आरती - सदगुरुनाथाची

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


( चाल - सदर )
श्रीसदगुरु नरहरीराया । आरती ओवाळूं सदया ॥ध्रु०॥
श्रीपुरुषोत्तम गुरुचरणीं । रतला भृंग जसा नलिनीं ॥
बहूविध दृढसेवा करुनी । जाहला मान्य सर्व भुवनीं ॥
( चाल ) नराचा नारायण झाला । परी सेवाचि, गुरुची साची,
परि न वर याची । किती वानुं मी तुझ्या विनया ॥ आरती० ॥१॥
रेणुका मातेची सेवा । अपूर्ण राहिली कीं तेव्हां । ती ते
पूर्ण करायाला । भार्गवरामचि अवतरला ॥ चाल शिष्यसमुदायीं
बहु शोभे । अमरीं कीं इंद्र नागीं नागेंद्र उड्डुगणी
चंद्र, उद्धरी जन या कलि समया ॥ आरती० ॥२॥
कामक्रोध दास होती । नामें मदमत्सर पळती । लोभ मोहाची तीच
गती । जीवन्मुक्तची तो जगतीं ॥ ( चाल ) प्रेमें वासुदेव चरणीं ।
करितसें नमन, प्रपंचीं न मन, विषय तें वमन, वाटे झाली गुरुचि
दया, आरती आवाळुं सदया ॥ आरती० ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP