मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|अनंत काणेकर|संग्रह १| चंदाराणी संग्रह १ चांदराती खाडीच्या किना-यावर प्रीतिची हूल फुकट ना तरी !' थांब थांब, बाले आतां------ स्मृती माझी परि नसे तुला बाई ' प्रेम आणि पतन चटका बाजू उलटली ! भावबंधन एकलेपणाची आग चंदाराणी संध्यासंगीत गुलाबांचा हार एक स्वप्न सावल्यांचे गाणें. नि:श्वासगीत ऐरण एके रात्रीं जोडपे पंचप्राण त्याचे गाणे तिचे गाणे चांदरात रानगीत खूळ त्यांचें प्रेम दैविकता चिमुकल्यास स्वर्ग दोनच बोटें उरला ! प्रीतीची त-हाच उलटी असे ! जेव्हां चिंतित प्रीति मीं म्हटलें गाइन १ मीं म्हटलें गाइन २ जइं भेटाया तुज एक करुणकथा प्रेमळ पाहुणा दिवाळी, तो आणि मी 31 डिसेम्बर १९२६ ची मध्यरात्र. 31 डिसेम्बर १९२६ ची मध्यरात्र. नळावर तणतणून भांडणार्या एका बाईस एकाचे गाणें माझे गाणें दोन चुंबने तिमदन कोळ्याचें गाणे बेगमेच्या विरहगीता'ला शिवाजीचें उत्तर लग्नघरातील स्वयंपाकिणींचें गाणे कवने दोन देवभक्त कोणि म्हणती फासावरुन मी करितों तुजवर प्रेम चालली मिरवणुक कागदी फुलें मोरपिसें आणि कावळा पतंगप्रीत चंदाराणी अनंत काणेकर यांच्या कवितेत, भावनेची उत्कटता, आणि तिचे प्रकटन होण्यासाठी अनुरूप अशी रससिद्ध भाषाशैली यांची एकजीव जुळणी झालेली आहे. Tags : anant kanekarkavitaअनंत काणेकरकविता चंदाराणी Translation - भाषांतर निळ्या निळ्या आकाशांत शोधाया आलें नाथ. शुभ्र ढगांचा- -मऊ पिसांचा करुनि गालिचा, जरा पहुडलें त्यावरती घेण्याला क्षण विश्रांती. चैन मुळीं नच पडे परी; तशीच फिरलें माघारीं. मेघनगांच्या घनकुहरीं धुंडधुंडिलें किती तरी ! चपला येउनि मजजवळी, 'शोधाया जातें ' वदली. इथें पळाली, तिथें भटकली, पुन्हा चमकली; चंचल परि त्या बालेला तो कुठचा गवसायाला ! मग म्हटले जावें आतां, पाताळीं शोधित नाथा. शोधुनि दमलें, विकल जाहलें, तेज पळालें; अश्रूंचा वाहे पूर ! जीवाभावाच्या सखया तारा भेटाया आल्या. त्या मधल्या वदल्या कोणी, 'नका भिऊं, चंदाराणी ! जलधीमध्यें शिरतांना, दिसला आम्हां रविराणा.' ऐकुनि त्यांच्या वचनाला, किति उठल्या झणिं जाण्याला. रविरायाला शोधायाला जलधितळाला, उडया पटापट त्या घेती जीवाची सोडुनि भीती ! किती जाहलीं युगें तरी, अशीच फिरतें पिशापरी ! प्रेमामृत जोंवरि जवळी, आशा तोंवर ना सुटली ! N/A References : कवी - अनंत काणेकर दिनांक - ९ नोव्हेम्बर १९२२ Last Updated : October 11, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP