मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|अनंत काणेकर|संग्रह १| सावल्यांचे गाणें. संग्रह १ चांदराती खाडीच्या किना-यावर प्रीतिची हूल फुकट ना तरी !' थांब थांब, बाले आतां------ स्मृती माझी परि नसे तुला बाई ' प्रेम आणि पतन चटका बाजू उलटली ! भावबंधन एकलेपणाची आग चंदाराणी संध्यासंगीत गुलाबांचा हार एक स्वप्न सावल्यांचे गाणें. नि:श्वासगीत ऐरण एके रात्रीं जोडपे पंचप्राण त्याचे गाणे तिचे गाणे चांदरात रानगीत खूळ त्यांचें प्रेम दैविकता चिमुकल्यास स्वर्ग दोनच बोटें उरला ! प्रीतीची त-हाच उलटी असे ! जेव्हां चिंतित प्रीति मीं म्हटलें गाइन १ मीं म्हटलें गाइन २ जइं भेटाया तुज एक करुणकथा प्रेमळ पाहुणा दिवाळी, तो आणि मी 31 डिसेम्बर १९२६ ची मध्यरात्र. 31 डिसेम्बर १९२६ ची मध्यरात्र. नळावर तणतणून भांडणार्या एका बाईस एकाचे गाणें माझे गाणें दोन चुंबने तिमदन कोळ्याचें गाणे बेगमेच्या विरहगीता'ला शिवाजीचें उत्तर लग्नघरातील स्वयंपाकिणींचें गाणे कवने दोन देवभक्त कोणि म्हणती फासावरुन मी करितों तुजवर प्रेम चालली मिरवणुक कागदी फुलें मोरपिसें आणि कावळा पतंगप्रीत सावल्यांचे गाणें. अनंत काणेकर यांच्या कवितेत, भावनेची उत्कटता, आणि तिचे प्रकटन होण्यासाठी अनुरूप अशी रससिद्ध भाषाशैली यांची एकजीव जुळणी झालेली आहे. Tags : anant kanekarkavitaअनंत काणेकरकविता सावल्यांचे गाणें. Translation - भाषांतर तेजाची आम्ही बाळे, रूप जरी अमुचें काळें ! लहान वा कोणी मोठी ससेमिरा अमुचा पाठी ! जनी स्मशानीं कुठे तरी, अशी तरळतों पिशांपरी. मेघांच्या काळ्या पंक्ती निळ्या नभीं जेव्हां फिरती राक्षसरूपांना धरुनी मंद मंद आम्ही फिरतों; निळ्या जळा काळें करितों पीतारुण संध्या बघुनी वंदन दिर्घ सरूं पडुनीं ! मग येई रजनीमाई पदराखालिं अम्हा घेई. चांद्ण्यांत अमुची माया भुताटकी गमते हृदया. पांढुरक्या तेजांतून कुठें कुठे बसतों दडुन. पांढुरक्या वाटेवरुनी एकलेच फिरती कोणी, लपत छपत पाठुनि त्यांच्य़ा फिरत असूं आम्ही वेड्या ! पानांचें पसरुनि जाल आणिक पारंब्या लोल, वट कोणी ध्यानस्थ बसे; मंद अनिल त्या डुलवितसे. मग अमुचीं रुपे डुलति; बाळांना बागुल दिसती जुनाट हे पड्के वाडे, पर्णहीन त्यांतिल झाडें धवल चंद्रिका रंगविते; आम्ही मग त्यांतील भुतें ! जर का कुणि चुकुनी आला वाटसरू रात्रींमधला, बघुनि विकट अमुचे चाळे चरकुनि तो मागेंच वळे ! प्रेम स्थल अमुचें एक; त्यासाठी विसरुनि भूस, दाहि दिशा मागुनि फिरणें ही अमुची वेडी प्रीत झिडकारा - मारा लाथ ! N/A References : कवी - अनंत काणेकर दिनांक- १२ मे १९२५ Last Updated : October 11, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP