्येहि व्यक्त होतें. ही मधुरता कित्येक वेळां अत्यंत अल्प असते आणि क्षारधर्मी मूत्रामध्यें ती झांकलीही जाते.

``दोषदूष्या विशेषेऽपि तत्संयोगविशेषत: ॥
मुत्रवर्णादिभेदेन भेदो मेहेषु कल्प्यते ॥

सामान्यलक्षणमाह - सामान्यमित्यादि । प्रभूतेत्यादि
प्रभूतमूत्रत्वं दूष्यद्रवधातुसंबन्धात्, आविलत्वं दोष-
दूष्यसंसर्गात् । ननु कथं कफेन दश, पित्तेन षडित्यादि
व्यवस्था ? यत: कारणभेदात् कार्यभेद इत्याशड्कयाह
दोषदूष्याविशेषेऽपि तत्संयोगविशेषत: इति । तेषां
दोषदूष्याणामुत्कर्षाकषेकृतात् संयोगभेदाद्‍भेदो मेहेषु
भवन्ति । यथा पञ्चानां वर्णानां श्वेत कृष्ण पीत लोहित-
श्यावानां संयोगभेदादनेकपिड्गुलपाटलादिभेदा: । सुश्रुतेऽ
प्युक्तं - ``यथां पञ्चानां वर्णानामुत्कर्षापकर्षकृतेन
संयोगविशेषेण कपिलादिनानावर्णोप्तत्तिरेवं दोषादि
संसर्गान्मेहानां नानात्वम्'' इति । संयोगभेदप्रतीति:
कुत इत्यत आह मुत्रेत्यादि । मूत्रवर्णादिभेदं दृष्ट्‍वा
कारणानां समानानां भेद: कल्पनीय:, यथा - मृदादि-
कारणकलापस्याभेदेऽपि कुम्भकारादिसंयोगभेदादुद:च-
नादि प्रपञ्चभेद: । ननु: उदञ्चनादौ कुम्भकारादिप्रयत्न
भेदात् संयोग भेद:, अत्र तु क: संयोगभेदहेतु: ? उच्यते,
तत्तदाहारादिकमदृष्टं च भवतीत्यदोष: ॥६॥
मा. नि. प्रमेह ६ म. टीकेंसह पान २५६

यथा हि वर्णानां पञ्चानामुत्कर्षापकर्षकृतेन संयोगविशेषेण
शबलबभ्रुकपिलकपोतमेचकादीनां वर्णानामनेकेषामुत्प-
त्तिर्भवति; एकमेव दोषधातुमलाहारविशेषेणोत्कर्षापकर्ष-
कृतेन संयोगविशेषेण प्रमेहाणां नानाकरणं भवति ॥
सु. नि. ६-२६

प्रमेहाचीं सामान्य दोषदूष्यें सारखींच असलीं तरी त्यांच्या संयोगाच्या व विकृतीच्या तरमतेनुसार मेहामध्यें प्रकार-पडतात आणि याच कारणांनीं मूत्राचें स्वरुप व वर्ण विविधप्रकारचेम होतात. प्रमेहांतील मूत्राच्या स्वरुपांतील भेदावरुनच प्रमहांचे वीस प्रकार पाडलेले आहेत. सुश्रुतानेंही या संबधीं स्पष्ट शब्दांत पुढील प्रमाणें उल्लेख केला आहे.

इदानीं दोषाणां त्रयाणामपि यथा विंशति प्रमेह संभबस्त-
थोपमानेवाह - यथेत्यादि । पञ्चानां सितहरितकृष्णपीतरक्तानाम् ।
उत्कर्षापकर्षकृतेन वृद्धिह्यास कृतेन । बभ्रु: कपिल पिड्गु: कपोत:
कपोताभ: मेचक: श्यामल: । मलग्रहणमुपधातुभूतवसालसीकयोरु-
दकस्य चोपलक्षणम् ॥२६॥
नि. सं. टीकेसह -- पान २९४

प्रकार

तत्रेमे त्रयो निदानादि विशेषा: श्लेष्मनिमित्तानां प्रमेहाणा-
माश्वभिनिर्वृत्तिकरा भवन्ति; तद्यथा - हायनकयव-
कचीनकोद्दालक नैषधोत्कट मुकुन्द सहाव्रीहि प्रमोदक
सुगन्धकानां नवानामतिवेलमतिप्रमाणेन चोपयोग;
तथा सर्पिष्मतां नवहरेणुमाषसूप्यानां, ग्राम्यानूपौदकानां
च मांसानां, शकातिलपललपिष्टान्नपायासकृशराविले -
पीक्षु विकाराणि, क्षीरनवमद्यमन्दकदधिद्रवमधुरतरुण-
प्रायाणांचोपयोग: मृजाव्यायामवर्जनं, स्वप्नशयनासन
प्रसड्ग: यश्च काश्चिद्विघिरन्योऽपि श्लेष्ममेदोमूत्रसंजनन:,
स सर्वो निदानविशेष: ॥५॥
च. नि. ४-६ पान ५५१

हायनकापासून सुगंधकापर्यंत सांगितलेले दहा प्रकारचें तांदूळ नवीन असतांना अधिक प्रमाणांत व बरेच दिवस खाणें, भरपूर तुपाची फोडणी दिलेली नवीन वाटाणा, नवीन उडीद, यांचीं वरणें खाणें, मेंढीसारखे ग्राम्य, डुकरासारखेच आनूप आणि माशासारखे औदक प्राण्याचें मांस पुष्कळ प्रमाणांत खाणें, (चमचमीत) पालेभाज्या, तिळाचें पदार्थ, वाळलेले मांस, रवा, मैद्यापासून केलेले पदार्थ निरनिराळ्या खिरी, खिचडी, आटवल, ऊसाच्या रसांपासून तयार झालेले पदार्थ, दूध (म्हशीचें), नवीन मद्य, आदमुरे दही, असे पातळ; गोड, पूर्णपणें परिणत न झालेंले (आमावस्थेंत असलेले) पदार्थ भरपूर प्रमाणांत खाणें, शरीराला शिकेकाई' कचोरा, वगैरे द्रव्यांचीं उटणीं वापरुन स्वच्छता न राखणें, व्यायाम न करणें, नेहमी पडून राहण्यांत वा बसून राहण्यांत सुख मानणें, या कारणानें वा, यासारख्याच कफमेदसूत्र यांची वृद्धि करणार्‍या इतर आहारविहारानें कफ प्रकुपित होतो.

बह्यबद्धं मेदो मांसं शरीरजक्लेद: शुक्रं शोणिते वसा
मज्जा लसीका रसश्चौज: संख्यात इति दूष्यविशेषा: ॥७॥
च. नि. ४-७-८ पान ४५२

त्रयाणामेषां निदानादिविशेषाणां सन्निपाते क्षिप्रं श्लेष्मा
प्रकोपमापद्यते, प्रागतिभूयस्त्वात्; स प्रकुपित: क्षिप्रमेव
शरीरे विसृप्ति लभते; शरीरशैथिल्यात् स विसर्पञ्‍
शरीरे त्रेदसैवादितो मिश्रीभावं गच्छति मेदसश्चैव
बह्वबद्धत्वान्मेदश्च गुणै: समानगुणभूयिष्ठवात्; स
मेदसा मिश्रीभवन् दूषयत्येनत् विकृतत्वात्; स विकृतो
दुष्टेन मेदसोपहित: शरीरक्लेदमांसाभ्यां संसर्ग गच्छति'
क्लेदमांसयोरतिप्रमाणाभिवृद्धत्वात् । स मांसे मांसप्र-
दोषात् पूतिमांसपिडिका; शराविकाकच्छपिकाद्या: संजन-
यति, अप्रकृतिभूतत्वात्, शरीरक्लेदं पुनर्दूषयन् मूत्रत्वेन
परिणमयति, मूत्रवहानां च स्त्रोतसां वंक्षण बस्ति
प्रभवाणां मेद: क्लेदोपहितानि गुरुणि मुखान्यासाद्य
प्रतिरुध्यते; तत: प्रमेहांस्तेषां स्थैर्यमसाध्यतां वा
जनयति; प्रकृतिविकृतिभूतत्वात् सन्निपाते मेलके ।
प्रकोपमापद्यत अति प्रमेहकरणायोद्यतो भवति ।
कुत: प्रमेहकरणायोद्यतो भवतीत्याह - प्रागतिभूयस्त्वात् ।
प्रागिति उत्पादकाल एव । यस्मात् प्रमेह - करणं
प्रत्यभिमुखो भूयांश्च कफो भूतस्तत इत्यर्थ: । प्रमेह
निदानेन हि कफोऽयं प्रमेहकरणशक्तियोगाच्च तथा
प्रकुप्यतीति युक्तम् । विसृप्तिं विसरणम् । मेदसश्च
गुणानां गुणै: समानगुणभूयिष्ठत्वादित्यादि मेदसो गुणानां
मधुरस्नेहगौरवादीनां श्लेष्मणां गुणैर्गुरुशीतादिभिर्भूरि-
सामान्यादित्यर्थ:, समानं हि समानेन मिलतीति भाव: ।
विकृतत्वादितिवचनेन प्रकृतेन श्लेष्मणा संबन्धो मेदो-
दूषको न भवति, किन्तर्हि विकृतेनैवेति दर्शयति । अति-
प्रमाणवृद्धत्वादिति अतिशयित प्रमाणयोगेन वृद्धत्वात्; न
गुणातियोगमात्रेण वृद्धत्वमिह, किन्तर्ह्यवयोपचयेनेत्यर्थ: ।
पूतिमांसवत्य: पिडका: पूतिमांसपिडका: ।
अप्रकृतिभूतत्वादिति मांसप्रदोषेण नानाविधशराविकादि-
जनकत्वशक्तित्वादितीह बोद्धव्यम् । तेन, अप्रकृतभूतत्वा-
दिति वचनं हि विशेषार्थत्वान्न पुनरुक्त्म् । आसाद्य
प्रतिरुध्यत इति गत्वाऽवतिष्ठते । प्रकृतिविकृतिभूतत्वादिति
प्रकृतिभूतैर्गुणै: सर्वैरेव विकृतास्तस्मात् प्रकोपप्रकर्षात्
स्थिरो भवति, अतिप्रकषोत्वसाध्य इत्यर्थ: । किंवा
प्रकृतिभूत: श्लेष्मा समाने दूष्ये मेदोवसादौ विकृतिभूत-
श्चासमाने शोणितादौ; तेन समानासमानत्वादित्यर्थ: ।
तथा च समान्दूष्यप्राप्त्याबलित्वम् असमानदूष्यप्राप्त्या च
विरुद्धोपक्रमत्वं कफस्य भवति; ततश्च स्थैर्यमसाध्यता
वा युक्तेति मन्तव्यम् ॥८॥
च. नि. ४/८ टीकेसह

तत्र वातपित्तमेदोभिरन्वित: श्लेष्मा श्लेष्मप्रमेहान्
जनयति ॥
सू.नि. ६-/९

प्रमेह उत्पन्न करनारा कफ द्रव गुणांनीं वाढलेला असतो. मेद क्लेद, मांसादि दूष्ये हीं वृद्ध झालेलीं असून त्यांना - शिथिलता आलेंली असते. रस, रक्त, वसा, मज्जा, शुक्र, ओज, यांच्यामध्येंही उण्याअधिक प्रमाणांत विकृती उत्पन्न होतें जीं दूष्यें स्वभावात: द्रवस्वरुपांत असतात, त्यांच्यामधील विकृती केवळ, प्रमाणाधिक्यानें होते. मेद-मांसासारख्या ज्या - दूष्याच्यामध्यें घनत्व असतें त्यांच्यामध्यें प्रमाणाधिक्याच्या जोडीनें अवद्धत्य - असंहतत्व - शिथिल्यही उत्पन्न होतें. धातूंची वृद्धी (उपचय नव्हे) अग्निमांद्यानें होते हें स्पष्ट आहे. आहाररसाचें धातूंत, धातूंचेंझ इतर धातूंत वा धातूग्नींच्या द्वारा परिणमन होत असतांना-सारकिट्टविभजनाच्या प्रत्येक पाणमन क्रियेंत अस्तित्वांत असणार्‍या सामान्य नियमाप्रमाणें सारभूत धातू व उधातू निर्माण होत असतांना त्यावेळीं एक प्रकारचा किट्ट भागही वेगळा होत असतो. ह्यासच क्लेद अशी संज्ञा आहे. हा क्लेद प्रकृतस्थितींत स्वेदाच्या आश्रयानें राहून त्वचा स्निग्ध ठेवण्यास साहाय्यभूत होतो व मूत्रासवें मलरुपानें प्रतिदिनीं शरिरांतून बाहेर पडतो. प्रमेह-व्याधींतील जठराग्निमांद्य, कफ प्रकोप, या कारणांनीं इतर धातूपधातूंप्रमाणें या क्लेदाचीहि विकृती होते. प्रमेहांत असणार्‍या प्रभूताविल मूत्रतेसही कफदुष्टी व क्लेददुष्टीच विशेषत: कारणीभूत आहे.

प्रमेहव्याधीच्या विशिष्ट स्वभावामुळें कफप्रकोप होऊन मेदमांसादींच्या असहततेमुळें शिथिल झालेल्या शरीरामध्यें या प्रकुपित कफाचा संचार होतो. मेदाचे व कफाचे गुण जवळ जवळ सारखेच असल्यामुळें प्रकुपित झालेला कफ वृद्ध शिथील झालेल्या मेदाशी मिसळून त्यास विकृत करतो, दुष्ट झालेले हे कफभेद क्लेद मांस यांच्याशीं संसर्ग पावतात आणि क्लेद मांसानाही दुष्ट करतात. कफामुळें दुष्ट झालेल्या क्लेदाचें मूत्रामध्यें रुपान्तर होतें. क्लेद, रस, मेद, मांस यांच्या दुष्टीमुळें वृक्कापासून बस्तीपर्यंतच्या, वा त्यापूर्वीच्याही मूत्रनिर्मितीस कारण असणार्‍या, मुत्रवहस्त्रोतसांत विकृती उत्पन्न होऊन, मूत्राच्या प्रकृत स्वरुपामध्यें निरनिराळे विकार उत्पन्न होतात व प्रमेह हा व्याधी उत्पन्न होतो. प्रमेहव्याधीच्या सामान्यंप्राप्तींत कफदोषाला महत्व असल्यानें चरकानें कफजमेहाची म्हणून जी संप्राप्ति सांगितली आहे तीच, त्याच क्रमानें इतरही प्रकारांत घडते. आरंभक दोष तेवढे प्राधान्यानें निरनिराळे असतात. आयुर्वेदीय कल्पनेप्रमाणें मूत्राचें प्रथम उत्पत्तीस्थान पक्वाशयामध्यें आहे. त्याठिकाणीं वायूच्या प्रेरणेंनें पुरिषापासून मूत्र पृथक् होऊन शोषलें जातें. हें शोषित मूत्र प्रारंभीं अच्छ जलाच्या स्वरुपांत असतें. आहारातील जलांशच याठिकाणीं प्रामुख्यानें वेगळा होतो. हा जलांश सर्व शरीरामध्यें क्लेद संग्रहाचें कार्य करीत वृक्कामध्यें येतो. यासाठीं वृक्काला आहारजलवाही सिरामुले' असें सार्थ विशेषण शारंगधराच्या टीकाकारानें दिलें आहे. (शा. प्र. ५-४४ गु. टीका पान ५८) आहारजलवाहिंनी सिरांच्या मुळांशी संबद्ध असलेले, दोन अवयव, एक, क्लोम किंवा तिळ व दुसरा वृक्क, त्यांत तिळाकडे आहारजलांतील सारभागाचें नियंत्रण असून, किट्टभागाचें नियंत्रण व्नक्ल हे अवयव करतात. या वृक्कांतून किट्टवहनाचें कार्य करणारे मूत्र गविनीद्वारा बस्तिमध्यें येते व तेथून तें मूत्रमार्गाने शरीराबाहेर पडतें. प्रमेहामध्यें मेदाची दुष्टी असल्यामुळें त्यांच्या स्त्रोतसाच्या मूळस्थानी असलेलें वृक्क दुष्ट होणें स्वाभाविक होतें. सर्व आप धातूच प्रमेहामध्यें दुष्ट होतो असें ही त्याच्या दूष्याच्या वर्णनावरुन दिसतें. वृक्क हें या उदकवहस्त्रोतसाशीं संबद्ध आहें हें आपण पाहिलेंच. प्रमेहांतील अवयवविकृतीचा विचार करतां तृषा उत्पन्न करणारे क्लोम, मेदावर नियंत्रण असलेले वपावहन व वृक्क, मूत्राचें आधार असलेला बस्ती या सर्व अवयवामध्यें कफामुळें अग्निमांद्यामुळें दुष्टी उत्पन्न झालेली असते. या सर्व संप्राप्तीचा संकलित परिणाम प्रमेह, त्याचे प्रकार वा प्रमेहामध्यें उत्पन्न होणारें उपद्रव यांच्यामध्यें होतो. ज्यावेळीं कफाचे सर्वच्या सर्व गुण विकृत होऊन, सर्व मूत्रवह स्त्रोतस् दुष्ट झालेल्या क्लेद मेदाने व्यान होतें. त्यावेळीं साध्य असलेला हा कफज मेदही स्थिर (चिरकारी) वा असाध्य होतो. संप्रातींतील कफानें होणार्‍या मांसदुष्टीचें प्रमाण अधिक झाल्यास प्रमेहपिडका नांवाचा उपद्रव उत्पन्न होतो.

शरीरक्लंदस्तु श्लेष्ममेदोमिश्र: प्रविशन् मूत्राशयं
मूत्रत्वमापद्यमान: श्लैष्मिकैरेग्रिर्दशाग्रिर्गुणैरुपसृज्यते
वैषम्य युक्तै:; तद्यथा - श्वेतशीतमूर्तपिच्छिलाच्छस्निग्ध
गुरुमधुरसान्द्रप्रसादमन्दै:, तत्र येन गुणेनैकेनानेकेन
वा भूपस्तरमुपसृज्यते तत्समाख्यं गौणं नामविशेषं
प्राप्नोति ॥९॥
ते तु खल्विमे दश प्रमेहा नामविशेषण भवन्ति; तद्यथा-
उदकमेहश्च, सिकितामेहश्च, शनैर्मेहश्च । आलालमेहश्चेति ॥१०॥
संप्रति यथा कफमेहा: कफगुणयोगाद्दश भवन्ति तथा प्राह
-- शरीरेत्यादि । वैषम्यमिह वृद्धिकृतमेव बोद्धव्यं,
क्षयरुप वैषम्यस्यैवरुपव्या व्यजनकत्वात् । वैषम्य एव
वृद्धवृद्धतरत्वादिना हानिवृद्धि बोद्धव्ये; तेन श्वेतादि गुण-
वृध्द्या ये शुक्रमेहादय उक्ता: तेष्वपीतरे श्लेष्मगुणा
हानिवृद्धिरुप वैषम्ययुक्ता: सन्तोत्यर्थ: ।
किंवा वैषम्य सति क्वचिच्चतुर्णा गुणानां वृद्धिर्भवतीति
दर्शयति ।
तेन गुणसंख्योत्कर्षापकर्षाद्‍हानिवृद्धी ज्ञेये नचेह श्वेतादिदशगुण
योगाद्यथासंख्य दश प्रमेहा: किंतु व्यस्तसमस्त गुणयोगाच्च;
अत एवाह - येन गुणेनेकैनानेकेन वेत्यादि - सान्द्र प्रसादगुणैकदे
शेनोभ्दूतेन ज्ञेय: ।
तत्समाख्यं नाम, यथा - शीतमेह - शुक्लमेह - सान्द्रमेहेषु अत्र हि
शीतादि गुणाख्ययै व मेहा व्यपदिश्यन्ते; इतरेषु तूदकमेहादिषु
न श्वेतादि गुणसंज्ञातुल्यं नाम, किंतर्हि श्लेष्मणो नैक गुण
युक्तोदकादितुल्यत्वेन गुणयोग प्रकृतत्वादौण मदकमेह इति;
अच्छ सितशीतादि कफगुणयोगाद्‍ गौणमुदकमेह इति नाम
भवति ।
एवमन्यत्राप्यनुसरणीयम् उदकादयस्त्विह कफगुण
मेलकलक्षणार्थास्तत्तत्कफगुण युक्ता उपात्ता: संज्ञाकरणार्थम् ॥९-११॥
च. नि. ४-१०-११ सटीक पान ४५३, ५४.

शरीरांतील क्लेद, कफमेदाशी मिश्रित होऊन, मूत्रवह स्त्रोतसामध्यें येऊन मूत्ररुपानें शरीरांतून बाहेर पडत असतांना कफाच्या दहा गुणांच्या साहचर्यानें मूत्राच्या स्वरुपामध्यें विषमता उत्पन्न होते. कफविकृती असली तरी कफाचे सर्वच्या सर्व गुण सारख्याच प्रमाणानें विकृत होऊन कफाचें प्रकृत स्वरुप प्रमाणानें वृद्धी होऊनही जसेंच्या तसेंच रहातें असें सहसा होत नाहीं. श्वेत, शीत, मूर्त, पिच्छील, अच्छ, स्निग्ध, गुरु, प्रसाद, मधुर, सांद्र, मंद अशा दहा गुणांनीं कफ युक्त आहे. यामधील, जो, जो, एक वा अधिक गुण विकृती पावेल त्याच्या त्याच्या परिणामानें प्रमेहांतील मूत्राचे स्वरुप भिन्न भिन्न होईल. त्या स्वरुपभिन्नतेला अनुलक्षून कफामुळें उत्पन्न होणार्‍या प्रमेहाचे दहा प्रकार मानलेले आहेत. ते असें -
(१)  उदकमेह
(२)  इक्षुवालिकासमेह
(३)  सांद्रमेह
(४)  सांद्रप्रसादमेह
(५)  शुक्लमेह
(६)  शुक्रमेह
(७)  शीतमेह
(८)  सिकतामेह
(९)  शनैर्मेह
(१०) आलालमेह.

वर उल्लेखलेले १० गुण व कफजमेहाचें १० प्रकार यांची एकामुळें एक अशी जोडी लागत नसून गुणांच्या एक वा अधिक स्वरुपाच्या व भिन्न भिन्न प्रमाणांतील संयोगानें वरील मेहप्रकार उत्पन्न होतात. मेहाची नांवेंही कांहीं ठिकाणी विकृत गुणांचीं बोधक आहेत तर कांहीं ठिकाणीं मूत्राच्या स्वरुपाचीं द्योतक आहेत. या दहा प्रकारच्या मेहांची लक्षणे पुढील प्रमाणें असतात.

तत्र श्लोका: श्लेष्मप्रमेह विशेषविज्ञानार्था भवन्ति ॥१२॥
अच्छं बहु सितं शीतं निर्गन्धमुदकोपमम् ।
श्लेष्मकोपान्नरो मूत्रमुदमेही प्रमेहति ॥१३॥
अत्यर्थमधुरं शीतमीषत्पिच्छिलमाविलम् ।
काण्डेक्षुरससड्काशं श्लेष्मकोपात् प्रमेहति ॥१४॥
यस्य पर्युषितं मूत्रं सान्द्रीभवति भाजने ।
पुरुषं कफकोपेन तमाहु: सान्द्र मेहिनम् ॥१५॥
यस्य संहन्यते मूत्रं किंचित् किंचित् प्रसीदति ।
सान्द्रप्रसादमेहीति तमाहु: श्लेष्मकोपत: ॥१६॥
शुक्लं पिष्टनिभं मूत्रमभीक्ष्णं य: प्रमेहति ।
पुरुषं कफकोपेन तमाहु: शुक्लमेहिनम् ॥१७॥
शुक्राभं शुक्रमिश्रं वा मुहुर्मेहति यो नर: ।
शुक्रमेहिनमाहुस्तं पुरुषं श्लेष्मकांपत: ॥१८॥
अत्यर्थ मधुरं शीतं मूत्रं मेहति यो भृशम् ।
शीतमेहिनमाहुस्तं पुरुषं श्लेष्मकोपत: ॥१८॥
अत्यर्थ मधुरं शीतं मूत्रं मेहति यो भृशम् ।
शीतमेहिनमाहुस्तं पुरुषं श्लेष्मकोपत: ॥१९॥
मूर्तान्मूत्रगतान् दोषानणून्मेहति यो नर: ।
सिकतामेहिनं विद्यात्तं नरं श्लेष्मकोपत: ॥२०॥
मन्दं मन्दमवेगं तु कृच्छ्रं यो मूत्रयेच्छनै: ।
शनैर्मेहिनमाहुस्तं पुरुषं श्लेष्मकोपत: ॥२१॥
तन्तुबद्धमिवालालं पिच्छिलं य: प्रमेहति ।
आलालमेहिनं विद्यात्तं नरं श्लेष्मकोपत: ॥२२॥
इत्येते दश प्रमेहा: श्लेष्म प्रकोपनिमित्ता व्याख्याता -
भवन्ति ॥२३॥

टीका

विशेषविज्ञानार्था भवन्तीति परस्परभिन्नलक्षण प्रति-
पादकाइत्यर्थ: ।
उदकोपममिति उदकवर्णादि तुल्यम् ।
ननु, इक्षुवालिकामेहे काण्डेक्षुरससड्काशमिति किमि
त्युच्यते, इक्षुवालिकाकाण्डेक्ष्वोरर्थान्तरत्वात् ।
नैवम्,इक्षुवालिकारसस्य तथा काण्डेक्षुरसस्य चैकरुपताप्रति-
पादनार्थ मुभयोरुपादानं, किंवा, काण्डेक्षुरसतुल्योऽपि तथा
इक्षुवालिकामेहो भवतीत्युभयोपादाना दर्शयति । क्षुवालिकार
सतुल्यश्चे संहन्यते स्त्यानीभवति । मूर्तानिति कठिनान् ।
दोषानिति जातौ बहुवचनं, येन दोषोऽत्रैक एव प्रभूत: कफ: ।
तन्तुबद्धं तन्तुवद्दीर्घमित्यर्थ: । लालामिवालालं, समन्ता-
ल्लालारुपमित्यर्थ: । प्रतिप्रतिमेहं च श्लेष्मकोपत इत्यादि
वचनं सुखग्रहणार्थम् । नचेह वाच्यम् - यद्‍ - यथा
श्लेष्मगुना दश प्रमेहाञ्जनयन्ति, तथा किमित्यपरानपि
गुणसंसर्गवि कल्पान्तरेण न कुवन्तीति; यतो भाव-
स्वभावोऽयं - यथा दृष्ट एव परं कल्प्यते नादृष्ट:, नहि
सत्यपि भूतसंसर्गभूयस्त्वे रसभूयस्त्वं भवतीति
व्यवस्थितमेव ॥
च. नि. ४/१३ ते २३ सटीक. पान ४५४

नच यथा दशभिर्गुणैर्दश मेहान् करोति तथा संसर्ग-
विकल्पान्तरेणापरानपि कुतो न करोतीत्याशड्कनीयं,
भावस्वभावस्यार्पयनुयोज्यत्वात्, अदृष्टकल्पनायाश्चान-
र्हत्वात् । तत्र श्वेताच्छशीतैर्गुणैरुदकमेह:; मधुरशीता
भ्यामिक्षमेह:;सान्द्रपिच्छिलाभ्यां सान्द्रमेह:, अच्छेन
पित्तानुरागिणा सुरामेह:; शुक्लेन पिष्टमेह:,
अन्न पिष्टवदित्यालेपनपिष्टवत्; श्वेतस्निग्धाभ्यां
शुक्रमेह:, अत्र शुक्राभमिति सर्वमेव मूत्रं शुत्रतुल्यं,
शुक्रमिश्रं वेति शुक्राभं शुक्रमिश्रं, वास्तवशुक्रमिश्रत्वे
तु कफजस्याप्यसाध्यत्वं स्यादिति, वाप्य चन्द्रस्तु
शुक्रस्य मूत्रेण गुणकृतं सादृश्यं, शुकमिश्रं वेति च
शक्रगुणानां संयुक्तसमवायान्मूत्रे दर्शनमित्याह; सान्द्र
मूर्ताभ्यां सिकतामेह:, अत्र मूर्ताणूनिति मूर्तात् कठिणान्,
अणून् अल्पान्, मलानिति बहुवचनं दोषानामवयवबहुत्वात्,
जात्याख्यायामेकस्मिन् बहुवचनमिति वाप्यचन्द्र:;
मलोऽत्र प्रकरणात् कफ:; गुरुमधुरशीतै: शीतमेह:; मन्द-
मूर्ताभ्यां शनैर्मेह:; पिच्छिलेन लालामेह: ।
चरके सुरामेहस्थानेसान्द्रप्रसादमेह: पठित:, तथा पिष्टमेह:
शुक्लमेहशब्देन, तेनैव शीतमेहलालामेहौ पठितौ,
पित्तजश्च कालमेह:; सुश्रुतस्तु चरकोक्त शीतमेह
लालामेहयो: स्थानं फेनमेहलवणमेहौ, कालमेहस्थाने
चाम्लमेहं पठितवान् । सामञ्जस्यं चात्र नास्त्येव
परस्परलक्षणसंवादाग्रावात्, स्मृतिद्वैधवत् सर्व प्रमाणम् ॥
मा.नि. प्रमेह - १२ पा. २५७ - ५८ म. टीका

उदकमेह

मूत्राचे स्वरुप स्वच्छ पांढरें (वर्णहीन) शीत, गंधरहित व अगदीं पाण्यासारखे असतें. श्वेत, शीत, व अच्छ हे कफाचे गुण उदकमेहांत कार्यकारी होतात. माधवनिदान व वाग्भट यांनीं उदकमेहाच्या गुणामध्यें किंचित् आविल, पिच्छिल असा जो पाठ घेतला आहे तो योग्य नाहीं. तें वर्णन इक्षुमेहांतच शोभणारें आहे. सगळ्याच प्रमेहांत आविलता असते ती येथें दुलाक्षत होऊं नये म्हणून हें वर्णन वाग्भटानें केलें आहे असें म्हणतां आलें तरी उदकमेहामध्यें वर्णिलेली उदकोपं व अच्छं या लक्षणाशीं तें विसंगत आहे. प्रत्यक्षातही आविलता नसलेलें मूत्र प्रमेही मनुष्यामध्यें कांहीं वेळां तरी आढळतें. त्यामुळे चरकाचेंच वर्णन योग्य आहे. बा. नि. १०-९

इक्षुमेह - (इसुवालिकारसमेह; कांडेक्षुमेह.)

इसुवालिका व कांडेक्षु असें दोंन समानार्थक आहेत. व एक प्रकारचा जंगली ऊंस या अर्थानें ते या ठिकाणीं एकत्र उल्लेखलिले आहेत. तालीमखाना, बोरु कसार, दर्भ, अशा निरनिराळ्या अर्थानें हें दोन्ही शब्द वापरले असले तरी मधुरादि गुणांच्यां वर्णनावरुन जंगली उंस असाच त्याचा अर्थ येथें अभिप्रेत आहे. या प्रकारांतील मूत्र मधुर, शीत, पिच्छिल  ( थोडेंसें ) आणि गढूळ ( आबिल ) असें असतें. इक्षुमेहांत मधुर आणि शीत कफाचे गुण कार्यकारी असतात.

सांद्रमेह

पात्रांतील मूत्र कांहीं काळ साठवून ठेवलें तर तें दाट बनतें सांद्रमेहामध्यें सांद्र व पिच्छिल हे कफाचे गुण प्रभावी असतात.

सांद्रप्रसादमेह --

पात्रांतील मूत्रामध्यें कांहीं भाग घन झालेला व वरील कांहीं भाग स्वच्छ मलसहित दिसतो. त्यास सांद्रप्रसादमेह असें म्हणतात. वाग्भट व माधवनिदान यांनीं यासच सुरादमेह असें म्हटलें आहे. टीका कारांचे त्यावरील विवेचन विचारांत घेतां या प्रकारच्या मेहामध्यें थोडासा पित्ताचा अनुबंध असतो आणि त्यामुळें हें मूत्र रंगानें किंचित् पीतरक्त (मधाप्रमाणें असतें असें म्हणतां येतें. (वा.नि.१०)

शुक्ल (पिष्ट) मेह.

मूत्राचें स्वरुप त्यामध्यें पांढरें मीठ मिसळल्यासारखें असतें. वाग्भटानें ह्या रुग्णाच्या अंगावर वरचेवर (अगर मूत्रप्रवृत्तिच्या वेळीं) रोमांच उभे रहातात, असे एक लक्षण अधिक दिलें आहे. पिष्टमेहांत कारणीभूत होणारा गुण टीकाकारानें श्वेत शुक्ल एवढा एकच सांगितलेला आहे. आमच्या मतें मूर्त व गुरु गुण त्याच्या जोडीस येथें आवश्यक आहेत.

शुक्रमेह

यांच्यामध्यें मूत्र स्वरुपानें शुक्रासारखें दिसतें. अगदीं क्वचित् त्यामध्यें प्रत्यक्ष शुक्र हीं मिसळलेले असतें. कफाच्या श्वेत, स्निग्ध या गुणांनीं हा मेह उत्पन्न होतो.

शीतमेह

शीतमेहांत मूत्रप्रवृत्ति अतिशय शीत अशी असते. मूत्रप्रवृत्ति होण्याच्या वेळीं रोग्याला त्याची शीतता जाणवते. या मूत्रांत मधुरताही अधिक असते. कफाच्या गुरु, मधुर, शीत गुणांनीं हा प्रकार होतो.

सिकतामेह

वाळूच्या कणासारखे, मूर्त स्वरुपाचें बारीक बारीक कण पुष्कळ प्रमाणांत मूत्राबरोबर पडतात. कफाच्या सांद्र व मूर्त ह्या गुणानें हा मेह उत्पन्न होतो.

शनैर्मेह

मूत्रप्रवृत्तीचा वेग येऊनही व मूत्राचें प्रमाण पुष्कळ असूनहि थोडी थोडी व सावकाश सावकाश लघवी होते. कफाच्या मंद व मूर्त ह्या गुणांनीं हा मेह होतो. मूर्ताच्या ऐवजीं गुरु गुणाचा उल्लेख करणें आम्हांस अधिक योग्य वाटतें. मार्गावरोध आणि बस्तीचें बल कमी होणें, यामुळें ह्या प्रकारची विकृति प्रमेहामध्यें उत्पन्न होत असावी.

आलालमेह लालामेह

लाळेप्रमाणें, तंतुयुक्त, पिच्छिल, अशी मूत्रप्रवृत्ति होते कफाच्या पिच्छिल गुणामुळें हा मेह होतो. सुश्रुतानें फेनमेह व लवणमेह असें दोन मेह कफज प्रकारांत उल्लेखलेले आहेत व चरकानें सांगितलेल्या शीतमेह व लालामेह यांचा उल्लेख त्यानें केलेला नाहीं. (सु.नि.६-८) मात्र त्यावरुन हे दोन प्रकार एकमेकांसारखे आहेत असें म्हणतां येणार नाहीं यांची गणना करावयाची झाल्यास कफाचे प्रकार १२ मानावें लागतील. आमच्या कल्पनेप्रमाणें सुरामेह, फेनमेह, व लवणमेह यांचें स्वरुप द्वंद्वजासारखें आहे. वातानुबंधामुळें फेनमेह, पित्तानुबंधानें सुरामेह व पित्तानुबंधामुळें कफास विदग्धता आल्यास लवणमेह उत्पन्न होतो. (कफविदाहव्यत्यये गुरुणा लवणमेह: । सु. नि. ६-८ न्या. च. टीका.)
व्या .....१२

पित्तजमेह

उष्णाम्ललवणक्षारकटुकाजीर्णभोजनोपसेविस्तथाऽ
तितीक्ष्णातपाग्निसंतापश्रमक्रोधविषमाहारोपसेविनश्च
तथा विधशरीरस्यैव क्षिप्रं पित्तं प्रकोपमापद्यते, तत्तु
प्रकुपितं तथैवानुपूर्व्या प्रमेहानिमान् षट्‍ क्षिप्रतरमाभिनिर्व-
र्तयति ॥२४॥
तेषामपि तु खलु पित्तगुणविशेषेणैव नामविशेषा भवन्ति;
तद्यथा - क्षारमेहश्च, कालमहेश्च नीलमेहश्च लोहितमेहश्च,
माञ्जिजष्ठमेहश्च, हारिद्रमेहश्चेति ॥२५॥
ते षड्‍भिरेव क्षाराम्ललवणकटुकविस्त्रोष्णै: पित्तगुणै: पूर्व-
वद्युक्ता भवन्ति ॥२६॥
च. नि. ४ २४ ते २७ पा. ४५५

वातकफशोणितमेदोन्विरामतं पित्तं प्रमेहान् ।
सु. नि. ६/९ पा. २९९

उष्ण, अम्ल, लवण, क्षार, तिखट हा गुणांनीं युक्त अशा पदार्थाचें अतिप्रमाणांत सेवन करणें, अजीर्ण झालें असताना जेवणें, विषम आहार घेणें, अत्यंत कडक उन्हांत फिरणें, फार शेक घेणें, अतिश्रम, अतिक्रोध ह्या कारणांनीं पित्तप्रकोप होऊन तें कफासही प्रकुपित करतें आणि मग कफज प्रमेहांत सांगितल्याप्रमाणें प्रमेहाची सम्प्राप्ती घडते. पित्त हे क्षार, अम्ल, लवण, कटु, दुर्गंधी आणि उष्ण अशा गुणांनीं युक्त आहे. ह्या गुणांच्या प्रकोपाच्या विकृतीच्या तरतमतेप्रमाणें, एक वा अनेक गुणांच्या परिणामानें क्षारमेह, कालमेह, नीलमेह, लोहितमेह, मंजिष्टमेह, हारिद्रमेह या नांवानें उल्लेखले जाणारे सहा प्रकारचे पित्तज मेह होतात.

तत्र श्लोका: पित्तप्रमेहविशेषविज्ञानार्था भवन्ति ॥२७॥
गन्धवर्णरसस्पर्शैर्यथा क्षारस्तथाविधम् ।

येथें ॥२८॥ नाहीं.

पित्तकोपान्नरो मूत्रं क्षारमेही प्रमेहति ॥२९॥
मसीवर्णमजस्त्रं यो मूत्रमुष्णं प्रमेहति ।
पित्तस्य परिकोपेण तं विद्यात् कालमेहिनम् ॥३०॥
चाषपक्षनिभं मूत्रमम्लं मेहति यो नर: ।
पित्तस्य परिकोपेण तं विद्यान्नीलमेहिनम् ॥३१॥
विस्त्रं लवणमुष्णं च रक्तं मेहति यो नर: ।
पित्तस्यपरिकोषेण तं विद्याद्रक्तमेहिनम् ॥३२॥
मञ्जिष्ठोदकसंकाशं भृशं विस्त्रं प्रमेहति ।
पित्तस्य परिकोपात्तं विद्यान्माञ्जिष्ठमेहिनम् ॥३३॥
हरिद्रोदकसड्काशं कटुकं य: प्रमेहति ।
पित्तस्यपरिकोपात्तं विद्यादूहारिद्रमेहिनम् ॥३४॥
इत्येते षट्‍ प्रमेहा: पित्तप्रकोपनिमित्ता व्याख्याता
भवन्ति ॥३५॥
च. नि. ४ २९ ते ३५ पा. ४५५-५६

क्षारमेह

गंध, वर्ण, रस, स्पर्श हा सर्व गुणांनीं मूत्राचें स्वरुप क्षार मिसळलेल्या पाण्याप्रमाणें असतें.

कालमेह

उष्ण स्पर्श वव काजळी सारखें काळें मूत्र वरचेवर होतें.

नीलमेह

चाष पक्ष्याच्या पंखाप्रमाणें (नीलवर्ण) अशी मूत्र प्रवृत्ति मंद गतीने होते. ती स्वच्छ व फेनयुक्त असते असें सुश्रुतानें सांगितले आहे. (सु. नि. ६-११)

लोहितमेह, शोणितमेह, रक्तमेह

लवण रसात्मक, उष्ण स्पर्श, दुर्गंधी व रक्तवर्ण अशी मूत्रप्रवृत्ति होते.

मंजिष्ठमेह

मंजिष्ठेच्या काढयाच्या रंगाप्रमाणें काळसर ला दुर्गंधीयुक्त अशी मूत्रप्रवृत्ति पुष्कळ प्रमाणांत होते.

हरिद्रा मेह

हळदीच्या पाण्याप्रमाणें पीतवर्ण कटुरसात्मक अशी मूत्रप्रवृत्ती होते, मूत्रप्रवृत्तिचे वेळी आग होते असें लक्षण माधवानें दिलें आहे. (मा. नि. प्रमेह १४)
कफज प्रमेहांत सांगतां आल्याप्रमाणें गुणभेदानें पित्तज प्रमेह कसें असतात तें सांगता येत नाहीं. कारण वर्णाव्यतिरिक्त इतर गुण ह्या प्रकारच्या मूत्राच्या स्वरुपांत अगदीं अल्प प्रमाणांत वर्णिलेलें आहेत. गयदासानें आपल्या टीकेंत.

पित्तात्तु नीलाद्या: षट्‍, पित्तगुणै: षभिड्‍रेव यथासंख्यं
नीलपीताम्लक्षारविस्त्रलोहितैरभिव्यज्यन्ते ।
सु. नि. ६-८ न्या. च. टीका पा. २९१

पित्ताच्या सहा गुणांपैकी एकेकाने एकेक ह्या प्रमाणांत नील गुणानें नील मेह, पीत गुणानें हरिद्र मेह, अम्ल गुणानें अम्लमेह, क्षार गुणानें क्षारमेह विस्त्र गुणानें मंजिष्ठ मेह आणि लोहित गुणानें शोणित मेद होतो असें म्हटलें असलें तरी त्यानें वर्णिलेले सर्वच शब्द पित्ताच्या गुणाचें बोधक आहेत असें नाहीं. त्यामुळें निर्णय करणें कठीण आहे. चरकाच्या कालमेहाऐवजीं सुश्रुतानें पित्तज प्रकारामध्यें अम्लमेह उल्लेखला आहे. त्यामध्यें उष्ण स्पर्श, अम्लरस, आंबुसवास व दाह हे गुण मूत्रामध्ये असावेत असें वाटतें हा एक अधिक प्रकार मानावा.

वातजमेह

कषायकटुतिक्तरुक्षलघुशीतव्यवायव्यायामवमनविरेचना-
स्थांपन शिरोविरेचनातियोगसंशारणानशनाभिघातात-
पोवेगशोकशोणितातिषेकजागरणविशमशरीरन्यासानुप-
सेवमानस्य तथाविधशरीरस्यैव क्षिप्रं वात: प्रकोप-
मापद्यते ॥३६॥
स प्रकुपितस्तथाविधे शरीरे विसर्पन् यदा वसामादाय
मूत्रवहानि स्त्रोतांसि प्रतिपद्यते तदा वसामेहमभिनिर्वर्तयति;
यदा पुनर्मज्जानं मूत्रबस्तावाकर्षति तदा मज्जमेहमभि-
निर्वर्तयति; यदा तु लसीकां मूत्राशयेऽभिवन्मूत्रानुबन्धं
च्योतयति लसीकातिबहुत्वाद्विक्षेपणाच्च वायो: स्वल्प-
स्यातिमूत्रप्रवृत्तिसड्गं करोति, तदा स मत्त इव गज:
क्षरत्यजस्त्रं मूत्रमवेगं, तं हस्तिमेहिनमाचक्षते; ओज:
पुनर्मधुरस्वभावं, तद्‍ यदा रौक्ष्याद्वायु: कषायत्वेनाभिसं-
सृज्य मूत्राशयेऽभिवती तदा मधुमेहं करोति ॥३७॥

रुक्षेत्यादिवतमेहस्य निदानम् । मूत्रबस्तावकर्षति
मूत्रबस्तौ स्थित आकर्षति, अर्थान्मूत्रं

बस्तिमेव नयति । लसीका मांसत्वगन्तरे उदकभाग: ।
वक्ष्यति हि शारीर - ``यन्मांसत्वगन्तरे उदकं,
तल्लसीका शब्दं लभते'' इत्यादि । अनुबन्धमिति अवि-
च्छेदेन । च्योतयतीति पातयति । रौक्ष्याद्वायु: कषायत्वे
नाभिसंसृज्येति मधुरमप्योजो वायु: प्रभावात् कषायरस-
युक्तं कृत्वा रौक्ष्यान्मूत्राशयेऽमिवहति, मूत्राशयं शैक्ष्याच्छे-
दयित्वा रुक्षं य: कृत्वा नयत्योज:, स्वमहिम्ना य: वायु-
रोज: कषायं करोति, यतो वातो हि वृद्ध: प्रभावात्
कषायरसं करोति ॥
च. चि. ४-३६, ३७ सटीक पा. ४५६,५७

कफपित्तवसामज्जमेदोभिरन्वितो वायुवार्तप्रमेहान् ॥९॥
सु. नि. ६/९ पा. २९१

तत्र श्लोका वातप्रमेहविशेषविज्ञानार्था भवन्ति ॥४०॥
वसामिश्रं वसाभं वा मुहुर्मेहति यो नर: ।
वसामेहिनमाहुस्तमसाध्यं वातकोपत: ॥४१॥
मज्जानं सह मूत्रेण मुहुर्मेहति यो नर: ।
मज्जमेहिनमाहुस्तमसाध्यं वातकोपत: ॥४२॥
हस्ती मत्त इवाजस्त्रं मूत्रं क्षरति यो भृशम् ।
हस्तिमेहिनमाहुस्तमसाध्यं वातकोपत: ॥४३॥
कषायमधुरं पाण्डु रुक्षं मेहति यो नर: ।
वातकोपादसाध्यं तं प्रतीयान्मधुमेहिनम् ॥४४॥
च. नि. ४-४० ते ४३ पा. ४९७

श्यावारुणो वातकृत: सशूलो
मज्जादिसाद्‍गुण्यमुपैत्यसाध्य: ॥१२॥
च. चि. ६-१२ प.अ १०४७

वातज मेह

रुक्ष, कटु, कषाय, तिक्त, लघु, शीत, या गुणांनीं युक्त पदार्थ अधिक प्रमाणात खाणें, अतिव्ययाय, अतिव्यायाम, पंचकर्माचें अतियोग, वेगविधारण, अभिघात, उपवास, उद्वेग, शोक, जागरण, विषम शरीरन्यास या कारणांनीं वातप्रकोप होतो. तो कफपित्ताला प्रकुपित करुन कफज प्रकारांत सांगितल्याप्रमाणें संप्राप्ती घडवितो. वाताच्या विशेष स्वरुपाच्या सामर्थ्यामुळें याप्रकारच्या प्रमेहांत धातुदुष्टी विशेष स्वरुपांत होते, त्यामुळें वाताच्या विविध गुणाचा परिणाम होऊन मेहाचे जे प्रकार होतात त्याचें वर्णन पित्तमेहाप्रमाणें गुणानुरोधानें न करतां धातुदुष्टीला प्राधान्य देऊन केलें आहे. मूत्राचें स्वरुप सामान्यत: श्याव अरुण वर्णाचें व प्रवृत्तीचे वेळीं शूल करणारें असतें. प्रकारभेदानें त्या त्या धातुसारखें मूत्र होतें.

वसामेह

शरीरामध्यें संचार करणारा वायू वसेला दुष्ट करुन मूत्रमार्गात आणतो. त्यामुळें मूत्राचें स्वरुप वसें सारखें वा वसा मिसळल्यासारखें असतें.

मज्जमेह (सर्पिमेह)

वातप्रकोपानें मज्जा दुष्ट होऊन ती मूत्रमार्गांतून बाहेर पडते, त्यामुळें मूत्राचें स्वरुप मज्जा मिसळल्यासारखें असतें.

हस्तिमेह लसीकामेह

त्वचा व मांस यांच्यामध्यें असलेला, उदकासारखा दिसणारा जो लसीका नांवाचा पदार्थ त्याची दुष्टी वातप्रकोपानें होऊन लसीका अतिरिक्त प्रमाणांमध्यें मूत्रमार्गामधून बाहेर पडते. माजलेल्या हत्तीनें मूत्र करावें त्याप्रमाणें न आवरतां येईल अशा वेगानें मूत्रप्रवृत्ती होते व पुष्कळ प्रमाणांत मूत्र होऊनही बस्ति मोकळा झाल्यासारखें वाटत नाहीं. तो जड भरलेलाच वाढतो. हत्तीप्रमाणें मूत्रप्रवृत्ती होते. म्हणून हरितमेह हें नांव या प्रकाराला दिलेलें आहे.

ओजोमेह मधुमेह क्षौद्रमेह

वायूच्या रुक्ष कषाय गुणांमुळें ओजाच्या मधुर, स्निग्ध स्वभावासही विकृती प्राप्त होते व तें ओज मूत्रमार्गांतून बाहेर पडतें. मूत्राचें स्वरुप मधासारखे असतें. रस अत्यंत मधूर असून मूत्र पुष्कळ प्रमाणांत होऊनही बरेंच दाट व श्यावारुण वर्ण असतें.

पूयप्रमेह

हारितानें कांही प्रमेह वेगळे सांगितले आहेत.

जलप्रमेहो, रुधिरप्रमेह: पूयप्रमेहो लवणप्रमेह: ।
तक्रप्रमेहो खटिकप्रमेह: शुक्रप्रमेहो कथित: पुरस्तात् ॥
हारित तृतीय २८ पान ३८५

पूयप्रमेह हें वर्णन केवळ अनेक वेळां मूत्रप्रवृत्ति होते एवढयापुरतेंच प्रमेहांत घालण्यासारखें असलें तरी प्रभूत मूत्र हें लक्षण त्यांत असत नाहीं. त्यामुळें मूत्रप्रमेहाला मूत्रकृच्छ्र असे संबोधून त्याचा उल्लेख आम्ही पुढें मूत्रकृच्छ्रांत केला आहे. हरीताने सांगितलेले इतर मेह पूर्वी वर्णिलेल्या मेह प्रकारांत येऊन जातात हे सहज लक्षांत येण्यासारखें आहे.

सर्व एव प्रमेहास्त कालेनाप्रतिकारिण: ।
मधुमेहत्वमायान्ति तदाऽसाध्या भवन्ति हि ॥२३॥
मधुमेहे मधुसमं जायते स किल द्विधा ।
क्रुद्धे धातुक्षयाद्वायौ दोषावृतपथेऽथवा ॥२४॥
आवृतो दोषलिड्गा नि सोऽतिमात्रं प्रदर्शयन् ।
क्षणात्क्षीण: क्षणात्पूर्णो भजते कृच्छ्रसाध्यताम् ॥२५॥
मधुरं यच्च मेहेषु प्रायो मध्विव मेहति ।
सर्वेऽपि मधुमेहाख्या माधुर्याच्च तनोरत: ॥२६॥
मा. नि. प्रमेह २३ ते २६ पान २६२

उपेक्षया हि पित्तकफजानामपि मधुमेहत्वं प्रदर्शयतिमाहु-
सर्व एवेत्यादि । धातुक्षयावरणाभ्यां कुपितवातेन मधुमेह
संभवमाह - मधुमेह इत्यादि । मधुसमिति `मूत्रं' इति शेष: ।
स इति मधुमेह: । सावरणीलिड्गमाह -
आवृत इत्यादि : आवृत इति आवृतवातकृत: । दोषलिड्गा-
नीति येन पित्तादिना आवृतस्तस्य वातस्य च लिड्गानि
प्रदर्शयति । अनिमित्तकस्मात् । क्षीण: क्षणात् क्षणात्पूर्ण
इति आवरणेन पुन: पूर्णो भवन् कृच्छ्रसाध्यो भवति ।
तथा चरक:-``समारुतस्य पितस्य कफस्यच मुहुर्मुहु: ।
दर्शयताकृतिं गत्वा क्षयमाप्यय्यते पुन:'' इति ।
धातुक्षय कुपितवाजस्य तु केवलवातजमेव लिड्गमय़ ।
गदाधरस्त्वाह, - मधुमेह: सावरणवायुनैव क्रियते ।
यदाह चरक:, - ``तैरवृतगतिर्वायुरोज आदाय गच्छति ।
यदा बस्तिं तदा कृच्छ्रो मधुमेह: प्रवर्तते'' - इति ।
केवलवातजेषु तु कषायादि वमनाद्यतियोगादिकृतेषु
धातुक्षयजेषु वायोहावरणं, नास्तीतिभेद: ।
मधुमेहशब्दप्रवृत्तौ निमित्तमाहमधुरं यच्च मेहेष्वित्यादि ॥
मा. नि. प्रमेह २३-२६ सटीक पा. २६२

सर्व प्रकारचे प्रमेह उपक्षेनें मिथ्याहार विहारानें, दीर्घकाळानें वा दोषदूष्याच्या बलवान विकृतीमुळें मधुमेंहामध्यें परिणत होतात. वायूच्या सामान्य विकृतीच्या कारणाप्रमाणें मधुमेहांतही धातुक्षयोत्पन्न मधुमेह आणि दोषावृत वातप्रकोपजन्य मधुमेह असे दोन प्रकार होतात. आवरणामुळें उत्पन्न हो‍णार्‍या मधुमेहामधें कफ़पित्ताची लक्षणें मधून मधून एकाएकी दिसतात आणि मधुन मधुन केवळ वाताची व इतर दूष्याचीहि लक्षणें दिसतात. धातुक्षयजन्य मधुमेहामध्यें मात्र केवळ वाताचींच लक्षणें सातत्यानें दिसतात. कांही ग्रंथकारांच्यामतें ओजाची विकृती करणारा मधुमेह हा मार्गावरोधजन्य वातप्रकोपानेंच होतो. चरकानें कफ़पित्तानें व मेदमांसानें आवृत्त झालेला वायू ओजाला घेऊन बस्तीमध्यें येतो व मधुमेह उत्पन्न करतो असें म्हटलें आहे. (च. सू. १७-७९, -८०)
प्रमेहाला मधुमेह असेंही संबोधलें जातें. कारण मूत्राला उण्याअधिक प्रमाणांत मधुरता असणें हें लक्षण सर्वच प्रमेहांत असतें. तसेंच प्रमेहांतील विकृति वाढत जाईल त्या प्रमाणांत सर्व शरीरालाहि माधुर्य येतें. म्हणूनही मधुमेह हा प्रमेहाचा प्रतिशब्द म्हणून मानला जातो.

प्रमीढ
पुष्कळ मुत्रप्रवृत्ति व पूर्वरूपांत सांगितलेल्या लक्षणांचें आधिक्य अशा स्थितींत प्रमेही मनुष्यास "प्रमीढ" अशी संज्ञा आहे. कांही लोक पिडका उत्पन्न झाल्यानंतर मधुमेह अशी संज्ञा वापरतात. तें तितकेसें योग्य नाही.

बहुमूत्र
योगरत्नाकराने बहुमूत्र नांवाचा एक व्याधी उल्लेखलेला आहे. त्यामध्यें उल्लेखलेंली लक्षणें सर्व प्रमेहाचींच आहेत. मूत्रप्रवृत्तीचें प्रमाण हें पुष्कळच अधिक असतें आणि क्कचित् मूत्रामध्यें मधुरता आढळत नाही. हा मधुमेहाचाच कफ़ज
मेहातील वातानुबंधाने होणारा एक प्रकार मानावा, यामध्यें तृष्णा लागणें, दौर्बल्य वाढणें, अतिशय प्रमाणांत मूत्रप्रवृत्ति होणें व त्वचेला निस्तेजता, पाण्डुता येणें, रूक्षता वाढणें अशीं लक्षणें असतात. (यो. र. पान ५७६)

चिकित्सा संदर्भानें लक्षणें
पांडु, अर्श, अरूचि, ग्रहणी, कुष्ठ (च. चि. ६।४०), वातरोग, वातशोणित, मूत्राघात, मूत्रकृच्छ्र, प्रदर, अश्मरी, विबंध, अनाह, शूल, कामला, तेवंगसेन पान ४९३) ज्वर, (वंगसेन ४९४ पान) शोथ, पांडु, उदर, शूल लीहा (वंगसेन ४९४ पान ) शोथ, गुल्म, वातरक्त, विद्रधि, अपस्मार, उन्माद (वंगसेन ४९५), यक्ष्मा (वंगसेन ४९७ पान).
यक्ष्मा, कास, तृष्णा, उन्माद, श्वास (यो. र. पान ५७५) वृद्धी, स्थानक्षय

स चापि गमनात् स्थानं स्थानादासनमिच्छति ॥
आसनावृणुते शय्यां शयनात् स्वन्पमिच्छति
तस्येदानीं मधुमेहिनो विहाराख्यं चतुर्विधक्रियाश्रयं लिड्गं
दर्शयन्नाह- स चापि गमनादित्यादि । गमनस्थानासन-
शयनानि हि सर्वेषामेव विहार: । अन्यान्न तथाऽवलम्बते
मधुमेही, किं तर्हि निद्रामेव केवलामलम्बते।
सु. नि. ६-२५ पान २९४

वृद्धिस्थानक्षय
अतिशय धातुदुष्टी, वातप्रकोप, ओजोविकृति आणि धातुक्षय यांचा परिणाम म्हणून मधुमेही व्यक्तिंच्या विकारामध्यें अधिकाधिक दुर्बलता व्यक्त होत जाते. हिंडता फ़िरता मधुमेही हिंडण्याचा कंटाळा करतो. नंतर बसूनच रहातो पुढें पडून रहाण्याची शय्येची अपेक्षा करतो शेवटी सारखा झोप घेतो.
मूत्रप्रवृत्तीचें प्रमाण, वेळा, आविलता, घनता, मधुरता वाढत जाणें, थकवा येत जाणें, कृशता येणें, हें व्याधी वाढत असल्याचें द्योतक समजावे. नेहमीचें पथ्यकर साधे असें अन्न घेऊन तृष्णा, दौर्बल्य व प्रभूताविल मूत्रता ही लक्षणें नियंत्रित राहिलीं वा कमी कमी होत गेलीं तर व्याधी बरा होत आहे असें समजावे.
हा व्याधी अत्यंत चिरकाली व याप्य असा आहे. वर्षानुवर्ष पथ्यकर आहार विहारानें रहाणें व औषधें घेणें या उपचारानें नियंत्रित रहातो. संपूर्ण बरा असा अगदी क्वचित्च होतो.

उपद्रव
अविपाकोऽरुचिश्छर्दिर्निद्रा कास: सपीनस: ।
उपद्रवा: प्रजायन्ते मेहानां कफ़जन्मनाम् ॥१८॥
बस्तिमेहनयोस्तोदो मुष्कावदरणं ज्वर: ।
दाहस्तृष्णाऽम्लिका मूर्च्छा विड्‍भेद: पित्तजन्मनाम् ।
वातजानामुदावर्त: कम्पह्रद्‍ग्रहलोलता: ।
शूलमुन्निद्रता शोष: कास: श्वासश्च जायते ॥२०॥
मा. नि. प्रमेह १८ ते २० पान २५९
उपद्रवास्तु खलु प्रमेहिणां तृष्णातीसारज्वरदाहदौर्बल्या-
रोचजाविपाका: पूतिमांसपिडकालजीविद्रध्यादयश्च तत्प्र-
सड्गाद्बवन्ति ॥४७॥
च. नि. ४-४७ पा. ४५८

मक्षिकोपसर्पणं आलस्यं मांसोपचय: प्रतिश्याय: शैथिल्यं श्वास कफ़जे । ह्रदिशूलं, अरोचक, वमथु परीधूपनं, पिपासा, निद्रानाश:, पांडुरोगा:, पीत-विण्मूत्रनेत्रत्वं पित्तजे । स्तंभ: बद्धपुरीषत्वं वातजे ।
सु. वि. ६-१३,

तृष्णा, अतिसार,ज्वर, दाह, दौर्बल्य, अरोचक, अविपाक, पिडका, विद्रधि, पूतिमांस असे उपद्रव चरकानें प्रमेहाचे सांगितले आहेत.
सुश्रुतादींनी प्रमेहाचे उपद्रव दोषमेदानें सांगितलें आहेंत.

कफ़ज मेहोपद्रव
कफ़ज मेहांत उपद्रव म्हणून माशा बसणें, आलस्य, मांसाच्या गांठी बनणें, पीनस, प्रतिश्याय, शरीराला शिथिलता येणें,
अरोचक,अविपाक, वरचेवर थुंकी येणें, छर्दी, झोंप फ़ार येणें, कास, श्वास अशीं लक्षणें होतात.

पित्तज मेहोपद्रव
पित्तज मेहांत उपद्रव म्हणून वृषणाला भेगा पडणें बस्ती व उपस्थ यांच्यामध्यें शूल होणें, ह्रदयांत शूल होणें, घशांशी आंबट येणें, ज्वर, अतिसार अरोचक, छर्दी, घुसमटल्यासारखें वाटणें, दाह, मूर्च्छा, तृष्णा, निद्रानाश, पांडुरोग, मलसूत्र- नेत्राला पीतत्व येणें अशीं लक्षणें होतात.

वातज मेहोपद्रव
वातज मेहात उपद्रव म्हणून ह्रदग्रह, लौल्य (खा, खा, सुटणें ) निद्रानाश स्तंभ, कंप, शूल, श्वास, मलावष्टंभ यक्ष्मा असे उपद्रव होतात.
प्रमेह व्याधी हा अत्यंत याप्य असल्यामुळें प्रमेह नष्ट होतो व परिणाम राहातात असें सहसा घडत नाहीं.

साध्यासाध्य विवेक
ते दश प्रमेहा: साध्या: समानगुणभेद:स्थानकत्वात्
कफ़स्य प्राधान्यात्  समक्रियत्वाच्च ॥११॥
च. नि.४-१२ पान ४५४
सर्व एव ते याप्या: संसृष्टदोषभेद:स्थानत्वाद्विरुद्धोप-
क्रमत्वाच्चेति ॥२७॥
च. नि. ४-२८ पान ४५५
इमांश्चतुर: प्रमेहान् वातजानसाध्यानाचक्षते भिषज:
महात्ययिकत्वाद्विरुद्धोपक्रमत्वाच्चेति ॥३८॥
च. नि. ४-३८ पान ४५७

दहा प्रकारचे कफ़ज मेह हे दोंषदूष्याच्या द्दष्टीनें एकाच प्रकारच्या लंघन रुक्षणादि क्रियेनें बरे होणारे असल्यानें साध्य होतात. क्रिया वैषम्यामुळें सहा प्रकारचे पित्तजमेह कष्टसाध्य वा याप्य होतात आणि दोष दूष्याच्या चिकित्सेंतील अत्यं विपरीततेमुळें वायुच्या प्रभावामुळें चारही प्रकारचे वातज मेह असाध्य असतार्त.

सपूर्वरुपः कफपित्तमेहाः
ऋमेण ये वातकृताश्र्व मेहाः ।
साध्या न ते पित्तकृतास्तु याप्याः
साध्यास्तु मेदो यदि न प्रदुष्टम् ॥५६॥
च. चि. ६-५६ पान १०४७.

कफज व पित्तज मेह साध्य वा कष्टसाध्य म्हणून सांगितले असले तरी ज्या वेंळीं पूर्वरुपाम्तील लक्षणें व्यक्त होत असतील त्या वेळीं कफपित्तमेहही असाध्य असतात. इतर व्याधीमध्यें पूर्वरुपांतील सगळींच्या सगळीं लक्षणें प्रगट झालीं तरच असाध्यता तेते. प्रमेहामध्यें मात्र पूर्वरुपांतील लक्षणें कांहीं थोडीं जरी व्यक्त झालीं तरी प्रमेहाला असाध्यता येते. वातज प्रमेहांत सांगितलेल्या स्वतंत्र निदान लक्षणांनीं युक्त असेंवातमेह निश्र्वितपणें असाध्य आहेत. कफपित्ताच्यामध्यें वाताचा अनुबंध होऊन उत्पन्न झालेले जे वातज मेह ते तवछे साध्य वा याप्य आहेत. ग्रंथांतरी वातज प्रमेहासाठीं सांगितलेली चिकित्सा या जातीच्या प्रमेहासाठीं आहें. मेदोदुष्टीचीं लक्षणें उत्पन्न झालीं असतां सर्व प्रकारचे मेह असाध्य होतात.

जातः प्रमेही मधुमोहीनो वा
न साध्य उक्तः स हि बीजदोषात् ।
ये चापि केचित् कुलजा विकारा
भवन्ति तांश्च प्रवदन्त्यसाध्यान् ॥५७॥
क. चि. ६-५७ पान १०४८

मेहानामसाध्यताप्रकारान्तरमाह - जात इत्यादि ।
प्रमेही य: प्रमेहिणो जात: सोऽप्पसाध्यो भवति ।
अत्रापि हेतुमाह - स हि बीज दोषादिति; प्रमेहारम्भकदोषदुष्ट
बीजजातप्रमेहित्वात् । मधुमेहशब्देनात्र मेहमात्र
मुच्यते, यदि तु वातिक उपेक्षितो वा मेहो मधुमेह
उच्यते, तदेतरप्रमेहयुक्त मातापितृजनितप्रमेहिणो नासा-
ध्यत्वं स्यात् । किंच मधुमेहिनो जनितस्य मधुमेहित्वमे
व कारणानुरुपतया युक्तम् । ततश्च मधुमेही मधुमेहिनो
वा जातो न साध्य इति वक्तुमुचितम् । तसादपत्वे
सामान्येन प्रमेहवचनेनापि तत्कारणे पितरि कार्यानुरुप:
प्रमेहो मधुमेहशब्दवाच्यो ज्ञेय: । मेहशब्दोऽयं सामान्येन
सर्व मेहेषु वर्तत एव, यत: कियन्त:शिरसीये या पिटका''
इत्यनेन सामान्यप्रमेहसंबन्धितयाऽनुदिता:, तस्मान्मधु-
मेह शब्द:सर्वप्रमेहे मधुमेहविशेषे च वर्तते; यथा तृणशब्द:
सर्वतृणें तृणविशेषे च वर्तते । प्रपञ्चितश्चायमर्थ: कियन्त:
शिरसीये इति नेह प्रतन्यते । कुलजप्रमेहासाध्यताप्रसंगे-
नापरेषां मध्येसाध्यतामाह - येचापेत्यादि । कुलजा
इति पितृपितामहादि कारणोद्‍भूता: । अनेनैव सामान्येन
वचनेन प्रमेहस्यापि कुलजस्यासाध्यतायां सिद्धायां
पुनस्तद्वचनं संतानानुबन्धित्वोपदर्शनार्थम् । उक्तं हि
``प्रमेहोऽनुसड्गिनाम्' (सू. अ. २५) इति ।
पान १०४८ च. चि. ६/५८ टीका.

अगदीं लहानपणींच ज्याला प्रमेह उत्पन्न झाला आहे किंवा प्रमेंही मातापित्यांच्यामुळें बीजदोषानें ज्याला प्रमेह जडला आहे असा प्रमेह असाध्य होतो. अनुवंशांतील दोषामुळें उत्पन्न होणारे सर्वच व्याधी असाध्य होतात. अनुवंशांतून पसरत जाण्याची प्रवृत्ति प्रमेह वा व्याधीत विशेष आहे. प्रमेहामध्यें बलमांसपरिक्षय झाल्यास प्रमेहव्याधी असाध्य होतो. (मा. नि. प्रमेह १२-२२ म. टीका)

रिष्ट लक्षणें

मेह स्तृड्दाहपिटिकामांसकोथातिसारिणम् ॥८५॥
वा. शा. ५-८५ पान ४२६

तृष्णा, दाह, प्रमेहपिटीका, मांसकोथ, ही मेहाची रिष्ट लक्षणे आहेत.

चिकित्सा सूत्रे

स्थूल: प्रमेही बलवानिहैक:
कृशस्तथैक: परिदुर्बलश्च
संबृंहणं तत्र कृशस्य कार्य
संशोधनं दोषबलाधिकस्य ॥१५॥
स्निग्धस्य योगा विविधा: प्रयोज्या:
कल्पोपदिष्टा मलशोधनाय ।
ऊर्ध्व तथाऽधश्च मलेऽपनीते
मेहेषु संतर्पणमेव कार्यम् ॥१६॥
गुल्म: क्षयो मेहनबस्तिशूलं
मूत्रंग्रहश्चाप्यपतर्पणेन ।
प्रमेहिण: स्यु परितर्पणानि
कार्याणि तस्य प्रसमीक्ष वह्निम् ॥१७॥
च. चि. ६-१५ ते १७ पान १०४१

प्रमेहाचे चिकित्सेच्या सोईसाठी चार विभाग अवस्थानुरुप केलेले आहेत ते असे बलवान्, दुर्बल, स्थूल, कृश, या भावांच्या संयोगानें आणखीही ४ भेद कल्पिता येतील ते असे कृशदुर्बल, कृशबलवान्, स्थूल बलवान्, स्थूल दुर्बल. कृश आणि दुर्बल रोग्यामध्यें प्रमेह व्याधींतही संतर्पण व संशमन असेच उपचार करावेत. स्थूल व बलवान् रोग्यामध्ये प्रमेह व्याधींतही संतर्पण व संशमन असेच उपचार करावेत. स्यूल व बलवान् रुग्णामध्यें दोषाधिक्य असेल त्या प्रमांणांत संशोधन करावें. वमनविरेचन यांचे इष्ट तें द्रव्य वापरावें. प्रमेह व्याधी चिरकारी असल्यामुळें संशोधनानंतर सर्व प्रकारच्या रुग्णांत योग्य प्रमाणांत संतर्पणच केलें पाहिजे. अविचाराने केलेल्या अपर्तपणानें गुल्म, क्षय, उपस्थशूल, बस्ति शूल, मूत्रग्रह, असे विकार उत्पन्न होतात.

क्लेदश्च मेहश्च कफश्च वृद्ध:
प्रमेहहेतु: प्रसमीक्ष्य तस्मात् ।
वैद्येन पूर्वं कफपित्तजेषु
मेहेषु कार्याण्यपतर्पणानि ॥५१॥
च. चि. ६-५१ पान १०४५

व्यायामयोगैर्विविधै: प्रगाढै
रुद्वर्तनै: स्नानजलावसेकै:
सेव्यत्वगेला गुरुचन्दनाद्यै
र्बिलेपनैश्चाशु न सन्ति मेहा: ॥५०॥
च. चि. ६-५० पान १०४५

प्रमेहाच्या सामान्य सम्प्राप्तीमध्यें क्लेद, मेद, कफ यांची दुष्टी असल्यामुळें कफपित्तांचें प्राधान्य असलेल्या मेहांत तरी प्रथमत: अपतर्पण करावें, व्यायाम, चंक्रमण उद्वर्तन, स्नान या विहारांचा अवश्य उपयोग करावा.

कल्प

आमलकी, हरिद्रा, निंब, कारलें, सनकपी, मुस्ता, चंदन, दारुहळद, अर्जुन, खदीर, कदंब, हरीतकी, लोघ्र, गुडुची, पटोल, वड, उंबर, जांभूळ, बेल, लोह, माक्षिक, शिलाजतु, वंग, नाग, जसद, अहिफेन, भांग, चंद्रप्रभा, वसंतकुसुमाकर, आरोग्यवर्धिनी, प्रमेहगजकेसरी, कुंभजतु, लोहासव, खदिरारिष्ट, जंब्वासव.

अन्न

सातू, वरी, नाचणी, गोधूम, मूग, कुळीथ, हरभरा, जुने जाडी तांदुळ, ताक, दूध, पालेभाज्या हे सेवन करावें.

विहार

चालण्याचा व्यायाम भरपूर घ्यावा.

अपथ्य

सदाऽसनं दिवा निद्रा नवान्नानि दधीनि च ।
मूत्रवेगं धूमपानं स्वेदं शोणितमोक्षणम् ॥४॥
सौवीरकं सुरा सूक्तं तैलं क्षारं घृतं गुडम् ।
अम्लेक्षुरसपिष्टान्नानूपमांसानि वर्जयेत् ॥५॥
यो. र. पान ५७६

बसून रहाणें, दिवसा झोंप घेणें, नवीन धान्य, दही, धूम्रपान, स्वेदन, रक्तमोक्ष, मद्य, तेल, तूप, गूळ, साखर, क्षार, आंबट पदार्थ, पिठाचे पदार्थ, आनूप मांस वर्ज्य करावें.

N/A

References : N/A
Last Updated : August 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP