|
पु. एक अंत्यज , अस्पृश्य जाति ; अतिशूद्र ; परवारी पहा . [ सं . महा + अरि किंवा आर्य ; महा + अर ( पर्वताच्या गुहेंत राहणारा ); मृत + हर = मेलेलें जनावर ओढणारा ; मेर = गांवाची कड ? ] म्ह० महाराची आई चांभार घेऊ ( मला काय त्याचें ). ०कचका पु. जोराजोराचें , आरडाओरड्याचें भांडण ( महार नेहमीं भांडतात त्याप्रमाणें ). ०कवडी स्त्री. एक जातीची कवडी . ०कावळा पु. डोंबकावळा . ०की स्त्री. गांवच्या महाराचें काम , हक्क , वतन , अधिकार . ( ल . ) कोणतेंहि हलकें , नीच , कष्टाचें कामं . ०गजाल स्त्री. गडबड ; गोंगाट ; दंगल ; आरडाओरड . ०चावडी स्त्री. अस्पृश्यांना गांवच्या चावडींत येऊन बसतां येत नाहीं म्हणून बहुतेक खेड्यांत गांवचावडीखेरीज दुसरी एक चावडी असते ती . - गांगा ५५ . ०पुंज पु. शेतकर्यांनीं आपल्या उत्पन्नांतील जो भाग गांवच्या महाराचा हक्क म्हणून सरकारांत भरावयाचा तो . ०पोर पु न . गांवांतील हलक्या जातीचे लोक ०पोरगा पु. पागेमध्यें घोड्याची नोकरी करण्यासाठीं ठेवलेला महारजातीचा मनुष्य . ०भादवी स्त्री. भाद्रपद महिन्यांत देवीच्या यात्रेकरितां येणारा खर्च भागावा म्हणून महाराला जमिनीच्या उत्पन्नापैकीं द्यावयाचा भाग , किंवा कांहीं देणगी . ०महारकी स्त्री ; महाराच्या इनामजमिनीवरील कर . वडा , वाडा , वण पुन . महार लोकांची राहण्याची जागा . ( ल . ) सोंवळ्याओवळ्यासंबंधानें अतिशय अव्यवस्था त्याचे घरीं सारा महारवाडा आहे . मी कांहीं जेवावयास जात नाहीं . म्ह० जेथें गांव तेथें मंहारवडा . ०शिसोळा हडोळा हळकी रहाटी - पुस्त्री . गांवचीं मेलेलीं गुरें टाकण्यासाठीं महाराला नेमून दिलेली जागा . महारडा - पु . ( तिरस्कारार्गी ) महार . महारवी - वि . महार लोकांनीं तयार केलेली . ( टोपली , केरसुणी , सूत इ० ).
|