मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय अठ्ठाविसावा|

एकनाथी भागवत - श्लोक १४ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


यथा ह्यप्रतिबुद्धस्य, प्रस्वापो बह्ननर्थभृत् ।

स एव प्रतिबुद्धस्य, न वै मोहाय कल्पते ॥१४॥

सज्ञान आणि अज्ञान । यांसी जें विषयसेवन ।

त्यांचा अनुभव भिन्नभिन्न । तेंही लक्षण अवधारीं ॥१७०॥

जेवीं स्वप्नींची विषयप्राप्ती । स्वप्नस्थ साचचि मानती ।

तेचि विषय जागृतीं स्फुरती । परी सत्यप्रतीति त्यां नाहीं ॥७१॥

तेवीं अज्ञानां विषयसेवन । तेणें विषयासक्त होय मन ।

तेंचि मुक्तांप्रति विषय जाण । मिथ्या दर्शन विषयांचें ॥७२॥

नटनाटय-लोकाचारीं । संपादी स्त्रीपुरुषव्यवहारीं ।

मुक्तासी तैशी परी । गृहदारीं नांदतां ॥७३॥

कां लेंकरांच्या खेळाप्रती । तुळसीदळें घेऊनि हातीं ।

वडे मांडे क्षीर तूप म्हणती। एकीं कल्पिती अनेकत्व ॥७४॥

तेवीं जीवन्मुक्तांसी देख। जगीं विषयो अवघा एक ।

त्यासी नानात्वें भाविती लोक । परी तो अनेक देखेना ॥७५॥

दृढ धरोनि देहाभिमान । ’मी माझें’ जें विषयस्फुरण ।

तेंच भवबंधाचें कारण । विशद श्रीकृष्ण सांगत ॥७६॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP