Dictionaries | References न नेमणे Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 नेमणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | verb कामावर वा नोकरीवर घेणे Ex. या कामासाठी आम्ही नुकतीच पाच माणसे नेमली HYPERNYMY:ठेवणे ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:ठेवणे नियुक्त करणेWordnet:asmনিযুক্ত কৰা bdथिसन benনিযুক্ত করা gujનિમણૂક કરવી hinनियुक्त करना kanಭರ್ತಿಮಾಡು kasکٲم دِنۍ kokनियुक्ती करप malജോലി ആരംഭിക്കുക nepनियुक्त गर्नु oriନିଯୁକ୍ତି ଦେବା panਨਿਯੁਕਤ ਕਰਨਾ tamநியமனம்செய் telనియమించు urdمقررکرنا , تقررکرنا , تعینات کرنا , تعین کرنا , کام دینا , بھرتی کرنا , ملازمت دینا see : बनवणे, ठेवणे, नियुक्त करणे Rate this meaning Thank you! 👍 नेमणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स.क्रि. १ लावणे ; ठरविणे ; निश्चित करणे ; स्थापणे ( नियम , रुढी ). तुका म्हणे त्यासी ठाउके उचित । होईल संकेत नेमियेला । - तुगा १०८१ . २ नियोजित करणे ; योजना करणे ( जागेवर , अधिकारावर ); नेमणूक करणे . नेमियेले मज शत्रुजयाला । परि ते गेले सर्व लयाला । - सौभद्र अंक १ . ३ नेम धरणे ; लक्ष्य वेधणे ( बाण इ० नी ). ४ नियम करणे ; ताब्यांत ठेवणे . नमो संतां भक्तां भक्तिणी । जेही भवसागरु उतरुनि । इंद्रियांचे सुख नेमुनि । देवचाराते जितला । - ख्रिपु १ . १ . ६४ [ सं . नि + यम ] नेमणूक - स्त्री . १ वेतन ; पगार ; वेतनाची व्यवस्था . आम्हाला चारशे रुपये नेमणूक झाली आहे . २ सेवेबद्दल किंवा कांही कामगिरीबद्दल सालीना जे नक्त वगैरे पावते ती देणगी . ह्याबद्दल कोणास चाकरी करावी लागते , कोणास लागत नाही . - इनाम ३१ . या नेमणुकीचे पुढील कांही प्रकार आहेत - वर्षासन , बिदागी , अम्मल , इनामी जमीन मोबदला , नुकसानभरपाई , ग्रास , पालखी , पगडी इ० ३ योजना ; नियोजन ; नेमणे ( जागेवर , हुद्यावर ).०बेहडा पु. हुजुराकडून मामलेदाराकडे पाठवावयाचे कागद .- इनाम ४९ . अजमास पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP