मराठी मुख्य सूची|विधी|शांती विधी|प्रकार १|
कुल, ग्राम, स्थानदेवता पूजन, वास्तुपूजन

कुल, ग्राम, स्थानदेवता पूजन, वास्तुपूजन

वास्तु्शांती म्हणजे वास्तु उभारताना यजमानाच्या हातून विविध चुका होतात किंवा दोष घडतात, त्यांची शांती. वास्तुपुरुषाची शांती नव्हे.


विधी - ३

पूजेची मांडणी -
पुण्याहवाचनासाठी एका पाटावर मध्यभागी तांदुळाचे दोन ढीग घालावेत. त्यावर वरुणाचे दोन कलश मांडावेत. महागणपतीची सुपारी तांदुळावर मांडावी. कलशांच्या उत्तरेस मातृकांची स्थापना करावी. गणपतीसाठी एक, वरुणासाठी दोन, मातृकांसाठी एक असे विडे मांडावेत. साहित्य असेल त्याप्रमाणे देवतांसाठी वस्त्रे, नारळ, फळे वगैरे मांडावीत. यजमानाच्या कुलदेवतेसाठी एक विडा व नारळ ठेवावा. त्याचप्रमाणे ग्रामदेवता, स्थानदेवतेसाठी सुद्धा एक विडा व नारळ ठेवावा. यजमान पति-पत्‍नीस हळद-कुंकू लावणार्‍या सवाष्ण स्त्रीस देण्यासाठी एक विडा ठेवावा. मुख्य विप्रास देण्यासाठी एक विडा ठेवावा. अशा रीतीने विडे व नारळ ठेवावेत. पाटाभोवती रांगोळी काढावी. त्यानंतर यजमान पत्‍नीस यजमानाच्या उजव्या अंगास बसवून पूजेस सुरुवात करावी.

प्रथम यजमान पत्‍नीस सवाष्ण स्त्रीने हळद-कुंकू लावावे. यजमानांच्या कपाळी ओल्या गंधाचे बोट किंवा कुंकू लावावे. या सवाष्ण स्त्रीस यजमानांच्या हस्ते विडा द्यावा.

करोतु स्वस्ति ते ब्रम्हा स्वस्तिवाऽपि द्विजातयः । सरीसृपाश्च ये श्रेष्ठास्तेभ्यस्ते स्वस्ति सर्वदा । स्वहा स्वधा शची चैव स्वस्ति कुर्वंतु ते सदा । लक्ष्मीररुंधती चैव कुरुतां स्वस्ति ते सदा ।

कुलदेवता, आराध्यदेवता, स्थानदेवता, वास्तुदेवता यांची पूजा करावी. त्याचा संकल्प

करिष्यमाण कर्मांगत्वेन कुलदेवता, आराध्यदेवता, स्थानदेवता, वास्तुदेवता आदि कृपाप्रसाद सिद्ध्यर्थं तांबुलादि प्रदानं करिष्ये ।

हातावरून पाणी सोडावे. वरील संकल्प म्हणून आपली कुलदेवता, ग्रामदेवता यांचे स्मरण करावयास सांगावे व कुलदेवतेसाठी ठेवलेल्या विड्यातील सुपारीवर हळद-कुंकू, अक्षता, फुले वाहावीत. नारळावर पाणी सोडावे. नमस्कार करावा. नंतर हा नारळ व विडा उचलून घरातील देव्हार्‍यात ठेवायला सांगावे.

पवित्रं धृत्वा

असे म्हणून यजमानास पवित्रक (दर्भाची बनविलेली अंगठी) बोटात घालावयास द्यावी.

यानंतर महागणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन वगैरे विधीसाठी सुरुवात करावी. त्याकरिता यजमानास पुन्हा आचमन करावयास सांगावे.

यजमान-आचम्य ।

औं केशवाय नमः । नारायणाय नमः । माधवाय नमः । गोविंदाय नमः । विष्णवे नमः । मधुसूदनाय नमः । त्रिविक्रमाय नमः । वामनाय नमः । श्रीधराय नमः । ह्रषिकेशाय नमः । पद्मनाभाय नमः । दामोदराय नमः । संकर्षणाय नमः । वासुदेवाय नमः । प्रद्युम्नाय नमः । अनिरुद्धाय नमः । पुरुषोत्तमाय नमः । अधोक्षजाय नमः । नारसिंहाय नमः । अच्युताय नमः । जनार्दनाय नमः । उपेंद्राय नमः । हरये नमः । श्रीकृष्णाय नमः । प्राणायामः ।

गायत्री मंत्र - यो देवः सवितास्माकं धियो धर्माधि गोचरे । प्रेरयेत्तस्य तद्‌भर्गस्तद्वरेण्यं उपास्महे ।

वरद मूर्तये श्रीमन्महागणाधिपतये नमः । इष्ट देवताभ्यो नमः । कुलदेवताभ्यो नमः । ग्रामदेवताभ्यो नमः । स्थानदेवताभ्यो नमः । वास्तुदेवताभ्यो नमः । माता पितृभ्यां नमः । ही लक्ष्मी नारायणाभ्यां नमः । सर्वेभ्यो देवेभ्यो नमः । सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः ।

निर्विघ्नमस्तु ।

सुमुखश्चैकदंतश्च कपिलो गजकर्णकः । लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः । धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजाननः । द्वादशैतानि नामानि यः पठेत् श्रृणुयादपि । विद्यारंभे विवाहेच प्रवेशे निर्गमे तथा । संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते । शुक्लांबर धरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं । प्रसन्न वदनं ध्यायेत् सर्व विघ्नोपशांतये । सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके । शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोऽस्तुते । सर्वदा सर्व कार्येषु नास्ति तेषाममंगलम् । येषां ह्रदिस्थो भगवान् मंगलायतनं हरिः । तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव । विद्या बलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेघ्रिंयुगं स्मरामि । लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः । येषामिंदी वरश्यामो ह्रदयस्थो जनार्दनाः । विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् । सरस्वतीं प्राणम्यादौ सर्वकामार्थ सिद्धये । अभीप्सितार्थ सिद्ध्यर्थं पूजितो यः सुरासुरैः । सर्व विघ्न हरस्मस्मै गणाधिपतये नमः । सर्वेष्वारब्ध कार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वराः । देवा दिशंतु नः सिद्धि ब्रह्मेशान् जनार्दनः ।

यानंतर यजमान पती-पत्‍नीच्या हातात थोड्या अक्षता द्याव्यात व पुढील संकल्प सांगावा.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP