मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय सातवा|
श्लोक १५ वा

एकनाथी भागवत - श्लोक १५ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


त्यागोऽयं दूष्करो भूमन् कामानां विषयात्मभिः ।

सुतरां त्वयि सर्वात्मन्नभक्तैरिति मे मतिः ॥१५॥

पाहतां या त्यागाची रीती । मज तंव दूर्धरु गा श्रीपती ।

मग इतरांची येथ मती । कवण्या स्थितीं होईल ॥६५॥

कामु जयाच्या चित्तीं । विषयीं आसक्त मती ।

त्यासी या त्यागाची गती । नव्हें श्रीपति सर्वथा ॥६६॥

तूझी कृपा जंव नव्हे । तंव ते अभक्तां केवीं करवे ।

त्यागु बोलिला जो देवें । तो सर्वांसी नव्हे सर्वथा ॥६७॥

तूं सर्वात्मा असतां हृदयीं । चित्त प्रवेशेना तूझे ठायीं ।

तें आवरिलें असे विषयीं । नवल कायी सांगावें ॥६८॥

ऐसे प्रपंची आसक्त । यालागीं विमुख झाले अभक्त ।

त्यांसी त्यागु नव्हे हा निश्चित । चित्त दूश्चित सर्वदा ॥६९॥

त्यागु कां नव्हे म्हणसी । तें परिस गा हृषीकेशी ।

कठिणत्व जें त्यागासी । तें तूजपाशीं सांगेन ॥१७०॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP