बाळा श्रीकृष्ण, देवकिच्या नंदना बाळा जू जू रे
व्हतास कैलासी, अल्लक नीरंजना बाळा जू जु रे
आलास अवतारी, कौसल्येच्या उदरीं
करीशी पालना, सुखी करोंव जना बाळा जू जू रे
येऊनी रामानीं, सोडीलें बंधना
येउदीं ( युद्धांत ) हटेना, ऋषी करी वंदना बाळा जू जू रे
राम जन्मले, न्हाई कुनी वळकीले
कुनाला कळेना, वसीष्ट जाने खुना बाळा जू जू रे
कौसल्येच्या गर्बांत, आठ वर्साची मूर्त
घालसी धिंगाना, कुठं आहे रावना बाळ जू जू रे
अवतार निर्गून, उडवो रावनाची मान
मारीला कुंबकर्न, राज दिलें बिभीसैन बाळा जू जू रे
आनंद अवघ्याला, तेतीस कोटी देवाला
इंद्र करीं गायना, नारद वाजवी वीना बाळा जू जू रे
राम बोध झाला, कीरीत भावना
खून दिली पुरना, काय करावें कळेना कळेना बाळा जू जू रे
दिवस सोमवारी, लावून ज्ञानाची दोरी
केले पालना, सुखीं ठेविलें जना बाळा जू जू रे