विधी - ३१
गृहप्रवेश
एव्म प्रथमेह्वि वास्तुशांति विधाय द्वितोयेह्नि सुमुहूर्ते तदहरेववा गृहप्रवेशं कुर्यात् ।
नवंजलपूर्णं पल्लवोपेतं दुर्वायुतं गंधाक्षतसुधालिप्तं वस्त्रवेष्ठितं सपूर्णपात्रं सफलं कलशं अंजलिना गृहित्वा
यजमानो ब्राह्मणान्वितः सदारपुत्रस्तूर्यघोषेण स्वस्तिसूक्तेन कनिक्रददितिच गृहं प्रविश्य प्रधानगृहमध्ये धान्योपरितं कलशं स्थापयेत् ।
ततो गृहस्थैर्यार्थ ब्राह्मणैः पुण्याहं वायचित्वा तान्संपूज्य तैस्त्रिः शिवं वास्तु इति वाचयिष्ये । इतिगृहप्रवेशः ॥
प्रथमेन्हि वास्तुशांतीचे विधीपूर्ण करून द्वितीयेन्हि किंवा त्याचवेळी गृहप्रवेश करावा. नवीन (कोरा), शुद्धपाण्याने भरलेला, पल्लव दूर्वा गंधाक्षत वगैरे घातलेला वस्त्रवेष्टित पूर्णपात्रासह सफल (नारळ ठेवलेला) असा कलश हातात धरून ब्राह्मणांसह यजमानाने सपत्नीक पुत्रांसह मंगल घोषाने घरात प्रवेश करावा. त्या वेळी ब्राह्मणांनी कनिक्रदद वगैरे स्वस्तिसूक्ते म्हणावीत. नंतर तो कलश प्रधानगृहामध्ये (घरात सोईनुसार योग्य जागेवर) धान्यावर स्थापन करावा. विधिवत् कलशपूजन करते वेळी गृहस्थैर्यासाठी ब्राह्मणांनी पुण्याहवाचन (कमीतकमी पंचवाक्यैः) करावे. शिवंवास्तु वगैरे म्हणावे.