विधी - ११
रेखा करणम्
शिख्यादि देवतांचे जे वास्तुपीठ मांडलेले आहे त्यावर सोन्याच्या शलाकेने (तारेने) किंवा दर्भाने रेघा ओढणे यालाच रेखाकरण असे म्हणतात. या रेघा ओढताना पश्चिमेपासून सुरू करून पूर्वेकडे दहा उभ्या रेघा ओढाव्यात. त्यावेळी खालील देवतांची नावे घ्यावीत.
१. ईशान्यै नमः ।
२. यशोवत्यै नमः ।
३. कांतायै नमः ।
४. विशालायै नमः ।
५. प्राणवाहिन्यै नमः ।
६. सत्यायै नमः ।
७. सुमत्यै नमः ।
८. नंदायै नमः ।
९. सुभद्रायै नमः ।
१०. सुरथायै नमः ।
यानंतर दक्षिणेकडून उत्तरेकडे दोन दोन बोटांच्या अंतराने १० आडव्या रेखा ओढाव्यात. त्यावेळी खालील देवतांची नावे घ्यावीत. आकृती पहा.
११. हिरण्यायै नमः ।
१२. सुव्रतायै नमः ।
१३. लक्ष्म्यै नमः ।
१४. विभूत्यै नमः ।
१५. विमलायै नमः ।
१६. सत्यायै नमः ।
१७. सुमत्यै नमः ।
१८. बालायै नमः ।
१९. विशोकायै नमः ।
२०. इडायै नमः ।