मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अंगाईगीत|संग्रह १|

अंगाईगीत - जो जो रे जो जो श्रीरामचंद...

मोजक्या आणि शेलक्या शब्दांचा वापर करून निर्माण झालेलें अंगाईगीत काव्य प्रामाणिकपणें मनांत आलेल्या आईच्या भावनेचा आविष्कार करते.


जो जो रे जो जो श्रीरामचंद्रा । दशरथपुत्रा लागो निद्रा ॥ध्रु०॥

केवळ कांचनी-पाळणा आणिला । तुजसाठी बा रेशमी विणिला ॥१॥

खूर रुप्याचे चहुबाजूंना हंतरीलासे आंत बिछाना ॥२॥

भर्जरी चांदवा रेशमी शेला । चिमण्या मोत्यांची झालर त्याला ॥३॥

हंस कोकीळ ते इंद्रनीळाचे । बसवीले शुक मोर पोवळ्यांचे ॥४॥

हालवी कौसल्या दशरथ बाळा । वंदिले कृष्ण त्या विश्वपाळा ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 26, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP