मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह ४| ग्रीष्म संग्रह ४ दुर्गा चरणाखालिल हाय मीच रज ! कवनकमळें मेनकावतरण जय रतिपतिवर ! शरणागत चुकला बाण मावळत्या सूर्याप्रत घर राहिलें दूर ! पाणपोईवाली वारुणीस्तोत्र जमादार ग्रीष्म विरहांतील जीवन आज पारणें कां फिटलें ? चौकीदार तें कोण या ठायिं ? वायो, खुणव तीस संगीत कलेप्रत तरुणांस संदेश ! शुभं भूयात् कोठें मुली जासि ? पुनः पुनः यावें तुझे चरण पाहिले राजद्रोह कीं देशद्रोह ? ग्रीष्म भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात Tags : b r tambekavipoemकविताकवीभा रा तांबे ग्रीष्म Translation - भाषांतर स्वारि बाइ केवि आलि ! घर्मि अंग अंग न्हालि ! आलि गालिं बाइ लालि, उतरिन जलकुंभ मी ! ध्रु० तापे शिरिं अंशुमालि, आग आग भोवतालि, रखरखीत ह्या अकालिं अग्निच्या जिभा झळा ! १ तरुतळिं बसुनी विवशी रवंथ करिति गाइम्हशी, गुपचुप हे पशुपक्षी दडति गुहाकोटरीं. २ पक्षि एकटा सुतार ठकठक करि बेसुमार, सारखा करी प्रहार, ध्वनि गभीर खोल हा ! ३ पोपट पिंजर्यांत शांत चित्रसा बसे निवांत, श्वान हलुनि नखशिखांत धापा हें टाकितें ! ४ वाटेवर तप्त धूळ, फिरके ना मुळिं पाउल, गांव जणूं निद्राकुल, सामसूम चहुंकडे ५ आगीची उठे लाट, तप्त भिंति, तप्त वाट, तप्त वाट, तप्त खाट, लाहि लाहि काहिली ! ६ ओढ दासिची नितांत, आलां या वेळिं कांत ! पाय धुतें, बसा शांत, वारा मी घालितें ! ७ N/A कवी - भा. रा. तांबे जाति - अरुण राग - सारंग ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर दिनांक - १८ ऑक्टोबर १९३५ Last Updated : October 11, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP