मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय सातवा|
श्लोक ६ वा

एकनाथी भागवत - श्लोक ६ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


त्वं तू सर्वं परित्यज्य स्नेहं स्वजनबन्धूषु ।

मय्यावेश्य मनः संयक् समदृग्विचरस्व गाम् ॥६॥

उद्धवा तूं यालागीं । येथोनि निघावें लागवेगीं ।

एकलाचि आंगोवांगीं । हितालागीं सर्वथा ॥२९॥

धनधान्यसमृद्धीसीं । सांडावें स्वजनगोत्रजांसी ।

भ्रातादूहितानिजभगिनींसी । स्त्रीपुत्रासी त्यजावें ॥३०॥

स्नेहो ठेवूनि घरदारीं । अंगें तूं जरी निघालासि बाहेरी ।

तरी तो त्याहूचि कठिण भारी । अनर्थकारी होईल ॥३१॥

आधीं समूळ स्नेहो सांडावा । पाठीं अभिमानुही दंडावा ।

वासनाजटाजूट मुंडावा । मग सांडावा आश्रमु ॥३२॥

स्नेहो कैसेनि सांडे । अभिमानु कैसेनि दंडे।

हें तूज वाटेल सांकडें । तरी रोकडें परियेसीं ॥३३॥

माझें स्वरूप जें सर्वगत । तेथ ठेवोनियां चित्त ।

सावधानें सुनिश्चित । राहावें सतत निजरूपीं ॥३४॥

तये स्वरूपीं चित्ता । निर्धारेंसीं धारणा धरितां ।

निजभावें तन्मयता । तद्रूपता पावेल ॥३५॥

भृंगी जड कीटी मूढ । ध्यानें तद्रूप होय दृढ ।

अभ्यासीं कांहीं नाहीं अवघड । तो अभ्यास गूढ विशद केला ॥३६॥

माझें स्वरूप ज्ञानघन । ध्याता जीवु स्वयें सज्ञान ।

या स्थितीं करितां ध्यान । सहजें जाण तद्रूप ॥३७॥

तेथ समसाम्यें समस्त । समत्व पावेल चित्त ।

तेणें समभावें निश्चित । जेथींच्या तेथ रहावें ॥३८॥

आधीं गृहाश्रमातें त्यागावें । मग म्यां म्हणसी कोठें राहावें ।

ऐसें मानिसील स्वभावें । तेविखीं बरवें परियेसीं ॥३९॥

स्वरूपसाम्यें समदृष्टी । समभावें विचरें सृष्टीं ।

निवासस्थानांची आटाटी । सर्वथा पोटीं न धरावी ॥४०॥

जेथ अल्प काळ वसती घडे । त्या ठायाचा अभिमान चढे ।

वसतिस्थान ऐसें कुडें । वस्तीचें सांकडें सर्वथा न धरीं ॥४१॥

तूं सर्वीं सर्वगत होसी । सर्वाधार सर्वदेशी ।

ऐसा मी होऊन मज पावसी । न हालतां येसी निजधामा ॥४२॥

मज निजधामा न्यावें। होतें पुशिलें उद्धवें ।

तें निजबोधस्वभावें । स्वयें केशवें सांगितलें ॥४३॥

न करितां हे उपायस्थिती । सर्वथा न घडे माझी प्राप्ती ।

मग तूं निजधामाप्रती । कैशा गती येशील ॥४४॥

गरुडीं वाऊनि वेगेंसीं । न्यावें निजधामा म्हणसी ।

गति तेथ नाहीं पाखांसी । गम्य गरुडासी तें नव्हे ॥४५॥

सांडूनि उभय पक्षांसी । साधक पावती मद्रूपासी ।

पक्षाभिमान असे गरुडासी । गमन त्यासी तेणें नव्हे ॥४६॥

म्हणसी न्यावें घेवोनि खांदीं । मज खांदूचि नाहीं त्रिशुद्धी ।

तूज न सांडितां अहंबुद्धी । गमनसिद्धी तेथ नाहीं ॥४७॥

न त्यागितां अहंभावस्थिती । केल्या नाना उपाययुक्ती ।

तेणें निजधामाप्रती । नव्हे गती सर्वथा ॥४८॥

जें जें देखसी साकार । तें तें जाण पां नश्वर ।

तेचि विखींचा निर्धार । करीं साचार निजबोधें ॥४९॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP