मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीब्रह्मचैतन्य महाराज वरित्र|
एकुणसाठावे वर्ष

श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - एकुणसाठावे वर्ष

आनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.


१९०४
"घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो."
श्री. भाऊसाहेब केतकर श्रींना गदगला भेटले व त्यांच्याशी बोलणे झाल्याप्रमाणे त्यांनी सर्व भार मनोमन श्रींवर टाकला. त्यावेळी भाऊसाहेबांचे तृतीय चिरंजीव रामचंद्र ऊर्फ तात्या यांचे लग्न सांगलीचे श्रीमंत व सज्जन गृहस्थ श्री. गोखले यांच्या द्वितीय कन्येशी ठरले. श्रींनी मुलीला पसंत केले. सकाळचा मुहूर्त ठरला. पण श्री सकाळीच आपल्या खोलीमध्ये जाऊन निजले. लग्नाची वेळ जवळ येत चालली, पण लग्नाची काहीच हालचाल दिसेना, तेव्हा भाऊसाहेब म्हणाले, " श्री उठल्याशिवाय लग्न लागणार नाही व कोणी त्यांना उठवणार नाही." मुहूर्त टळला, तेव्हा भाऊसाहेब, गोखले यांना म्हणाले, "आपणास पसंत नसेल तर योग्य दिसेल तसे आपण कर. मला त्याचे वाईट वाटणार नाही. " गोखल्यांनी मुलगी भाऊसाहेबांच्याच घरात देण्याचे ठरवल्याने सर्वजण श्रींच्या उठण्याची वाट पहात स्वस्थ बसले. संध्याकाळी ७ वाजून गेल्यावर श्री खोलीतून बाहेर आले व म्हणाले,"भाऊसाहेब, आपल्या घरी लग्न आहे ना  ? तुम्ही मला कसे उठवले नाही, बरे, आता लवकर आटपा.नवर्‍या मुलासाठी श्रींचा बत्ताशा घोडा शृंगारुन आणला. तात्यांना घोड्यावर बसवले, श्रींनी स्वत: लगाम धरला. धार्मिक विधी उरकायला रात्रीचे १२ वाजले. (ती"अमृतवेळ" होती असे ज्योतिषांनी नंतर सांगितले.) याप्रमाणे ९ मार्च १९०४ (फाल्गुन वद्य अष्टमी शके १८२५) रोजी लग्न लागले. लग्नानंतर भाऊसाहेबांनी पेन्शन घेतले व सहकुटुंब गोंदवल्यास येऊन राहिले.श्रींच्याकडे अक्षरश: हजारो लोक येऊन जात. श्रींच्या पुढे किंवा रामाच्या पुढे अनेक लोक पैसे, फळे, वस्त्रे, दागिने, ग्रंथ वगैरे ठेवत. श्री लगेच त्या वस्तू, कोणाला तरी वाटून टाकीत. आईसाहेबांपुढे आलेल्या वस्तू, वस्त्रे त्या सांभाळून ठेवीत. या वस्तूंनी आईसाहेबांच्या दोन ट्रंका भराव्या. श्रींच्या ही गोष्ट लक्षात आली. ते एकदोनदा म्हणाले," लोक जसे आपल्याला आपण व मागता देतात तसे आपण देखील आप्त-इष्टांना व गरीब लोकांना ते मागत नसता आपल्याजवळच्या वस्तू द्याव्या." पुढे काही दिवसांनी आईसाहेबांना सपाटून ताप आला, खोकला झाला. त्यांची अवस्था कठीण झाली. तेव्हा श्रींनी त्यांना रामाचे तीर्थ पाजले व नंतर खाली घोंगडीवर निजविले व म्हणाले, "हे बघ, आता तुझा नेम नाही. तू तुझ्याजवळ जे साठवून ठेवले आहेस ते गरीब स्त्री-पुरुषांना दान देऊन टाक."लगेच श्रींनी भटजींकडून संकल्प सांगून आईसाहेबांच्या हातून उकद सोडविले. ट्रंकेतील साठविलेल्या सर्व वस्तू श्रींनी स्वत: गरीब सुवासिनींना वाटून टाकल्या. अंगावरच्या वस्त्रशिवाय काही शिल्लक ठेवले नाही. काही वेळाने आईसाहेबांना मोठी ओकारी येऊन खूप कफ पडला, घाम येऊन ताप कमी झाला. काही दिवसांनी त्यांची तब्येत पूर्णपणे सुधारली. श्री म्हणाले, "जगामध्ये घडणारे सर्व अपमृत्यू टाळता येण्यासारखे असतात, त्याला २/३ उपाय आहेत. एक उपाय म्हणजे मरणोन्मुख माणसावरुन लहान मूल ओवाळून टाकतात, याने तो मनुष्य जगतो पण मूल मरते. हा अघोरी उपाय आहे. द्सरा उपाय म्हणजे मरणार्‍या माणसासाठी इतर कोणी अगदी मनापासून तयार मरायला होणे. उदा. मुलासाठी आई किंवा नवर्‍यासाठी बायको किंवा मालकासाठी नोकर आपला प्राण देतात. हा उपाय म्हणजे खरा, पण इतके प्रेम सहसा आढळत नाही. तिसरा उपाय म्हणजे आपल्या देहासकट सर्वस्वाचे दान करणे. घर-दार, पैसा-अडका, भांडी-कुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पण करणे. यामुळे अपमृत्यू टळू शकतो. कर्नाटकातील चिंतामणी भट या नावाचा एक सात्त्विक दशग्रंथी वैदिक विप्र होता. त्याला भयंकर पोटदुखी होती. थोडेसे अन्न खाल्ले तरी प्राणांतिक वेदना होत.अनेक औषधे, काढे वगैरे घेऊन पाहिले. पण त्यांचा काही उपयोग झाला नाही. श्रींचे नाग ऐकून तो गोंदवल्यास आला. त्या दिवशी कोणीतरी रामाला नैवेद्य केला असल्याने जेवणास उशीर झाला होता. चिंतामणी भटजी आल्याबरोबर श्रींच्या दर्शनास आले. त्यावर श्री म्हणाले, " चला लवकर स्नान करुन पानावर बसा" त्यावर भटजी म्हणाले, " अन्नाशी माझे वैर आहे, अन्नाने मला प्राणांतिक वेदना होतात." त्यावर श्री म्हणाले,"हे माझ्या घरचे अन्न नाही. हा रामाचा प्रसाद आहे, तुम्ही पोटभर जेवा, भिऊ नका." त्याप्रमाणे भटजी भीत भीत पोटभर जेवले. काय होईल ते होईल. मेलो तर साधूजवळ मरेन. श्रींनी आग्रह करुन त्याला पोटभर जेवायला घातले. पोट दुखण्याची वाट पाहणार्‍या भटजींची पोटदुखी त्या दिवसापासून कायमची थांबली.

N/A

References : N/A
Last Updated : February 05, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP