मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय अठ्ठाविसावा|

एकनाथी भागवत - श्लोक ११ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


आत्माऽव्ययोऽगुणः शुद्धः, स्वयंज्योतिरनावृतः ।

अग्निवद्दारुवदचिद्देहः कस्येह संसृतिः ॥११॥

आत्मा चिद्रूप अविनाशी । गुण निर्गुण नातळे ज्यासी ।

कर्माकर्मपापपुण्यासी । ठाव त्यापाशीं असेना ॥२५॥

परादिवाचा नव्हे उच्चार । यालागीं म्हणिपें ’परात्पर’ ।

प्रक्रुतिगुणीं अविकार । प्रकृतिपर परमात्मा ॥२६॥

जयाच्या स्वप्रकाशदीप्तीं । रविचंद्रादि प्रकशती ।

प्रकाशें प्रकाशे त्रिजगती । तेजोमूर्ती परमात्मा ॥२७॥

ऐशिया आत्म्याच्या ठायीं । भवबंधन न लगे कांहीं ।

सूर्य बुडे मृगजळाच्या डोहीं । तैं आत्म्यासी पाहीं भवबंध ॥२८॥

खद्योततेजें सूर्य जळे । बागुलाभेणें काळ पळे ।

मुंगीचेनि पांखबळें । जैं उडे सगळें आकाश ॥२९॥

वारा आडखुळीला आडीं पडे । जैं थिल्लरामाजीं मेरु बुडे ।

तरी भवबंध आत्म्याकडे । सर्वथा न घडे गोविंदा ॥१३०॥;

देहाकडे भवबंधन । मूर्खही न मानिती जाण ।

देह जड मूढ अज्ञान । त्यासी भवबंधन कदा न घडे ॥३१॥

जैं दगडाचें पोट दुखे । कोरडें काष्ठ चरफडि भुकें ।

तैं देहाकडे यथासुखें । भवबंध हरिखे लागता ॥३२॥

जैं डोंगरासी तरळ भरे । मृत्तिका नाहाणालागीं झुरे ।

कोळसेनि काळें होय अंधारें । तैं भवबंधभारें देह दाटे ॥३३॥;

म्हणसी देहात्मसंगतीं । घडे भवबंधाची प्राप्ती ।

विचारितां तेही अर्थी । न घडे श्रीपति तें ऐक ॥३४॥

आत्मास्वप्रकाश महावन्ही । देह तो जड मूढ काष्ठस्थानीं ।

तो मिळतां आत्ममिळणीं । सांडी जाळूनि तत्काळ ॥३५॥

जैं अग्निमाजीं संवादें । कापूर आठ प्रहर नांदे ।

तैं देहात्मनिजसंबंधें । देह भवबंधें नांदता ॥३६॥

म्हणसी काष्ठामाजीं अग्नि असे । परी तो काष्ठचि होऊनि नसे ।

मथूनि काढिल्या निजप्रकाशें । जाळी अनायासें काष्ठातें ॥३७॥

तेवीं आत्मा देहामाजीं असे । परी तो देहचि होऊनि नसे ।

देहप्रकाशक चिदंशें । भवबंधपिसें त्या न घडे ॥३८॥

आशंका ॥ म्हणशी ’आत्म्याचे निजसंगतीं । जैं जळोनि जाय भूतव्यक्ती ।

तैं भूतांची वर्तती स्थिती । कैशा रीतीं’ तें ऐक ॥३९॥

छायामंडपीं दीप प्रकाशी । नाचवी कागदांच्या बाहुल्यासी ।

तेच लावितां दीपासी । जाळी अनायासीं त्या व्यक्ती ॥१४०॥

तेवीं आत्म्याचे स्वसत्ताशक्तीं । भूतें दैवयोगें वर्तती ।

स्वयंभू झाल्या आत्मस्थिती । भूतव्यक्ती उरेना ॥४१॥

करितां आत्म्याचें अनुसंधान । संसाराचें नुरे भान ।

तेथ भूताकृति भिन्नभिन्न । कैंच्या जाण अतिबद्ध ॥४२॥

यापरी भवबंधन । मज पाहतां मिथ्या जाण ।

भवबंधालागीं स्थान । नेमस्त जाण असेना ॥४३॥

आत्म्याच्या ठायीं ना देहीं । उभयसंबंधींही नाहीं ।

भवबंध मिथ्या पाहीं । त्यासी ठावो कोठेंही असेना ॥४४॥

कोपों नको श्रीकृष्णनाथा । माझेनि निजनिर्धारें पाहतां ।

भवबंध मिथ्या तत्त्वतां । निश्चयें चित्ता मानलें ॥४५॥

ऐकोनि उद्धवाचें वचन । हरिखें वोसंडला श्रीकृष्ण ।

माझा उद्धव झाला सज्ञान । निजात्मखूण पावला ॥४६॥

सत्य मिथ्या भवबंधन । ऐकोनि उद्धवाचें वचन ।

परमानंदें डोले श्रीकृष्ण । जीवें निंबलोण करुं पाहे ॥४७॥;

आत्म्यास भवबंध नाहीं । शेखीं न दिसे देहाच्या ठायीं ।

हा विवेक नेणिजे जिंहीं । त्यासी भवबंध पाहीं हरि सांगे ॥४८॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP