एका बागेत एक मधमाश्यांचे पोळे होते. त्यातला मध खाण्यासाठी एक अस्वल तेथे गेले. त्याने त्या पोळ्याला तोंड लावले व आता मध पिणार, तोच सगळ्या मधमाशा त्याच्यावर तुटून पडल्या व त्याच्या नाकातोंडावर चावून त्याला अगदी सतावून सोडले. त्यामुळे ते अस्वल इतके वेडावल्यासारखे झाले की रागाच्या भरात त्याने स्वतःच्या डोक्याची कातडी स्वतःच्या पंजाने फाडून टाकली.
तात्पर्य - प्राणिमात्राच्या संतापाचा अतिरेक झाला की त्या भरात तो स्वतःलाही इजा करून घेण्यास कमी करत नाही.