नदीकाठी गवतात काही बेडूक खेळून उड्या मारून स्वतःची करमणूक करत होते. ते पाहून तेथील कासवाला आपल्याला उड्या मारता येत नाहीत म्हणून वाईट वाटले. इतक्यात त्या बेडकांना नाचताना पाहून एक घार आकाशातून उतरली व तिने सर्व बेडकांना खाऊन टाकले. ते पाहून एक कासव इतर कासवांना म्हणाले, 'अंगात उडी मारण्याची शक्ती असल्याने मरण येण्यापेक्षा ती शक्ती नसलेली बरी.'
तात्पर्य - देवाने जे गुण जन्मतःच दिलेले असतात तेच हितकारक असतात.