विधी - १०
शिख्यादि वास्तुपीठ देवता मांडणी
चौरंगावर किंवा पाटावर किंवा जमिनीवर पेपर पसरून त्यावर पंचा किंवा अन्य वस्त्र पसरावे. त्यावर तांदूळ पसरावेत. त्यावर ६१ देवतांचे वास्तुपीठ (सुपार्या) मांडावे. त्यासाठी शेवटी दिलेली आकृती-चार्टचा वापर करावा. त्याच्या उत्तरेस कलश स्थापन करावा.
खिळे रोवण्याचे मंत्र
वास्तुपीठाच्या ईशान्येस कलश स्थापन करण्यासाठी तांदळाचा ढीग घालून ठेवावा. पाटाच्या चार कोपर्यात कणकीचे चार मुटके ठेवून चार खिळे रोवावेत. खिळे वेगळे केळावर, बटाट्यावर किंवा अन्य प्रकारे रोवावेत. त्या खिळ्यांभोवती कच्या धाग्याचे चार फेरे द्यावेत. कणकीच्या मुटक्यांना काळे उडीद लावावेत. ईशान्येपासून प्रत्येक खिळा रोवताना खालील मंत्र म्हणावा.
विशंतु भूतले नागा लोकपालश्च सर्वशः । अस्मिन् गृहेऽऽव तिष्ठंतु आयुर्बल कराः सदा । अग्निभ्योप्यथ सर्पेभ्यो ये चान्ये तत्समाश्रिताः । तेभ्यो बलिं प्रयच्छामि पुण्यपिष्ठममुत्तमम् ।