आरती - आरती दहावी
श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.
( चाल : इस तनधनकी. )
जय जय रेणूके आइ, जगदंबे । ओवाळुं आरति मंगळारंभे ॥धृ०॥
शुभ मंगलोत्सव मंगळवारीं
मंगळ वाजंत्रि वाजति द्वारीं
मंगळकृतजागर समारंभें ॥१॥
मंगल मंडपिं तूं राजबाळा
शोभति मौक्तिक नक्षत्रमाळा
भरजरि झालर नारळ आंबे ॥२॥
भडक पितांबर, कंचुकि पिवळी
नवरत्नें माणिक - मणि - मोतीं - पवळी
तळपति रविशशिंचीं प्रतिबिंबें ॥३॥
कुंकुम कंकणालंकृत वायन
चंदनचर्चन, अर्चन, गायन
उतरति नरनारि तुज लोणलिंबें ॥४॥
आदिमूळ माये, तूं विश्वाची राणी
लावण्यरुप सौभाग्यशिराणी
पहातां तुज देहभान विसंबे ॥५॥
जाहलि दुर्लभ भेट आनंदें
पाहिलिं विमल हीं चरणारविंदें
मन विष्णुदासाचें विरो अविलंबें ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP