तं लब्ध्वा लुब्धकः क्रूरः कपोतं गृहमेधिनम् ।
कपोतकान्कपोतीं च सिद्धार्थः प्रययौ गृहम् ॥७२॥
जाळीं पडला कपोता दुर्बुद्धी । झाली लुब्धकाची कार्यसिद्धी ।
सहकुटुंब घेऊनि खांदीं । निघे पारधी निजस्थाना ॥२९॥
ऐसा जो कोणी गृहमेधी । त्यासी सर्वथा काळ साधी ।
जैशी कपोत्याची बुद्धी । तैसी सिद्धी गृहमेध्या ॥६३०॥
बाळकांच्या काकुळतीं । मरण पावली कपोती ।
ऐसें देखत देखतां दुर्मती । तेथ निश्चितीं उडी घाली ॥३१॥
यापरी तो कपोता । कुटुंबाची मेधा वाहतां ।
मरण पावला सर्वथा । विवेकु चित्ता न धरीचि ॥३२॥