Dictionaries | References

झुंज

   
Script: Devanagari
See also:  झुंझ

झुंज

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

झुंज

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

झुंज

 ना.  कलह , झोंबाझोंबी , भांडणे .

झुंज

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  शत्रू, संकट, प्रतिकूलता इत्यादींवर मात करण्यासाठी केला जाणारा प्रयत्न   Ex. तिने मोठ्या धीराने परिस्थितीशी झुंज दिली
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
   see : युद्ध, लढा

झुंज

   नस्त्री . १ लढाई ; युध्द ; रण . बहुतकरूनि कौरव । हे आतुर दु : स्वभाव । वांटिवावीण हांव । बांधिती झुंजीं । - ज्ञा १ . १७२ . २ भांडण ; कलह ; झोंबाझोंबी . [ सं . युध्द ; प्रा . जुज्झ ; सं . युज ; प्रा . जुंज . हिं . जूझ ; आर्मेनियन जिप्सी जुज ] ( वाप्र . ) झुंजणें , झुजणें , झुझणें - १ लढणें ; युध्द करणें . २ हुजत घालणें ; भांडणें . झुंजविणें - १ झुंजण्यास लावणें ; लढविणें . २ भांडणास प्रवृत्त करणें . [ झुंजणें ] कण्या टाकून कोंबडे झुंजविणें , दाणे टाकून कोंबडे झुंजविणें - १ आपल्या गमतीखातर खर्च सोसूनहि लोकांना भांडावयास प्रवृत्त करणें . २ बक्षीस ठेवून त्यासाठीं एखाद्या मंडळांत , जूट असणार्‍या लोकांत भांडण लावणें ; आपल्या समाईक देणगीनें एखाद्या गटांत फूट पाडणें , कलागत लावणें . झुंझात राहणें - लढाईत ठार होणें . झुंझास उभें राहाणें , झुंजास उभें राहाणें - लढाई देणें ; लढाईस सिध्द असणें . मेजवानी म्हणून दहा लक्ष रुपये घेत असल्यास उत्तम , नाहींतर झुंजास उभें राहावें . - भाब ३१ . सामाशब्द - झुंजणार , झुंजणारा - वि . झुंजार ; लढवय्या . सखाराम पानशे परशुराम भाऊ भले झुंजणार । - ऐपो २५५ . झुंजागाळ - स्त्री . ( गो . ) रणभूमि . [ झुंज +( गो . ) गाळ = मैदान ] झुंजा , झुंझा , झुंजार , झुंझार , झुंजार , झुंझाट - स्त्री . १ लढाई ; युध्द ; घनचक्कर . ( क्रि० लागणें ; असणें ; होणें ). २ - वि . लढवय्या ; युध्दविपुण ; रणशूर . धाक घेतला झुंझारीं । केशिक सैन्य पळे दूरी । - एरुस्व १० . ३६ . [ झुंज ] झुंजारराव , झुंझारराव - पु . योध्दयास द्यावयाची एक पदवी ; वीरपुरुष ; शूरबहाद्दर ; रणगाजी . पुण्यांतल्या तरुणांनीं मोठमोठया झुंझाररावांना चकविलें . - इंप १२० . [ झुंजार + राव ] झुंजारी - वि . ( गो . ) अंगाशीं अंग लावून लढणारा ; झुंजार (- वि . ) पहा . [ झुंज ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP