विधी - ३०
वृष वास्तु (प्रतिमा) निक्षेप
वास्तुशांतीत आपण ज्या वास्तू प्रतिमेची पूजा केली ती प्रतिमा घराच्या आग्नेय कोपर्यात एक खड्डा खणून त्यात निक्षेप करावयाची असते. जर निक्षेप करावयाची नसेल तर आपल्या देव्हार्यात कायमस्वरूपी बंद डबीत ठेवावी. डबी कधीही न उघडता बाहेरूनच या वास्तुप्रतिमेची पूजा करावी.
निक्षेप करण्याकरिता जो खड्डा खणलेला असेल त्या खड्ड्यास गाईच्या शेणाने सारवुन घ्यावे. शेण नसेल तर पाणी शिंपडून ती जागा शुद्ध करून घ्यावी. त्यानंतर
सर्वेषामाश्रया भूइर्वराहेण समुद्धृता । अनंत सस्य दात्री या तां नमामि वसुंधराम् ।
श्री धरादैव्ये नमः सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि । हरिद्रां कुंकुमम् समर्पयामि । नमस्करोमि ।
असे म्हणून त्या जागेची पूजा करावी. त्यानंतर
पूजितोसि मया वास्तो होमाद्यैरर्चनैः शुभैः । प्रसीद पाहि विश्वेश देहि मे गृहजं सुखम् ।
वास्तोष्पते नमस्तुभ्यं भूशैया भिरत प्रभो । मद्गेहं धनधान्यादि समृद्धं कुरु सर्वदा ।
हा मंत्र म्हणत एक डबी घेऊन त्या डबीत सप्त धान्य, पंचरत्न, पंचामृत, हळद-कुंकू, अक्षता, फुले वगैरे घालावे. त्यानंतर वास्तु प्रतिमा पालथी करून डबीत ठेवावी व डबीचे झाकण बंद करावे. वास्तु पुरुषाचे डोके कोठे आहे तेथे खूण करून ठेवावी. यानंतर ही डबी त्या खड्ड्यात ठेवताना वास्तु पुरुषाचे डोके आग्नेय दिशेस करावे. खड्डा सिमेंट किंवा मातीने बंद करावा.
सशैलसागरा पृथ्वीं यथा वहसि मूर्धनि । तथा मां वह कल्याण संपत्संततिभिः सह । शिवं वास्तु । शिवं वास्तु । शिवं वास्तु ।
अशी प्रार्थना करावी.