आरती - आरती नववी

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


जय जय ब्रह्मविलासी, श्रीमृगराजाचलरहिवासी, हो
दर्शनमात्रें देसी अंबे, शिवपण सहज जिवासी हो ॥धृ०॥
तूं आदिमाय, भवानी, श्रीमुळपीठाची जगदंबा, हो
आइ भार्गवरामाची, मुनि जमदग्नीची वल्लभा हो
भगिनी श्रीकृष्णाची, तूं यशोदेच्या आलिस गर्भा हो
दुर्धर खळ मर्दिले सह महिषासुर, शुंभ, निशुंभा, हो
होउनिया भिल्लीणी त्वां भुलविलें महादेवासी हो ॥ जय जय० ॥१॥
कामधेनु, चिंतामणि आंगणिं कल्पवृक्ष डोलती हो
पुष्पलता घन शोभति, चंपक, बिल्व, कुंद, मालती, हो
हंस, केकी, शुक, कोकील पक्षी ‘ अंब, अंब ’ बोलती हो
पंचवदन एकानन तुझिया आज्ञेनें चालती हो
दोघे तळिवर बसले, दोघे भ्रमती नित्य प्रवासी हो ॥ जय जय० ॥२॥
कटिं कर ठेवुनि उभी राहुनि श्रमलिस भीमातटीं हो
विश्रांतिस्तव येथें येउनि बसलिस या मुळपीठीं हो
दशशतमुखमंचकिं तूं निजलिस क्षिरसागरपोटीं हो
कोठें भक्षिसि बोरें, पोहे, तक्र, भाजि, कणि, रोटी, हो
तूं गुरु, जननी, जनकचि, दुर्गम अगम - निगम प्रणवासी हो ॥ जय जय० ॥३॥
जो करि आवडा - निवडी त्यावरि दृष्टि सदा वांकडी हो
नेसुनि पिवळी साडी, घालुनि केकत मुद राख डो हो
येउनिया तांतडी दाखवी पदपंकज पलघडीं हो
पुरवावी आवडी विष्णुस्वामीची येवढी हो
अवगुण कांहीं न पहातां पावुनि अपुल्या ये नांवासी हो ॥ जय जय० ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP