Dictionaries | References

आहे

   
Script: Devanagari
See also:  आही

आहे

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   āhē f Poetry for अही q. v. Glow of fire; a blast of hot air &c.

आहे

 क्रि.  ( अस्तित्व दर्शविणारें ) असणें या क्रियापदाचें वर्तमानकाळाचें रुप . आहेआहे नाहीनाही - एखाद्या गोष्टीचें अस्तित्व किंवा व्यवहार ज्या वेळीं क्वचितच असतो किंवा असून नसल्यासारखा असतो त्या वेळीं हा वाक्यप्रचार योजितात . तो आहेआहे नाहींनाहीं . = त्याचें अस्तित्वच भासत नाहीं , त्याला कोण विचारतो ? अशौचामध्यें स्नानसंध्या म्हणजे काय , आहेआहे नाहींनाहीं . [ सं . अस्ति ; प्रा . अत्थि , आथि ]
  स्त्री. ( काव्य )
  स्त्री. ज्वाला ; आंच ; उपद्रव ; उपसर्ग ; पीडा . लागे शोकाग्निची न या आहे . । - मोशल्य १ . २८ . आही पहा .
   ज्वाला ; आग . अही पहा . ( अव . ) आह्या . येती उष्णाच्या आह्या । पायीं लाह्या भाजती । - अमृत ध्रुवच ५ . वियोगाची कोण भोगील आहे । - नरहरि दानव्रत ९८ .
   कांति ; शोभा . रुपाचेनि आहे । ऐरावतु पाणि वाहे । - शिशु ५०८ . [ सं . अहि = सूर्य ; सं . आभा ; प्रा . आहा = कांति ]

आहे

   आहे आहे, नाहीं नाहीं
   आहे म्हटले तर आहे, नाही म्हटले तर नाही. असून नसल्यासारखे असणें
   अल्प अस्तित्व किंवा व्यवहार असणें. ‘अशौचामध्ये स्नानसंध्या म्हणजे काय, आहे०’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP