हळद, कुंकू, गुलाल, रांगोळी, अगरबत्ती, अत्तर, कापूर एक मोठी डबी, जानवी जोड, नारळ ८, तांदूळ २ किलॊ, गहू १ किलो, सुपार६या १५०, खडीसाखर, गूळ, खोबर्याच्या वाट्या ४, विड्याची पाने ३५, पेढे, फळे, केळी, फुले, तुळस, बेलाची पाने, दूर्वा (हवनासाठी मुळासह भरपूर), पंचामृत, आंब्याचे डहाळे ८-१० सुटे पैसे (३०-३५ रुपयांची नाणी), समिधा ४५० (किंवा अन्वाधानाच्या प्रमाणाप्रमाणे) होमासाठी इंधन- लाकडाचे तुकडे २ किलो, कोळसे १ किलो, शेण्या २-३, गोमूत्र, गोमय (गाईचे शेण), साजूक तूप अर्धा किलो, पिवळी मोहरी (न मिळाल्यास साधी मोहरी) ५० ग्रॅम, काळे तीळ २५० ग्रॅम, काळे उडीद ५० ग्रॅम, दर्भ, एक किलो गव्हाचे पीठ, सप्तधान्य, ४ लोखंडी खिळे, कच्चा धागा, बेलफळ (मिळाल्यास), होमकुंड किंवा १६ विटा, वाळू किंवा माती, समईत तेल, नीरांजनात तुपाची फुलवात, दारावर तोरण.
वस्तु - पाट ८-१०, तांब्याचे तांबे ५, ताम्हन २, पळी पंचपात्र २, हळदकुंकू वगैरेसाठी ४-५ छोट्या वाट्या, ताटे किंवा प्लेट ३-४, चमचे ३-४, वाट्या किंवा फुलपात्री १०-१२, छोट्या डिश ५-६, रिकामा मोठा बाऊल किंवा बादली,अगरबत्ती स्टॅंड सोन्याची किंवा चांदीची वास्तुप्रतिमा, पंचरत्नांचे खडे(माणिक, मोती, प्रवाळ, पुषकराज, हिरकणी, नीलम, लसण्या यापैकी पाच रत्ने), सोन्याची शलाका (तार), प्रतिमा मावेल एवढी डबी, पंचधातूचा छोटा तुकडा.
वस्त्रे - ब्लाऊज पीस ४, पंचे ३, धोतर १, टोपी १, टॉवेल १, साडी १, सौभाग्य वायनाचे साहित्य (आरसा, फणी, कुंकवाचा करंडा, काजळ डबी, मणी मंगळसूत्र, बांगड्या इत्यादी साहित्य) आचार्य व विप्रांना यथाशक्ति वस्त्रदान.