Dictionaries | References

न्हाणी

   
Script: Devanagari
See also:  न्हाण , न्हाणघर , न्हाणवणी , न्हाणवर , न्हाणुली , न्हाणें , न्हातीधुती , न्हावणी

न्हाणी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

न्हाणी

  स्त्री. स्नानगृह . जेथे असे रत्न जडीत न्हाणी । - सारुह ६ . १८ . [ सं . स्नान ] ( वाप्र . ) न्हाणी पाह्यला विटाळ येणे - ( बायकी ) बाळंतीण झाल्यावर पहिल्या तीन महिन्यांच्या आतच बाहेरची होणे . न्हाणी पाह्यला साप येणे - ( गर्भवती स्त्रीने साप पाहिल्यास त्याचे डोळे जातात अशा समजुतीवरुन ) बाळंतिणीचे न्हाणीत साप निघणे ( असा साप आला म्हणजे त्याची गेलेली दृष्टि फिरुन येते म्हणतात . ) न्हाणीचा चौक - पु . ( बायकी ) लग्नमुंजीत न्हाण्यासाठी चार पाट मांडून त्यांचे चारही बाजूस चार भांडी रंग घालून , ठेवून प्रारंभी एका भांड्यास सूत गुंडाळून चारी पाटाभोंवती त्या भांड्याच्या भोवती तीन वेळां सूत गुंडाळून केलेला चौक . न्हाणीपूजन - न . ( बायकी ) प्रसूत झाल्यापासून तिसरे दिवशी बाळंतिणीकडून न्हाणीची पूजा करुन भिजवलेल्या हरभर्‍यानी ओटी भरुन मग न्हाणीवर पांढर्‍या चाफ्याची पाने व हरळी वाहतात तो विधि .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP