Dictionaries | References

लाहणा

   
Script: Devanagari

लाहणा

  पु. प्राप्ति ; उत्पन्न ; लाभ . म्हणोनि इये अध्यायीनिरुप्य नुरेचि कांही । आतां गुरुशिष्या दोही । स्नेहो लाहणा । - ज्ञा १६ . ४६ . - वि .
   लाभदायक ; नफा देणारा . गुरु उपदेश नाही लाहणा । - दावि १५० .
   प्राप्त होणारा ; मिळणारा . येतुलेनि पंडुसुता । अनुभव लाहाणा आयिता । - ज्ञा १३ . १०४८ .
   आवडता ; स्वाधीन . एवं भाविकू देवाचा लाहणा - एभा २५ . ६२० . [ सं . लाभ ; प्रा . लाह ] लाहणी - स्त्री . प्राप्ति ; लाभ . परि समयी झाली सुदैव गति लाहणी । - राला १० . लाहणे - अक्रि .
   प्राप्त होणे ; मिळणे ( नफा , लाभ म्हणून ). - ज्ञा १ . ७७ . तुजदेखत मी जयासि लाहेन । - मोकर्ण ३४ . २६ .
   लाभणे . लाधणे पहा . मेलाचि मरोनि लाहे । गेलाचि जावोनि लाहे । कर्मवशे ।
   उत्पन्न होणे ; फळ मिळणे . जैसे पेरिले लाहणे । - कृमरा ४२ . ५८ . लाहोनि इच्छेसारिखे फळ । - मुआदि ३ . ७२ .
   धजणे ; धैर्य करणे . परि अपराधु तो आणीक आहेजे मी गीतार्थु कवळुं पाहे । ते अवधारा विनवूं लाहे । म्हणऊनियां । - ज्ञा १ . ६६ .
   शेवट होणे ; फळ मिळणे ; परिणामी हाती येणे . नातरी जैसे तोयसाखर घालितां गुळचट होय ।लवण मिळवितां पाहे । क्षारत्व आहे तात्काळ । [ सं . लभ ; त्रा . लह ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP