मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अंगाईगीत|संग्रह १|

अंगाईगीत - चांदुकल्या सोनुकल्या क...

मोजक्या आणि शेलक्या शब्दांचा वापर करून निर्माण झालेलें अंगाईगीत काव्य प्रामाणिकपणें मनांत आलेल्या आईच्या भावनेचा आविष्कार करते.


चांदुकल्या सोनुकल्या

किती देऊं ठाळ्या

किती गाऊं गाणीं

कशी कशी पाखराची मिटेना पापणी

चाफेकळी सोनकळी

गालावर खळी

पायामध्यें वाळा

कसा कसा सरेना ग कमळाचा चाळा

हांस गडे हांस

चांदणीचा भास

चांदण्याचे कळे

हांसतांना पेंगुळले डोळे भोळे भोळे

N/A

References :

कवी - शिरीष पै

Last Updated : January 02, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP