मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह ४| संगीत कलेप्रत संग्रह ४ दुर्गा चरणाखालिल हाय मीच रज ! कवनकमळें मेनकावतरण जय रतिपतिवर ! शरणागत चुकला बाण मावळत्या सूर्याप्रत घर राहिलें दूर ! पाणपोईवाली वारुणीस्तोत्र जमादार ग्रीष्म विरहांतील जीवन आज पारणें कां फिटलें ? चौकीदार तें कोण या ठायिं ? वायो, खुणव तीस संगीत कलेप्रत तरुणांस संदेश ! शुभं भूयात् कोठें मुली जासि ? पुनः पुनः यावें तुझे चरण पाहिले राजद्रोह कीं देशद्रोह ? संगीत कलेप्रत भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात Tags : b r tambekavipoemकविताकवीभा रा तांबे संगीत कलेप्रत Translation - भाषांतर अतां राहु देइं नाम भजनिं कळाहीन राम ! ध्रु० रागरागिणीमधून ऐश्वर्ये नटुन सजुन येइ ह्रदयपट उघडुन राम परमसौख्यधाम ! १ नृत्य करिति तुझे सूर, भरुनि भरुनि येइ ऊर, तान-लय-निकुंजिं चूर राम इंद्रनील शाम ! २ नलगे मज पुजापाठ, दंभाचा थाटमाट, गायनि तव ह्या विराट राम मुनिमनोभिराम ! ३ ऐकतांच तुझी टीप उजळति जणुं रत्नदीप स्वर्ग येइ का समीप ? राम दिसे पूर्णकाम ! ४ ऐकतांच तुझी तान घेई मन हें विमान. तमःपटावरि उडाण ! विमल तेजिं घे विराम ५ मनचक्षुच्या भवती थय थय थय नृत्य करिति स्वर्ललना ज्योतिष्मति ही पुजा खरी अकाम ! ६ N/A कवी - भा. रा. तांबे जाति - जीवनलहरी राग - तोडी ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर दिनांक - १४ फेब्रुवारी १९३६ Last Updated : October 11, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP