Dictionaries | References

जोशी

   
Script: Devanagari
See also:  जोसी

जोशी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   An astronomer or astrologer, esp. one by profession. 2 An individual of a class among Shúdras. They are fortune tellers, soothsayers &c. 3 A bird, a sort of crane.

जोशी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  An astronomer or astrologer. An individual of a class of fortunetellers, soothsayers.

जोशी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  पंचांग सांगणे, पत्रिका पाहणे, मुहूर्त काढणे इत्यादी कामे करणारा गावातील मनुष्य   Ex. आम्ही जोश्याकडून सुमुहूर्त काढून आणतो.
SYNONYM:
ग्रामजोशी गामोपाध्याय

जोशी

  पु. १ पंचांग , कुंडल्या समजून गांवांत सांगणारा ; ज्योतिषी ; भविष्य वर्तविणारा ; भिक्षुकी , जोसकी करणारा ब्राह्मण ( विशेषत : धंदेवाईक ); ग्रामजोशी . पूर्वी ही वृत्ति असे व जोशाला गांवांत बलुतें देण्याचीहि वहिवाट असे . २ एक कुणब्यांतील जात ; कुडबुडे जोशी ( कुणब्यांतील ); हे सहदेवी मताचे मुहूर्त , ज्योतिष जाणतात . ३ बगळयाच्या जातींतील एक पक्षी ; कुकुडकुंभा . [ सं . ज्योतिषी ; प्रा . जोइस , जोइसिअ ] जोसकी , जोसपणा , जोसपण - स्त्रीपुन . गांवजोशाची वृत्ति , धंदा , वतन . जोसगंड - पु . जोशास निंदार्थी म्हणतात .

जोशी

   जोशीबोवा कोठें गेले? गोवर्‍या थापत हात गेलें ! कान गेल्‍याला किती दिवस झाले? चारहि उडवे म्‍यांच केले !
   (व.) एका ग्रामजोशाची बायको बहिरी होती व तिला गोवर्‍या थापण्याचा उद्योग असे. एकजण जोशीबोवाकडे काही कामानिमित्त आले, व त्‍यांनी विचारले जोशीबोवा कोठे गेले? बाई गोवर्‍या थापीत होती. ती जोशीबुवांचा पत्ता सांगण्याऐवजी म्‍हणते, गोवर्‍या थापून थापून हात निकामी झाले. या उत्तरावरून त्‍याने विचारले, किती दिवसांपासून तुम्‍ही बहिर्‍या झाला? बाई म्‍हणते, समोरच्या चारहि उडव्यांतील गोवर्‍या मीच आपल्‍या हाताने केल्‍या. बहिरेपणामुळे असा घोटाळा उडाला. विचारावे एक व उत्तर यावे विलक्षणच, अशा स्‍थितीला ही म्‍हण लागते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP