|
पु. १ सतत वास , लक्ष , व्यग्र असणे ; एकासारखे व्यापृत , उद्योगांत निमग्न असणे . ' तनु धन विषयाचा । सर्व जो जो पसारा । अनृतचि परि माझा । त्यामध्ये व्याप सारा । २ प्रापंचिक उद्योग व त्रास ; आयुष्यातील हालअपेष्टा , कष्ट , इ० . ३ पसारा ; विस्तार ; मोठा व्यवहार . जितका व्याप तितुके वैभव । - दा १४ . ६ . २६ . ४ उदव्याप . [ सं . वि + आप ] म्ह० - व्याप तितका संताप . व्यापक - वि . १ व्यापणारा ; आच्छादणारा ; सर्व विस्तार आपल्यांत घेणारा . २ पूर्णपणे भेदणारा व आक्रमणारा . ३ अंतर्भाव , समावेश करणारा ; सर्व पोटांत घेणारा . मनुष्यत्व जाति ब्राह्मणत्वजातिपेक्षां व्यापक . ४ पसरणारा ; विस्तार पावणारा . ५ मोठया , उदार विचाराचा ( माणूस ). तेथे भले आडळती । व्यापक तेहि कळो येती । - दा १९ . २ . २१ . व्यापणे - उक्रि . आच्छादणे ; पोटांत घेणे ; समाविष्ट करणे ( ल . व शब्दाशः ) - अक्रि . १ पसरणे ; व्यापृत होणे . २ भिनणे ; फैलावणे ( विषादि अंगांत ). विष जो सर्वांगी व्यापले नाही तोपर्यंत उपाय चालतो . व्यापन - न . १ आक्रमण ; प्रसरण . २ समावेशन ; व्यापण्याचा व्यापार . [ सं . ] व्यापी - वि . व्यापणारा ; पसरणारा ; समावेश करणारा . ( समासांत उपयोग ) जगदव्यापी ; सर्वव्यापी . व्याप्त , व्यापित - वि . १ व्यापलेला ; आच्छादलेला ; समाविष्ट केलेला . २ जिरलेला ; मुरलेला . ३ परिपूर्ण ; भरलेले . ४ लब्ध ; प्राप्त . व्याप्ति - स्त्री . १ आक्रमण ; सर्वत्र विद्यमानता . २ विश्वव्यापकता ; शिवादि देवतेचे एक अभिधान . ३ ( सामा . ) विस्तार ; पसारा ; व्याप . देखे हे शब्दाची व्याप्ति । - ज्ञा २ . ११४ . ४ प्राप्ति ; मिळकत . ५ ( शाप . ) वर्गीकरण ; विभागणी . ६ ( शाप . ) स्थान ; अस्तिवाचे , मिळाण्याचे ठिकाण . - सेंपू १ . ६३ . ७ ( तर्कशास्त्र ) निकट व अविभाज्य साहचर्य ; निश्चित अनुमानकारण . अग्नीची व्याप्ति धूमावर . ( धुरामध्ये अग्नीचा समावेश असतोच , तेव्हां अग्नीच्या अस्तित्वाचे अनुमान निश्चित ). व्याप्य - वि . १ व्यापावयाचे किंवा व्यापलेले ; आक्रमित . २ समाविष्ट व्हावयाचे किंवा झालेले ; अंतर्भूत . ३ ( तर्कशास्त्र ) अनुमानविषय असलेले . ०कोटि स्त्री. अंतर्भूतवर्ग ; गौण , पोटविषय , वर्ग . व्याप्यकोटि - प्रविष्ट - अंतर्गत इ० समास . ०वृत्ति स्त्री. ( तर्क . ) निरंतर साहचर्य . व्यापन . - वि . नेहमी बरोबर , चिकटून असणारे ; अंतर्वती , अनुषक्त असणारे . ०व्यापक पु. एक व्याप्य आणि एक व्यापक असा भयतांचा संबंध . भाव पु. एक व्याप्य आणि एक व्यापक असा भयतांचा संबंध .
|