विधी - १
यज्ञोपवीत धारण विधी
द्विराचम्य । ॐ केशवाय नमः । ॐ नारायणाय नमः । ॐ माधवाय नमः । ॐ गोविंदाय नमः । श्री कृष्णाय नमः । वरदमूर्तये श्रीमन्महागणपतये नमः । निर्विघ्नमस्तु । तिथिर्विष्णुस्तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव चं । योगश्च करणं चैव सर्व विष्णुमयं जगत् । अद्येत्यादि वर्तमान एवं गुन विशेषणविशिष्टायां शुभ पुण्यतिथौ । मम आत्मनः सकल शास्त्र पुराणोक्त फल प्राप्तर्थं श्री परमेश्वर प्रीत्यर्थं उपाकर्मांगत्वेन यज्ञोपविताभिमंत्रणं धारणं च करिष्ये ।
(उदक सोडावे.) तीन पदराचे यज्ञोपवीत प्रथम घ्यावे. ब्रह्मगाठीजवळ ते डाव्या आंगठ्यात अडकवावे व उर्वरीत भाग गोळा करून मुठीत धरावे. त्या यज्ञोपवीतावर उजव्या हाताने पाणी घालून ते भिजवावे. त्यावेळी म्हणावे,
ब्रह्मणे नमः । विष्णवे नमः । रुद्राय नमः । त्र्यंबकाय नमः । आपो देव्य ऋषीणां विश्वधात्र्यो दिव्यामदन्त्यौ याः शंकराः धर्मधात्र्यः । हिरण्यवर्णाः पावकाः शिवतमेन रसेन श्रेयसो मां जपंतु ॥
अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा । यः स्मरेत् पुंडरीकाक्षं सबाह्याभ्यंतरः शुचिः ॥
यज्ञोपविताचे एकंदर नऊ तंतू असतात त्यातील एकेक पदर धरीत म्हणावे-
परमेष्ठिनं प्रथम तंतौ न्यसामि । वन्हिं द्वितीय तंतौ न्यसामि । सर्पांस्तृतीय न्यसामि । चंद्रमसं चतुर्थ तंतौ न्यसामि । पितृन् पंचम तंतौ न्यसामि । प्रजापतिं षष्ठं तंतौ न्यसामि । वायुं सप्त तंतौ न्यसामि । सूर्य़ं अष्टम तंतौ न्यसामि । विश्वान् देवान् नवम तंतौ न्यसामि ।
यानंतर दहा वेळा खालील गायत्री मंत्र म्हणावा...
यो देवः सवितास्माकं धियो धर्मादि गोचरे । प्रेयरेतस्य तद्भर्गस्तवरेण्य्म उपास्महे ।
खालील मंत्र म्हणत यज्ञोपवीत सूर्यास दाखवावे.
परोरजः सवितुर्जातवेदो देवस्य भर्गो मनसेंद जजान । सुरेसाऽदः पुनराविश्य चष्टे हंसं गृध्राणं नृषद्रिं गिरामिमः ॥
अशा प्रकारे यज्ञोपवीत सूर्यास दाखविल्यानंतर उजव्या हातातून यज्ञोपवीत घालण्यास द्यावे.
यज्ञोपवीतं सहजं विधातुरनादिदिव्य परमं पवित्रम् । तेजोबलयुष्प्रमुज्ज्वलं च श्रेष्ठं स्वकण्ठे प्रतिमुंच एतत् ॥
असे म्हणून यज्ञोपवीत धारण करावे. पुन्हा द्विराचमन करावे.
यजमानाची सोडमुंज झाली असल्यास असेच तीन पदरांचे यज्ञोपवीत अभिमंत्रित करून धारण करावयास द्यावे. त्यानंतर जीर्ण यज्ञोपवीत कमरे खालून पायातून काढावे. एक पदर तोडावा व विसर्जन करावे.