एका शेतकर्याला नदी पार करून जायचे होते, म्हणून पाण्याला उतार कोठे आहे हे पाहण्यासाठी तो नदीच्या काठावर खालीवर फिरू लागला. थोड्या वेळाने तो म्हणाला, 'जिथे पाणी संथ वाहतं तिथे ते फार खोल आहे व जिथे पाण्याचा फार आवाज ऐकू येतो तिथे ते अगदी उथळ आहे.'
तात्पर्य - शांत वाटणारा अगदी आतल्या गाठीचा असल्याने त्याच्याकडून धोका असण्याचा जसा संभव असतो तसा बडबड्या आणि मोकळ्या मनाच्या माणसाकडून नसतो.