आरती - आरती दुसरी
श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.
जयदेवी जयदेवी जयजय एकविरे
श्रीरेणुके जननी जय जगदोद्धारे ॥ जयजय० ॥धृ०॥
आदि नमोस्तुते सकळारंभे आनंते ।
जय उदयोस्तु नारायणि श्रीभगवंते ।
जय जगदंबे ! अंबे ! परम कृपावंते ।
जय षडगुणैश्वर्यालंकृत श्रीमंते ॥ जय० १॥
श्रीमृगराजाचल मुळपीठासन मूर्ती ।
सतत विराजे गाजे दिग्मंडलीं कीर्ती ।
न्हाणिति नित्य सरस्वती यमुना भागिरथी ।
सुरवर मुनिजन भावें, पुजनार्चन करिती ॥ जय० २॥
मुगुट कुंडलें मंडित पीतांबर पिवळा ।
कुंकुम कज्जल केशर उटि कंकणमाळा ।
कनक - स्तंभ - मय - मंडपिं शोभे वेल्हाळा ।
त्रिकाळ होतसे मंगळ भुवनीं सुखसोहळा ॥ जय० ३॥
घालुनि रांगुळी उजळुनि धुपदिप सुगंधी ।
सुवर्णपात्रीं पंचामृत क्षिर बासुंदी ।
वरणभात घृत पापड दळ बेसन बुंदी ।
प्रार्थितों स्वस्थआनंदें जेवी आनंदी ॥ जय० ४॥
फल तांबूल दक्षिणा, सुभूषण सुमनें ।
भरली ओटी मौक्तिक माणिक मणि सुमनें ।
करुनि आरती वाहिली पुष्पांजली सुमनें ।
विष्णुदास म्हणे करि पूर्णार्चन सुमनें ॥ जय० ५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP