मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय सातवा|
श्लोक २७ वा

एकनाथी भागवत - श्लोक २७ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


प्रायो धर्मार्थकामेषु विवित्सायां च मानवाः ।

हेतूनैव समीहन्ते आयुषो यशसः श्रियः ॥२७॥

प्रायशा ये लोकीं लोक । धर्म‍अर्थकामकामुक ।

येचिविखीं ज्ञान देख । आवश्यक करिताति ॥८२॥

आम्ही स्वधर्म करितों म्हणती । स्नानसंध्येची कीर्ति मिरविती ।

शेवटीं गायत्रीचें फळ देती । अर्थप्राप्तीलागोनी ॥८३॥

वेदोक्त आम्ही करितों याग । संस्थापितों वेदमार्ग ।

शेखीं तो करिती जीविकायोग । स्वर्गभोग वांछिती ॥८४॥

एक म्हणती आम्ही स्वकर्मक । कुश मृत्तिका नाशिती उदक ।

समयीं आलिया याचक । इवलीसी भीक न घालिती ॥८५॥

दांभिक वाढवावया स्फीती । वैष्णवदीक्षा अवलंबिती ।

देवपूजा इळफळीत दाविती । शंख लाविती दों हातीं ॥८६॥

आयुष्यदानी पुण्यपुरुष । आम्ही चिकित्सक अहिंस ।

स्थावर जंगम जीव अशेष । मारूनियां यश मिरविती ॥८७॥

यश वाढवावयाचें कारण । तूळापुरुष करिती दान ।

देहो मूत्रविष्ठें परिपूर्ण । धन त्यासमान जोखिती ॥८८॥

परी परमार्थाचिया चाडा । कोणी वेंचीना कवडा ।

भूल कैशी पडली मूढां । स्वार्थ रोकडा विसरले ॥८९॥

पूर्वीं अदृष्टीं नाहीं प्राप्ती । ते श्रीकामा उपास्ती करिती ।

श्रियेचा स्वामी श्रीपती । त्यातें भजती अभाग्य ॥२९०॥

लक्ष्मी विश्वगुरु हरीची पत्‍नी । तीतें जो तो राखे अभिलाषुनी ।

नेदिती हरीची हरिलागोनी । त्यातें पचनीं हरि पचवी ॥९१॥

रोगत्यागें आयुष्य मागती । यालागीं सविता उपासिती ।

देहो नश्वर हें नाठवे चित्तीं । पडली भ्रांती निजपदा ॥९२॥

एवं आयुष्य-यश-श्रीकामीं । समस्त भजतां देखों आम्ही ।

परी नवल केलें तूवां स्वामी । परब्रह्मीं निजबोधू ॥९३॥

विषयबळ अलोलिक । मिथ्या भ्रमें भ्रमले लोक ।

ज्ञानसाधनें साधोनि देख । विषयसुख वांछिती ॥९४॥

वेदांतवार्तिकवाक्‍स्फूर्ती । अद्वैत ब्रह्म प्रतिपादिती ।

शेखीं पोटासाठीं विकिती । नवल किती सांगावें ॥९५॥

एक म्हणविती योगज्ञानी । वायुधारणा दाविती जनीं ।

टाळी लावूनि बैसती ध्यानीं । जीविका मनीं विषयांची ॥९६॥

ऐसे विविदिष लोक । साधनें साधूनि झाले मूर्ख ।

तूवां केलें जी अलोलिक । आत्मसुख साधिलें ॥९७॥

ऐसें स्वामी अवघूता । तूवां तृणप्राय केलें जीविता ।

तूच्छ करोनि लोकां समस्तां । निजात्महिता मीनलासी ॥९८॥

निजानंदें निवालासी । अंतरी शीतलु झालासी ।

ऐसें दिसताहे आम्हांसी । उपलक्षणेंसी परियेसीं ॥९९॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP