Dictionaries | References क कांरे भाता थोडा, तर कोंड्यांनी घातला वेढा Script: Devanagari Meaning Related Words कांरे भाता थोडा, तर कोंड्यांनी घातला वेढा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १. भाताच्या दाण्यास वर तूस असते ते जवळजवळ तांदुळाइतकेच असते. त्यामुळे पुष्कळ भात कांडले तरी तूस जाऊन तांदूळ थोडेच होतात. २. भात कांडून त्याचे तांदूळ करतांना काही कोंडा निघतो पण तो वाजवी तितकेच भात कांडले तर योग्य प्रमाणांत निघतोपण जर भात फार कांडले तर तांदूळहि कुटले जाऊन त्यांचा कोंडा होतो व तांदूळ योग्य प्रमाणापेक्षां कमी होतात. तेव्हां कोणतीहि गोष्ट प्रमाणांत न केली तर तीपासून थोडी फार घस लागल्याशिवाय राहात नाही, हे दाखविण्याकरितां ही म्हण योजतात. पूर्वी भात कांडण्याची मजूरी म्हणून कोंडा देत असत, म्हणून कांडपिणी तांदूळ अधिक कांडून कोंडा जास्त करीत असत. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP